Thursday 26 January 2017

जपानी H T V-6 कार्गोशिप 27 जानेवारीला पृथ्वीवर परतणार


                                                 Japanese H T V-6                                                       फोटो -नासा संस्था 

 नासा संस्था -  24  जानेवारी
नासाच्या अंतराळ मोहीम 50 च्या अंतराळवीरांनी जपानच्या H T V-6 ह्या कार्गोशिपचे चेकिंग पूर्ण केले असून आता शुक्रवारी अंतराळ स्थानकातून हे कार्गोशिप पृथ्वीकडे येण्यासाठी उड्डाण करेल
अंतराळवीरांना लागणारे 4.5 tan वजनाचे स्थानकात सुरु असलेल्या संशोधनासाठीचे आवश्यक साहित्य,इंधन व पाणी घेऊन H T V-6 हे कार्गोशिप पृथ्वीवरून सहा आठवड्यापूर्वी अंतराळस्थानकात गेले होते अंतराळ वीरांनी नुकतेच स्पेसवॉक करून बसवलेले अडाप्टर व नवीन बॅटरीज देखील ह्याच कार्गोशिप मधून पाठवण्यात आल्या होत्या
H T V-6  कार्गोशिप पृथ्वीच्या कक्षेत शिरून पॅसिफिक महासागराच्या वर पोहचताच पेट घेईल व त्या नंतर ते नष्ट केल्या जाईल
ह्या मोहिमेचे कमांडर Shane Kimbrough व फ्लाईट इंजिनीअर Thomas Pesquet  ह्या दोघांच्या देखरेखीखाली
H T V-6 ह्या कार्गोशिपच्या release चे काम पूर्ण केल्या जाईल ह्या घटनेचे थेट प्रक्षेपण नासा T.V. वरून केल्या जाणार आहे
नासाच्या अंतराळवीरांनी तिथे सुरु असलेल्या संशोधनांतर्गत कमी गुरुत्वाकर्षणाचा मानवी डोळ्यावर व दृष्टीवर काय परिणाम होतो हे जाणुन घेण्यासाठी त्यांच्या डोळ्याचे चेकिंग केले त्या साठी आवश्यक असलेले Optometry Instrument आधीच अंतराळ स्थानकात पाठवले होते ह्या Instrument च्या साहाय्याने डोळ्याच्या रेटिना व आतील भागाचे निरीक्षण करता येते

            अंतराळ स्थानकात Peggy Whitson आपल्या डोळ्याचे चेकिंग करताना                  फोटो -नासा संस्था




No comments:

Post a Comment