Thursday 9 February 2017

अंतराळ वीरांनी घेतला स्थानकात उगवलेल्या शेवटच्या लेट्युसच्या पानांचा आस्वाद

नासा संस्था -
सद्याच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough ह्यांनी नुकतेच वर्षाच्या शेवटी Veg-3 ह्या प्रोजेक्ट अंतर्गत स्थानकात उगवलेली लेट्युसची लाल पाने तोडली व अंतराळवीरांच्या जेवणात लेट्युसचा समावेश करून ह्या भाजीचा आस्वादही घेतला हि पाने स्थानकातील कृत्रिम बागेत तिसऱयांदा उगवली होती आता मात्र हि रोपे काढावी लागली त्या मुळे Veg -3 ह्या प्रोजेक्ट आता संपुष्टात आला.

     नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough  स्थानकातील लेट्युसची ताजी पाने तोडताना -फोटो -नासा संस्था

मागच्या वर्षी नासाच्या अंतराळवीरांनी अंतराळस्थानकात Veggie प्रोजेक्ट अंतर्गत झिनिया व लेट्युसची यशस्वी लागवड केली होती अंतराळवीर स्कॉट केली ह्यांनी हा प्रोजेक्ट यशस्वी करत ह्या लेट्युसच्या भाजीचा आस्वादही घेतला स्कॉट केली ह्यांनी पृथ्वीवासीयांना ह्या ताज्या झिनियाच्या फुलांचे आणि लेट्युसच्या पानांचे छायाचित्र पाहण्यासाठी त्वरित उपलब्धही केले होते

        अंतराळ स्थानकात फेब्रुवारी2016 मध्ये उगवलेली झिनियाची फुले    फोटो -अंतराळवीर - स्कॉट केली

अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना सध्या केमिकल प्रक्रिया केलेले पॅकबंद अन्न व भाजी पाठविल्या जाते पण जर ह्या अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकातच भाजी व फुले ह्यांची लागवड केली तर तिथल्या रुक्ष वातावरणात अंतराळवीरांना gardening चा आनंदहि मिळेल आणि ताजी भाजीही खायला मिळेल ह्या हेतूने Veg -3 हा प्रोजेक्ट राबवला गेला आणि तो यशस्वीही झाला ह्या Veggie प्रोजेक्ट मध्ये मॉड्युलर सिस्टिम वापरून वाफारे तयार केले गेले आणि रोपांची लागवड करून त्यांना special light effect व nutrients पुरवले गेले ह्या प्रयोगाद्वारे अंतराळ स्थानकातील सूक्ष्म वातावरणात हि रोपे कशी वाढतात ह्याचे निरीक्षण केले गेले
अंतराळातील दूरवरच्या मोहिमेत जास्त दिवस अंतराळस्थानकात राहण्यासाठी हा Veggie प्रोजेक्ट उपयुक्त ठरेल अशी आशा आता शास्त्रज्ञांना वाटतेय शिवाय पृथ्वीवर सुद्धा कमी जागेत कमी साधने वापरून अशी शेती करता येऊ शकते हे शास्त्रज्ञांनी  ह्या प्रयोगाद्वारे सिद्ध केले आहे ह्या आधीही अंतराळ स्थानकात लेट्युसची व फुलांची लागवड करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment