Monday 27 February 2017

नासाच्या शास्त्रज्ञांनी शोधली आपल्या सौरमालेबाहेरील ब्रह्मांडातील सप्तग्रह सौरमाला


           नासाच्या शास्त्रज्ञांनी शोधलेला TRAPPIST -1 ह्या ग्रहमालेतील ग्रहावरील संभावित खडकाळ भाग
                                                                                                                       फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 22  फेब्रुवारी                                                                  
शास्त्रज्ञानी आजवर अनेक अकल्पित आणि अशक्य असलेले नवनवीन शोध आपली कुशाग्र बुद्धी व आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीन लाऊन सारया जगाला अचंबित केलय भारताच्या ISRO नेही नुकतेच एकत्रित 104 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करून वैज्ञानिक क्रांती केलीय
आणि आता नासाच्या शास्त्रज्ञांनी Spitzer ह्या दुर्बिणीच्या साहाय्याने एका तारयाचा आणि त्या भोवती फिरणारया पृथ्वीसारख्याच भासणाऱया सात ग्रहांचा शोध लावला आहे हे नवे संशोधन बुधवारी 22 फेब्रुवारीला Nature ह्या Journal मध्ये प्रकाशित झाले ह्या ग्रहमालेला TRAPPIST-1 असे नाव देण्यात आले आहे
गेली कित्येक वर्ष शास्त्रज्ञ सतत ब्रह्मांडात आपल्यासारखी सौरमाला आणि पृथ्वीसारखी जीवसृष्ठी अस्तित्वात आहे का? की आपण विश्वात एकटेच आहोत? ह्याचा शोध घेत आहेत आपल्या सौरमालेतील एक,एक ग्रह सर करून आता त्यांचे संशोधन ब्रह्मांडातील पृथ्वीसारख्या सजीव सृष्ठी पर्यंत पोहोचले आहे
हि सौरमाला पृथ्वीपासून 40 प्रकाशवर्षे दूर असून कुंभ राशीत आहे पण आपल्या ग्रहमालेच्या बाहेर असल्यामुळे ह्या ग्रहमालेला शास्त्रज्ञ exoplanet असे म्हणतात
हे सात ग्रह पृथ्वीच्या आकाराचे आहेत आणि पृथ्वीसारखेच वातावरण असल्यामुळे तिथे सजीव सृष्टी असण्याची शक्यता आहे ह्या सातही ग्रहावर पाणी असण्याची शक्यता असली तरी खात्री नाही पण त्यातील तीन ग्रहांवर मात्र नक्की पाणी असेल आणि पाणी आहे म्हणजे जीवसृष्टीही अस्तित्वात असेलच असा अंदाज शास्त्रज्ञ व्यक्त करत आहेत ह्या नव्या शोधाने शास्त्रज्ञांच्या आशा पल्लवित झाल्या असून नासाच्या वॉशिंग्टन येथील एजन्सीचे Administrator ,Thomas Zurbuch म्हणतात, पृथीसारख्या सात ग्रहांचा शोध एकदम लागणे आश्चर्यकारक असून हे यश निश्चितच वैज्ञानिक विश्वातले आपल्या ध्येयाकडे पडणारे कौतुकास्पद पुढचे पाऊल आहे
TRAPPIST ह्या दुर्बिणीच्या साहाय्याने मे 2016 मध्ये शास्त्रज्ञांनी पृथ्वीसारख्या तीन ग्रहांचा शोध लावून तिथे जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तवली होती आता एक तारा आणि त्या भोवती फिरणारे सात ग्रह सापडले आहेत शास्त्रज्ञांनी वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार ह्या ग्रहांचा आकार आणि वस्तुमान पृथ्वीप्रमाणेच असून हे ग्रह खडकाळ आहेत आणखी सखोल संशोधन केल्यानंतर तिथे पाण्याचा साठा आहे का ? तिथे पाणी वाहात होते का? किंवा पाणी असल्याचा ठोस पुरावा मिळेल
ताऱयापासून दूरवर असलेल्या सातव्या ग्रहाच्या वस्तुमानाचा अंदाज मात्र अजून लागायचा असून तिथे बर्फ़ाळ वातावरण असेल अशी शक्यता त्यांना वाटतेय

                    विश्वातील TRAPPIST-1 ह्या सप्तग्रह मालिकेतील हे सात ग्रह व तारा  फोटो -नासा संस्था

ह्या ग्रहमालेतील मुख्य तारा हा सूर्याप्रमाणे प्रखर उष्ण व मोठा नसून लहान आकाराचा मंद व थंड आहे त्या मुळे त्याच्या भोवती फिरणारया ग्रहांवरही त्याचा कमी प्रकाश परावर्तित होतो
ह्या सौरमालेतील पहिला ग्रह हा मुख्य तारयाच्या अत्यंत जवळून फिरतो ह्या सगळ्याच ग्रहांची कक्षा कमी असून सूर्य आणि बुध ह्या ग्रहाच्या कक्षेपेक्षाहि कमी आहे हे सात ग्रह कमी कक्षेत फिरतात त्यांचे एकमेकापासूनचे अंतरही इतके कमी आहे कि,एका ग्रहावरून दुसरया ग्रहाची वैशिष्ठे पाहता येतील ह्या ग्रहांची स्वतः भोवती फिरण्याची वेळ आणि त्याच्या ताऱ्याभोवती फिरण्याची वेळ सारखीच असल्यामुळे ह्या ग्रहांची स्थिती टायडल लॉक्ड आहे ह्या परिस्थितीत तिथे ग्रहाची एकच बाजू सतत सूर्याकडे असल्यामुळे तिथे नेहमीच एक बाजू अंधारात तर दुसरी उजेडात असण्याची शक्यता आहे म्हणजे एका भागात कायम दिवस तर दुसरया भागात कायम रात्र असेल तिथले ऋतुमानही पृथ्वीपेक्षा वेगळे असेल कदाचित तिथे वादळी वारा तुफान वेगाने वाहात असेल आणि तिथले तापमानही अत्युच्च असेल म्हणजे टोकाची उष्णता किंवा थंडी असेल
Spitzer हि दुर्बीण अवकाशात असून TRAPPIST-1 ह्या ग्रहमालेच्या निरीक्षणासाठी अतिशय उपयुक्त आहे Spitzer च्या साहाय्याने लागलेला गेल्या चौदा वर्षाच्या कार्यकाळातील हा सगळ्यात रोमांचकारी शोध आहे ह्या दुर्बिणीच्या साहाय्याने आणखी सखोल निरीक्षण आणि संशोधन केल्या जाईल
शिवाय 2018 मध्ये James Web Telescope च्या साहाय्यानेही आणखी संशोधन केल्या जाईल त्या मुळे तिथे पाणी Methane,Oxygen ,ओझोन व तेथील वातावरणातील इतर घटक ह्यांचे संशोधन केल्या जाईल शिवाय वातावरणातील दाब व तापमान जाणून घेतल्या जाईल ह्या माहितीमुळे भविष्यात तिथे मानव निवास करू शकेल का? ह्यावरही संशोधन केल्या जाईल शिवाय ह्या दुर्बिणीमुळे विश्वातील आणखी गुपिते उलगडण्यास मदत होईल ह्या ग्रहमालेच्या शोधानंतर नासाने जीवसृष्टी असणाऱ्या आणखी चार ग्रहांवर लक्ष केंद्रित केले असून तेथे हायड्रोजन चा प्रभाव असणारया वातावरणाची शक्यता पडताळून पाहिली जाईल
आता पर्यंत नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी विश्वातील 3500 ग्रहांचा शोध लावला आहे पण अजूनही मानवी निवासासाठी योग्य ग्रह सापडला नाही

No comments:

Post a Comment