ब्रामांडातील नवीन संशोधित ग्रह-फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 21 मे
नासाच्या संशोधकांनी केप्लर मिशन अंतर्गत केलेल्या अवकाश संशोधनामुळे नुकताच ब्रमांडातील पृथ्वीसारख्याच आणखी ग्रहांचा शोध लागला आहे नासाच्या वाशिंग्टन येथील मुख्यालयातील प्रमुख शास्त्रज्ञ एलेन स्टोलन ह्यांनी दिलेल्या माहितीनुसार नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी केप्लर मिशन अंतर्गत केलेल्या अवकाश निरीक्षणानंतर अवकाशातील 1,284 ग्रहांचा शोध लावला आहे.
ह्या सापडलेल्या ग्रहांपैकी 550 ग्रह हे पृथ्वीसारखेच खडकाळ असून त्यातील नऊ ग्रहांवर पृथ्वी सारखेच वातावरण असून तिथे सजीव सृष्ठी आणि मानवी अस्तित्व असण्याची शक्यता शास्त्रज्ञांना वाटतेय पण हे नऊ ग्रह आपल्या सूर्य मालेत भ्रमण करीत नसून ब्रमांडात अस्तित्वात असलेल्या अनेक सूर्यमालेतील सूर्याभोवती भ्रमण करत आहेत हे ग्रह आपल्या सौरमालेबाहेर व अत्यंत दूर अंतरावर आहेत त्या मुळे तिथे मानव पोहोचणे सद्या तरी अशक्य आहे पण भविष्यात मात्र शास्त्रज्ञ त्या बाबतीत सखोल माहिती मिळवतील असा विश्वास त्यांना वाटतोय आणि सध्याची शास्त्रज्ञांची अफलातून अशक्य कोटीतील शक्य करण्याची यशस्वी कामगिरी पाहता ब्रमांडातील आपल्यासारखीच मानवी परग्रहवासी असलेले पृथ्वीसारखे ग्रह ते नक्की शोधतील ह्यात शंका नाही.
No comments:
Post a Comment