अवकाशातील भुई चक्कर सारखे दिसणारे कृष्ण विवर - फोटो -नासा संस्था
नासा संस्था -25 मे
नासाचे खगोल शास्त्रज्ञ हबल टेलिस्कोप ,चंद्रा एक्स रे ऑबझरव्हेटरी व स्पीटझर स्पेस टेलिस्कोपच्या सहाय्याने अवकाश निरीक्षण करत असताना त्यांना अवकाशातील हे कृष्ण विवर दिसले हे अवकाश निर्मित कृष्ण विवर दिवाळीतल्या फटाक्यातल्या भुईचक्कर सारखे दिसतेय जणु विधात्याने दिवाळीत ते पेटवलेय !
इटाली येथील संशोधक Fabio Pacucci (SNS) ह्यांनी Royal Astronomical Society च्या रिसर्च पेपर मध्ये हि नवी माहिती नुकतीच प्रसारित केली आहे अवकाशातील हे अवकाश निर्मित भुईचक्कर भल्या मोठया कृष्ण विवरा मध्ये तयार झाले असावे असे संधाकांचे मत आहे कृष्ण विवराच्या आरंभाची महत्वपूर्ण माहिती ह्या कृष्ण विवराच्या शोधातून मिळाली असून हि आतापर्यंतची सर्वात मोठी शास्त्रीय उपलब्धी असल्याचे संशोधकांचे मत आहे
ह्या मिळालेल्या आधुनिक माहिती नुसार सुरवातीचे काही कृष्ण विवर हे अतिविशाल वायूंच्या ढगांच्या collapse होण्यामुळे तयार झाले किंवा एखाद्या मोठया ताऱ्याच्या नष्ठ होण्यामुळे बाहेर पडलेल्या वायूंमुळे आणि नंतर हे वायू वेवेगळ्या प्रक्रियेतून गेल्या मुळे झालेल्या बदलांमुळे तयार झाले असावेत आणि ह्या विवराच्या उगमानंतर ते मोठे ,अति विशाल व अवाढव्य होत गेले असावे
शास्त्रज्ञ असे मत व्यक्त करतात कि,कृष्णविवरे हि सगळ्याच आकाशगंगेच्या मध्यभागी असतात त्यांनी शोधलेली काही कृष्ण विवरे तर सूर्यापेक्षा लाखपट मोठी असून विश्वाच्या आरंभापेक्षा एक अब्ज वर्षांनी लहान आहेत काहीच्या मते हे मोठे कृष्ण विवर आजुबाजुंचे वायू कृष्ण विवरात प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे ओढल्या गेल्या मुळे तयार झाले असावे तर काहीच्या मते अनेक लहान कृष्ण विवरे एकत्र आल्यामुळे हे अति विशाल अवाढव्य कृष्णविवर तयार झाले असावे पण ह्या साठी खूप कालावधी जावा लागतो आणि संशोधकांनी शोधलेले हे कृष्ण विवर मात्र अत्यल्प वेळेत मोठया ढगांच्या collapseहोण्याने त्वरित तयार झाले आहे अस संशोधकांच मत आहे भविष्यात जर ह्या कृष्ण विवराच्या आरंभाच्या पुराव्याला पृष्ठी मिळाली तर कृष्ण विवराच्या उत्पत्ती बद्दल अधिक माहिती मिळू शकेल
कृष्ण विवराचा उगम शोधणे अत्यंत कठीण आहे पण संशोधकांनी दोन कृष्णविवराच्या उगमाचा शोध लावल्याचा दावा इटालीच्या Astrophysics National Institute च्या Andra Grazian ह्यांनी केला आहे तरीही X Ray व इन्फ्रा रेड च्या सहाय्याने अजुन सखोल संशोधन केल्या जाइल मगच ह्या शोधाला पृष्ठी मिळेल
तूर्तास संशोधकांनी पाठवलेल्या ह्या फोटोतील ब्रम्हांडातील हे भुई चक्कर मात्र अत्यंत विलोभनीय दिसतेय
No comments:
Post a Comment