Tuesday 29 December 2015

वर्ष गाजवल वैज्ञानिकांनी ,महिलांनाही भाग्याच!

                                  वर्ष सरता सरता गाजल ते एका महिलेच्या धर्मविरोधी रूढी मोडत शनिशिंगणापूरच्या चौथारयावर चढुन शनीला तेल अर्पण करण्यान! आजवर स्त्रीन चौथारयावर चढणच काय तिथल्या घरात चोरी करण्याच धैर्यही चोर करत नाहीत त्या मुळेच तिथल्या घरांना दार खिडक्याही नाहीत अस नागरिक सांगतात तिथे हि धर्मविरोधी घटना घडताच संतप्त झालेल्या विश्वस्त पुजाऱ्यांनी मग दुग्धाभिषेक करून देवाला शुध्द केल कारण त्यांच्या मते त्या महिलेन स्पर्श करून देव अशुद्ध केला विशेष म्हणजे हि घटना घडताना तिथला सुरक्षा रक्षक दारू ढोसत होता म्हणूनच केवळ स्त्री आहे म्हणून प्रवेश नाकारण आणि पुरुष आहे म्हणून देवापुढे दारू ढोसण हा विरोधाभासी भेदाभेद आजची जागृत स्त्री सहन करण शक्यच नव्हत त्या मुळे ती स्त्री आणि महिला संघटना स्त्रीच्या झालेल्या अपमानान पेटून उठल्या मिडिया वाल्यांनी बातमी उचलून धरली काहींनी तीच अभिनंदन केल समाजातील मान्यवरांच्या नेत्यांच्या चर्चा घडविल्या गेल्या आणि जाहीर निषेध नोंदवत महिला संघटनान शानिशिंगणापुरला मोर्चा काढला आंदोलनही केल ह्या दरम्यान ज्या पंकजा मुंडेंनी पूर्वापार चालत आलेली व महिलांना निशिब्ध असलेली प्रथा मोडत आपल्या पित्याच्या चितेला अग्नी दिला त्यांच्यावरच त्या जुन्या रुढीला प्रोत्साहन देत आहेत असा आरोप केला गेला खरेतर त्याचं वारंवार सांगण होत," कि पूजा अर्चात अडकून राजकारण करून तुम्ही पुन्हा जुन्या वाटेवर जात आहात महिलेचा अपमान हि चुकीचीच गोष्ट आहे" पण तापलेलं जनमानस त्यांच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावत होता आणि विशेष म्हणजे हि महिला कोण तीन हे अनपेक्षितपणे केल कि कोणाच्या सांगण्यावरून ? हे प्रश्न अनुत्तरीतच राहिले स्त्री संघटना आणि माध्यमांनी तिला समोर आणायला हवय!
 ह्या निमित्तान स्त्रीच वास्तव मात्र समोर आल अजूनही तिला घर दोघांच असल तरीही संसारात ,प्रापर्टीत किंवा आर्थिक बाबतीत समान हक्क नाही ती त्या बाबतीत बोलूही शकत नाही कितीही राबल तरी घरचा पुरुष तिला केव्हाही बाहेर काढू शकतो आर्थिक पिळवणूक करू शकतो हे आजच कटू वास्तव आहे  ह्याकडे महिला संघटनांनी लक्ष द्याव विशेष म्हणजे ज्या पूजाअर्चा ,सणवार ,माजघरातून रुढीच्या जोखडातून स्त्रीला बाहेर पडायला इतकी वर्ष लागली ज्या साठी स्वातंत्रपूर्व व स्वातंरयानंतरही समाज सुधारकांना ,स्त्रीयांना अथक प्रयत्न करावे लागले पराकोटीचा संघर्ष सोसावा लागला प्रसंगी वाळीत टाकेलल आयुष्य जगाव लागल तेव्हा कोठे स्त्री शिक्षण ,समानता ,स्वातत्र्य नोकरी किंवा करिअर आताच्या स्त्रीला करता येऊ लागलय तिच्या सर्वच क्षेत्रात तिला बरोबरीचा हक्क मिळू लागलाय ,ती परदेशात एकटीन जाऊ शकतेय शिकू शकतेय आपल्या आवडीचा वेष परिधान करतेय जिथे नउवारी ऐवजी सहावारी घालण अशक्य होत तिथे पंजाबी ड्रेस तर दूरच ! त्या साठीही कित्येकांनी संघर्ष केलाय पण आता त्या तो सहजतेन घालू शकताहेत पण ज्या सण वार पुजेअर्चेतुन त्यांची सुटका झालीय त्या साठीचा हा संघर्ष आणि नऊ वारी ,नथीच आकर्षण पाहून नवल वाटतय आणि अंधुकशी भीतीही! आजच्या तरुणींची पावलं मागे तर पडत नाहीयत ना ? तसही आजची सुज्ञ तरुणी जास्ती दिवस नऊवारीचा बोजा सांभाळू शकणार नाही आणि करीअर करताना तिला सणवारात अडकायला वेळ तरी कोठे आहे ?  अर्थात आजच्या नवतरुणींनीच हे ठरवायचाय कि त्यांना प्रगत जगाकडे झेप घ्यायचीय का पुन्हा जुन्या रुढीत, पूजा अर्चात अडकायचय?
 विशेष म्हणजे इकडे शनिशिंगणापूर प्रकरण गाजत असताना तिकडे नासाच्या शास्त्रज्ञांनी शनिभोवतीच्या कडयाच गूढ उकलत शनि भोवतीच्या कड्याजवळिल वातावरणात बर्फाचे अंश असल्याचा शोध लावत त्याचा सुंदर फोटो सर्वांना पाहण्यासाठी उपलब्ध केला तसाच मंगळावर पाणी वहात होत तिथ जीवसृष्ठी अस्तित्वात होती ह्याचे ठोस पुरावे देणारा शोध लावत त्याचेही फोटो त्वरित पाठवले नासाच्या शास्त्रज्ञांनी उगवत्या पृथ्वीच नयनरम्य छायाचित्र, प्लुटो ,सूर्यावरील प्रचंड उष्ण आगडोंबाची छायाचित्रही काढून पाठवली तसेच अंतराळ स्थानकात त्यांनी लावलेल्या रोपांना आलेली लेट्युसची पाने ,झीनियाची टवटवीत रोपे ,उगवलेल्या कळ्या ह्यांचीही फोटोसहीत माहिती पाठवली
 अंतराळवीर Scott Kelly ह्यांनाही सेल्फिचा मोह आवरता आला नाही त्यांनी अत्यंत कठीण असलेल्या स्पेस walk दरम्यान स्वत: चा सेल्फी काढून पाठविला तर कित्येकांना सेल्फिमुळे आपल आयुष्य गमवाव लागल

महिला वैज्ञानिकांच्या पत्रिकेतला मंगळ भाग्यशाली 
 आपल्या भारताच्या इस्रोच्या मंगळ मोहिमेनही यशस्वीपणे वर्ष पूर्ण केलय आणि ज्या मंगळाला अपशकुनी चांगल्या कामात विघ्न आणणारा अस दोषारोपित केल जायचं त्याच मंगळान भारतियांच मंगळ मिशन यशस्वी करत शुभशकुनच केलाय नासा प्रमाणेच हि मंगळ मोहीम यशस्वी करणारया चमूमध्ये महिला वैज्ञानिकांचाही सहभाग होता त्या मुळे त्यांच्या कुंडलीत मंगळ ग्रह भाग्यकारकच ठरलाय

चीनी वृत्त वाहिनीवर महिला रोबोट Ankar 
चीनी वृत्त वाहिनीवर तर रोबोट Ankar न प्रवेश केलाय ह्या स्त्री रोबोट Ankarच नाव शियाओआइस असे आहे मंगळवारी एका लाइव ब्रेकफास्ट न्युज कार्यक्रमात ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या रोबोटन हवामान खात्याची माहिती देण्याच्या शुभारंभ केलाय तर भारतातल्या अग्निशमन दलातही Fire fighter Robot सामील झालाय तो आता जिथे अग्निशमन खात्यातील जवान जाऊ शकत नाहीत तिथे जाऊन लोकांना वाचऊ शकेल व आग विझवु शकेल

महिला बनतील  Fighter Jet Pilot
हे वर्ष लष्करातील महिला अधिकारयांसाठीही महत्वाच ठरलय त्यांना आता लढाईच्या काळात महिलांच्या तुकडीला स्वतंत्र आदेश देण्याचा अधिकार प्राप्त झालाय आणि लवकरच तो आमलातही येईल शिवाय सध्या महिला वैमानिक Helicopter व विमान पायलट म्हणुन काम करतात पण Fighter Jet त्या उडवु शकत नाहीत पण आता संरक्षण मंत्र्यांनी महिला वैमानिकांना Fighter Jet उडवण्यासाठी परवानगी दिलीय आणि सध्या Fighter Pilot team मध्ये महिलांना त्याचे training देण्यात येतेय
2017 मध्ये वायुसेनेत त्या Fighter Pilot म्हणून काम करतील

सौदी महिलांना मिळाला मतदानाचा हक्क 
सौदीअरेबियातील महिलांना आता मतदानाचा हक्क मिळालाय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी नुकतीच निवडणूक लढवून यशही मिळवलय तर त्याच सौदीत बार्बी डॉल खरेदी करण्यास मात्र बंदी आहे कारण बार्बी सुखवस्तू ,कमनीय बांध्याची व उच्चवर्णीय भासते अस मत व्यक्त करत त्या ऐवजी सौदीत नव्या बार्बिसारखीच दिसणारया पण सौदी बुरखाधारी पोशाख असलेल्या फुला डॉलची निर्मिती करण्यात आलीय

जपानी महिलांना रडण्यासाठी मिळाली जागा व सुविधा
तिकडे जपान मध्ये तर तिथल्या सरकारन बायकांना रडण्यासाठी हॉटेल मध्ये जागा ,डोळे पुसण्यासाठी टीश्यु पेपर, eye मास्क व रडू येण्यासाठी खास दु:खी सिनेमे पाहण्याचीही सोय केलीय आणि त्याच एक दिवसाच भाड आहे 10.000 जापनीज येन  तीथल्या सरकारन हि सुविधा उपलब्ध केलीय ते तिथल्या महिलांनी रडाव म्हणून आता तिथल्या बायका का रडत नाहीत, कामाच्या ताणामुळे कि अतित्रासाने त्यांचे अश्रू आटल्यामुळे किंवा रडण हे दुबळेपणाच लक्षण आहे म्हणून त्या रडत नाहीत हे जपानी महिलाच जाणोत इथ भारतात मात्र बायकांना रडायला क्षणाचाहि विलंब लागत नाही सुखदुखा:त ,भावनेचा कल्लोळ दाटल्यावर ,दुसऱ्यांच दु:ख पाहून अस कधीही केव्हाही कोठेही रडू येत त्या साठी विशेष काही कराव लागत नाही त्यावर अनेक विनोदही केले जातात

डाळ महागली ,लसूणहि महाग
इकडे भारतात अच्छे दिन येणार अस म्हणता म्हणता महागाईन मात्र गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणल आधी कांदा मग Tomato आणि इतर भाज्या महागल्या दिवाळीच्या तोंडावर तर दाळीन भावाचा उच्चांक गाठला तो नवीन तुरीच्या शेंगा बाजारात आल्या तरी तसाच आहे आणि आता ओला लसुण बाजारात आला तरीही लसुण अडीचशे रुपये कीलौने विकल्या जातोय

सोन्या ,चांदीला चकाकी 
सरत्या वर्षान महिलांना सोन्यान मात्र चकाकी दिली सोन ह्या वर्षी दोनतीनदा २५०००रु. तोळा पर्यंत क्वचित त्याच्याही खाली आल चांदीही ३५००० रु.किलौ पर्यंत उतरली आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे उतरलेले भाव डॉलरच्या तुलनेत रुपयाच झालेलं अवमूल्यन ,जागतिक मंदी आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील सोन्याचे उतरलेले भाव ह्या मुळे सोने उतरले पण तरीही ते गृहिणींची दागिन्यांची हौस  मात्र  भागऊ शकले नाही

चोरी ,दरोडे लुटीचा आलेख चढताच
ह्याहि वर्षी वाढत्या चोरीला आळा बसला नाहीच उलट चोरया,दरोडे, लुटीच्या घटना वाढतच गेल्याने दागिने घालुन बाहेर जाण तर दूरच ते घरी ठेवलं तरीही चोर ते चोरू लागलेत दररोज राजरोसपणे दिवसा देखील तीन चार घरे फोडणे हे नित्याचेच झालेय एव्हढेच नाही तर भाजप आणि शिवसेनेच सरकार असताना देखील चोर सर्रास मंदिरातही चोरी करण्यास धजाऊ लागलेत कोणाच्या जोरावर ते एव्हढे निर्ढावलेत ? चोर सापडत का नाहीत ?सापडले तरी का सुटतात? एखाद्या इमानदार पोलिस इन्स्पेक्टरांनी जीवाची बाजी लाऊन चोर पकडला तरी तो का सोडल्या जातो? चोरीचे दागिने कोठे जातात ते विकत घेण्यावर निर्बंध असतानाही कोण विकत घेत? निर्भय निर्धास्त आयुष्य नागरिक कधी जगतील असे प्रश्न संतप्त नागरिक विचारू लागलेत खरतर निवडून येण्या आधी आणि नंतरही चोरांना जरब बसेल व तो पुन्हा चोरी करण्यास धजावणार नाही अशी शिक्षा करू अस आश्वासन मंत्र्यांनी दिल होत आता स्त्री संघटनांनी त्यांना त्याचा जाब विचारावा ह्या बाबतीत सरकारला धारेवर धरत ,धरणे धरत आंदोलन करून चोरांना पकडून तुरुंगात खडी फोडायला पाठवण्यास बाध्य करावे

Thursday 24 December 2015

अंतराळ स्थानकात बहरणार झीनियाची फुले

              अंतराळ स्थानकात उगवलेली हि झीनियाची टवटवीत रोपे                                  फोटो -नासा संस्था 


  नासा संस्था 23 dec.2015

 नासाच्या अंतराळ स्थानकात भाजी व फुले उगवण्याच्या प्रयत्नांना यश आले असून लवकरच अंतराळ स्थानकात  झीनियाची फुले बहरणार आहेत
 अंतराळ स्थानकातील VEG -O1 ह्या व्हेजी शोध प्रकल्पा अंतर्गत लावलेली झीनियाची रोपे अंकुरली असून हि रोपे पृथ्वीवरच्या रोपापेक्षा मोठी दिसत असून त्यांना लवकरच कळ्या येथील अशी अपेक्षा शास्त्रज्ञांनी व्यक्त केलीय नव्हे तसा त्यांना विश्वास आहे कारण ह्या आधीही त्यांनी लावलेल्या अंतराळ स्थानकातील लेट्युसच्या रोपाला पाने आली आणि अंतराळवीरांनी ती खाल्ली देखील 
व्हेजी ह्या शोध प्रकल्पा अंतर्गत अंतराळ स्थानकात लागवड केलेली रोपे  एका चेंबर मध्ये वाढवल्या जात आहेत तिथे त्यांना आवश्यक पोषक द्रव्ये व प्रकाश दिल्या जातोय  ह्या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असलेल्या स्थितीत रोपे कशी वाढतात हे जाणुन घेण्यासाठी झीनियाची लागवड केल्या गेली व शास्त्रज्ञांना अपेक्षे प्रमाणे ह्या अभिनव व नाविन्यपूर्ण प्रयोगात यशही मिळालय आणि त्यांच्या प्रयत्न आणि मेहनतीच फळ आता अंतराळ स्थानकात बहरलेल्या झीनियाच्या फुलांच्या रुपात लवकरच पहायला मिळेल  

Scott Kelly आणि Tim Kopra या अंतराळवीरांचा थरारक space walk यशस्वी


                                  टीम कोप्रा स्पेस walk करतानाचा थरारक क्षण                                फोटो -नासा संस्था

                                  Scott Kelly चाही स्पेस walk दरम्यानचा थरारक क्षण                      फोटो -नासा संस्था
नासा संस्था -22dec.

नासाचे अंतराळवीर Scott Kelly व Tim Kopra यांनी २१ डिसेंबरला अंतराळ स्थानका बाहेर तीन तास सोळा मिनिटेचा  space walk केला Scott Kelly यांचा हा तिसरा तर Tim Kopra ह्यांचा हा दुसरा space walk होता
 दोन्ही अंतराळवीरांनी हा स्पेस walk यांत्रिक कामासाठी केला बुधवारी रशियन कार्गो सप्लाय स्पेस क्राफ्ट आवश्यक सामान घेऊन अंतराळ स्थानकात येणार असल्यामुळे त्याच्या आगमनाच्या तयारीसाठी हा स्पेस walk होता
अंतराळ वीरांनी space walk मध्ये काम केल 
 Scott kelly ह्यांनी स्पेस walk मध्ये अंतराळ स्थानकाची मोबाइल ट्रान्स्पोर्ट कार योग्य ठिकाणी हलविली तसेच U .S क़मर्शियल क्रु च्या वाहनासाठी आवश्यक केबल जोड तयार ठेवला
आणि Tim Kopra  यांनी  रशियन laboratory module  अंतराळ स्थानकाशी जोडण्यासाठी Ethernet cable तयार ठेवली
 दोन्हीही अंतराळ वीरांनी  ह्या स्पेस walk दरम्यान अंतराळ स्थानकाच्या बाहेरील यंत्र पेटीतून काही आवश्यक यंत्र सामुग्रीही काढली जी पुढील कामासाठी आवश्यक आहेत
अंतराळवीरांसाठी हा स्पेस walk अत्यंत कठीण व घातक असतो क्षणाचीही चूक किंवा विलंब जीवावर बेतू शकतो त्या मुळेच हा  यशस्वी स्पेस walk अंतराळ वीरांसाठी अभिनंदनीय आहे

Monday 21 December 2015

उगवत्या पृथ्वीच नयनरम्य दृश्य



फोटो -   NASA / Goddard/Arizona State University
 12Oct 2015.ला  नासाच्या  LRO  ( Lunar Reconnaissance Orbiter) ह्या यानातुन उगवत्या पृथ्वीच हे नयनरम्य दृश्य अचूक टीपलय
नासा  संस्था -18 dec.
सूर्याच्या किंवा चंद्राच्या उगवत्या मावळत्या क्षणाच आल्हाददायी दृश्य आपण नेहमीच पाहतो पण आपण उगवत्या पृथ्वीच नयनरम्य दृश्य पाहतोय हि कल्पनाच किती सुंदर अन नाविन्यपूर्ण अन तितकीच  अविश्वसनीयही! अर्थात पृथ्वीवर राहणारया मानवाला उगवत्या पृथ्वीच मनमोहक दृश्य दिसण केवळ अशक्यच ! पण अंतराळातून मात्र हि कल्पना प्रत्यक्षात उतरू शकते आणि उगवत्या पृथ्वीच निसर्गरम्य दृश्य अंतराळवीर किंवा यानामुळे आपल्यापर्यंत छायाचित्राच्या रूपात पाहता येऊ शकत
सरत्या वर्षाच्या शेवटी नासाच्या संशोधकांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हि कल्पना प्रत्यक्षात साकार केलीय
 LRO ने चंद्राच्या Comton विवरापासून  83 mile दूर अंतरावरून हे छायाचित्र घेतल त्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले आणि अखेर अनेक छायाचित्रे एक करून तयार झालेल हे  छायाचित्र आपल्यापर्यंत पोहोचल
ह्या छायाचित्रात पृथ्वी चंद्राच्या क्षीतीजा वरून उगवताना दिसतेय तसेच ह्या छायाचित्रात उजव्या बाजूला सहारा वाळवंट दिसतेय तर पलीकडे सौदी अरेबिया आणि साउथ अमेरिकेची अटलांटिक किनारपट्टी सुद्धा दिसतेय
नासाच्या मेरिलंड येथील Goddard Space Flight Centerयेथील Deputy Project Scientist Noah Petro म्हणतात कि ,"पृथ्वी उगवतानाचे हे सुंदर छायाचित्र पाहून 43 वर्षापूर्वीच्या अपोलो 17 ह्या चांद्रमोहिमेदरम्यान काढलेल्या पृथ्वीच्या छायाचित्राची आठवण येते त्या फोटोतही आफ्रिका देशाचा भाग ठळकपणे दिसत होता "
जून 18-2009 ला LRO  हे यान launch केल्या गेले आणि त्याने त्याच्या सात शक्तिशाली instrumentच्या सहाय्याने आतापर्यंत चंद्राची अत्यंत महत्वपूर्ण माहिती गोळा केलीय 
पृथ्वीवर चंद्राचे उगवणे मावळणे नेहमीचआल्हाददायी असते पण चंद्रावर अंतराळवीरांना वेगळेच दृश्य दिसते चंद्रावर पृथ्वी कधीच उगवताना वा मावळताना दिसत नाही तर क्षितिजावर पृथ्वी नेहमी स्थिर दिसते अस Arizona state University चे Mark Robinson हे संशोधक सांगतात

Saturday 12 December 2015

केजल लिंडग्रेनचे स्पेस स्टेशन मिशन यशस्वी पृथ्वीवर सुरक्षित परतले

                                                                   फोटो -नासा संस्था
नासा संस्था -11dec.
नासाच्या अंतराळ मोहीम  45 चे अंतराळवीर केजल लिंडग्रेन अंतराळ स्थानकातील आपला कार्यकाळ यशस्वीपणे पूर्ण करून 11dec.ला पृथ्वीवर सुखरूप परतले त्यांच्या सोबत रशियन स्पेस एजन्सीचे Flight Engineer Oleg Kononenko आणि जपानच्या स्पेस एजन्सीचे अंतराळवीर Kimiya Yui हे सुद्धा परतले
हे क्रु मेंबर कझाकीस्थान च्या उत्तरेकडील भागात सोयुझ स्पेक्टोक्राफ्ट मधून तिथल्या स्थानिक वेळेनुसार अंदाजे रात्री 8.12 m वाजता सुखरूप पोहोचले
ह्या मोहिमेतील Oleg Kononenko ह्यांनी अंतराळ स्थानकात 533 दिवस तर केजल आणि युई ह्यांनी 141 दिवस मुक्काम केला
त्यांच्या ह्या अंतराळ स्थानकातील नीवासादरम्यान त्यांनी पृथ्वी निरीक्षण तर केलेच शिवाय भौतिक ,जैविक आणि आण्विक विज्ञान क्षेत्रात भरीव कामगिरी केलीय त्यांनी केलेले तंत्रज्ञानातील संशोधन नाविन्यपूर्ण असून हे प्रयोग पृथ्वीला लाभदायक ठरले असून भविष्यात अंतराळातील खोलवरच्या भागात मानवाला जास्त दिवस राहून मानवी व रोबोटिक संशोधनासाठी उपयुक्त ठरतील आणि आगामी मोहीम अधिक सक्षम व कल्पकतेने राबविता येईल असा शास्त्रज्ञांना विश्वास वाटतोय
ऑगस्ष्ट महिन्यात केजल लिंडग्रेन व युई ह्यांचा  Veggie plant growth ह्या मोहिमेत सहभाग होता ह्या मोहिमे अंतर्गत अंतराळात वनस्पती लागवडीचा प्रयोग करण्यात आला आणि तो यशस्वीही झाला त्यांच्या प्रयत्नांनी अंतराळात वनस्पती उगवली आणि झाडाला लेट्यूसची ताजी पानेही आली ह्या नव्या प्रयोगामुळे आता अंतराळ स्थानकातील अंतराळ वीरांसाठी अंतराळात ताजी फळे ,भाजी व अन्नही पिकवता येईल अशी शक्यता निर्माण झाली असून नासाच्या जास्त दिवसाच्या अंतराळ मोहिमेतील मुक्कामात  फावल्या वेळात अंतराळ वीरांना बागकामाचाही आनंद घेता येईल शिवाय नवीन संशोधन पृथ्वीवरील बायोमास वाढीच्या व सुधारणेच्या प्रगतीसाठीही उपयुक्त ठरेल मोहीम 45च्या अंतराळवीरांनी दूरवरच्या अंतराळ प्रवासादरम्यान मानवी आरोग्याच्या व्यवस्थापना विषयीही महत्व पूर्ण संशोधन केले आहे
 ह्या मोहिमे दरम्यान तीन कार्गो स्पेस क्राफ्ट अंतराळ वीरांसाठी  लागणारे व प्रयोगासाठीचे आवश्यक असलेले काही टन सामान घेऊन अंतराळ स्थानकात पाठवण्यात आले
लिंडग्रेन ह्यांनी अंतराळ निवासा दरम्यान दोनवेळा स्पेस walk केला पहिला स्पेस walk स्थानकाच्या मेंटनन्स साठी व दुसरा यानाची अमोनिया कुलिंग सिस्टीम व्यवस्थित करण्यासाठी होता  
सद्या Skott  Kelly  ह्यांच्या नेतृत्वात 46 वी अंतराळ मोहीम सुरु असून त्यांच्या सोबत  Kornienko आणि Sergey Volkov (Roscosmos) हे दोन अंतराळवीर चार दिवस अंतराळ स्थानकात असून नासाचे Tim Kopra रशियाचे Yuri  Malenchenko आणि Tim Peake हे आणखी तीन अंतराळवीर 15 डिसेंबरला त्यांच्या सोबत अंतराळ स्थानकात राहण्यासाठी जातील

Friday 4 December 2015

वीस वर्षानंतरही SOHO कार्यक्षम

                 फोटो -NASA /ESA /SOHO
नासा संस्था -1dec.
नासा आणि इसा च्या स्पेस मधील सोलर आणि हेलिओस्पिअरिक ऑबझरवेटरी (SOHO ) (वेधशाळा) वीस वर्षानंतर अजूनही भक्कम आणि कार्यरत आहे व नासा आणि ESA SOHOच्या वीस वर्षाच्या यशस्वी कार्यशीलतेचा आनंद सद्या साजरा करत आहेत
1995 मध्ये सूर्य व सौर मंडलातील उत्सर्जित होणारी प्रचंड उष्णता ,सौरउर्जा ,सौरवादळ ह्यांचा सखोल अभ्यास  करण्यासाठी SOHO कार्यान्वित करण्यात आली सूर्यावरील सौरवादळ ,सौरत्सुनामी व सौर भूकंप ह्याचा शोध घेण्यास SOHO मुळे मदत झाली असून अनपेक्षितपणे धुमकेतू शोधण्याचे कामही SOHO ने केले आहे आतापर्यंत SOHO ने सुमारे 5000  धुमकेतू  शोधले आहेत

काय आहे SOHO
SOHO हे NASA व ESA ह्यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेले एक Space Craft आहे
सुरवातीला दोन वर्षासाठी पाठवण्यात आलेले SOHO वीस वर्ष होऊनही अजूनही भक्कमपणे कार्यरत  आहे आता त्याची मुदत डिसेंबर 2016 पर्यंत वाढविण्यात आलीय
ह्या छायाचित्रात सूर्यापासून उत्सर्जित झालेली प्रचंड गतिमान उर्जा व विद्युत भारीत ढगांचे झोत दोन विरुध्द दिशेला जाताना दिसत आहेत ह्या सौर पदार्थातील चुंबकीय शक्ती पृथ्वीच्या वातावरणातील चुंबकीय शक्तीकडे आकर्षित झाल्यास भूचुंबकीय वादळ होऊ शकते

Tuesday 1 December 2015

शनीचा चंद्र व शनीच्या कड्यावर जलविश्व

    फोटो -नासा /Caltech Space Science Institute
नासा संस्था -30 nov.
नासाच्या कॅलिफोर्निया येथील Jet Prapulsion Lab मध्ये NASA ,युरोपियन(ESA ) व इटालियन स्पेस एजन्सी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु असलेल्या नवीन प्रोजेक्टच्या संशोधनानुसार शास्त्रज्ञांनी असा निष्कर्ष काढला आहे  कि ,
शनीचा चंद्र व शनी भोवतीचे कडे गोठलेल्या पाण्याच्या सूक्ष्म कणांनी बनलेले असून ह्या कड्यामुळेच शनीला वैशिष्ठ प्राप्त झाले आहे
हे कण अत्यंत सुक्ष असल्यामुळे त्यांच्या अंतर्गत असलेली उष्णता राखू शकले नाहीत त्या मुळे अती थंड हवामानात ते गोठले गेले व Geologically मृतप्राय झाले तर दुसरीकडे हि उष्णता शनीच्या चंद्रावरील दक्षिण ध्रुवाकडे ओढल्या जाऊन पोलार जेट water च्या स्वरूपात साठवल्या गेली
नुकत्याच कॅसीनी यानावरून घेतलेल्या छायांचीत्राच्या निरीक्षणा नंतर अधिक संशोधनाअंती शनीच्या पृष्ठभागावर 313 मैल ( 504 k.m).अंतरा नंतरच्या पृष्ठभागावरच्या अंतर्गत भागात द्रव्य पाण्याचा महासागर  आढळला आहे असा निष्कर्ष शास्त्रज्ञानी काढला आहे
ह्या संशोधनानंतर सौरमालेतील जीव सृष्ठीच्या विकासातील पाण्याची भूमिका समजून घेण्याची शास्त्रज्ञांची उत्सुकता वाढली आहे
कॅसीनी यानावरून घेतलेल्या ह्या छायाचित्रात  शनीच्या कड्याच्या  प्रकाशमान भागाच्या  0.3 degrees खालचा भाग दिसतोय