जुईली जोगळेकर ठरली सारेगमपच्या ह्या पर्वाची महागायिका
रविवारी रंगलेल्या चार तासाच्या सारेगमप च्या अखेरच्या सुरेल गीतांच्या मैफिलीत हरिहरन,स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे ,सावनी रवींद्र आणि आधीच्या शेवटच्या एपिसोडमध्ये कविता कृष्ण्मुर्तीने आपल्या सुरेल आवाजात उत्तमोत्तम गाणी सादर करून रसिक प्रेक्षकांना रिझवले नेहमी प्रमाणेच अभिजित खांडकेकर याच्या खटयाळ सुत्रसंचलनाने प्रेक्षकांची करमणूक तर केलीच शिवाय ह्या वेळेस त्याला फु बाई फु च्या कलाकारांनी हसवणुकीत साथ दिली अवधूत गुप्तेची खास अवधूत स्टाइल दिलखुलास दाद ,तौफिक कुरेशींनी देखील तेव्हढ्याच उत्स्फूर्ततेन केलेलं कौतुक आणि मनमोकळी दिलेली दाद ,आणि आधीच्या सारेगमप च्या विजेत्यांची ह्या कार्यक्रमातील उपस्थिती ह्या मुळे कार्यक्रम कंटाळवाणा न होता उतरोत्तर रंगत गेला विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमात जेव्हा जयंत पानसरे ,जुईली जोगळेकर ,रेश्मा कुलकर्णी ,प्रल्हाद जाधव आणि महेश कंटे ह्यांनी गायलेल्या तोडीस तोड जुन्या नव्या गाण्याच्या तालावर त्यांच्या आईवडिलांसोबत प्रेक्षकांनी देखील ताल धरत डान्स केला.
सात शहरातून आलेल्या १५ ते ३० वयोगटातील तरुण गायकांच्या ह्या स्पर्धेत प्रथम १४ गायक ,गायिका आणि नंतर सात गायक ,गायीकांची निवड करण्यात आली होती तर शेवटी फक्त पाचजण अंतिम फेरी साठी निवडण्यात आले होते त्यात डोंबिवलीची रेश्मा कुलकर्णी [जिच तौफिक कुरेशी, अवधूत गुप्ते आणि अभिजित खांडकेकर ह्यांनी कट्यार कुलकर्णी अस नामकरण केल होत] तर पुण्याची जुईली जोगळेकर [जिला हे सारे चॉकलेट गर्ल म्हणत]सोलापूरचा जयंत पानसरे ,कोल्हापूरचा प्रल्हाद जाधव आणि मुरबाडचा महेश कंटे ह्यांचा समावेश होता ह्या वेळच्या सारेगमप च्या पर्वाचे वैशिष्ट म्हणजे ह्या एपिसोड मध्ये एकदा बाद ठरवलेल्या स्पर्धकाला पुन्हा कॉल back करून बोलावले नव्हते त्या मुळेच प्रेक्षकांना हि स्पर्धा आवडली परीक्षक म्हणून अवधूत गुप्ते आणि तौफिक कुरेशींनी कधी परखडपणे चूक दाखवून देत तर कधी कौतुकानी" ध. नी "देऊन त्यांना प्रोत्साहन देत आपले काम नि:पक्ष पणे पार पाडले शिवाय ह्या वेळेस ह्या कार्यक्रमातून नवीन नाटक सिनेमांच्या निर्माता ,दिग्दर्शक ,कलाकार गायक ,वादक संगीतकार ह्यांना बोलवून त्यांच्या सिनेमा नाटकाची जाहिरात कम ओळख करुन देण्यात तर आलीच शिवाय त्यातील गायकांनी आपली गाणी सादर केली ह्या मुळे ह्या पर्वाने आपले वेगळेपण जपत रसिकांची दाद मिळवली नेहमीप्रमाणेच सारेगमपच्या कमलेश भडकमकर आणि वाद्य वृन्दान अवधूत गुप्तेन केलेल्या संगीतातील नव्या बदलाच्या प्रयोगाला सुरेल साथ दिली खरेतर सारेगमपचे सारेच पर्व रंगतदार होते त्यातल्यात्यात" लिटील champs "ने सारयांना वेड लावले होते तसेच "युध्द तारयांचे "हे अभिनय विश्वातल्या गायकांचे पर्वही असेच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. गेले अनेक आठवडे सोमवार ,मंगळवार सारेगमपमय झाले होते
यंदाचे स्पर्धक विशेषत: रेश्मा कुलकर्णी ,जयंत पानसरे आणि जुइली जोगळेकर तोडीस तोड आणि शास्र्रीय संगीताची जाण असणारे होते त्या मुळे शेवटपर्यंत कोण जिंकणार ह्याची साऱ्यांनाच उत्सुकता होती आणि सारयांनाच हे तिघेही जिंकावे असे वाटत होते तिघांनाही परीक्षकांनी १००%मार्क दिले होते पण SMS द्वारे मिळालेल्या प्रेक्षकांच्या मतां मुळे जुइली ने बाजी मारत हि स्पर्धा जिंकत "महागायीकेचा" मान पटकावला तिचा रॉकिंग performance रसिकांच्या पसंतीस उतरला तिच्या आवाजातला चढ उतार खरोखरच वाखाणण्याजोगा होता ती केवळ सतरा वर्षाची असून आता तिची राहिलेली परीक्षा ती देणार आहे जयंत पानसरे उपविजेता ठरला तर रेश्मा कुलकर्णीन तिसरा क्रमांक पटकावला
ह्या कार्यक्रमाला Zee सिनेमा ,channels वरील मालिकांचे कलावंत तंत्रज्ञ निर्माता दिग्दर्शक ,गायक वादक ह्यांनी आवर्जून उपस्थिती लावली तौफिक कुरेशिंच्या " बॉम्बे कचरा"[plastic ,बाटल्या ,चेपटलेले डबे वै. ]घेवून त्यांनी सादर केलेल्या संगीताच्या नव्या लाजवबाब सादारीकरणा ने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments:
Post a Comment