ठळकपणे नोंद घेण्याजोगी यवतमाळची मुख्य समस्या रेल्वेची आहे भारतीय रेल्वेला दीडशेच्या वर वर्षे पूर्ण झालीत तर यवतमाळला शंभरच्या वर वर्षे पण अजूनही यवतमाळ रेल्वेच्या बाबतीत उपेक्षितच आहे
यवतमाळ रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली अस लोकांच्या कानावर आल पण पुन्हा रेल्वे कोठे अडली कळाले नाही कारण आता पुन्हा निवडणूक आलीय पुन्हा हाच मुद्दा चर्चेला येईल आश्वासनांचा पाऊस पडेल आणि निवडून येताच पुन्हा हे नेते रेल्वेचा मुद्दा विसरून जातील जे नेते थोडे फार प्रयत्न करतात ते देखील रेल्वे मंत्र्यांनी असमर्थता दाखविली की चूप बसतात ह्या अन्यायाविरुद्ध ते का आवाज उठवत नाहीत? त्यांना सामन्यांच्या समस्ये विषयीची कळकळ केवळ मता पुरतीच असते कारण एकदा निवडून आल कि पाच वर्षांची निश्चिंती!
दरवर्षी रेल्वेच अंदाजपत्रक जाहीर होत यवतमाळचा त्यात समावेशच नसतो कारण ज्या तडफेन तो प्रश्न विधानसभेत मांडायला हवा तो मांडल्याच जात नाही एरव्ही छोटया ,छोट्या प्रश्नावर एकमेकावर तुटून पडणारे नेते त्याच तडफेने यवतमाळ रेल्वेचा मुद्दा उपस्थित का करत नाहीत?
यवतमाळ येथील शकुंतला हि Narrow गेज रेल्वे, करार संपताच पुन्हा संघर्षाने सुरु झाली.यवतमाळ ब्रॉडगेज रेल्वेसाठीचा संघर्ष मात्र कमी पडतोय यवतमाळ ब्रॉडगेजने पश्चिम महाराष्ट्राशी जोडल्या गेल्यास व्यापारी, नोकरदार, प्रवाशी सारयांचाच फायदा होईल. यवतमाळ करांना त्यासाठी धामणगाव नागपूर अमरावतीला धाव घ्यावी लागते त्यात वेळ व पैसा वाया जातो यवतमाळ रेल्वेने अमरावती ,अकोला ,नागपूर,वर्धा हैद्राबाद,नांदेड ,सोलापूर,पुणे,मुंबईला सहज जोडता येईल कारण तिथे आधीच ब्रॉडगेज रेल्वेलाईन आहे ह्या सर्व ठिकाणी रेल्वेची सुविधा असताना यवतमाळ मात्र उपेक्षितच आहे कारण लोकांची आणि नेत्यांची उदासीनता.
यवतमाळच विमानतळही कित्येक दिवस नामांतराच्या घोळात अडकल होत तेव्हा लोक उपहासान विमानतळाला "प्रतीक्षा" नाव द्या अस म्हणत लोकांना अजूनही त्याचा काहीच उपयोग नाही कारण मोठी विमाने इथे येतातच कोठे? फक्त नेत्या आणि अभिनेत्यांची सोय मात्र झाली
जेव्हा मंत्रीपद जात किंव्हा हुकत तेव्हा त्यांना नाविलाजाने गाडीने प्रवास करावा लागतो तेव्हा त्यांना रस्ते
विकासाचा पुळका येतो थोडाफार रस्ता सुधारतोही पण तो लवकरच मूळ पदावर येतो तरीही कित्येक वर्षे टोल वसुलीच्या नावाने जनतेची लुट होतच राहते ती रस्त्यात खड्डे पडले तरी चालूच राहते
यवतमाळला मुख्यमंत्री व इतर मोठया नेत्यांनी कित्येकदा भेटी दिल्यात पण रेल्वे काही सुरु झाली नाही म्हणूनच निवडणुकी आधीच लोकांना नकाराधिकार द्यायला हवा म्हणजे निष्क्रिय उमेदवाराला तिकीट मिळणार नाही जो उमेदवार खरोखरच कर्तुत्ववान ,क्रियाशील आणि इमानदार असेल त्यालाच तिकीट मिळेल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या निष्क्रिय भाष्टचारी नेत्यांना आता लोक कंटाळलेत अशांना निवडणूक होण्या आधीच लोकांनी नाकारल्यास विकास होईल .
शिवाय एखादा नेता निवडून आलयास व त्यांनी दिलेली विकासाची आश्वासने पूर्ण न केल्यास त्यांना त्यांचा
कार्यकाळ पूर्ण करण्या आधीच परत बोलवण्याची सुविधा असावी हीच गोष्ठ भ्रष्टाचारी आणि दलबदलू नेत्यांच्या बाबतीतहि आमलात आणावी म्हणजे जनतेची फसवणूक करणारया नेत्यांना धडा मिळेल
सद्या दूरदर्शनवरून दाखवण्यात येणाऱ्या बातम्यामधुन आपण नेते लाखो रुपयांची कशीनावे तर चोरून नेआण
करत आहेत ते पहात आहोतच अशा वेळेस तर मतदारांनी मत देताना नेत्यांचा कावेबाजपणा ओळखून त्यांनी न केलेल्या विकासाचा निधी कोठे गेला हे विचारून मतदान करावे कारण आपले मत मौल्यवान आहे
No comments:
Post a Comment