Saturday 10 May 2014

बाजारात हापूस दाखल पण चव मात्र आंबट

                                              यवतमाळ येथील बाजारात सध्या भरपूर प्रमाणात आंबे विक्रीसाठी आले आहेत त्यात बेगनपल्ली,लालबाग,दशेरी, केसर नीलम,हापूस ह्या जातीच्या आंब्याचा समावेश आहे रसाचे गावरानी आंबे मात्र तुलनेने खूप कमी प्रमाणात मिळत आहेत कारण ह्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसा मुळे  व गारपिटीमुळे अनेक ठिकाणच्या आंब्याच्या झाडावरचा बहर गळून गेला.ज्यांच्या झाडावरचे आंबे राहिले त्यांनी आंब्याचा दर वाढवला असून ते ८० ते १०० रुपये किलो ह्या भावाने विकल्या जात आहेत शिवाय आंबे विकत घेताना गोड चव असणारे आंबे{नमुना }घरी आणल्यावर मात्र आंबट व पातळ रसाचे निघतात .गेल्या चारपाच वर्षात तसेही गावरानी गोड चवीचे दाट रसाचे आंबे यवतमाळच्या बाजारातून मिळेनासेच झालेत ,हीच गोष्ट बाकीच्याही आंब्याच्या बाबतीत घडतेय त्या मुळे  ह्या वर्षी आंबे सर्रास आंबट निघत आहेत .
                                              हापूस आंब्यातही होतेय फसवणूक 
                           सध्या बाजारात हापूस आंबेही विक्रीसाठी आले असून त्यात कर्नाटक ,हैद्राबाद आणि कोकण येथून हापूस विक्रीसाठी आले असल्याचे विक्रेते सांगतात हे आंबेही सर्रास आंबट निघत असून नमुना दाखवतानाची चव कधी गोड तर कधी सपक ,कडवट लागते शिवाय त्याचा रस किंचित कडवट आंबट ,सपक असून हे आंबे खरोखरच हापूस आहेत का ? असा प्रश्न पडतो ह्या बाबतीत फळवाल्या कडे विचारणा केल्यावर ते म्हणतात कि बाजारात असेच आंबे मिळतात आम्ही तरी काय करणार . सध्या कृत्रिम रित्या आंबे पिकवल्या जात असल्याच्या बातम्या दूरदर्शन वरील वाहिन्या वरून दाखवल्या जात आहेत येथील आंब्यांची चव पाहता हे हापूस आंबे देखील calcium carbide ने पिकवल्या जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही शिवाय ह्या आंब्यांचा भाव देखील खूप असून कर्नाटक हापूस १२०-१६० रुपये किलो तर कोकण हापूस ६००रुपये डझन प्रमाणे विकल्या जात असून ग्राहकांची फसवणूक होत आहे तरी संबंधितानी ह्या कडे लक्ष द्यावे आणि नागरिकांनी देखील आंबे विकत घेताना  नीट पाहून घ्यावेत. 

No comments:

Post a Comment