Tuesday 24 December 2013

धनुर्मासा मुळे तिरुपती येथे गर्दी कमी


               आंध्रप्रदेशातील धनुर्मास सुरु झाल्या मुळे तिथे येणारया भाविकांची संख्या नेहमीच्या तुलनेत कमी होती शिवाय धनुर्मासात नेहमीची "सुप्रभातम "हि सेवाही केल्या जात नसल्याचे सांगण्यात आले सुरक्षा व्यवस्था कडक असली तरीही थोडी सुस्तता जाणवत होती.तिरुपतीला थंडी खूप जाणवली, विशेषत: पाहटे गार वारे वहात होते. धनुर्मास असला तरीही बाकीच्या विशेष पूजा मात्र व्यवस्थित सुरु होत्या बुधवारी होणारी सहस्त्र कलश सेवा उत्साहात झाली त्याला भाविकांनी मोठ्या संखेत हजेरी लावली विशेष म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या देवस्थानच्या मुख्य पदाधिकाऱ्याच्या पत्नीने यज्ञा नंतर दिल्या जाणारया अंगारा व हळदीचे व्यवस्थित वाटप होत आहे कि नाही ह्या कडे कटाक्षाने लक्ष दिले .

  तिरुपतीला  विजय मल्ल्या यांची भेट
बुधवारी सकाळी तिरुपती येथे विजय मल्ल्या यांनी आपल्या सहकाऱ्या सोबत भेट दिली
व तिरुपतीचे दर्शन घेतले.

कर्नुल येथे मोर्चा
तेलंगाणा व आंध्र प्रदेशाचे विभाजनाची घोषणा होऊनही बरेच दिवस उलटले त्या मुळे येथील जनमानसावर व वातावरणावर कुठलाही अनुचित परिणाम जाणवला नाही परंतू "रायल सीमा "व दोन,तीन गावांसाठी अजूनही संघर्ष सुरु आहे सोमवारी तेथे मोटर सायकल रयाली काढण्यात आली होती मोर्चे धारकांच्या हातात काळे झेंडे होते व ते रायल सीमा आंध्र प्रदेशात सामील व्हावे अशी घोषणा देत होते विशेष म्हणजे हि रयाली शांततेत पार पडली इतरांना त्याचा काहीही त्रास झाला नाही .

रस्त्याची दुरावस्था तरी टोल वसुली सुरु

                        यवतमाळ येथून हैद्राबाद कडे जाणारा रस्ता बरयाच ठिकाणी खराब झालेला असून तेथून जाणारया ,येणारया वाहनांना आणि वाहन धारकांना त्याचा त्रास होत आहे विशेषत: पांढरकवडया कडून पाटणबोरी कडे जाणारा रस्ता इतक्या खराब अवस्थेत आहे की ,गाड्या हेलखावे खातच रस्ता पार करतात येथून बरीच वाहने जात,येत असल्याने रात्रीच्या वेळेस प्रवाशांना त्रास तर होतोच शिवाय अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही हा रस्ता जागोजागी उखडलेला आहे विशेष म्हणजे रस्त्याची इतकी खराब स्थिती असतानाही टोल वसुली मात्र व्यवस्थित सुरु आहे त्या बाबतीत विचारणा केल्यास पांढरकवडा ते देवीचे मंदिर ह्या रस्त्याची टोल वसुली केल्या जात आहे बाकीच्या रस्त्याचे आम्हाला काही माहित नाही असे सांगण्यात आले तरी संबधितांनी ह्या कडे लक्ष देवून रस्ता दुरुस्त करून घ्यावा म्हणजे रस्ता वाहतुकीस सुरक्षित तर होईलच शिवाय लोक टोल स्वखुशीने भरतील

Monday 25 November 2013

लिटील चाम्पस

                    T. V. वर "कौन बनेगा करोडपतीचा" एपिसोड सुरु होता नेहमी प्रमाणे अभिताभ यांच्या पुढे हॉट सीट वर कोणी मोठी व्यक्ती नाही तर कौटिल्य नावाचा लिटील वंडर बसून होता. अभिताभ यांनी विचारलेल्या प्रश्नांना तो क्षणाचाही विलंब न लावता पटापट अचूक उत्तरे देत होता ते ऐकून क्षणभर अभिताभजीही अवाक झाले. आप तो ग्यानी हो अस अभिताभजीनी म्हणताच कौटिल्य म्हणाला नाही आप ग्यानी हो आणि आप ग्यानीच हे तू,तू ,मै,मै स्टाईल म्हणण बराच वेळ रंगल आणि शेवटी कौटिल्य पुढे अभिताभजीनी हार मानली त्यान अभिताभजी सोबत लुंगी डान्सही केला खरेतर एवढ्या लहान वयातल कौटिल्यच अफाट ज्ञान,कुशाग्र बुद्धिमत्ता आणि कमालीची स्मरणशक्ती पाहून सार जगच अचंबित झालंय. जी प्रश्नोत्तरे पाठ करायला सामान्यांना तासनतास लागतात नव्हे तीथे हा छोटा कुठल्याही प्रश्नांची विना विलंब अचूकउत्तरे देतो हा अदभुत चमत्कार म्हणावा की निसर्गाची अलौकिक देणगी हा सर्व सामान्यांना पडणारा प्रश्न . बर! अस अचाट बालवयीन ज्ञान असणारा कौटिल्य एकटाच नाही मागे एका जुळ्या बहिणीचीही बालवयातली अफाट बुद्धिमत्ता एका न्यूज चानल वरून दाखवण्यात आली होती . ह्या बालवयीन कुशाग्रतेच शास्त्रीय विश्लेषण व्हायला हवे.
              हल्लीचे लिटील champs अफलातून आहेत मग ते क्षेत्र गायन, वादन,नृत्य ,अभिनय किंवा कुठलाही कला अविष्कार असो त्यात हे लिटील champs मागे नाहीत आधी सा रे ग म प मग इंडियन idol ह्या गायनाच्या स्पर्धेत ह्या लहान मुलांची गाणी ऐकली मुग्धा वैशंपायन ,पद्मनाभ हे लोभस,गोंडस छोटे आणि कार्तिकी, प्रथमेश ,आर्या ,रोहित राउत जेव्हा ताकदीन गातात तेव्हा नवल आणि कौतुकही वाटतच कारण त्या साठीचा रियाज त्यांनी न थकता केलेला असतो.
                 डान्स इंडिया डान्स असो कि एखादा reality show त्या साठी अथक परिश्रम करावे
लागतात आणि आताचे काही डान्स प्रोग्राम मध्ये सर्कशीतल्या प्रमाणे स्टंटचा समावेश केलेला असतो अशा रियालिटी शो मध्ये कसरत करताना क्षणाचाही विलंब घातक ठरू शकतो तेव्हा ह्या कोवळ्या बालकांना timing च भान ठेवत नाचण किती कठीण ? ह्याच श्रेय ह्या लिटील champs प्रमाणे त्यांच्या कोरियोग्राफरस ला पण जात . पूर्वी शाळा कॉलेजातून किंवा कधी मधी होणारया कार्यक्रमातून शिक्षकांनी निवडलेल्या मुलांची वर्णी लागायची त्यासाठी स्टेज डेअरिंग ,अंगभूत कला गुण असण आवश्यक असे. आता सतत असे कार्यक्रम होत असतात त्या मुळे कोरिओग्रफ़र,ड्रेस डिझायनर ,Event Manager असे नवे व्यवसाय नावारूपाला आले आहेत अर्थात त्या साठी भरपूर फी देखील आकारल्या जातेय.शिवाय ह्या नव्या प्रयोगामुळे अभिजात नृत्याविष्कार कमी पहायला मिळत आहेत
                  पूर्वी अभिनय क्षेत्रात जूनिअर मेहमूद,सचिन पिळगावकर ,माष्टर राजू ,उर्मिला मंतोडकर पल्लवी जोशी ,तिचा भाऊ अलंकार अशी कितीतरी बाल कलाकार मंडळी नावारूपाला आली होती त्यांना त्या साठी खूप संघर्ष करावा लागल्याच ते मुलाखतीतून नेहमी सांगतात पण आता सहजतेन T . V सिरियलस ,जाहिरातीमधून ही बालकलाकार मुले सिनेमातही अभिनय करू लागलेत पूर्वी "जिलेबी" केल्याच आजोबांनी सांगताच पळून गेलेला छोटू घरी परततो ती जाहिरात आणि त्यातला छोटू साऱ्यांनाच आवडला होता आता असे अनेक लोभस गोंडस छोटे जाहिरात,सिरियल मधून सहजतेन वावरतात तर काही "श्वास" सारख्या सिनेमातून अंतर राष्ट्रीय स्तरावर ही पोहोचली आहेत.                          
                    ह्या नव्या पिढीन आता आणखी एक नव नवलाच पाउल उचललय ही पोर आता संजीव कपूरच्या जुनियर "माष्टर शेफ " ह्या पाककला स्पर्धेत पोहोचलीत . ज्या वयात आई कडे खाऊसाठी हट्ट करायचा ,भातुकलीच्या खेळातला लुटुपुटीचा स्वयंपाक करायचा त्या वयात हि मुले कुकरी शो मध्ये कुशलतेन खरोखरचा स्वयंपाक करताना पाहून आपल्याला थक्क व्हायला होत. हि छोटी मुले एकत्रित पणे पदार्थाची चर्चा करतात , पदार्थ बिघडला तर ,मार्क कमी मिळाले किंवा नंबर आला नाही तर हिरमुसतात ,रडतात आणि सुधारणा करत मोठयांच्या जोडीन मोठयांच्या तोडीचे पदार्थ करतात तेव्हा खरच नवल वाटत. आधीच्या पिढयांपर्यंत लहान मुलांना स्वयंपाक घरात पाऊल टाकताच बाहेर पिटाळल्या जायचं. खूपच मागे लागल तर कणकेचा गोळा अन छोट पोळपाट दिल जायचं gas जवळ हि त्यांना जाऊ दिल जात नव्हत. भातुकलीच्या खेळातही चुरमुरे, शेंगदाणे फार फार तर आई त्यांना छोटे फराळाचे करून देई आणि पोर देखील स्वत:च काम स्वत: कर म्हटल कि पळ काढत पण आताची लिटील champs संजीव कपूरच्या कृपेन स्वयंपूर्ण होऊ लागलीय अर्थात T.V. च अनुकरण छोटी मुले करतात तेव्हा gas पेटवताना भाजी चिरताना मुलांवर लक्ष ठेवण आवश्यक आहे. ह्या बाबतीत संजीव कपूरला मानायला हव त्यांनी आधी गृहिणी मग पुरुष ,तरुणाई आणि आता चक्क छोटी मुलं ह्यांना कुकरी शो तून स्वयंपूर्ण केलय.
              मागे दै. लोकसत्तात बायका पुरुषांना स्वयंपाक घरात लुडबुड करू देत नाहीत ह्या विषयावर प्रतिक्रिया मागवल्या होत्या तेव्हा मी म्हटल होत कि उलट त्या तर म्हणतील ,"या! स्वयंपाक घरात तुमच सहर्ष स्वागतच आहे वर्षानु वर्षे आम्ही ह्याच क्षणाची वाट पाहतोय कि कधी स्वयंपाक घरातून सुटका होतेय"! सुदैवान आता पुरुष हि त्यांना स्वयंपाकात हातभार लावू लागलेत आणि आता लिटील champs स्वयंपाक शिकू लागलेत म्हणजे स्वयंपाक घराचा गाडा आता खरया अर्थान चार पायावर चालू लागला तर नवल वाटायला नको.
                     सद्या सर्वत्र भ्रष्टाचार ,चोरया ,लुटालूट ह्याना उत आलाय अशा वेळेस ह्या लिटील champs ना देशासाठी लढताना धारातीर्थी पडलेल्या नौजवानांची विजयी गाथेची ओळख करून द्यायला हवी शिवाय स्वातंत्र पूर्व काळातील स्वातंत्र्य सेनानी ज्यांनी देशासाठी शत्रूकडून छळ सोसला आणि प्रसंगी
आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्या शूर वीर ,सावरकर ,वल्लभभाई पटेल ,टिळक,आगरकर,महात्मा गांधी आणि त्याही आधी शिवाजी ,झाशीची राणी लक्ष्मीबाई ,ह्याच्या कथा सांगायला हव्या त्यांच स्मरण ह्या लिटील champs ना प्रेरणादाई ठरेल.
                         नुकतीच एका छोटया मुलाने मंगळसूत्र चोराला पिटाळून लावल्याची बातमी पहिली औरंगाबाद इथल्या एका इमारतीतल्या रखवालदाराच्या छोटया मुलाने त्याच इमारतीतल्या एकामहिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून पळणाऱ्या चोराचा दगड मारून पाठलाग केला तेव्हा चोराने मंगळसूत्र तिथेच टाकून पळ काढला ह्या साठी त्या छोटयाच्या धैर्याच कौतुक करायला हव शिवाय त्याचा आदर्श इतरांनीही घ्यायला हव विशेषत: रोज हजारो मंगळसूत्र चोरीच्या घटना होत असताना हि गोष्ट कौतुकास्पद आहे.

Thursday 21 November 2013

यवतमाळ येथे gas सिलिंडरची अवस्था खराब

यवतमाळ येथे सध्या ग्राहकानां वितरीत करण्यात येणाऱ्या सिलिंडरची अवस्था खराब असून सिलिंडर रंग उडालेले,चपटलेले,धुळीने माखलेले असे असून काही सिलिंडर च्या वरची रिंग थोडीशी तुटलेल्या अवस्थेत आहे असे  सिलिंडर लोकांच्या जीवाला घातक असतात मागे यवतमाळात सिलींडरचा स्फोट झाल्याची घटना  घडली  असून देखील असे सिलिंडर वितरीत केल्या जात आहेत तरी संबंधितानी ह्या कडे लक्ष देवून लोकांना चांगले सिलिंडर देण्याची सोय करावी व खराब अवस्थेतील सिलिंडरस कंपनीने  परत घ्यावेत .नागरिकांनी तक्रार केल्यास सिलिंडर बदलून देऊ असे सांगून प्रत्यक्षात मात्र बदलवून दिल्या जात नाही.काही वेळेस गाडीत चांगले सिलिंडर असूनही ते न देता खराब स्थितीतलेच सिलिंडर घ्या नाहीतर नका घेवू अशी उत्तरे मिळतात
फोटो -पूजा दुद्दलवार -BE(Soft)BMC
                   Gas सिलेंडरची खराब अवस्था ,वरची रिंग तुटण्याच्या अवस्थेत



                          

Saturday 16 November 2013

पडध्यामागचे फिल्मी सितारे

                  पण सध्या तरी सर्वत्र श्री आणि जान्हवीची म्हणजे शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान ह्यांची हवा आहे त्या मुळेच बहुतांश channels वरून त्याचं दिवाळी सेलिब्रेशन , त्यांच्या आवडी निवडी ,करिअर अभिनय ह्या बद्दलची माहिती प्रसारित झाली फिल्मी सितारे मग ते कुठल्याही मालिकेतले असोत एकदा का प्रकाश झोतात आले कि पडध्या वरच त्याचं झगमगत वलय पाहून पडद्यामागे हे तारे कसे कसे असतात ,कसे वागतात ह्याची उत्सुकता साऱ्यांनाच असते कित्येकजण तर पडद्यावरच त्याचं आयुष्य हेच त्याचं खर आयुष्य आहे अस मानु लागतात.
                           टी वी मुळे आज आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिल्मी सितारयांच पडद्या मागच आयुष्य आपण सहजतेन पाहू शकतोय आजची नवी पिढी देखील आपली पब्लिसिटी पटकन cash करत चाहत्याशी फोनवरून संवाद साधतेय त्यांच्यात सहजतेन मिसळतेय गावागावात कार्यक्रमातून हजेरी लावतेय त्या मुळेच लोकांना हे कलावंत आपलेसे वाटतात.
                       टी .वी. येण्याआधी आणि नंतरही सिने,नाटय कलावंताना भेटण त्यांच्याशी संवाद साधण तितकस सोप नव्हत आणि त्या आधी मुंबई पुण्या बाहेरील चाहत्यांना त्यांची झलक दिसणहि दुर्लभ होत फक्त पेपरच्या रविवार पुरवणीतून त्यांच्या बद्दल वाचायला मिळे लहानपणी आई आम्हाला तीन पाहिलेल्या पन्हाळगड वर झालेल्या शुटींग च रसभरीत वर्णन सांगायची दीक्षित मास्तर (कवी संजीव ) ह्यांच्या गीतांचा समावेश असलेल्या बोलपटातील नामवंत अभिनेत्री ,तिच्या सोबतच तीच वास्तव्य त्या, दरम्यान तीन अनुभवलेलं तीच चांगुलपण ,तिची राहणी,तिचा अभिनय ह्या बद्दल ती आम्हाला नेहमी सांगायची तेव्हा नवल वाटायचं पण म्हणून आम्हाला सिनेमे पाहण्याची मुभा नव्हती कारण नंतर च वातावरण बदलल वर्षातून एक दोन सिनेमे तेही चांगले असतील तरच पहायला मिळत.नाटक उशिराने असल्याने फारसे कोणी पाहत नसत आमच्या दूरच्या मावस काकांकडूनहि आम्हाला सिने कलावंतांचे किस्से कळत
शाळेत असताना एकदा आम्हाला आमच्या वर्ग मैत्रिणीकडून "शशिकला "सोलापुरात आल्याच कळाल तिच्या घराच्या समोरच शाशिकालाजीचघर होत तीन आम्हाला शाशिकलाजीची भेट घडवण्याच कबुल केल अर्थात घरच्यांच्या परवानगीन आम्ही दुसरया दिवशी भेटण्याची वेळ ठरवली पण जायला वेळ झाला अन त्यांची आरामाची वेळ संपली ती त्यांच्या व्यायामाची वेळ होती त्या मुळे त्यांनी दुसरया दिवशी भेटीची वेळ दिली आमचा हिरमोड झाला पण मैत्रिणीच्या माडीवरून आम्ही शाशिकलाजींना पाहिलं शाशिकलाजी त्यांच्या वयापेक्षा कितीतरी लहान दिसत होत्या सुंदर सडपातळ गुलाबी सलवार कमीझ घातलेल्या शाशिकलाजी माडीवर येरझारा घालत होत्या त्या वेळेस त्या एक प्रथितयश अभिनेत्री आणि खलनायिकाही होत्या.
एकदा बेंगलोर च्या काबिनी जंगल सफारी मध्ये अमेरिकन अभिनेत्री गोल्डी हॉन तिच्या फिल्मी युनिट सोबत आली होती पंचेचाळीसची गोल्डी हॉन अवघी विशीची दिसत होती तिच्या सहकारयाकडून तीच वय कळाल तेव्हा तिच्या फिगर maintenance च नवल वाटलं दिवसभर लंच ,डीनर ,camp फायर मध्ये आम्ही सोबत होतो दुसरया दिवशी आम्ही थोडस शुटींग ही पाहिलं तिच्या सहकारयाकडून दुपारी भेटण्याची वेळ ठरवली पण नंतर वेटर कडून तीन खूप ड्रिंक्स घेतल्याच कळाल अन आम्ही तिच्याशी बोलण्याचा विचार बदलला सुधाचंद्रंन आम्हाला एकदा मुंबईत दिसली ती अंधेरीला तिच्या गाडीत एकटीच ड्रायवरची वाट पहात होती तिचा ड्रायवर तिला न सांगता कोठेतरी निघून गेला होता आणि तिला शुटींग स्थळी लवकर पोहोचायचं होत .
             पुढे मी रीतसर पत्रकारितेचा कोर्स केला अन अशोक शिंदे ,मैथिली जावकर ,रमेश भाटकर ,कुलदीप पवार ह्यांच्याशी बोलण्याची संधी मिळाली पुण्याला माझ्या कुटुंबीयांसोबत अशोक शिंदे यांची मुलाखत रंगली अर्थात आधी रीतसर मुलाखतीची वेळ ठरवूनच. त्या दरम्यान त्यांचा अभिनय संघर्ष ,कुटुंब वत्सलता ,अन समोरच्याला मान देण्याची वृत्ती अनुभवली नंतर यवतमाळ येथे आल्यावर त्यांनी आवर्जून आठवण ठेवली रमेश भाटकर पुण्यात "हृदयस्पर्शी "सिनेमाच्या प्रिमियर साठी आले होते त्यांनी तो सिनेमा आवर्जून पहा अस सांगितलं पण वेळेअभावी आम्हाला सिनेमा पाहता आला नाही नंतर तो आम्ही पहिला आणि आम्हाला तो आवडलाही यवतमाळ येथे तेही नाटकाच्या निमित्ताने आले तेव्हा खलनायकी ढंगाची त्यांची भूमिका पाहून आश्चर्य वाटल खर पण त्याही भूमिकेत त्यांचा अभिनय उत्तम असल्याच मी त्यांना सांगितलं.


                   "बायको बिलंदर नवरा कलंदर " ह्या कुलदीप पवार दिग्दर्शित करत असलेल्या नाटक च्या निमित्ताने कुलदीप पवार यवतमाळ येथे आले होते इथल्या एका शाळेच्या प्रांगणात ते नाटक होणार होते आणि त्याच शाळेच्या hall मध्ये त्यांच्या मेकअप वैगरेची सोय केलेली होती hall ला पडदा बांधून महिला कलाकारांची चेंजिंग ची सोय केलेली होती कुलदीप पवार आपल्या सहकारयांशी चर्चा करण्यात मेकअपमन मेकअप करुन देण्यात ,प्रेसमन कपड्यांना प्रेस करण्यात मग्न होते साऊंड मन आणि इतर कलावंतांची ये जा सुरु होती व्यस्ततेमुळे कुलदीप पवारांनी मुलाखतीसाठी नंतरची वेळ दिली आणि ते सह कलाकारांना अभिनयाचे प्रात्यक्शित दाखवू लागले.


                              कीर्ती गोसावी मेकअ करून तयार होते त्यांना त्यांच्या आजोबांचा अभिनय वारसा लाभलेला आहे एका प्रश्ना दरम्यान कीर्ती गोसावी हे IIT पवई तून engineer झालेले आहेत हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं तेव्हा आमच बोलण ऐकून कुलदीप पवार म्हणाले ,"अहो !लोकांना वाटत इथले लोक मद्दड असतात, अर्ध शिक्षित असतात .पण तस नाही इथंही डॉक्टर engineerआहेत अभिनय करण , नाटकात काम करण काय इतक सोप असत ? उलट इथे तर कॉमन सेन्सचा खूप वापर करावा लागतो वैयक्तिक अडचणी दूर ठेवून अभिनय करावा लागतो खूप संकट येतात पण न डगमगता त्यांना तोंड ध्यावे लागते ,कितीतरी व्यवधान सांभाळावी लागतात . कित्येकदा एखाद्या व्यावसायिकाचा फोन येतो कि आमचा मुलगा अभ्यासात हुशारनाही त्याच तिथे ही जमत नाही त्याला तुमच्या कडे घ्या . पण हेकाय इतक सोप असत! एकवेळ अभ्यास करून घोकंपट्टी करून engineer होता येत पण अभिनय अंगात असावा लागतो इथे मेहनतीला पर्याय नाही वेळेवर अभिनय करावा लागतो संवाद म्हणावे लागतात ,वेळ निभावून न्यावी लागते इथे अंगभूत कलागुणांना महत्व असत!"



बरोबर आहे ,अशोक शिंदे engineer आहेत ,मैथिलीही उच्चशिक्षित आहे आणि आता तर नवीन कलावंतही doctor, engineer आहेत त्यांच्या प्रसिद्धी वलया मागे त्यांची अपार मेहनत ,चिकाटी,एकाच वेळी अनेक सिरियल्स मधले संवाद पाठ करण शुटींगच्या वेळा साभांळण ,धावपळीत शुटींग स्थळी पोहोचण आणि आपल डायेट सांभाळत ,सारा ताण विसरून चाहत्यांशी हसत मुखान संवाद साधण हेच फिल्मी सिताऱ्यांच खर आयुष्य असत .

Wednesday 30 October 2013

अखेर यवतमाळ येथिल शास्त्री नगर येथे पाणी पुरवठा पूर्ववत

                       अखेर नागरिकांच्या तक्रारीची व बातम्यांची दखल घेत पाणी पुरवठा विभागाने शास्त्री नगर मधील पाणी पुरवठा सुरळीत केला आहे त्या मुळे गृहिणींनी सुटकेचा श्वास घेतला आहे पण हा पाणी पुरवठा किती दिवस सुरळीत राहील कोण जाणे शिवाय अजूनही भरपूर पाणी साठा असता नाही पाणी अजूनही एक दिवसाआडच सोडण्यात येते तरी तो पाणी पुरवठा दररोज करण्यात यावा अशी लोकांची मागणी आहे

Wednesday 23 October 2013

दिवाळीच्या तोंडावर यवतमाळ येथील शास्त्री नगर येथे उशीराने पाणी पुरवठा

         यंदा विर्भात पाऊस नको इतका पडला त्या मुळे कित्येक ठिकाणी पूर आला तोही दोन तीनदा त्या मुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आणि धरणाची दारे उघडुन पाणी बाहेर सोडावे लागले.उन्हाळ्यात दुष्काळाने त्रस्त झालेल्या यवतमाळकरांना वाटले आता पाणी नियमित येईल पण गेल्या दोन तीन महिन्या पासून यवतमाळ येथील शास्त्रीनगर,दाते कॉलेजच्या मागची बाजू येथे पाणी पुरवठा अनियमित होत आहे दसरयालाही पाणी उशिराने म्हणजे संध्याकाळी पाच वाजता झाला.
      आता दिवाळीच्या तोंडावर तर पाणी दुपारनंतर केव्हाही कमी दाबाने होत आहे सकाळी कधी थेंब,थेंब कमी दाबाने पाणी बाहेर अंगणात येते व घरात दुपारी पाच वाजता पाणी सोडल्या जाते आज दिनांक तेवीस रोजी तर रात्री आठ वाजता थेंब,थेंब बाहेर पाणी सोडण्यात आले तर घरात रात्री दहा वाजता थोड्या ज्यास्त दाबाने थोडा वेळ पाणी सोडण्यात आले ह्या बाबतीत विचारणा केल्यास कधी लाईट नसल्याने उशिराने तर कधी टाकीत पाणी भरल्या न गेल्याने उशिरा तर कधी व्हाल्व नादुरुस्त असल्याचे सांगितले जाते तो कधी दुरुस्त होईल व कधी पाणीपुरवठा सुरळीत होईल हे संबंधितांनी जाहीर करावे कित्येकदा तर यवतमाळ येथे बाहेर धो,धो पावूस पडत असताना घरात मात्र पाणी येत नाही अशी स्थिती होती आधीच यवतमाळ येथे एक दिवसाआड पाणी सोडण्यात येते त्या मुळे नागरिकांना पाणी टंचाईला तोंड ध्यावे लागते तेही यवतमाळ येथे मुबलक पाणीसाठा असताना तेव्हा संबंधितानी ह्या कडे लक्ष देवून नागरिकांना रोज सकाळी वेळेवर पाणी मिळेल ह्या कडे लक्ष ध्यावे ./div>

Monday 14 October 2013

महाराष्ट्रीयन लूक

                   नुकतीच गोकुळ अष्टमीची धामधूम संपली,पाठोपाठ गौरी,गणपतीही उत्साहात साजरे झाले आणि आता नवरात्रोत्सव सुरु आहे नवरात्रात पूर्वी गरब्याला महत्व होत ते गुजराथी समाजात पण हळू,हळू गरब्याला उत्सवी स्वरूप प्राप्त झाल अन गरबा प्रकाशझोतात आला त्याने तारे, तारका, गायक,वादक ह्यांनाही भुरळ पाडली आणि ते गरब्यात येताहेत म्हटल्यावर तरुण तरुणी,आणि इतर नागरिकही त्यात हौसेन सामील होऊ लागले गरब्यामुळे घागराचोळीलाही महत्व आले घागरयाचे वेगवेगळे डिझाईन पाहायला मिळाले लहानथोर सारयांनाच तो पेहराव आवडला आणि त्याने मार्केट काबीज केल.
                        आता घागरा चोळीला स्पर्धा करीत नऊवारी झोकात पुढे आलीय नव्या रुपात,नव्या ढंगात . नव्या पिढीला तीच अप्रूप वाटतंय म्हणून कि काय आताशा नऊवारी जिकडे तिकडे मानान मिरवतेय fashion डिझायनरलाही तीन भुरळ पाडलीय मागे एका fashionशो मध्ये नऊवारीचा नवा अविष्कार पाहायला मिळाला हि नऊवारी धोतीसारखी शिवलेली वर कुडता आणि नाकात नथ अशा नव्या जोशात सामोरी आली होती.
                 आता तर काय जिथे तिथे नऊवारी दिसू लागलीय पूर्वी ब्राम्हणात नवरात्रात अष्टमीला घागर फुंकत तेव्हा किव्हा मंगळागौरीला हौसेन नऊ वारी साडी घातली जायची हे सण टी.वि वर आले आणि मग प्रत्येक सणाला टी .वि.वरच्या अभिनेत्री channel वरच्या बातमीदार महिला नऊ वारी ,नथ हौसेन घालू लागल्या मिरवणुकीत महिला युवतीहि नऊवारी परिधान करून नथ घालून सहभागी होऊ लागल्यात.
              आता नवरात्रोत्सवात ठिकठीकाणी देवीचा जागर ,होम हवन ,आरत्या,गोंधळ ह्या सोबतच वेगवेगळ्या स्पर्धा सुरु आहेत आणि ह्या स्पर्धेत नऊवारी नथीसह महाराष्ट्रीयन लुक ह्या नावान दाखल झालीय .म्हणतात ना! कालचक्र अविरत फिरत जुनी गोष्ठ पुन्हा नव्यान येते अगदी fashion सगट तशीच नऊवारी नथीसह fashion विश्वात दिमाखान विराजमान झालीय.
           हे पाहून खरच नवल वाटत स्वातंत्र पूर्व काळात बायका नऊ वारी साडी नेसत कारण सहा वारी साडी नेसायची त्यांना मुभाच नव्हती मग त्या विरोधात ब्र काढायची कोणाची बिशाद! नऊ वारी साडी ,नाकात नथ आणि अंगभर दागिने घालून दिवसभर घरात राबण त्यांच्या अंगवळणी पडल होत .त्या वेळच्या समाज सुधारकांच्या अथक प्रयत्नाने सहावारी साडी अस्तित्वात आली समाज सुधारक आगरकर यांचही मत अस होत कि बायकांनी नऊवारी धोती सारखी शिवलेली वर कुडता आणि ओढणी असा सुटसुटीत पोशाख परिधान करावा त्या काळी त्यांना खूप विरोधही झाला ,खूप संघर्ष करावा लागला हाच संघर्ष मधल्या पिढीला सलवार कमीज घालण्यासाठी करावा लागला त्या वेळेस ते इतक सोप नव्हत स्वातंत्र पूर्व काळात पुरषांनाही धोतर शर्ट आणि टोपी असाच पोशाख वापरावा लागे आणि आजचे नव युवकही हौसेने धोती कुडता नव्या रुपात घालू लागले आहेत.
            आई,आजीच्या संघर्षाचा वारसा पुढे नेत मधल्या पिढीच्या कृपेन आजच्या स्रीया सहजतेन
जीन्स ,स्कर्ट्स सलवार कमीज इतकच काय आपल्याला हवा तो ड्रेस परिधान करू शकतात खरेतर आजच्या स्रियांसाठी सर्वार्थान हे गोल्डन युग आहे चुलीपासून अंतराळात भरारी मारलेल्या स्रियांच यशस्वी युग ,अर्थात चुलीलाही आता glamour प्राप्त झालय संजीव कपूर आणि तत्सम शेफची ,अन channel वाल्याची कृपा.
                   आजची पिढी वेगवान आहे करिअरिष्ट आहे अशा वेळेस नऊ वारीचा हा नवा अविष्कार किती दिवस टिकेल?स्रिया पुन्हा जुन्या कडे वळतील? नऊ वारी साडी घालून नथ घालून सणांच सेलिब्रेशन करण नव्या युवतींना किती काळ आवडेल? त्या त्यात किती काळ अडकतील? हे येणारा काळच ठरवेल.
                 काही का असेना आगरकराना अपेक्षित असलेला आणि आधीच्या पीढीन ज्या साठी संघर्ष केला तो वेश आता fashion म्हणून नव्या रुपात नव्या झोकात मिरवतोय हा काळाचाच महिमा अर्थात जुन्या वेशभूषेत सणवारात अडकताना पुन्हा जुना काळ तर येणार नाही ना! ह्याची दक्षता मात्र घ्ययला हवी.

यवतमाळ येथील दुगोत्सव


               एकता दुर्गोत्सव मंडळ


यवतमाळ येथील छोटी गुजरी येथील एकता दुर्गोत्सावाचे हे ४२वे वर्ष असून दर वर्षी ते एखाद्या ज्वलंत समस्येवर प्रकाश टाकतात ह्या वेळी त्यांनी स्त्री भ्रूणहत्त्या ,हुंडा बळी ,वृद्धांची समस्या म्हणजे त्यांचे पालनपोषण न करता त्यांच्याच घरातून त्यांना घराबाहेर काढणाऱ्या मुलांच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न केला आहे तसेच स्री,पुरुष असमानता,या सारख्या समस्या पाहून चूप न बसता त्या विरोधात आवाज उठवा असा संदेश देणारे बोर्ड लावले होते मंदिराची सजावट पत्रावळ्या व द्रोण ह्यांच्या साह्याने केली असून कलकत्ता येथील कारागिरांना त्या साठी पंधरा दिवस लागले .

 


नवशक्ती दुर्गोत्सवमंडळ
येथील कार्यकर्ते दरवर्षी अखंड ज्योत अभियान राबवतात त्याला नागरिक भरभरून प्रतिसाद देतात गणपती मंदिरा जवळ असलेल्या ह्या मंडळाने ह्या वर्षी सरस्वती ,लक्ष्मी आणि दुर्गा अशा तीन देवीची प्रतिस्थापना केली होती.


हितेन्वेशी दुर्गोत्सव मंडळ
येथील मंडळाने झोपाळ्यावर बसलेल्या देवीची मूर्ती विलोभनीय असून, मंडळाचे हे एकविसावे वर्ष आहे.

लोकमान्य दुर्गोत्सव मंडळ
आर्णी रोड येथील ह्या मंडळाने देवीच्या मागे ,शंकराची पिंड व त्यावर गुहेतून झिरपणारे  पाणी असा देखावा तयार केला.

पोलिस लाईन येथील आकर्षक मंदिरात विराजमान झालेली देवी.

निवांत क्षणी प्रसादाचा आस्वाद घेताना पोलिस
फोटो -पूजा दुद्दलवार -BE (Soft).BMC

Wednesday 18 September 2013

यवतमाळ येथील गणेश सजावट


  यवतमाळचा राजा
          

               येथील मारवाडी चौकातील नवयुवक गणेश उत्सव मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षात गणेशा पुढे शीश महालाचा देखावा साकारला आहे प्रवेश दारावर दोन्ही बाजूने लाईट च्या साह्याने जल महालाचे दृश्य साकारले आहे तर पायरया वर काचेखाली कुंदन व क्रिस्टलचा उपयोग करून सुंदर नक्षीकाम केले आहे .
 
फ्लोअरिंग वर देखील चौकोनी काचेखाली कमळ व इतर साहित्य वापरून पाण्याचे कारंजे त्यात आकर्षकता आणत आहे.



बाजुच्या भिंती वरील छत देखील आकर्षक काचकामानी सजवले आहे.




 मूर्तीचा सभामंडप ५१ फूट असून ही मूर्ती मूर्तिकार वनकर बंधूनी तयार केली आहे मूर्ती २५ किलौ चांदीच्या सिहासनावर विराजमान असून मुकुट सोन्याचे व दागिने रत्न जडीत आहेत समोरचा मूषक साडे आठ किलो चांदीचा आहे.



      यवतमाळ येथील आर्णी रोड वरील महारुद्र गणेश मंडळाने ह्या वर्षी विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे त्यांनी कलकत्त्याच्या मूर्तीकारांनी बनवलेल्या मुर्तीद्वारे साकारलेले हे दृश्य


फोटो -पुजा दुद्दलवार BE (Soft ),BMC  

Friday 13 September 2013

यवतमाळ येथे गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत

                             यवतमाळ येथे गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले यवतमाळ येथील मारवाडी चौकातील नवयुवक मंडळाने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे त्या मुळे ह्या मंडळाच्या "यवतमाळचा राजा" असे संबोधण्यात येणारया गणेशाचे स्वागत खास पेशवाई थाटात झाले गणेशाच्या मिरवणुकीत हत्ती , उंट ,घोडे ह्यांचा सहभाग होता तर गणेशाची स्वारी पुष्पक विमानाच्या प्रतिकृतीवर विराजमान झाली होती सोबत पेशवाई वेष घातलेले तरुण सहभागी झाले होते गणरायावर तोफेद्वारे पुष्प वृष्ठी केल्या जात होती ही मूर्ती शिश महालात विराजमान झाल्याचा देखावा साकारण्यात आला आहे .
                                       यवतमाळ येथे गौरीचे स्वागतही उत्साहात झाले विदर्भात महालक्ष्मीच्या प्रसादाचे विशेष महत्व असते इथे महालक्ष्मीच्या जेवणाच्या दिवशी जेवणावळी असतात ज्यांच्या कडे महालक्ष्मी बसतात तिथे प्रसादाच्या पंक्ती च्या पंक्ती जेवू घातल्या जातात महालक्ष्मी पुढे रास टाकल्या जाते व नंतर राशीचे जेवण दिल्या जाते जेवणात सोळा भाज्या पूरण पोळी ,वडे ओतपल्लु [घारगे]तर असतातच पण इथे महत्व असते ते आंबीलीला आंबील दोन प्रकारे केल्या जाते काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात ज्वारीच्या कण्या ज्या प्रकारे केल्या जातात तशी फोडणीची आंबील तर काही ठिकाणी साधी आंबील शिजवून त्याच्या वड्या पाडून त्यात दुध साखर घालून दिल्या जातात शिवाय पंचपक्वानांचा नैवेध्य्ही असतोच पश्चिम महाराष्ट्रात महालक्ष्मी आल्या दिवशी भाकरी पालेभाजी व शिरयाचा नैवेद्य दाखवतात.
                      तर पश्चिम महाराष्ट्रात बाहेरच्यांना जेवण दिल्या जात नाही कारण जर कोणी जेवायला आलेच तर त्याला तिथेच मुक्काम करावा लागतो आणि जर राहणे शक्य नसेल तर लक्ष्मी पुढे पैसे दक्षिणा म्हणून टाकून मगच बाहेर जाता येते विदर्भात जेवल्यानंतर हात धुण्यासाठी घरातच एक जागा करून तिथेच हात धुवावे लागतात जेणे करून खरकटे इकडे तिकडे जाऊ नये तर पश्चिम महाराष्टात महालक्ष्मी आल्यानंतर तीन दिवस पैसे खर्च करत नाहीत कचरा बाहेर टाकत नाहीत आणि घर झाडतही नाहीत .
                पश्चिम महाराष्ट्रात हळदी कुंकवाचे विशेष महत्व असते तेव्हा बरयाच जणांना बोलावले जाते महालाक्ष्मिपुढे सजावट केली जाते पूर्वी सोलापुरात काम शेट्टी ,नामदेव चिवडेवाले ह्याच्या कडची आरास पाहण्यासाठी खूप गर्दी व्हायची चिवडे वाल्यांकडे तीन आरसे महालक्ष्मी मागे असे ठेवल्या जात कि त्या मोठया आरशात महालक्ष्मीच्या अगणीत प्रतिमा दिसत तो अप्रतिम देखावा पाहताना पाहणारयाचे भान हरपे.
                          आता सणांना उत्सवी स्वरूप आलय सोळा भाज्या एकमेकात मिसळून भाज्यांची संख्या कमी करण्यात आलीय त्या मुळे त्यात नाविन्य तर आलच शिवाय भाजी संपवण पण सोप झालय माझ्या दोन्ही कडच्या आजोळी महालक्ष्म्या बसत सोलापूरला आम्ही आमच्या आजोळी महालक्ष्मी साठी जात असू तेव्हा सारे जमत आजच्या भाषेत गेट टूगेदर होई जेवल्या नंतर तिथेच रहाव लागे तेव्हा आजी आजोबांचा येव्हडा धाक असे कि ताटातल्या सोळा भाज्या संम्पवाव्याच लागत आता खूप बदल झालाय तेव्हा महालक्ष्मी पुढे आरास करताना समोर छान छान खेळण्या मांडल्या जात आता सजावटी साठी बरयाच वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.

Thursday 12 September 2013

यवतमाळ येथे होतोय अजूनही एक दिवसाआड व अनियमित पाणी पुरवठा

            पूर्ण विदर्भात ह्या वर्षी अतिवृष्ठी झाली पुरामुळे धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले त्या मुळे गावात पाणी शिरून शेत,घरे,दुकानांचे नुकसान झाले पण तरीही पाणी पुरवठा विभागाच्या योग्य नियोजना अभावी अजूनही व्यवस्थित पाणी पुरवठा होत नाही खरेतर इतका पाऊस पडल्यानंतर दररोज नियमित पाणी नळाद्वारे सोडण्यात यायला हवे पण पाणी एक दिवसा आडच सोडले जाते दाते कॉलेज मागील शास्त्री नगर मध्ये व काही भागात कमी फोर्सने ते ही अनियमित वेळेत दुपारी बारा ते चार वाजता पाणी सोडले जाते.मग मात्र रात्री पर्यंत पूर्ण फोर्सने पाणी सोडल्या जाते सकाळी दहा पर्यंत बाहेर थेंब,थेंब पाणी येते व नंतर बंद होते हि वेळ गृहिणींसाठी गैरसोयीची आहे तेव्हा आधी प्रमाणे दररोज पहाटे पासून दुपारी दोन पर्यंत नियमित पाणी सोडण्यात यावे शिवाय दिवसभर पाणी न सोडता तो नियमित करावा म्हणजे जास्तीचे पाणी वाया न जाता पाणी उन्हाळ्या पर्यंत नागरिकांना पुरेल व लोकांना विशेषत: गृहिणींना उन्हाळ्यात पाणी टंचाई ला तोंड ध्यावे लागणार नाही.

Tuesday 3 September 2013

यवतमाळ येथे डासांचा त्रास वाढला

                                                     यवतमाळ येथे सद्या डासांचा त्रास वाढला असून दिवसभर डासांना प्रतिबंध करण्यारया ऑल आउट ,मच्छर अगरबत्ती व तत्सम साधनांचा वापर करावालागतोय ,मध्यंतरी यवतमाळ येथे डेंगू चे रुग्ण आढळले होते शिवाय येथे मलेरिया ,हिवतापाचीही साथ सुरु आहे अशा वेळेस नियमितपणे नाल्या साफ करणे गाजर गवत काढणे गरजेचे आहे  कारण गाजर गवता मुळेही बऱ्याच समस्या उदभवतात पण सध्या यवतमाळ येथे नगरपालिकेत अविश्वास ठरावावरून राजकारण सुरु आहे त्या मुळे निवडून आलेल्या प्रतिनीधींना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय आपण ज्यांच्या बळावर निवडून आलोय हे ते विसरलेत.
                     डासांच्या समस्येवर उपाय म्हणून फ्वागिंग मशीन द्वारे फवारणी करण्यासाठी मशीन खरेदी झाली काही दिवस नियमित फवारणीही केल्या गेली पण पुन्हा वादाच्या भोवरयात फ्वागिंग मशिन फवारणी अडकल्याने नागरिकांना मात्र डासाच्या त्रासाला व त्या मुळे होणारया त्रासांना सोमोरे जावे लागते नगरपालिकेत  वाद सुरु असताना काही कर्मचारी नागरिकांच्या घरातील कामे करण्यात गुंतले आहेत त्या बाबतीत विचारणा केल्यास ते आपल्यालाच धमकावतात ह्या बाबतीत काही नगर सेवकानाही माहिती असून ते काहीही कारवाई करत नाहीत त्या मुळे त्यांचावर वचक बसत नाही अशा नगर सेवकांवर ,काम करून घेणारया नागरिकांवर व कर्मच्यारयांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे कारण येथे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
                     शिवाय नाली साफ केल्यानंतर काही कर्मचारी काढलेला कचरा तिथेच टाकून निघून जातात त्यामुळे सुद्धा डासांचे प्रमाण वाढते त्या मुळे तो कचरा लगेचच उचलून गाडीत टाकण्यास बाध्य करावे ,बंद पडलेली फ्वागिंग मशीन फवारणी सुरु करावी शिवाय बरयाच दिवसापासून यवतमाळ मधील नागरिकांची अंडर ग्राउंड नालीची मागणी पूर्ण करावी म्हणजे उघडया नाल्यांमुळे होणारा त्रास कमी होईल(नालीत कचरा साचून तुंबणे,नालीत साचलेल्या कचरया मुळे वाढणारी डासांची पैदास ,त्यातच डुंबणारी डुकरे)शिवाय घंटागाडी कर्मचारयानाही नाली साफ करावी लागणार नाही.
                       फक्त निवडून येण्यापुरते आम्ही हे करू ते करू म्हणून आश्वासने देवून कामाकडे व नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास लोकांनी अशा प्रतिनिधींना परत बोलवावे आता लोकांना रोग प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप होईल व निरोगी लोकांना उगाचच गोळ्या घ्याव्या लागतील त्या मुळे रोग उद्भवण्या आधीच योग्य उपाय केल्यास डासांना प्रतिबंध बसेल.

Friday 23 August 2013

वीरपत्नी

                                                  
                 सकाळ ह्या दैनिकासाठी कर्तुत्ववान महिलांचं बाईमाणूस नावाच सदर मी सकाळच्या यवतमाळ येथील पहिल्या आवृत्ती साठी चालवलं होत तेव्हा मी काही लष्करातल्या महिलांच्या मुलाखती घेतल्या होत्या सध्या सीमेवर सैनिकांची पाकिस्तानी घुसखोरांबरोबर चक मक सुरु आहे देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या पत्ञीचि अवस्था कशी असते हे ह्या मुलाखतीवरून कळेल.
                               सीमेवर घुसखोरी करणाऱया अतिरेक्यांशी लढताना  शहिद झालेल्या वीरपुत्र भास्कर पांतोड ह्या जवानाची वीरपत्ञी म्हणून जगताना वाट्याला आलेलं एकाकीपणाच दु:ख मनात साठवून व मुलांच्या भवितव्याचा विचार करून सैनिक विध्यार्थिनी वसतिगृहात अधीक्षिका ह्या पदावर काम करणारया सुरेखा पांतोड म्हणजे एक स्वावलंबी कर्तुत्व.
                                    अकोला जिल्ह्यातल्या मिर्झापूर येथील सुरेखा नवलकर याचं देवळी च्या भास्कर पांतोडशी लग्न झालंतेव्हा त्यांच्या लष्करातल्या नोकरीला सात वर्षे झाली होती त्यांनी लग्नाआधी आपल्या लष्करातल्या नोकरीची त्यांना कल्पना दिली होती तेव्हा वेगळ्या क्षेत्रातल्या देशसेवा करणारया ह्यातरुणाला घरच्या सारयांनी पसंत केल होत छोटयाश्या खेडयातून राजधानी सारख्या मोठया शहरात गावापासून दूर लष्करी वसाहतीमध्ये आल्या नंतरच नव जग त्यांना आकर्षून गेल पण जेमतेम दोन वर्ष होत नाहीत तोच त्यांच्या पतीची बदली डेहराडूनला झाली पुढे मुलगा लहान असल्यामुळे त्या सासरीच थांबल्या अन भास्कर पांतोडची बदली श्रीनगरला झालीमग मात्र सुरेखाताईनां तिकडे जाता आले नाही ते अगदी शेवटपर्यंत.सासरच कुटुंब मोठ होत कामात वेळ जाई पण मन मात्र पतीकडे धाव घेई.
                                   त्यातून लग्नाआधी त्यांच्या पतीन तिथली परिस्थिती सांगितलेली सीमेवर ड्यूटी असताना जवानांना हिमवादळाला तोंड देत बर्फात कडेकपारीत शत्रूवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवताना घरदार,जेवणखाण ह्याची शुद्ध नसते कित्येकदा उपाशी रहाव लागत सतत बर्फात राहून हातापायांची त्वचा थंडीत गारठते,खराब होते तर कधी पायाखालचा बर्फ कधी खचेल अनजवान आत गाडले जातील ह्याचा नेम नसतो एखाद्या बेसावध क्षणी शत्रूची गोळी शरीराचा नेम कधी घेईल ह्याचा नेम नसतो हे सार आठवल कि मन बैचेन होई .
                   म्हणूनच मन रमवण्यासाठी त्यांनी पंचायत समिती मार्फत चालवल्या जाण्यारया बाल वाडीत शिक्षिका म्हणून नोकरी सुरु केली त्यासाठी त्या रोज वणीला जा ये करीत एक दीड वर्षानंतर त्यांची देवळीला बदली झाली दर वर्षी सुट्टीत जेव्हा त्यांचे पती घरी येत तेव्हा मिळालेल्या पगारातून साठवलेल्या पैशातून मुलांच्या शिक्षणासाठी अकोल्याला त्यांनी घर बांधायचं ठरवलं तस ते बांधलही वास्तूच्या वेळेस ते आले तेव्हा दूरदर्शनवर सैनिकांच्या जीवनातल्या अनिश्चीततेविषयी तिथल्या परस्थिती विषयी विचारल होत पण अशा वेळी ते हसून उगाचच सांगत कि आम्ही खूप मजेत आहोत तस घाबरण्यासारख काही नाही पण सुरेखाताईनां तिथली सत्य परिस्थिती त्यांना होणारा त्रास माहीत होता तेव्हाच अतिरेक्यांचा जोर वाढला होता दरम्यान भास्कर पांतोड यांचा लष्करी सेवेचा पंधरा वर्षांचा बॉंड संपत आलेला होता ते चौदावे वर्ष होते आता लवकरच लष्करा तर्फे दिल जाणार रोजगाराच प्रशिक्षण घेऊन घरी परतायचं अस त्यांनी ठरवलं होत दरम्यान त्यांना दुसरी मुलगी झाली तेव्हा ते तिला पहायला आले सुट्टी संपवून नोकरीवर रुजू होतानाची आठवण सांगताना सुरेखाताई सांगतात कि ,त्यांनीजाताना त्यांना व त्यांच्या मित्रांना देण्यासाठी करंज्या केल्या होत्या तेव्हा तू आधी मुलांना दे माझा विचार करू नकोस ह्या पुढे तुला मुलासाठीच सार करायचंय अस सांगितल तेव्हा त्यांना खूप खटकल अन खरच तस झाल हे सांगताना सुरेखाताईनां अश्रू आवरत नाहीत जावून जेमतेम पंधरा दिवसही होत नाहीत तोच जम्मू काश्मिरात ऑपरेशन विजय राबवतानाच्या मोहिमेत अतिरेक्यांशी लढताना ते धारातीर्थी पडले त्यांच्या मृत्यूची तार सुट्टीमुळे चार पाच दिवसांनी पोहोचली त्या मुळे दिल्लीत त्यांच्या अंत्य संस्कारात कोणीही जाऊ शकले नाही ह्याची त्यांना खंत वाटते सुरवातीला कोणालाच हे खरे वाटत नव्हत पण जेव्हा लष्करी अधिकारी त्याचं सामान घेवून घरी आले तेव्हा मात्र वास्तवाची जाणीव झाली दुर्दैवाची गोष्ठ म्हणजे त्याचं व्यवस्थित पोहचल्याच पत्र देखील सार झाल्यावर येवून पोहोचल.
                                             आता पर्यंत सुट्टीत गाठभेट व्हायची जवळ तान्ही मुलगी भरल्या कुटुंबात आलेलं एकटेपण जीवनाचा साथीदार अर्ध्यावर साथ सोडून गेलेला जीवन अंधारून गेलेलं ते दिवस खूप कठीण होते लष्करातून त्वरित मदत मिळाली जिथे जिथे त्यांच्या पतीच पोष्टिंग झाल होत त्या,त्या ठिकाणाहून मदतीचा ओघ सुरु झाला जिल्हा सैनिक कल्याण केंद्रातल्या अधिकारयानी पैशाची योग्य गुंतवणूक,आवश्यक पत्र व्यवहारासाठी मोलाची मदत केल्याची त्या आवर्जून सांगतात त्याच काळात त्यांना आपल्या पायावर उभ रहाव अस वाटू लागल सैनिक कल्याण केंद्रामार्फत नोकरी विषयक माहिती मिळाली आणि पुण्याच्या सैनिक कल्याण केंद्रामार्फत लेखी परीक्षा व मुलाखतीनंतर नगरच्या सैनिकांच्या मुलींच्या वसतिगृहात अधीक्षक म्हणून त्यांची निवड झाली सुरवातीला आपल्यापेक्षा उच्चपदस्थ अधिकारयासोबत बोलताना भीती वाटे पण तिथल्या मुलांच्या वसतीगृहातले अधीक्षक व इतर सहकारयानी सांगितल की ,आपण सारे एकाच कुटुंबातले आहोत तेव्हा त्यांनी दिलेल्या धीरामुळे आत्मविश्वास वाढला पण मुलांना सासरी सोडून जाव लागल जीवनातल एकटेपण अन काहींची व्यंगात्मक टीका ह्या मुले नैराश्य यायच आपण कष्ट केले पाहिजेत हे जाणवायचं हळू हळू कामाची माहिती होत गेली धान्य स्वस्त दरात व चांगल कस खरेदी करायचं मुलींचे पैसे बँकेत जमा कसे करायचे हे त्या शिकल्या.
                                 जवळपास चार वर्षाच्या नोकरी नंतर त्यांची बदली यवतमाळला झाली इथल्या सैनिक विध्यार्थिनी वस्ती गृहातल काम त्या सांभाळतात अपंग व शहीद जवानांच्या मुलींना प्राधान्य देवून उर्वरित जागा इतरांना दिल्या जातात त्यांना मात्र पैसे ध्यावे लागतात नुकताच २००२मध्ये त्यांना वीरपत्नी म्हणून शासनातर्फे ताम्रपट मिळालाय दरवर्षी १ ऑक्टोबरला होणारया रायझिंग डे ला त्यांना बोलवल्या जाते व सन्मानपत्र दिल्या जाते नुकतेच २३ ऑगस्ट ला त्यांचे दिवंगत पती शहीद जवान भास्कर पांतोड ह्यांच्या स्मरणार्थ& विदर्भ संधानिक विकास मंडळातर्फे उभारण्यात आलेल्या बहूऊदेशिय सभागृहाचे देवळी येथे राष्ट्रवादी चे मंत्री आर आर पाटील ह्यांच्या हस्ते उद्घघाटन झाल(सद्या ते गृहमंत्री आहेत )
                                         देशासाठी बलिदान देणारया शहीद जवानाची ही वीरपत्नी देखील जीवनाची लढाई तेवढ्याच धैर्याने लढतेय.

Monday 19 August 2013

सोने पुन्हा तेजीत

            गेल्या काही महिन्यात सोन्याचे भाव कमी झाले होते सोन्या सोबतच चांदीचेही भाव कमी होत होते आंतर राष्ट्रीय बाजारात सोन्याचे उतरलेले भाव व रुपयाचे वाढते अवमूल्यन हि कारणे भाव उतरण्यास कारणीभूत असल्याचे जाणकार सांगत होते शिवाय काही आर्थिक सल्लागाराच्या मते ऑगस्ट पर्यंत सोने पंचवीस हजारा पर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती गेल्या काही दिवसात बाजारात फेरफटका मारल्यावर सराफाच्या दुकानात शुकशुकाट दिसत होता सोन्याचे भाव कमी होतील ह्या आशेने सामान्य नागरिक खरेदी करताना दिसत नव्हते शिवाय सोन्याची चेन,मंगळसूत्रांची चोरी काही थांबत नाही कोठेही जा चोरया होतातच त्या मुळे लोकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली त्यातून काही सोनारांनीच चोरीचे सोने विकत घेतल्याची घटनाही घडली ह्या साऱ्यांचा परिणाम सोने खरेदीवर झाला नाही तरच नवल.
             सोने आतातर तीस हजाराच्याही वर व चांदी पन्नास हजार रुपये किलो वर पोहोचली आहे सोने चांदीवरील आयात शुल्क वाढ व अंतर राष्ट्रीय बाजारातील सोने चांदीची दर वाढ हि कारणे जाणकार व्यक्त करत आहेत.

Friday 19 July 2013

आषाढी एकादशी

        आषाढी एकादशी निमीत्य लाखोच्या संख्येने लोक वारी सोबत पायी पंढरपुरात दाखल झालेत गेल्या महिन्याभरा पासून ते वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या पालख्यांसोबत पायी चालत आहेत त्यात सर्व जाती धर्मातील,वयोगटातील सुशिक्षित,अशिक्षित,शेतकरी,व्यापारी,नोकरदार सामील झाले होते वाटेतल्या अडचणींना तोंड देत पावसातही ही वारी मार्गस्थ होत होती त्यात काही परदेशी नागरिक व विद्यार्थीही होते
वारीसोबत चालण्यारयात काही अपंगही होते एरव्ही थोडेसेही चालल्यावर थकणारे आणि दुरूनच वारीला नमस्कार करणारे मध्यम वर्गीयही आता उत्साहात वारीत सामील होऊ लागलेत वारी सोबत ट्रकमधून खाण्या पिण्याचे साहित्य आचारी,सामान सुमान आणि वेळ पडली तर आवश्यक मेडिकल सेवा पुरवणारी वैद्यकीय मंडळीही होती वारीत फुगेवाले चांभार,शिंपी,आणि इतर व्यावसायिकही होते टी वी वरून हे सार पाहताना जणू एखाद गावच सोबत चालतंय अस वाटत होत.
आज जवळपास दहा लाखांच्या आसपास भाविक पंढरपुरात दाखल झालेत सारे रस्ते भक्तांनी फुलून गेलेत पूर्वी वारी एव्हढी प्रकाशझोतात नव्हती पण वारीकडे परदेशी नागरिक आकर्षित झाले आणि वारीवर सिनेमा निघाला आणि वारी प्रकाशझोतात आली कारण सीनेमावाल्याच्या मागे मिडियावाले आल्याने त्यांना आपसूकच प्रसिद्धी मिळाली त्यातून तरुणाई पण वारीत सामील झाल्यावर नेतेपण त्यात सामील झाले आणि वारीतल्या लोकांची संख्या वाढत गेली वारीतल्या काही लोकांनी निसर्गाच्या सानिध्यात वडाच्या झाडाच्या पारंब्यांना लोंबकळून सुरपारम्ब्या खेळाचा आनंद लुटला.
पूर्वी वारीच एव्हढ प्रस्थ नव्हत पंढरपूर सोलापूर जिल्यातल माझ्या आजोळचे नातेवाईक नियमित वारी करणारे आषाढी आणि कार्तिकी एकादशीला ते पंढरपूरला जात काही जण शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीसोबत पायी येत मला आठवतंय collageमध्ये असताना वारीचा मुक्काम सोलापूरच्या एका शाळेत होता माझे मावस भावजी पालखीची व्यवस्था पाहत आम्ही सारे नातेवाईक व शेजाऱ्यांनी मिळून तेव्हा वारीतल्या लोकांना खाण्याचे पदार्थ करून नेले होते तेव्हा टी .वी नव्हता पण प्रोजेक्टर द्वारा पडद्यावर गजानन चरित्र दाखवल्या जात होते.वारी सोबत आलेल्या एका पंच्याहत्तर वर्षाच्या आजीबाइच आम्हाला तेव्हा नवल वाटल होत आईने घरी बोलवून तिला जेवू घालून ओटी भरली होती आता बरीच वर्षे उलटलीत माझ्या माहेरचे अजूनही वारीसाठी जेवण देतात.आता बसेस,रेल्वेची सोय झालीय पंढरपूरला सहज पोहोचता येऊ लागलय पण नवल म्हणजे वारीतून चालणाऱ्यांची संख्या वाढतच चाललीय आणि पूर्वी वारीत एक आजीबाई होती आज कित्येक आहेत माझ्या मोठ्या बहिणीच्या लग्नानंतरचा एक प्रसंग मला आठवतोय तेव्हा काही म्हाताऱ्या बायका आम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या म्हणजे पंढरपूरला जाणारे म्हणून आमच्या पाया पडण्यासाठी वाकल्या होत्या तेव्हा आम्ही त्यांना थांबवल होत तेव्हा पंढरपूरला जाण खूप कठीण होत आज तेच लोक सहजतेन पायी चालत विठोबाच दर्शन घेऊ शकतात हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.आजच वारीच स्वरूप पाहता अस वाटत जणू विठोबाच्या दर्शनासाठी जाणारी वारी म्हणजे जातपात वय विसरून अखंड पायी चालणार चालत बोलत पर्यटन झालय
आमच मूळ घराण पंढरपुरच पुढे शिक्षणाच्या,धंद्याच्या निमित्यान माझे आजोबा सोलापुरात स्थायिक झाले त्या मुळे पंढरपुरात आम्ही नेहमीच जायचो तेव्हा आणि आता किती बदल झालाय ते आताच्या गर्दीतून दिसतय तेव्हाची थोडीशी गर्दीही आम्हाला खूप वाटायची तिथे आम्ही शांततेन दर्शन घेतलय तिथल्या झिपऱ्या शेवंतीचे गजरे घेत देवळात रेंगाळलोय दिवसभर देवळात नातेवाईकांच्या,मैत्रिणीच्या लग्नात सामील झालोय,हे आता सांगूनही खरे वाटणार नाहीं आता दर्शनाची रांग पाच किलोमीटर पर्यंत गेलीय दर्शनाला चोवीस तास लागत आहेत तरीही वारकऱ्यांच्या उत्साहाला उधाण आलय हजारो मैल चालत आलेल्या वारकरयाना फक्त ओढ आहे ती विठू दर्शनाची
आम्ही वारकरी वारकरी करितो पंढरीची वारी
सोबत हत्ती अन अंबारी वाटे चालण्यात सुख भारी
वाट पंढरीची चालता दर्शन एकात्मतेचे घडे
विठू भजनी रंगता जगाचाही विसर पडे
देव नांदतो अंतरी परी दर्शनाची आस भारी
पाहता विठोबाचे मुख मिळे त्रेलोक्याचे सुख
                          अशीच काहीशी अवस्था आज वारकरयाची झालेली असते.

Monday 1 July 2013

स्मरण कुंचल्याचे

              स्मरण कुंचल्याचे हे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यंग चित्राचे प्रदर्शन यवतमाळ येथे नुकतेच भरवण्यात आले होते स्व. बाळासाहेबांनी एकोणीसशे छप्पन्न ते त्यांनी चित्र काढणे बंद करेपर्यंतच्या व्यंग चित्रांचा त्यात समावेश होता ह्या दुर्मीळ चित्रांचे प्रदर्शन पहाण्यासाठी यवतमाळ करांनी गर्दी केली होती स्व. बाळासाहेबांच्या कुंचल्यातून साकारलेल्या चित्रात समाजकारण,अर्थकारण महागाई,यांचा समावेश तर होताच शिवाय दलबदलू राजकारणी,स्कायल्याब कोसळणार अशी अफवा उठल्यानन्तरची परस्थिती बांगलादेशाच्या युद्धाचा वेळची परीस्थिती त्यांनी आपल्या व्यंग चित्रातून साकारली होती .
    त्यांची काश्मीर प्रश्नावर त्या वेळचे काश्मीरचे दुटप्पी राजकीय नेते चीनच्या भिंतीआडून कशी हातमिळवणी करत आहेत, स्व. इंदिरा गांधींना नाकीनऊ आणणारे राजकारणी इंदिरा गांधीच्या नाकावर रेखाटलले व्यंगचित्र ,स्व. नानासाहेब परुळेकरांच्या मृत्युनंतरचे डोंगराआडचे सूर्याच्या जागी काढलेले चित्र स्व.इंदिरा गांधीच्या मृत्युनंतरचे पणतीचे चित्र विशेष उल्लेखनीय आहेत.

Tuesday 18 June 2013

भाजीचे भाव पावसामुळे कडाडले

              सततच्या पावसाने यवतमाळ येथे भाजी मार्केट मध्ये चिखल साचलेला होता तर पावसामुळे रस्ते बंद असल्याने बाजारात भाजी खूप कमी प्रमाणात विक्रीस आली आणि पावसाला उघाड मिळताच मार्केटमध्ये रविवारी भाजी घेण्याकरता लोकांनी गर्दी केली त्या मुळे आधीच कमी प्रमाणात आलेली भाजी संध्याकाळपर्यंत संपत आली होती भाजीचे भाव देखील खूप वाढलेले होते
              एरवी पाच ते दहा रुपये पाव किलौने मिळणारी भाजी वीस,ते तीस रुपये पाव किलौने विकल्या जात होती बाजारात कच्ची कैरी,व आंबे मात्र भरपूर प्रमाणात विक्रीला आले होते आंब्याचे भाव उतरलेले होते तर कच्या कैरयांचे भाव मात्र वाढलेले होते

Saturday 15 June 2013

यवतमाळ येथे सततधार पाऊस

               यवतमाळ येथे गेल्या चार पाच दिवसा पासून सतत धार पाऊस सुरु असून वातावरण ढगाळलेले आहे. उन्हाळ्यात उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना त्या मुळे दिलासा मिळाला असून शेतकरी पेरणीच्या लगबगीत आहेत विशेष म्हणजे उन्हाळ्यात उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना आता मात्र सूर्य अभावानेच दर्शन देत आहे  ह्या उन्हाळ्यात पारा गेल्या साठ वर्षाचा रेकार्ड मोडत काही ठिकाणी ४८ . सेल्शिअस तर काही ठिकाणी त्याच्याही वर पोहोचला होता. त्या मुळे नागरिकांना पावसाची प्रतीक्षा होती काही ठिकाणी तो लवकर बरसला पण यवतमाळ येथे तो उशिराने सुरु झाला सुरवातीला पावसाच्या तुरळक सारी बरसल्या पण गेल्या चार,पाच दिवसापासून पाऊस जो सुरु आहे तो काही थांबण्याचे नाव घेईना कधी रात्रीतून,तर कधी दिवसा मध्येच पाऊस मुसळधार कोसळत आहे.
                           
पाणी पुरवठा मात्र अजूनही दोन दिवसा आडच
                     ह्या आठवडयात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी देखील पाणी पुरवठा मात्र अजूनही सुरळीत झाला नाही उन्ह्यळ्यात थेंब ,थेंब येणारे पाणी बरया पैकी फोर्सने येत असले तरीही ते दोन दिवसांनी आणि उशिराने येत आहे गेल्या दोन.चार दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी,नाले दुथडी भरून वाहत आहेत अडान नदीलाही पूर आला असून बेंबळा प्रकल्पाचे चार दरवाजे तर अप्पर पूस धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत
                    जुन महिन्याच्या पहिल्याच पावसाने आर्णी येथिल अरुणावती नदीला पूर आला असून आर्णी तालुक्याचा बराचसा भाग पाण्याखाली गेला आहे त्या मुळे तुळजापूर यवतमाळ मार्गावरील वाहतूक ठप्प होती काही जणांच्या घरात व तळमजल्यावरील दुकानात पाणी शिरल्याने लोकांची दाणादाण उडाली त्या मुळे त्या लोकांनी शाळेमध्ये आश्रय घेतला.
                     दिग्रस मधेही सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून रस्त्यावर पाणी साचले आहे तर काही नवीन वस्त्यामधेहि पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांनातोंड द्यावे लागत आहे

Wednesday 8 May 2013

यवतमाळ येथे उन्हाची तीव्रता वाढली

          यवतमाळ येथे उन्हाची तीव्रता वाढलीय एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात व मार्च मध्ये अवकाळी पाऊस व गारा पडल्याने उन्हाची तीव्रता जाणवली नव्हती पण एप्रिलच्या मध्यावर आणि मे महिना सुरु होताच ऊन तापायला सुरवात झाली ती दिवसेन दिवस वाढतच आहे उन्हाची तीव्रता गेल्या काही दिवसात इतकी वाढलीय कि पारा बेचाळीस त्रेचाळीस वर पोहोचलाय सकाळी नऊ नंतर उन तापायला सुरु होते आणि उन्हाचा गरम झळा लागू लागतात त्या मूळे नागरिक घरी राहणेच पसंत करतात अगदीच महत्वाचे काम असल्या शिवाय कोणीही घरा बाहेर पडत नाही त्या मुळे दुपारी रस्त्यावर सामसूम असते
                 
आता पाण्याचीही टंचाई
                     उन्हाची तीव्रता वाढताच आता पाणी टंचाईही जाणवू लागलीय गेल्या काही वर्षापासून यवतमाळ येथे एक दिवसाआड म्हणजे तिसऱया दिवशी पाणी येते पण आता दोन दिवसांनी म्हणजे दर चवथ्या दिवशी पाणी सोडण्यात येत आहे त्या मुळे नागरिक त्रस्त आहेत शिवाय पाणी फोर्सने न येता थेंब थेंब येत आहे उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना पाणी टंचाई असल्याने कूलर चा वापरही करता येत नाही.
                विशेष म्हणजे ह्या वर्षी यवतमाळ जिल्ह्यात भरपूर पाऊस पडला कित्येक नद्यांना पूर आला काही गावे देखील त्यात वाहून गेली तरीही पाणी साठवण्याचे योग्य नियोजन न केल्याने यवतमाळ येथील नागरिकांना पाणी टंचाईस तोंड ध्यावे लागत आहे यवतमाळ जिल्ह्यातील सर्व पाणी प्रकल्पात साठलेल्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास पुढच्या वर्षी तरी लोकांना दररोज पाणी मिळेल शिवाय जास्त दाबाने पाणी सोडून ते लोकांपर्यंत त्याच दाबाने पोहोचते कि नाही हे पाहिल्यास लोकांना तीव्र पाणी टंचाईस तोंड ध्यावे लागणार नाही.

Friday 12 April 2013

गुढी पाडवा उत्साहात साजरा

                                                  काल सर्वत्र उत्साहात गुढी  पाडवा साजरा झाला
विशेष म्हणजे यंदाचा गुढी  पाडवा विविध क्षेत्रातल्या मान्यवर यशस्वितेंच्या हस्ते गुढी
उभारून  साजरा करण्यात आला हि गुढी  स्त्री शाक्तीचा जागर  करीत ,सकाळ दैनिकाच्या वतीने "  तनिष्का स्त्री प्रतिष्टा अभियाना अंतर्गत " कोल्हापूरच्या  महालक्ष्मी मंदिरात [ जिने दुष्टांचा,दैत्यांचा संहार केला अशी आख्यायिका सांगितल्या जाते त्या ] आदिशक्ती म्हणजेच स्त्री   शक्तीच्या साक्षीने उभारण्यात आली 
                   ठिकठिकाणी ढोल ताशांच्या निनादात , लेझीमच्या तालावर नाचत ,कुठे कवायती
सादर करीत तर कुठे नऊवारी घालून पारंपारिक वेशात मोटर सायकल वर स्वार होऊन
जुन्या नव्याचा सुरेल संगम  साधत मिरवणूकीने पाडव्याचे उत्साहात स्वागत झाले   खेड्या,पाड्यात
 पुणे ,ठाणे  ,नाशिक,व इतर ठिकाणी मान्यवर महिलेच्या हस्ते गुढी उभारण्यात आली          कालचा गुडी पाडवा पाहून  स्वातंत्र दिनाची आठवण आली इथे फरक इतकाच होता कि ही मिरवणूक गुढी पाडव्याची होती आणि इथे झेंड्या ऐवजी गुढी उभारल्या गेली अर्थात ही  गुढी स्त्री स्वातंत्र्याची होती आता खरया अर्थाने स्त्री स्वतंत्र झाली असे म्हणावयास हरकत नाही असे सुचित करणारी होती  ह्या वर्षीच्या गुढी पाडव्याची नोंद निश्चितच  ऐतिहासिक होईल
              काही ठिकाणी विधवांनाही मिरवणुकीत   सामील करून घेण्यात आले होते
आजचा हा स्त्री स्वातंत्र्याचा दिवस  स्त्रीयांच्या नशिबी येण्यासाठी माधवराव रानडे, रमाबाई रानडे ज्योतिबा फुले,  टिळक ,आगरकर ,इरावती कर्वे ह्या सारख्या कितीतरी सुधारकांनी अथक प्रयत्न केले
प्रसंगी दगडाचा मारा सहन केला सध्या सुरु असलेल्या झी टी वी वरील "उंच माझा झोका "मधून
आपण पाहतच आहोत आगरकरांनी स्त्रीयांना सलवार कमीज सारखाच  सुटसुटीत  पेहराव करता यावा
म्हणून सुधारक विचार मांडले पण ते अमलात यायला आजचा काळ यावा लागला
           मधल्या  पिढीने देखील स्त्री शिक्षणासाठी अथक प्रयत्न केले साधी  पदवी पर्यंत शिक्षण घेणे सुद्धा    तेव्हा कठीण होते मग उच्च शिक्षण आणि परदेश गमन तर दूरच  रमाबाईचा काळ स्वातंत्र्या पुर्वीचा  होता पण मधल्या पिढीचा स्वातंत्र्या नंतरचा सलवार कुडता ,जीन्स आणि आधुनिक पोषाख घालण  तेव्हा इतक  सोप  नव्हत  आज  साठीतली  महिलाही  सहजतेन   हवा तो ड्रेस वापरू शकते. आज मुली सहजतेने नोकरी,शिक्षणाच्या निमित्याने परदेशात राहू शकतात  त्याचे श्रेय मधल्या पिढीलाच द्यायला हवे. 
         हा बदल व्हावा म्हणून  मधल्या पिढीने प्रयत्न केले मोकळीक दिली जे  सण वार सोवळे ओवळे ह्यातून नव्या पिढीची सुटका व्हावी म्हणून प्रयत्न केले तेच सण आज आनंदाने साजरे होत आहेत कारण त्याला ग्ल्यामर प्राप्त झालय. ज्या नऊवारी ऐवजी सहावारी घालणे तेव्हा सोपे नव्हते ती नऊवारी साडी आज हॊस म्हणून घातल्या जात आहे अर्थात त्यात वावगे काही नाही  पण  सण साजरे करताना पारम्पारिकता  जपताना पुन्हा आपण मागच्या काळात तर जात नाही ना ,  ह्याचा विचार जरूर करावा  एकीकडे सुनिता विlल्यम्स कल्पना चावलाने  अंतराळात वास्त्यव्य करून जगाला स्तिमित केलेले असताना  आपण  सणा समारंभात गुरफटत  तर नाही  ना ह्याचे भान ठेवल्यास खऱ्या अर्थाने ती स्त्री स्वातंत्र्याची गुढी ठरेल
                           गुढी उभी राहिली आता पुढे काय ?
                    आता बायकांची समस्या सोडवणे ह्या गोष्टीला  प्रथम अग्रक्रम द्यायला हवे सर्वात पहिली महिलांच्या जिव्हाळ्याची समस्या म्हणजे मंगळसूत्र घालून निर्धास्त पणे सर्वत्र फिरता येणे त्या साठी मंगळसूत्र चोरांना पकडून त्यांची रवानगी  तुरुंगात करणे हे काम स्त्री प्रतिष्ठा अभियानातील महिला पोलिस करू शकतात घरा बाहेर जाताच होणारया चोरया रोखू शकतात घरा घरातून होणारा बायकांचा छळ रोखण्यासाठी प्रयत्न करू शकतात कित्तेकदा बायकाच बायकांचे पाय ओढतात अशांना समज द्यावी
महागाई विरोधात काम करता येईल गावातील,शहरातील समस्या सोडविण्यासाठी संबंधितांना  धारेवर धरता येईल आणि हे जेव्हा प्रत्यक्षात घडेल तेव्हा ती स्त्री प्रतिष्ठा अभियानाची खरी गुढी ठरेल

Wednesday 3 April 2013

यवतमाळात अवकाळी गाराचा पाउस


अंगणात पडलेल्या गारा
                        यवतमाळ येथे सोमवारी रात्री व मंगळवारी संध्याकाळी अचानक पावसानी हजेरी लावली मार्च महिना संपताच होळी नंतर यवतमाळ इथे ऊन तापायला सुरवात झाली.घरा घरातून कूलर लावल्या गेले पण ऊनाची तीव्रता वाढताच अचानक वातावरण ढगाळ झाले आणि संध्याकाळच्या सुमारास ढगांच्या कडकडा सह पावसास सुरवात झाली आणि थोड्याच वेळात पावसा सह गाराही पडू लागल्या भर उन्हाळ्यात अचानक बरसलेल्या गारांच्या पावसाचा आनंद नागरिकांनी घेतला उन्हापासून थोडावेळ तेव्हढीच सुटका मिळाल्याचा लोकांचा आनंद मात्र फार वेळ टिकला नाही कारण पावसाचा ,वादळाचा व गारांच्या वर्षावाचा वेग इतका प्रचंड
होता कि काही ठिकाणी घरावरचे पत्रे उडून इतरत्र पडले तर काही ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली त्या मुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला घराघरात पावसासह झाडांची पाने व धुराळा उडत होता रस्त्यावर ,घरात पाणी साचले मोठ्या आकारांच्या गारा वेचण्याचा आनंद नागरिक घेत होते मात्र शेतकरयाचे आंबा ,संत्री व इतर पिकांचे गारांमुळे व अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.
                               पावसाने काही ठिकाणी झाडे कोसळल्या मुळे यवतमाळ इथे रात्री उशिरा पर्यंत वीज पुरवठा खंडित होता .वीज पुरवठा खंडीत झाल्याने यवतमाळ येथे एक दिवसाआड होणारा पाणी पुरवठा
न झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली .

 पावसासोबत पडलेल्या गारा
                                         
  गारांचा वर्षाव
                                           

Saturday 2 March 2013

मैथिली जावकर

(नाशीक येथून प्रकाशित होणाऱ्या पोलिस न्यूज ह्या पाक्षीकासाठी व मुक्त वार्ताहर म्हणून मी घेतलेली हि मुलाखत )
मैथिली जावकर
                                        दामिनी,घरकुल,थरार,सांजभूल ,इन्स्पेक्टर ,कामेडी डॉट काम ,अशा छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमधून विविध व्यक्तिरेखा साकारताना आपल्या सहज सुंदर अभिनयाचा ठसा उमटवत घराघरात परिचित झालेली एक गुणी प्रतिभासंपन्न उगवती अभिनेत्री मैथिली जावकर यवतमाळ इथे षड्यंत्र ह्या नाटकाच्या निमित्त्ताने येउन गेली तेव्हा तिच्या ह्या नाट्य प्रवेश विषयी तिच्या अभिनय कारकिर्दी विषयी आणि एकूणच तिच्या विषयी जाणून घेण्यासाठी तिच्याशी बातचीत केली तेव्हा तिची लगबग सुरु होती षड्यंत्र ह्या नाटकात ती मेन रोल करत असल्यामुळे तिला बघायला ,तिची स्वाक्षरी घ्यायला व तिच्यासोबत फोटो काढायला येणारया तिच्या चाहत्यांची गर्दी होती त्या प्रत्येकांशी संवाद साधत ती फोटो देत होती त्या मुळे नाटक संपल्या नंतरच तिच्याशी बोलायला वेळ मिळाला सुंदर आणि गोड मैथिली आपल्या आदबशीर वागण्याने समोरच्यांना आकर्षून घेते.

                                              नाटक संपल्यानंतर मुलाखत देताना मैथिली
                            मैथिलीने अगदी के जी ज़ि. पासूनच नाटकात कामे केलीत शाळेत असल्या पासून ते थेट महाविध्यालायापर्यंत प्रत्येक वर्षी ती नाटकात कामे करायची आणि बक्षीस पटकवायची लहानपणापासूनच तिने अभिनय क्षेत्रात यायचं हे नक्की केल होत शिकत असतानाच ती वेगवेगळ्या नाट्यस्पर्धेत भाग घ्यायची ,आंतर विद्यापीठ ,आंतर राज्य व कामगार कल्याण केंद्र अशा विविध स्पर्धेतल्या नाटकात तिने कामे केलीत आणि ह्या स्पर्धेत तिला उत्कृष्ट अभिनेत्रीच बक्षीस पण मिळाल. घरून तसा विरोध नव्हता फक्त शिक्षण पूर्ण करण्याची अट होती ती तिने पूर्ण केली. तिने हिंदी लिटरेचर  घेवून M .A  केलंय .
              मैथिली मुंबईचीच तिथच तीच शिक्षण झाल आणि करिअरची सुरवात पण मैथिली म्हणते की ,मला अभिनया व्यतिरिक्त इतर कशात रस नव्हता मी ह्या क्षेत्रात आले नसते तर खूप अस्वस्थ राहिले असते मग मी काही केल असत कि नाही कोण जाणे आपली नाटकाची आवड जोपासत असतानाच मैथिलीने वेगवेगळे छंद पण जोपासलेत भरतनाट्यम ,स्विमिंग ,हॉर्स रायडींग ,कराटे ,खो,खो, ब्याडमींटन ह्यात ती पारंगत आहे स्काउट  मधेही ती उत्साहाने भाग घ्यायची थोडक्यात तू आल राउंडर आहेस तर !म्हटल्यावर मैथिली हसून दाद देते.

                                  मैथिली जावकर व अशोक शिंदे नाटकातील एका प्रसंगात
तुला पहिला ब्रेक कोणी दिला असे विचारल्यावर मैथिली सांगते
       92 ते 95 पर्यंत मैथिली एकांकिका व नाटके करत होती मग सत्यदेव दुबेंनी तिला "सावल्या" ह्या नाटकात संधी दिली पण खरा ब्रेक प्रकाश बुद्धिसागर ह्यांनी "आई परत येतेय " ह्या नाटकातून दिलाय त्यात तिच्या सोबत उषा नाडकर्णी होत्या त्या नाटकात तिला बेस्ट अक्ट्रेस च बक्षीस मिळाल त्या नंतर" सुपारी "हि एकांकिका "डोळे मिटून उघड,उघड" केल त्यात विजय चव्हाण ,अतुल परचुरे होते "अफलातून" ,दांडेकरांचा सल्ला " ही कमर्शियल नाटक केली तिने संतोष पवारांचं "जाणून बुजून " केलाय सप्तपदीचे पायलट एपिसोड केलेत .त्या नंतर २००० साली तीच शोभायात्रा हे नाटक आल त्यातल्या '"बार्बी" ह्या फारिनर मुलीच्या भूमिकेन तिला नाव मिळाल स्वत:ची ओळख मिळवून दिली आणि मग त्यातल काम पाहून "चार चौघी" मिळाल त्यातला प्रतीक्षा लोणकरचा रिप्लेस रोल तिला मिळाला नाटकातली तिची कामे पाहून विशेषत: "शोभायात्रा " पाहून "कुमार सोहनिंनी" तिला"मानसी "मालिकेत काम दिल आणि मैथिलीचा आपसूकच छोट्या पडद्यावर प्रवेश झाला.दामिनी ,घरकुल,थरार ,कामेडी डॉट काम ,चार दिवस सासूचे ,सांजभूल अशा अनेक मालिकांनी तिची स्वतंत्र ओळख निर्माण झाली ती अधिकारी बंधूच्या हिंदी मालीकातुनहि काम करतेय सब टी वि वर एस बास आणि"सजन झूट न बोलो "मुधून ती येतेय.
हिंदीचा अनुभव कसा होता ? मराठी भाषिक म्हणून अडचण आली का ?
मैथिली सांगते - हिंदी लिटरेचर केल असल्याने भाषेची अडचण आली नाही शिवाय अधिकारी बंधूच सिरियल असल्याने फक्त स्टोरी वेगळी आणि भाषा वेगळी बाकी स्पॉट बॉय पासून क्यामेरा मन पर्यंत सारे तेच होते त्या मुळे  अडचण आली नाही
                                   
       
 नाटय  सिरियल मधल्या घोडदौडी सोबत तिचा आता चित्रपटातही प्रवेश झालाय मैथिलीच्याच शब्दात सांगायचं तर तिने यशाची आणखी एक पायरी सर केलीय "आधारस्तंभ" ह्या चित्रपटात तिने लक्ष्मीकांत बेर्डे सोबत काम केलय त्यात ते दोघेही पत्रकार होते. खिमजीभाई सत्रा ह्या गुजराती उध्योगपतीचा हा मराठी सिनेमा तिच्या नाटकातल काम पाहून त्यांनी तिला हि भूमिका दिली ह्यात विक्रम गोखले ,दिलीप प्रभावळकर ,रमेश भाटकर ,अशोक शिंदे ह्या सारख्या मान्यवर कलावंतासोबत काम करायला मिळाल्यामुळे मैथिली खुश होती शिवाय ती सत्यमेव जयते ह्या चित्रपटात काम करतेय त्यात दोघेही इन्स्पेक्टर आहेत त्यातला व इन्स्पेक्टर सिरियल मधला इंस्पेक्टरचा रोल तिने खूप एन्जॉय केलाय त्यातला थरार ,धाडस ,घोड दौड तिला खूप आवडली वास्तविक जीवनातही तिला अस धाडस करायला खूप आवडत. मैथिली आई वडिलांची एकुलती एक लाडकी मुलगी आहे तु दौरयावर गेल्यावर ते तुला मिस करत असतील न! ती चटकन उत्तरते "हो, ना "!
आत्ताची मैथिली आणि पहिल्याची मैथिली ह्यात काही फरक झालाय का ? विशेषत:: मैत्रीणीत वावरताना     मैथिली म्हणते ,मुळीच नाही ,घरी तर मी फक्त मैथिलीच आहे मैत्रीणीत देखील मी पूर्वी सारखीच मिसळते माझ्या आई वडिलांनी माझ्यावर असे संस्कार केलेत कि अजूनही माझे पाय जमिनीवरच आहेत ,मैथिलीला नातेवाईकात पूर्वीप्रमाणेच मोकळेपणाने मिसळायला आवडते
तू सौंदर्याची निगा कशी राखतेस ?
 मैथिलि म्हणते कि ,मी व्यायाम अर्थात वेळ मिळाला तरच करते स्विमिंग करते तेलकट तुपकट खाण्याच टाळते शक्यतो घरूनच जेवण्याचा डबा नेते.
                                             

           खरच , नाटक सिनेमा, सिरियल ह्यांचा तोल सांभाळताना मैथिलीन यशाचा पण तोल सांभाळाय
मैथीलीच्या अभिनयातली सहजता परिपक्वता तिच्यात देखील दिसते तिच्याशी बोलताना तिच्यातली
साधीसुधी निरागस मैथिली डोकावते तिच्यातली नम्रता मनाला भावते आणि तिच्या सहकलावंतांनी
तिच्या चांगुल पणाची दिलेली पावती पाहून मैथीलीच्या भावी यशाची खात्री पटते वेळ बराच झालेला असतो मैथिलीला पुढच्या दौरयावर जायचं असत मलाही घरी पोहचायची घाई असते "तुझे षड्यंत्र नाटकातल काम एकदम झकास होत ह !" असे सांगून व तिचे आभार मानून मी मुलाखत संपवते.

yojana.duddalwar@gmail.com

Wednesday 27 February 2013

अशोक शिंदे ( प्रतिभावंत सिने अभिनेते )

                                                                                                    
अशोक शिंदे
        रेशीम गाठी ,पवळा,सासर माहेर ,अशी असावी सासू ह्या सारख्या अगणित सिनेमातून ,नाटकातून
आणि छोट्या पडद्यावरच्या कित्येक सिरीयल्स मधून विशेषत: बंदिनी ,घरकुल मुळे घराघरात परिचित झालेले सिने नाट्य  कलावंत अशोक शिंदे यांची भूमिका बरयाच वाहिन्यां वरून प्रसारित होणारया सिरियल मध्ये असतेच. मी मुक्त वार्ताहर म्हणून त्यांची मुलाखत घेतली तेव्हा ते गंधाली ह्या चित्रपटाच्या शुटींग मध्ये व्यस्त होते त्या दिवशी ते दिवस भराचे शुटींग आटोपून रात्रीच्या मुक्कामाला पुण्याला आले होते व  लगेचच सकाळी परत चित्रीकरण स्थळी जाणार होते. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी मुलाखतीसाठी वेळ दिला विशेष म्हणजे त्यांच्या सोबत मोहन वाघ ,रमेश भाटकर वै. प्रभूती तिथे होत्या त्यांची गप्पांची मस्त मैफल रंगली होती तरी देखील त्यांच्या व्यस्त दिनचर्येतून मिळालेल्या निवांत  क्षणातून  वेळ काढून मुलाखतीला वेळ दिल्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानले व मुलाखतीला सुरवात केली
                              मुळचे सातारयाचे असलेले अशोक शिंदे यांचे कुटुंबीय नंतर पुण्यात स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती शाळा कॉलेजातून नाटकातून कामेही केलेली त्या मुळे लहानपणीच अभिनयात कारकीर्द करायचं नक्की केलेलं असल तरी घरच्यांचा मात्र थोडासा विरोध होता कारण आधी शिक्षण पूर्ण कर मग काय ते कर अस त्याचं ठाम मत होत त्यांनीही त्या मताचा आदर ठेवत त्या काळात फक्त आभ्यासावर लक्ष केंद्रित करत आधी इंजिनीयरच शिक्षण पूर्ण केल ते बी.ई इलेक्ट्रानिक्स आहेत हे ऐकून मला आश्चर्य वाटलं.
           नंतर मात्र त्यांनी मिळेल ती नाटक केली तेव्हा त्यांच्या सोबत मोहन जोशी होते आम्ही दोघे तेव्हा
पुण्यातली जवळ जवळ सगळी नाटकं करायचो काही वेळेस तर कमी पैशात सुद्धा नाटकं केली नंतर मुंबईत आलो.पेइंग गेस्ट म्हणून राहिलो अर्थातच खूप संघर्ष करावा लागलाच अस अशोक शिंदे सांगतात.
षड्यंत्र नाटकातील प्रसंग
            अशोक शिंदेना पहिला ब्रेक जयश्री गडकरींनी दिला खरेतर त्यांचा पहिला सिनेमा "पवळा" नावाचा होता त्यात मोहन जोशी ,श्वेता नगरकर ,बाळ धुरी वै. मडळी होती त्यात त्यांनी" पठ्ठे बापुरावा ची" भूमिका साकारली होती पण तो सिनेमा रिलीज झाला नाही मग त्यांनी " सासर माहेर हा सिनेमा केला पण
त्या आधी "रेशम गाठी" रिलीज झाला तसा पहिला ब्रेक त्यांना जयश्री गडकरींनी अशी" असावी सासू"मधून दिला.
                    लहानपणीचा स्टेजवरचा निरागस आनंद आणि संघर्षा नंतरचा सफलतेचा आनंद शब्दातीत होता अस ते आपल्या पहिल्या ब्रेक नंतरच्या अनुभवा बद्दल सांगतात नंतर सिनेमे मिळत गेले "वाहवा "होत गेली मग पुंन्हा त्यांना मागे वळून पहाव लागलच नाही.अजूनही त्यांची घोडदौड चालूच आहे.
          एकाच वेळी सिनेमा सिरियल्स ह्यात कामे करताना दोन्हीचा मेळ साधताना त्यांची तारांबळ उडते सकाळी सिनेमाच सुटिंग ,दुपारी सिरियल्स मग पुन्हा रात्री सिनेमा असा त्यांचा दिवसभरचा भरगच्च कार्यक्रम असतो सध्या टी वी वरच्या बऱ्याच चानल्स वरच्या सिरियल्स मध्ये ते कामे करताहेत.
त्यांच्या फिगर मेंटेनस बद्दल सांगताना त्यांनी सांगितलं , ते सकाळी सहसा जेवत नाहीत नुसती फळे खातात ज्यूस पीत नाहीत कारण त्यात शुगर असते रात्री एकदाच जेवतात शिवाय ते रोज सकाळी अर्धा तास रनिंग आणि अर्धा तास चालण्याचा व्यायाम करतात मग ते कोठेही असले तरी नियम मोडत नाहीत
               अभिनय करताना काही खास तयारी करावी लागते का अस विचारल्यावर ते म्हणतात आता अभिनय त्यांच्या अंगवळणी पडलाय वेळेवर स्क्रिप्ट हाती येते कधी एक तास आधी तर कधी अगदी वेळेवर पण लहानपणापासून काम केल्याने अडचण येत नाही.तुम्ही इंजिनियर आहात म्हणजे बुद्धिमान आहातच त्या मुळे संवाद लक्षात ठेवण सोप जात असेल शिवाय तुम्ही कुठल्याही व्यक्तिरेखेत फिट्ट बसता मग तो साधा सरळ नायक असो कि क्रूर खलनायक अस मी सांगितलं
त्या वर ते हसून Thanks म्हणतात.
         तुम्ही एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका करता कधी साधी सरळ तर कधी खलनायकी ढंगाची क्रूर कधी आनंदी तर कधी दु:खी! मग भाव भावनांचा हा मेळ कसा काय साधता? कारण थोडा वेळ तरी त्याचा परिणाम मनावर राहातच असेल ना ! अस मी विचारल्यावर त्यांनी सांगितलं ,ते स्विच ऑन स्विच ऑफ पद्धतीने काम करतात.
नाटक,सिनेमा आणि सिरिअल्स यातलं त्यांच आवडत माध्यम नाटक आहे कारण ते लाईव असत त्यांना हिंदीतही काम करायचय पण ते योग्य संधीची वाट पाहताहेत
बरोबर आहे मराठीतले गुणी कलावंत हिंदीत फुटकळ भूमिका करताना पाहून लोकांना वाईट वाटत अस सांगताच त्यांनी नाना पाटेकरची आठवण करून दिली
त्यांच्या जीवनातली अविस्मरणीय घटना सांगताना त्यांनी मी वाईट गोष्टी चटकन विसरतो व चांगलच लक्षात ठेवतो अस सांगितलं.
            काल रात्री बारा वाजता ह्या सिनेमाची आठवण ते सांगतात "मी ती घटना कधीच विसरू शकत नाही
त्या सिनेमात मी ,मधु कांबीकर ,अलका कुबल वै, मंडळी होती. मी त्यात खलनायकाची भूमिका केली होती मी त्यात वाईट प्रवृत्तीचा आमदार असतो व अलका कुबल माझी बायको असते ती साधी सरळ व खूप चांगली असते मी तिचा सतत छळणारा व त्रास देणारा नवरा असतो मधु कांबीकर खलनायिका असते मी अलका कुबलला फसवतो अस त्यात दाखवण्यात आल होत त्या मुळे अलका कुबल वेडी होते .त्या सिनेमाच्या प्रीमियरला मी गेलो होतो बायकांची चिक्कार गर्दी होती सिनेमा सुटल्यावर काही जणीच माझ्याकडे लक्ष गेल त्यांनी अश्या काही नजरेन माझ्या कडे पाहिलं कि बस्स! आणि त्या एकमेकीला सांगू लागल्या," हाच बघ तो दुष्ट बायकोला छळणारा ह्याच्या मुळेच ती वेडी झाली" आणि त्या मला चक्क शिव्या देऊ लागल्या मला वाईट वाटल पण त्या वेळेस माझ्या सोबत रणजीत सिंह मोहिते पाटील होते ते म्हणाले अरे, हीच तर तुझ्या यशाची खरी पावती आहे ." !
अशोक शिंदे आपल्या अभिनय कारकिर्दी वर समाधानी तृप्त आहेत पण अजूनही त्यांना ह्या फिल्ड मध्ये खूप काही चांगल कारावस वाटतंय शिवाय समाजसेवाही करायचीय.
              अशोक शिंदेंचा प्रेमविवाह झालाय त्यांना दोन मुलीही आहेत आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून
ते आपला मोकळा वेळ आपल्या कुटुंबीयांसोबत व आई वडिलांसोबत घालवतात अगदी घरकुल मधल्या अनिरुद्ध सारखाच कर्त्यव्यदक्ष प्रेमळ मुलगा ,पती आणि पिता पण त्या सिरियल मध्ये स्वभावाच्या अनेक छटा त्यांनी यशस्वीपणे पेलल्यात. त्याचे " संसार मांडते मी ", " शिर्डी के साईबाबा " आणि इतर अनेक सिनेमे,सिरीयल्स व अनेक नाटके तेव्हा येण्याच्या मार्गावर होते आतापर्यंत अशोक शिंदे यांचे जवळपास दोनशेच्या वर सिनेमे प्रदर्शित झाले आहेत .
            सध्या बरयाच चानल्स वरून त्यांच्या सिरियल्स सुरु आहेत विशेषत; स्वप्नांच्या पलीकडले हि स्टार वाहिनी वर प्रसारित होणारी डेलीसोप त्यांचे षड्यंत्र हे नाटक यवतमाळ येथे येऊन गेले तेव्हाही त्यांना भेटण्याचा योग आला त्यांनीहि आवर्जून आठवण ठेवून विचारपूस केली त्यांचा त्या नाटकातला खलनायक पाहून खरोखरच त्यांच्या अभिनयाची चुणूक दिसली.
                     त्यांच्यातला विनय,दुसरयाना मान देण्याची निगर्वी वृत्ती हेच तर त्यांच्या यशाच रहस्य आहे
पहिल्याच क्षणी साधेपणामुळे ते समोरच्याचे मन जिंकतात आपल्यातल्या मोठेपणाचा जराही गर्व त्यांच्या ठाई दिसत नाही. नुकताच त्यांचा नवा सिनेमा "विशेष म्हणजे ही माझी मिसेस " प्रदर्शित झालाय.
                        "स्टार प्रवाह" ह्या वाहिनी वर सध्या त्यांची "लगोरी "ही नवी मालिका पण  सुरु झालीय
त्यात ते आधुनिक प्रेमळ पित्याची भूमिका साकारत आहेत.
                 
 yojana.duddalwar@gmail.