Friday 13 September 2013

यवतमाळ येथे गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत

                             यवतमाळ येथे गौरी गणपतीचे उत्साहात स्वागत करण्यात आले यवतमाळ येथील मारवाडी चौकातील नवयुवक मंडळाने यंदा सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे त्या मुळे ह्या मंडळाच्या "यवतमाळचा राजा" असे संबोधण्यात येणारया गणेशाचे स्वागत खास पेशवाई थाटात झाले गणेशाच्या मिरवणुकीत हत्ती , उंट ,घोडे ह्यांचा सहभाग होता तर गणेशाची स्वारी पुष्पक विमानाच्या प्रतिकृतीवर विराजमान झाली होती सोबत पेशवाई वेष घातलेले तरुण सहभागी झाले होते गणरायावर तोफेद्वारे पुष्प वृष्ठी केल्या जात होती ही मूर्ती शिश महालात विराजमान झाल्याचा देखावा साकारण्यात आला आहे .
                                       यवतमाळ येथे गौरीचे स्वागतही उत्साहात झाले विदर्भात महालक्ष्मीच्या प्रसादाचे विशेष महत्व असते इथे महालक्ष्मीच्या जेवणाच्या दिवशी जेवणावळी असतात ज्यांच्या कडे महालक्ष्मी बसतात तिथे प्रसादाच्या पंक्ती च्या पंक्ती जेवू घातल्या जातात महालक्ष्मी पुढे रास टाकल्या जाते व नंतर राशीचे जेवण दिल्या जाते जेवणात सोळा भाज्या पूरण पोळी ,वडे ओतपल्लु [घारगे]तर असतातच पण इथे महत्व असते ते आंबीलीला आंबील दोन प्रकारे केल्या जाते काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात ज्वारीच्या कण्या ज्या प्रकारे केल्या जातात तशी फोडणीची आंबील तर काही ठिकाणी साधी आंबील शिजवून त्याच्या वड्या पाडून त्यात दुध साखर घालून दिल्या जातात शिवाय पंचपक्वानांचा नैवेध्य्ही असतोच पश्चिम महाराष्ट्रात महालक्ष्मी आल्या दिवशी भाकरी पालेभाजी व शिरयाचा नैवेद्य दाखवतात.
                      तर पश्चिम महाराष्ट्रात बाहेरच्यांना जेवण दिल्या जात नाही कारण जर कोणी जेवायला आलेच तर त्याला तिथेच मुक्काम करावा लागतो आणि जर राहणे शक्य नसेल तर लक्ष्मी पुढे पैसे दक्षिणा म्हणून टाकून मगच बाहेर जाता येते विदर्भात जेवल्यानंतर हात धुण्यासाठी घरातच एक जागा करून तिथेच हात धुवावे लागतात जेणे करून खरकटे इकडे तिकडे जाऊ नये तर पश्चिम महाराष्टात महालक्ष्मी आल्यानंतर तीन दिवस पैसे खर्च करत नाहीत कचरा बाहेर टाकत नाहीत आणि घर झाडतही नाहीत .
                पश्चिम महाराष्ट्रात हळदी कुंकवाचे विशेष महत्व असते तेव्हा बरयाच जणांना बोलावले जाते महालाक्ष्मिपुढे सजावट केली जाते पूर्वी सोलापुरात काम शेट्टी ,नामदेव चिवडेवाले ह्याच्या कडची आरास पाहण्यासाठी खूप गर्दी व्हायची चिवडे वाल्यांकडे तीन आरसे महालक्ष्मी मागे असे ठेवल्या जात कि त्या मोठया आरशात महालक्ष्मीच्या अगणीत प्रतिमा दिसत तो अप्रतिम देखावा पाहताना पाहणारयाचे भान हरपे.
                          आता सणांना उत्सवी स्वरूप आलय सोळा भाज्या एकमेकात मिसळून भाज्यांची संख्या कमी करण्यात आलीय त्या मुळे त्यात नाविन्य तर आलच शिवाय भाजी संपवण पण सोप झालय माझ्या दोन्ही कडच्या आजोळी महालक्ष्म्या बसत सोलापूरला आम्ही आमच्या आजोळी महालक्ष्मी साठी जात असू तेव्हा सारे जमत आजच्या भाषेत गेट टूगेदर होई जेवल्या नंतर तिथेच रहाव लागे तेव्हा आजी आजोबांचा येव्हडा धाक असे कि ताटातल्या सोळा भाज्या संम्पवाव्याच लागत आता खूप बदल झालाय तेव्हा महालक्ष्मी पुढे आरास करताना समोर छान छान खेळण्या मांडल्या जात आता सजावटी साठी बरयाच वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment