यवतमाळचा राजा
येथील मारवाडी चौकातील नवयुवक गणेश उत्सव मंडळाने सुवर्ण महोत्सवी वर्षात गणेशा पुढे शीश महालाचा देखावा साकारला आहे प्रवेश दारावर दोन्ही बाजूने लाईट च्या साह्याने जल महालाचे दृश्य साकारले आहे तर पायरया वर काचेखाली कुंदन व क्रिस्टलचा उपयोग करून सुंदर नक्षीकाम केले आहे .
फ्लोअरिंग वर देखील चौकोनी काचेखाली कमळ व इतर साहित्य वापरून पाण्याचे कारंजे त्यात आकर्षकता आणत आहे.
बाजुच्या भिंती वरील छत देखील आकर्षक काचकामानी सजवले आहे.
मूर्तीचा सभामंडप ५१ फूट असून ही मूर्ती मूर्तिकार वनकर बंधूनी तयार केली आहे मूर्ती २५ किलौ चांदीच्या सिहासनावर विराजमान असून मुकुट सोन्याचे व दागिने रत्न जडीत आहेत समोरचा मूषक साडे आठ किलो चांदीचा आहे.
यवतमाळ येथील आर्णी रोड वरील महारुद्र गणेश मंडळाने ह्या वर्षी विसाव्या वर्षात पदार्पण केले आहे त्यांनी कलकत्त्याच्या मूर्तीकारांनी बनवलेल्या मुर्तीद्वारे साकारलेले हे दृश्य
फोटो -पुजा दुद्दलवार BE (Soft ),BMC
No comments:
Post a Comment