यवतमाळ येथे सद्या डासांचा त्रास वाढला असून दिवसभर डासांना प्रतिबंध करण्यारया ऑल आउट ,मच्छर अगरबत्ती व तत्सम साधनांचा वापर करावालागतोय ,मध्यंतरी यवतमाळ येथे डेंगू चे रुग्ण आढळले होते शिवाय येथे मलेरिया ,हिवतापाचीही साथ सुरु आहे अशा वेळेस नियमितपणे नाल्या साफ करणे गाजर गवत काढणे गरजेचे आहे कारण गाजर गवता मुळेही बऱ्याच समस्या उदभवतात पण सध्या यवतमाळ येथे नगरपालिकेत अविश्वास ठरावावरून राजकारण सुरु आहे त्या मुळे निवडून आलेल्या प्रतिनीधींना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडलाय आपण ज्यांच्या बळावर निवडून आलोय हे ते विसरलेत.
डासांच्या समस्येवर उपाय म्हणून फ्वागिंग मशीन द्वारे फवारणी करण्यासाठी मशीन खरेदी झाली काही दिवस नियमित फवारणीही केल्या गेली पण पुन्हा वादाच्या भोवरयात फ्वागिंग मशिन फवारणी अडकल्याने नागरिकांना मात्र डासाच्या त्रासाला व त्या मुळे होणारया त्रासांना सोमोरे जावे लागते नगरपालिकेत वाद सुरु असताना काही कर्मचारी नागरिकांच्या घरातील कामे करण्यात गुंतले आहेत त्या बाबतीत विचारणा केल्यास ते आपल्यालाच धमकावतात ह्या बाबतीत काही नगर सेवकानाही माहिती असून ते काहीही कारवाई करत नाहीत त्या मुळे त्यांचावर वचक बसत नाही अशा नगर सेवकांवर ,काम करून घेणारया नागरिकांवर व कर्मच्यारयांवर योग्य ती कारवाई होणे गरजेचे आहे कारण येथे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे.
शिवाय नाली साफ केल्यानंतर काही कर्मचारी काढलेला कचरा तिथेच टाकून निघून जातात त्यामुळे सुद्धा डासांचे प्रमाण वाढते त्या मुळे तो कचरा लगेचच उचलून गाडीत टाकण्यास बाध्य करावे ,बंद पडलेली फ्वागिंग मशीन फवारणी सुरु करावी शिवाय बरयाच दिवसापासून यवतमाळ मधील नागरिकांची अंडर ग्राउंड नालीची मागणी पूर्ण करावी म्हणजे उघडया नाल्यांमुळे होणारा त्रास कमी होईल(नालीत कचरा साचून तुंबणे,नालीत साचलेल्या कचरया मुळे वाढणारी डासांची पैदास ,त्यातच डुंबणारी डुकरे)शिवाय घंटागाडी कर्मचारयानाही नाली साफ करावी लागणार नाही.
फक्त निवडून येण्यापुरते आम्ही हे करू ते करू म्हणून आश्वासने देवून कामाकडे व नागरिकांच्या समस्येकडे दुर्लक्ष केल्यास लोकांनी अशा प्रतिनिधींना परत बोलवावे आता लोकांना रोग प्रतिबंधक गोळ्यांचे वाटप होईल व निरोगी लोकांना उगाचच गोळ्या घ्याव्या लागतील त्या मुळे रोग उद्भवण्या आधीच योग्य उपाय केल्यास डासांना प्रतिबंध बसेल.

No comments:
Post a Comment