गेल्या काही महिन्यात सोन्याचे भाव कमी झाले होते सोन्या सोबतच चांदीचेही भाव कमी होत होते आंतर राष्ट्रीय बाजारात सोन्याचे उतरलेले भाव व रुपयाचे वाढते अवमूल्यन हि कारणे भाव उतरण्यास कारणीभूत असल्याचे जाणकार सांगत होते शिवाय काही आर्थिक सल्लागाराच्या मते ऑगस्ट पर्यंत सोने पंचवीस हजारा पर्यंत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती गेल्या काही दिवसात बाजारात फेरफटका मारल्यावर सराफाच्या दुकानात शुकशुकाट दिसत होता सोन्याचे भाव कमी होतील ह्या आशेने सामान्य नागरिक खरेदी करताना दिसत नव्हते शिवाय सोन्याची चेन,मंगळसूत्रांची चोरी काही थांबत नाही कोठेही जा चोरया होतातच त्या मुळे लोकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरवली त्यातून काही सोनारांनीच चोरीचे सोने विकत घेतल्याची घटनाही घडली ह्या साऱ्यांचा परिणाम सोने खरेदीवर झाला नाही तरच नवल.
सोने आतातर तीस हजाराच्याही वर व चांदी पन्नास हजार रुपये किलो वर पोहोचली आहे सोने चांदीवरील आयात शुल्क वाढ व अंतर राष्ट्रीय बाजारातील सोने चांदीची दर वाढ हि कारणे जाणकार व्यक्त करत आहेत.
सोने आतातर तीस हजाराच्याही वर व चांदी पन्नास हजार रुपये किलो वर पोहोचली आहे सोने चांदीवरील आयात शुल्क वाढ व अंतर राष्ट्रीय बाजारातील सोने चांदीची दर वाढ हि कारणे जाणकार व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment