Sunday, 28 May 2023

Axiom -2 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचले Welcome Ceremony संपन्न

  The four Axiom Mission-2 crew members join the seven-member Expedition 69 crew aboard the station and gather together for a crew greeting ceremony. Credit: NASA TV

 Axiom -2 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर Welcome Ceremony दरम्यान नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना अंतराळवीर John Shoffner सोबत अंतराळस्थानकातील सर्व अंतराळवीर -फोटो नासा संस्था

नासा संस्था -(Axiom Space)-23 मे

Axiom -2 मोहिमेतील नासाची रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर  Peggy Whitson अंतराळवीर John Shoffner सौदी अरबचे अंतराळवीर Ali Alquarni आणि Rayyanah Barnawi  सोमवारी स्थानकात सुखरूप पोहोचले  Space X -Crew Dragon मधून हे चारही अंतराळवीर नासाच्या Kennedy Space Center मधील ऊड्डाण स्थळावरुन 21 तारखेला अंतराळस्थानकाच्या दिशेने अंतराळ प्रवासास निघाले आणी 22 तारखेला स्थानकात पोहोचले  ऊड्डाणाआधी  ह्या अंतराळवीरांची आवश्यक ऊड्डाणपुर्व प्रक्रिया पार पडली ह्या अंतराळ प्रवासा दरम्यान नासा संस्था आणि Axiom संस्था ह्या अंतराळवीरांच्या संपर्कात होत्या 

Duke Brady (Multimedia Specialist  -Axiom Space) आणि  Kate Tice-  (Quality System Engineering Manager Space X ) ह्यांनी ह्या अंतराळवीरांशी संवाद साधत त्यांच्या ह्या पहिल्या अंतराळ प्रवासा दरम्यानच्या भावना जाणून घेतल्या 

Welcome everyone to our Live on Orbit ! Welcome Peggy ! तू चवथ्यांदा स्थानकात जात आहेस पण हे तिघे प्रथमच अंतराळप्रवास करत आहेत आता झिरो ग्रॅव्हीटीत पोहोचल्यावर त्यांच्या भावना काय आहेत हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत !

Peggy Whitson - मी पुन्हा एकदा स्थानकात जाणार म्हणून Excited आहेच पण माझ्या सोबतचे हे तीन अंतराळवीर प्रथमच अंतराळ प्रवास करत आहेत आणि अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीचा अनुभव घेत आहेत म्हणून मी पण जास्त Excited आहे 

John Shoffner - खूपच सुंदर! आश्चर्यकारक अनुभव आहे हा ! जेव्हा रॉकेट Dragon पासून वेगळे झाले आणि Dragon ने दुसऱ्या स्टेज मध्ये प्रवेश केला तेव्हा आम्हाला झिरो ग्रॅव्हीटीतील वजनरहित अवस्थेची प्रथम जाणीव झाली झिरो ग्रॅव्हीटीतील वजनरहित अवस्थेत तरंगण्याचा हा अद्भुत अनुभव शब्दातीत आहे ! "हे पहा इथून खिडकी बाहेरचा अंतराळातील उजेड" असे म्हणत त्यांनी बाहेरचा अंतराळातील उजेड दाखविला पृथ्वीच्या वरून अंतराळातून पृथ्वीच प्रथमदर्शन करण्याचा हा अनुभव अलौकिक आहे ! आता आम्ही खरोखरच अंतराळात पोहोचलो आहोत ह्याची जाणीव होतेय मी काही क्षण बिझी होतो त्या मुळे खाली पृथ्वीकडे पाहण विसरलो होतो पण आता पाहील Awesome ! रोमांचक ! खूप सुंदर दृश्य आहे ! अविस्मरणीय क्षण आहे हा !

Ali - हा क्षण खरोखरच अविस्मरणीय आहे माझ्यासाठीच नाही तर प्रत्येक सौदी साठी ! मी अंतराळातून बाहेर पाहिल तेव्हा मला माझाच अभिमान वाटला माझ्यासाठी हा नवा अनुभव आहे हा प्रवास रोमांचक आहे ! ग्रेट आहे ! नासा संस्थेने आम्हाला हि संधी दिली म्हणून त्यांचे,नासा संस्थेतील सहभागी देशाचे आणि आमच्या देशाचे king Salman ह्यांचे विशेष आभार ! त्यांच्यामुळेच आम्हाला हा अद्भुत अनुभव घेता आला आम्हाला प्रेरित करणाऱ्या साऱ्यांचेच आभार!   

Rayyanah - Hello ! From Outer Space ! इथून पृथ्वीकडे पाहण अमेझिंग ! आम्ही आता वजनरहित अवस्थेत तरंगण्याचा प्रत्यक्षात अनुभव घेतोय सारच अद्भुत ! रोमांचक आणी अविश्वसनीय ! त्या साठी नासा संस्था Axiom आणि सौदी अरेबियाचे आभार ! आमचे प्रिन्स सलमान ह्यांचे विशेष आभार ! त्यांच्या मुळे आम्हाला हि संधी मिळाली आणि माझ्या आजीचे देखील विशेष आभार ! तिने मला प्रोत्साहन दिल माझी सुंदर फॅमिली,मित्र परिवार साऱ्यांचे आभार! हा अनुभव Fantastic आहे आणि ह्या तिघांसोबत पृथ्वीदर्शन करण्याचा हा क्षण अमेझिंग !  John नी सांगितल्या प्रमाणे Dragon रॉकेट पासून वेगळे होतानाचा आणि झिरो ग्रॅव्हीटीत प्रवेशतानाचा क्षण अविस्मरणीय आहे आणि विशेष म्हणजे आम्ही Peggy Whitson सोबत हा अंतराळातील अद्भुत अनुभव घेतोय !

Axiom संस्था -आता लवकरच तुम्ही स्थानकात पोहोचाल त्या नंतर पुन्हा संवाद साधु ! तोपर्यंत Bye आणी पुढील प्रवासासाठी  शुभेच्छा !

Space X Dragon अंतराळ स्थानकाजवळ पोहोचताच स्थानक आणि Dragon ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडली आणि अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकातील अंतराळवीरांनी ह्या चार अंतराळ वीरांचे स्थानकात स्वागत केले काही वेळातच स्थानकात Welcome Ceremony पार पडला त्या वेळी स्थानकातील अकरा अंतराळवीर एकत्र जमले नासा संस्थेने ह्या अंतराळवीरांचे स्थानकात स्वागत केले आणि अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधला 

स्थानकाचे सध्याचे कमांडर Sergey Prokopov ह्यांनी ह्या अंतराळवीरांचे स्थानकात सुखरूप पोहोचल्याबद्दल अभिनंदन केले ! ते म्हणाले ," तुम्ही स्थानकात व्यवस्थित पोहोचलेले पाहून आनंद झाला आता तुम्ही आमच्या सोबत राहणार आहात आपण अकरा अंतराळवीर मिळून इथे संशोधन करणार आहोत मला Peggy Whitson ह्यांना ईथे पाहून खूप आनंद होतोय आम्हाला त्यांच्या सोबत काम करायला त्यांच्या कडुन शिकायला मिळेल त्या अनुभवी अंतराळवीर आहेत त्यांनी विक्रमी गौरव प्राप्त केला आहे त्यांच्या सोबत काम करण गौरवास्पद आहे ह्या नवीन तीन अंतराळवीरांचेही स्वागत ! सौदी Space चे खास आभार आता त्यांचा अंतराळमोहिमेत समावेश झालाय त्यामुळे त्यांच्या देशाच्या भविष्यकालीन यशस्वी कारकिर्दीची हि सुरवात आहे असे मला वाटते "!

Peggy -Thanks Sergey ! Great Launch ! Great Ride ! आम्ही अंतराळप्रवासात खूप मजा केली आम्ही इथे संशोधन करण्यासाठी उत्सुक आहोत मला इथे आल्यावर पुन्हा माझ्या घरी परतल्यासारख वाटतय मी तुम्हाला नक्की सहकार्य करेन मदत लागली तर ! खरच इथे राहताना खूप मजा येते आणि पुन्हा इथे येऊन स्थानक पाहायला मिळते इथे सर्व देशातील अंतराळवीर एकत्र येतात संशोधन करतात आता माझ्या सहकारी अंतराळवीरांना त्यांचा अनुभव शेअर करण्याची मी संधी देते 

John Shoffner - ( Business Pioneer )Axiom -2 मोहिमेत सहभागी होण माझ्यासाठी गौरवास्पद आहे इथे  येण्याची वास्तव्य करण्याची आणि इथल्या अंतराळवीरांसोबत संशोधन करण्याची हि पहिली संधी मिळालीय ती अमूल्य आहे मी लहानपणापासून इथे येण्याच स्वप्न पाहिल होत (Young Astronaut Club मध्ये असताना ) ते आता सत्यात उतरल ह्या तीन अंतराळवीरांसोबतचा विशेषतः Peggy Whitson ह्यांच्या सोबतचा अंतराळप्रवास अविस्मरणीय आहे हि संधी दिल्याबद्दल Axiom आणि Space X चे आभार! नासा संस्थेचे विशेष आभार त्यांनी खाजगी व्यासासायिक मोहिमेचा शुभारंभ केला आणि खाजगी अंतराळ वीरांच्या अंतराळ प्रवासासाठी परवानगी देऊन अंतराळाचे दालन ऊघडले मी आता माझ्या प्रिय पत्नीचे आभार मानू इच्छितो  तिने काढलेल्या जादुई शब्दांसाठी तीने पेपर मध्ये बातमी वाचली आणि मला म्हणाली ,"बघ अखेर तु स्थानकात रहायला जाणार आहेस !" ते शब्द खरे ठरले म्हणून Janine तुझे आभार!

Ali Alquarni (Fighter Pilot)- Thanks! नासा संस्थेतील सर्वांचे त्यांच्यामुळे मला हि संधी मीळाली John म्हणाले त्या प्रमाणे ईथे स्थानकात नवीन  अंतराळवीर मित्र मिळाले तुम्हा सर्वांसोबत काम करण्यासाठी मी ऊत्सुक आहे तुम्ही Expert आहात तुमच्याकडून नवीन शिकायला मिळेल आमच्या Kingचे त्यासाठी आभार त्यांनी हि अमुल्य संधी मला दिली हि मोहीम महत्वकांक्षा आणी आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी आहे मी ईथे येण्याच स्वप्न पाहिल त्यासाठी प्रयत्न केले ते आता पुर्ण झाले माझ्या देशातील अंतराळवीर होऊ इच्छिणाऱ्या तरुणांना मला सांगावयाचे आहे तुम्हीही स्वप्न पहा तुमचही ध्येय साध्य होईल त्या साठी तुमच्या द्येयाच्या दिशेने प्रयत्न करा हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय

Rayyanah Barnawi (Biomedical researcher)- माझ्या स्थानकातील प्रवेशानंतर केलेल्या स्वागताबद्दल Thanks! मी ईथे फक्त एक प्रतिनिधी म्हणून आले नाही तर पृथ्वीवरील अनेकांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी आले आहे ईथे वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या संस्कृतीतील,व्यवसायातील अंतराळवीर आले आहेत कोणी डॉक्टर आहे कोणी ईंजीनीअर आहे तर कोणी संशोधक हे सगळे ईथे एकत्र राहून संशोधन करत आहेत हे जागतिक एकत्रीकरण आहे आणी स्थानक ह्या सर्वांना कस एकत्र आणत पहा ! म्हणून मी आनंदी आहे मला नासा संस्थेतील माझ्या सर्व ट्रेनर्सचेही आभार मानायचे आहेत 

त्यानंतर Peggy Whitson ह्यांनी ह्या नवीन अंतराळवीरांना अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट व नं देऊन त्यांच्या गौरव केला  John- Astronaut no-598, Ali-Astronaut no.-599, Rayyanah-Astronaut no-600 त्या नंतर नासा संस्थेतर्फे त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या तीस मेला हे अंतराळवीर पृथ्वीवर परतणार असुन सध्या ते तेथील संशोधनात व्यस्त झाले आहेत

Friday, 19 May 2023

Axiom-2 मोहीमे अंतर्गत चार अंतराळवीर स्थानकात जाणार

नासाच्या  Axiom -2 मोहिमेतील सौदी अंतराळवीर Rayyanah Barnawiअंतराळवीर John Soffnerअंतराळवीर Peggy Whitson आणि अंतराळवीर Ali Alqarni जाण्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना -फोटो नासा संस्था

 

 नासा संस्था -12 मे

अमेरीकेने अंतराळ विश्वातील अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासासाठी व्यावसायिक कंपनींना परवानगी दिल्यानंतर Space X-Crew Dragon मधुन नासाच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळविरांची स्थानकात सुरक्षित येजा सुरू आहे तसेच नासा संस्था,Space- X आणी Axiom ह्यांच्या सहकार्याने नासाच्या Axiom मोहिमेचाही शुभारंभ एप्रिल 2022 मध्ये Axiom -1 मोहिमेद्वारा झाला होता ह्या मोहिमेतील चार अंतराळवीर आठ दिवसाच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते आता Axiom-2 मोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकात रहायला जाणार आहेत

नासाची रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर Peggy Whitson अंतराळवीर John Shoffner सौदी अरबचे अंतराळवीर Ali Alqarni आणी Rayyanah Barnawi ह्या  चार अंतराळवीरांचा ह्या मोहिमेत सहभाग आहे हे चारही अंतराळवीर 21 तारखेला नासाच्या Florida मधील Kennedy Space Center येथील 39A ह्या ऊड्डाण स्थळावरुन Space X Crew Dragon मधून स्थानकात जाण्यासाठी ऊड्डाण करतील रविवारी 21 तारखेला 5.37p.m.(EDT) Space X Crew Dragon Freedom  Falcon -9 रॉकेट च्या साहाय्याने ह्या चार अंतराळविरांसह अंतराळ स्थानकात जाण्यासाठी  अंतराळात झेपावेल

ह्या मोहीमेत अंतराळवीर Peggy Whitson कमांडरपद,अंतराळवीर John Soffner पायलटपद सांभाळणार असुन सौदी अंतराळवीर Ali Alqarni आणी Rayynah Barnawi हे दोघे ह्या मोहिमेत मिशन स्पेशालिस्ट म्हणून काम पाहतील स्थानकातीळ दहा दिवसांच्या वास्तव्यात हे अंतराळवीर तेथे सुरु असलेल्या सायंटिफीक संशोधनात सहभागी होतील

 ह्या अंतराळवीरांचे पृथ्वीवरून स्थानकाकडे ऊड्डाण,स्थानकाजवळ पोहोचल्या नंतर Hatching,Docking प्रक्रिया आणि स्थानकातील प्रवेश व Welcome ceremony च्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण नासा टि.वी. वरुन करण्यात येणार आहे

अंतराळवीर Peggy Whitson चवथ्यांदा अंतराळस्थानकात राहायला जाणार आहेत त्यांच्या  37 वर्षांच्या अंतराळ कारकिर्दीत त्यांनी  तीन वेळा अंतराळ वारी केली त्यांच्या ह्या तीनवेळच्या अंतराळ वारी दरम्यान त्यांनी सलग 665 दिवस स्थानकात वास्तव्य केले होते आणि त्या दरम्यान त्यांनी अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत सर्वात जास्त दिवस अंतराळस्थानकात वास्तव्य करणारी पहिली अमेरिकन महिला अंतराळवीर,ह्या वास्तव्यात स्थानकाचे दोनवेळा कमांडरपद सांभाळणारी पहिली महिला कमांडर,दहा Space Walk (60 तासांचा )केल्याने जास्त वेळा Space Walk करणारी पहिली महिला Space Walker,नासाच्या Astronaut Office मधील पहिली non Military महिला Chief Officer,पहिली महिला ISS Science Officer म्हणूनही विक्रम प्रस्थापित केला आहे  2018 मध्ये जगातील शंभर Most Influential people च्या यादीत  Peggy Whitson ह्यांनी शंभरावे स्थान मिळवले आहे स्थानकातील वास्तव्यात त्यांनी अनेक महत्वपूर्ण उपयुक्त संशोधनही केले आहे

Saturday, 13 May 2023

Deep Space Food Challenge स्पर्धेत कॅनडातील चार कंपन्यांची निवड

 

 कॅनडियन स्पेस एजन्सी (C.SA) - 1 मे

भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर आणि अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना पौष्टिक,सकस आणि चविष्ट अन्न निर्मिती करता यावी ह्या साठी आणी पृथ्वीवरील धान्य ऊत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नासा संस्था आणी कॅनडीयन स्पेस एजन्सी (C.SA) ह्यांनी Deep Space Food  Challenge स्पर्धा जाहीर केली होती ह्या स्पर्धेत धान्य निर्मितीची नाविन्यपूर्ण पध्दत विकसित करण्याची संधी देण्यात आली होती कॅनडियन स्पेस एजन्सीने जाहीर केलेल्या स्पर्धेत भाग घेणारी धान्य उत्पादक संस्था आणि नागरिक कॅनडा मधील  रहिवासी असणे आवश्यक होते आता ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या चार स्पर्धक गटांची प्राथमिक फेरीतून निवड करण्यात आली आहे

ह्या स्पर्धेत अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांना जीवनसत्त्वयुक्त सकस आणी पौष्टिक अन्न ऊत्पादन संशोधनाची संधी जाहीर करण्यात आली होती हे अन्न ऊत्पादन कमी साहित्य,कमी पाणी वापरून,कमी जागेत करता येणे आवश्यक होते स्थानकातील झीरो ग्रव्हिटित सगळ्या वस्तू तरंगत असल्याने आणी तीथे पाणी नसल्याने पाणी कमी प्रमाणात वापरणे आवश्यक असते तेथे पाणी देखील थेंबाच्या स्वरूपात तरंगते त्यामुळे तेथे पदार्थ बनवणे अशक्यच ह्या बाबी लक्षात घेऊन ह्या समस्यावर मात करून धान्य ऊत्पादन निर्मितीची नवीन विकसीत पध्दत सादर करणे आवश्यक होते हे संशोधित नवीन धान्य उत्पादनाचे तंत्रज्ञान भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरेल विशेषतः चंद्र आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी तेथील वास्तव्यात आणि भविष्यकालीन मानवी निवासात उपयुक्त ठरेल

पृथ्वीपासुन दुर अंतराळात स्थानकातील झीरो ग्रॅव्हीटीत सतत तरंगत्या अवस्थेत रहाणाऱ्या अंतराळविरांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे गरम जेवण ताज्या भाज्या व फळे खायला मिळत नाहीत त्यांना पृथ्वीवरुन पाठवलेले प्रिर्झव्ह थंड अन्न व भाज्या खाव्या लागतात कारण तेथे ईथल्या सारखी सृष्ठी किंवा वातावरणच नाही म्हणून नासा संस्थेतील शास्त्रज्ञ स्थानकातील व्हेजी चेंबरमधील कृत्रीम बागेत पृथ्वीसारखे वातावरण निर्माण करून व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या,फळे व धान्य पिकवण्याचे प्रयोग सतत करत असतात आणि ते यशस्वीही होत आहेत पृथ्वीवरील नासा संस्थेत देखील परग्रहावरच्या सारखे कृत्रिम वातावरण आणि सृष्ठी निर्माण करून  यशस्वी धान्य आणि भाजी लागवड करण्यात येत आहे 

अंतराळविरांना सतत झीरो ग्रॅव्हिटीत तरंगत्या अवस्थेत रहावे लागत असल्याने त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होतो त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांची हाडे ठिसूळ होतात त्यांच्या दृष्ठीवर परिणाम होतो म्हणूनच त्यांना व्हिटॅमिन युक्त आरोग्यदायी जेवण मिळावे विषेशतः ताजी हिरवी पालेभाजी व फळे मिळावीत म्हणून संशोधक सतत प्रयत्न करत आहेत त्या साठीच अंतराळवीरांना निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त सकस अन्न मिळणे आवश्यक आहे भविष्यकालीन दुरवरच्या अंतराळ निवासात अंतराळविरांना पृथ्वीवरून अन्न  पाठविताना वेळ लागेल त्यामुळे त्यांना स्थानकातच अन्न.भाजी व फळे लागवड करावी लागेल म्हणून नासाचे शास्त्रज्ञ स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबवत आहेत शास्त्रज्ञांच्या ह्या प्रयत्नांना आता पुन्हा यश मिळाले आहे स्थानकातील व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत लावलेल्या टोमॅटोच्या रोपांना टोमॅटो आले आहेत ह्या आधी देखील अंतराळविरांनी स्थानकात मीरची,गहु, Lettuce, लाल कोबी, ह्या सारख्या भाज्या लावून त्यांची चवही चाखली आहे परंतु परग्रहावरील विपरीत वातावरणात अन्न धान्य पिकवणे सोपे नाही त्या साठीच पृथ्वीवर तसेच वातावरण निर्माण करून सकस,जीवनसत्वयुक्त,पौष्टीक अन्न निर्मितीसाठी संशोधन करण्यात येत आहे ह्या स्पर्धेचा उपयोग अंतराळवीरांप्रमाणेच कॅनडा मधील  उत्तरेकडील दुर्गम दुष्काळी भागातील लोकांना अन्न उत्पादन करण्यासाठी होणार आहे 

ह्या चार विजेत्या स्पर्धकांना आता दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला असून त्या नंतर सर्व बाबीची पूर्तता करून विकसित केलेल्या संशोधित धान्य उत्पादकाची अंतिम निवड होईल

Monday, 1 May 2023

स्थानकाच्या सौर पॅनलच्या नूतनीकरणा साठी नासाचे अंतराळवीर Steve Bowen आणि Sultan Alneyadi ह्यांचा Space Walk संपन्न

  The Earth begins illuminating during an orbital sunrise as spacewalkers (lower right) Sultan Alneyadi and Stephen Bowen  work outside the space station. Credit: NASA TV

 नासाचे अंतराळवीर Sultan Alneyadi आणि Steve Bowen स्थानकाबाहेरील भागात Space Walk करताना - फोटो -नासा संस्था

नासा संस्था -28 एप्रिल 

नासाचे अंतराळवीर Steve Bowen आणि सौदी अरबचे अंतराळवीर Sultan Al Neyadi ह्यांनी स्थानकाच्या बाहेरील Star Board Truss ह्या भागातील सौर पॅनलची क्षमता वाढवण्यासाठी Space Walk केला 28 एप्रिलला सकाळी 9 वाजून11 मिनिटाला हे दोन्हीही अंतराळवीर Space Walk करण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि सात तासांनी Space Walk पूर्ण करून 4 वाजून 12 मिनिटाला स्थानकात परतले 

  Astronauts (from left) Stephen Bowen and Sultan Alneyadi try on and test out the their spacesuits ahead of a spacewalk planned for Friday, April 28. नासाचे अंतराळवीर Steve Bowen आणि अरबचे अंतराळवीर Sultan Alneyadi Space Suit घालून Space Walk ची तयारी करताना -फोटो नासा संस्था

ह्या दोन्ही अंतराळवीरांनी आदल्या दिवशीच ह्या Space Walk ची तयारी केली होती अंतराळवीर Steve Bowen ह्यांनी ह्या Space Walk साठी परिधान केलेल्या Space Suit वर लाल रंगांच्या रेषा होत्या अंतराळवीर Sultan Al Neyadi ह्यांनी परिधान केलेला Space Suit रेषा विरहित होता

सात तासांच्या ह्या Space Walk मध्ये ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकाबाहेरील Star Board Truss ह्या भागातील सौर पॅनल मध्ये नवीन Solar Arrays (iROSAs) स्थापित करण्यासाठी केबल बसविण्याचे काम केले आणि Insulation  Brackets फिक्स केले अंतराळ स्थानकाला लागणारी वीज निर्मिती आणि सौर ऊर्जा स्थानकाबाहेरील सौर पॅनल मधून तयार होते स्थानकाला लागणारा उजेड आणि सायंटिफिक संशोधनासाठी आणि इतर कामासाठी लागणारी ऊर्जा सौर पॅनल मधूनच मिळते सध्या ह्या सौर पॅनल मधील ऊर्जा निर्मितीची क्षमता वाढविण्यासाठी ह्या  सौर पॅनल मधील जुन्या बॅटऱ्या काढून त्या जागी नवीन जास्त पॉवरफुल सौर बॅटऱ्या बसविण्याचे काम सुरु आहे त्या साठी नवीन केबल बसविण्यात येत आहेत आता पर्यंत स्थानकाबाहेरील भागात चार सौर पॅनल (iROSAs) बदलण्यात आले आहेत आणि पुढील Space Walk मध्ये उर्वरित दोन Solar Arrays बसविण्यात येणार आहेत त्यासाठीची तयारी ह्या Space Walk मध्ये ह्या दोन्ही अंतराळवीरांनी करून ठेवली ह्या Space Walk मध्ये हे दोन्ही अंतराळवीर ह्या भागातील खराब झालेला S-band antenna equipment Electronic Box काढून स्थानकात आणणार होते पण ह्या Space Walk मध्ये ते काम अपूर्ण राहिले 

अंतराळवीर Steve Bowen ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला अंतराळ स्थानकाच्या कामासाठी केलेला हा आठवा Space Walk होता अंतराळवीर Sultan Al Neyadi ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी असल्याने त्यांचा हा पहिलाच Space Walk होता ह्या Space Walk नंतर आता Sultan Al Neyadi ह्यांनी सौदी अरबमधील पहिले Space Walker म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे स्थानकाच्या कामासाठी आजवर अंतराळवीरांनी केलेला हा 261 वा Space Walk होता

Tuesday, 18 April 2023

Ingenuity Mars Helicopter चे मंगळावरील आकाशात 50 वे यशस्वी उड्डाण

This image of NASA’s Ingenuity Mars Helicopter was taken at “Airfield D” by the Mastcam-Z instrument

  नासाचे Ingenuity Mars Helicopter मंगळावरील 114 व्या दिवशी 15 जून 2021ला मंगळभूमीवर - फोटो नासा संस्था

नासा संस्था-14 एप्रिल

दोन वर्षांपूर्वी Perseverance यानासोबत मंगळावर गेलेल्या Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळभुमीवरील आकाशात पन्नासावी यशस्वी भरारी मारली असून परग्रहावर जाणारे आणी तेथील आकाशात पन्नासवेळा यशस्वी ऊड्डाण करणारे पहिले हेलिकॉप्टर अशी विक्रमी ऐतिहासिक नोंद केली आहे विशेष म्हणजे ह्या हेलिकॉप्टरच्या मंगळावरील पहिल्या ऊड्डाणाला येत्या 19 एप्रिलला दोन वर्षे पुर्ण होतील त्या आधीच ह्या हेलिकॉप्टरने अर्धशतकी ऊड्डाण करून विक्रम प्रस्थापित केला आहे 

13 एप्रिलला Ingenuity हेलिकॉप्टरने मंगळभूमीवरील Belva Crater ह्या भागात 59 फुट(18 मिटर) ऊंचीवरून ऊड्डाण केले आणि 145.7 सेकंदात मंगळावरील 1,057.09 फुट (322.2 मीटर) म्हणजेच जवळपास अर्धा मैल अंतर पार करून सूरक्षीतपणे खाली ऊतरले आता नासाची टीम Ingenuity हेलिकॉप्टरचे 51चे  उड्डाण करण्याची तयारी करीत आहेत मंगळावरील Jezero Crater ह्या भागातील Fall river poss ह्या भागातील शोध घेण्यासाठी Ingenuity  तेथील आकाशात 51वी भरारी मारणार आहे 

Ingenuity हेलिकॉप्टर फेब्रुवारी 2021 मध्ये Perseverance मंगळयानासोबत मंगळावर पोहोचले होते दोन वर्षांपासून Perseverance यान मंगळावरील पुरातन सजीव सृष्ठीच्या अस्तित्वाला दुजोरा देणारे पुरावे शोधण्याचे काम करत आहे मंगळावरील पुरातन काळी अस्तित्वात असलेले पण कालांतराने नष्ठ  झालेले पाण्याचे स्रोत,मंगळ भुमीवरील आणी भुगर्भाखालील खडक,मिनरलस्,सजीवांचे अवशेष शोधण्याचे काम Perseverance यान करत आहे नुकतेच Perseverance यानाने तेथील जमिनीचे ऊत्खनन करून संशोधीत केलेले नमुने नमुन्यांंच्या कुपीत भरण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले आहे ह्या यानाला मंगळावरील सजीवांच्या अस्तित्वाला दुजोरा देणारी आणि पाण्याचे श्रोत असणारी ठिकाणे शोधून देण्याचे काम हे हेलिकॉप्टर करत आहे शीवाय भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आणी मानवी निवासासाठी पोषक वातावरण असलेला भाग शोधण्याचे कामही हे हेलिकॉप्टर करत आहे

नासाच्या Perseverance टिममधील शास्त्रज्ञांनी Ingenuity हेलिकॉप्टरचे डिझाईन ह्या कामासाठी केले तेव्हा त्यांना Ingenuity हेलिकॉप्टर कडून मंगळावरील आकाशात पाचवेळा उड्डाणाची अपेक्षा होती पण Ingenuity हेलिकॉप्टरने शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा दहापट जास्तवेळा उड्डाण करून त्यांना आश्चर्यचकीत केले आहे नासाच्या वॉशिंग्टन येथील संस्थेचे  Planetary Science चे डायरेक्टर Lory Glaze म्हणतात,"1903 मध्ये राईट बंधूंनी पहिल्या प्रयत्नानंतर विमान ऊड्डाण सुरु ठेवले आणी यश मिळवले तसेच Ingenuity च्या पहिल्या ऊड्डाणा नंतर न थांबता आम्ही सतत ऊड्डाण सुरू ठेवले दरवेळी हे हेलिकॉप्टर नव्याने आकाशात ऊड्डाण करते आणी मंगळावरील नवीन भाग शोधून तेथील संशोधीत माहिती गोळा करण्यात यशस्वी होते तेथील फोटो पाहून आम्ही आश्चर्यचकीत होतो त्यामुळे आमच्या दृष्टिकोनात बदल होतो नवनवीन भुभाग शोधण्याची आमची जिज्ञासा वाढते Ingenuity च्या मंगळावरील पहिल्या उड्डाणाने आम्ही आनंदी झालो होतो पण आता Ingenuity ने उड्डाणाचे अर्धशतक गाठले आहे

Ingenuity ने संशोधीत केलेल्या ह्या माहितीचा ऊपयोग भविष्यकालीन मंगळमोहिमेसाठी तर होईलच शीवाय तेथील आकाशात ऊड्डाण करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या Mars Helicopter साठी होईल Ingenuity ची टिम ह्या हेलिकॉप्टरच्या ऊड्डाण क्षमतेचे संशोधन करून भविष्यकालीन मंगळमोहिमेसाठी Helicopter बनवताना त्यात काय त्रुटी आहेत काय बदल आवश्यक आहेत ह्याचा विचार करत आहेत सध्या Perseverance यानाने गोळा केलेले संशोधीत नमुने आणी ईतर माहिती आणण्यासाठी मंगळावर दोन Sample recovery Helicopters पाठवण्यात येणार असून त्याच्या डिझाईनसाठी हि संशोधीत माहिती वापरण्यात येत आहे   

मंगळावरील Jezero Crater ह्या भागातील आकाशात  Ingenuity हेलिकॉप्टरने अकरावेळा  यशस्वी भरारी मारली आहे मंगळावरील कडाक्याच्या थंडीत तेथे सुर्यप्रकाश कमी असतो आणी मंगळावरील धुळीच्या वादळात हेलिकॉप्टरच्या पंख्यावर धुळ जमते तेव्हा सौर ऊर्जेच्या कमतरतेमुळे ऊड्डाण करणे कठीण असते आणी Perseverance यानाला  हेलिकॉप्टरचे ठिकाण शोधणेही अशा वेळी कठीण जाते पण सकाळी सुर्यप्रकाशात पंख्यावरील धुळ ऊडुन जाते आणी Ingenuityपुन्हा नव्या जोमाने ऊड्डाण करण्यासाठी सज्ज होते 

आता Ingenuity मंगळावरील Martian Kansas ह्या भागात आहे ह्या भागात पुरातन पाण्याचे आटलेले स्त्रोत,नदीपात्र त्या भोवती वाळूचे  ढिगारे आणी नदीच्या पाण्याच्या आटलेल्या लहरींच्या खुणा सापडल्या आहेत तो भाग डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांनी वेढलेला आहे हा भाग भविष्यकालीन मंगळमोहिमेसाठी ऊपयुक्त आहे ह्या मोहिमेतील अंतराळवीर आणी मानवी निवासासाठी योग्य आहे Ingenuity हेलिकॉप्टर मध्ये नवीन Software fix केल्यामुळे त्या भागातील सुक्ष्म निरीक्षण नोंदवण्यास मदत होईल आणी सुरक्षित ऊड्डाणासाठीही 

नासाच्या J.PL संस्थेचे Ingenuity Operation Lead - Josh Anderson म्हणतात," Perseverance यान आणी नासा संस्था ह्यांच्यात संपर्क साधण्यास Ingenuity मदत करते पण हेलिकॉप्टर ह्या भागात ऊड्डाण करताना टेकडीमागे किंवा दुरवर जाऊन दिसेनासे झाले तर हा संपर्क तुटु शकतो म्हणून टिमला सतत सर्तक रहावे लागते ह्या आधीही Ingenuityने अशा अनेक आव्हानात्मक परिस्थितीवर मात करीत यशस्वी उड्डाण केले आहे येत्या काही दिवसात देखील ह्या समस्या पार करून Ingenuity हेलिकॉप्टर आणखी वेगाने उड्डाण करेल आणी त्यात बसविलेल्या नवीन सॉफ्टवेअर मुळे तेथील भागात उड्डाण करताना अडचण येणार नाही  Ingenuity हेलिकॉप्टर त्यातील अत्याधुनिक कॅमेऱ्याच्या साहाय्याने आम्हाला लवकरच Belva Crater ह्या भागातील सुंदर मनोरम दृश्यांचे फोटो पाठवेल Ingenuity हेलिकॉप्टरची कार्यक्षमता Perseverance यानाच्या सौर उर्जेवर अवलंबून असते आणि Perseverance यान दररोज शेकडो मीटर प्रवास करतो त्यामुळे Ingenuity हेलिकॉप्टर आणखी किती दिवस तेथे कार्यरत राहील हे नक्की सांगता येत नाही कदाचित काही महिने किंवा काही वर्षेही! आम्ही प्रत्येक उड्डाण बोनस समजतो शेवटी चांगल्या गोष्टीलाही शेवट असतोच "असे नासा संस्थेतील Ingenuity टीमचे प्रमुख म्हणतात  

Saturday, 8 April 2023

आर्टेमिस-II मोहिमेतील निवडक अंतराळवीरांनी व्यक्त केले मनोगत

 The Artemis II crew in an Orion simulator at NASA’s Johnson Space Center in Houston.

 नासाच्या Artemis -II मोहिमेतील अंतराळवीर Reid Wisemen ,Victor Glover कॅनडियन अंतराळवीर Jeremy Hansen आणि Christina Koch नासाच्या Johnson Space Center मध्ये -फोटो नासा संस्था

नासा संस्था-4 एप्रिल

नासाच्या Johnson Space Center Huston जवळील Ellington येथील प्रांगणात एका कार्यक्रमात नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी Artemis मोहिमेसाठी निवडलेल्या अंतराळवीरांची नावे जाहीर केली त्या वेळी नासाचे अंतराळवीर व आमंत्रींत पत्रकारांसोबत विद्यार्थीही उपस्थित होते 

Bill Nelson ह्यांनी ह्या अंतराळवीरांची  नावे अनोख्या पद्धतीने जाहीर करून उत्कंठा वाढविली आणि ह्या अंतराळवीरांचे स्टेज वर जोशात स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले ह्या अंतराळवीरांची नावे जाहीर होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले तर विद्यार्थ्यांनी ह्या अंतराळवीरांचे पोस्टर हातात घेऊन त्यांचा आनंद व्यक्त केला 

Bill Nelson नाव जाहीर करताना म्हणाले ",ती इंजिनीअर आहे तीने तिच्या करिअरची सुरवात Goddard येथून केली ती अनोळखी नाही तिला तुम्ही ओळखता तिने  स्थानकात जास्त दिवस राहण्याचा आणि पहिला फक्त महिलांचा समावेश असलेला स्पेसवॉक करून रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे ती ह्या मोहिमेतील मिशन स्पेशॅलिस्ट Christina Koch !"

"तो Master of Science in Physics आणि F-18 पायलट आहे तो कॅनडियन अंतराळवीर Jeremy Hansen "!

"तो Naval Aviator आणि Test Pilot आहे त्याने वेगवेगळ्या चाळीस Aircraft मधून उड्डाण केलय आणि Space X Crew -1मोहिमेत स्थानकात वास्तव्य देखील केल तो Artemis-II मोहिमेचा Pilot Victor Glover "!

"तो Decorated Naval Aviator Test Pilot आणि Leader Of highest  Character आहे  तो Artemis मोहिमेचा कमांडर Reid Wiseman"! हे अंतराळवीर आता आर्टेमिस-II साठी निवडले आहेत ते तुमचे आमचे साऱ्या देशाचे अंतराळवीर आहेत ! आम्हाला त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान आहे  

आर्टिमस-ll मोहीमेत नाव जाहीर होताच ह्या चारही अंतराळवीरांनी Bill Nelson आणि नासा संस्थेचे आभार मानले आणी उपस्थीतांशी संवाद साधत त्यांचे मनोगत व्यक्त केले

Christina Koch

नासाच्या आर्टिमस मोहिमेत माझी निवड झाल्याचे ऐकून आनंद झाला नासा संस्थेचे आभार ! माझ्याकडे एक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पोस्टर होते त्या पोस्टरमध्ये पृथ्वी ऊगवतानाचा फोटो होता तो फोटो नासाच्या Apollo 8 अंतराळ मोहिमेत चंद्रावरून घेतलेला होता विषेश म्हणजे अंतराळवीरांनी तो फोटो घेतला होता म्हणजे लेन्स मागे फोटो घेणारा मानव होता मी त्यावेळी तरुण होते तो फोटो पाहून माझी चंद्राबद्दल विचार करण्याची दिशा बदलली आणी मला पृथ्वीबद्दल नव्याने विचार करण्यास प्रवृत्त केल आपण चंद्राकडे एक सिम्बॉल म्हणून पहातो सौंदर्याच प्रतीक म्हणून पहातो पण चंद्र फक्त एक सिम्बॉल नाही तर त्याही पलीकडे बरच काही आहे चंद्रावरील प्रकाशझोतात आपल्याला सायंटिफिक माहिती मिळु शकते तीथे संशोधन करण्यासाठी खूप वाव आहे तीथे जाऊन आपण आपल्या पृथ्वीच अवलोकन करून ह्या विश्वातील पृथ्वीच स्थान काय आहे तिची ऊत्पत्ती कशी झाली हे शोधू शकतो आणि आपल्याला अज्ञात अशा माहितीचा शोध देखील आपल्याला घेता येईल अस तेव्हा माझ्या मनात आल आता लवकरच मला तिथे जायला मिळेल आणि माझ स्वप्न साकार होईल

Victor Glover-  ह्या मोहिमेसाठी माझी  पायलटपदी निवड झाली आहे त्या बद्दल आभार ! Christina सारखच मला देखील वाटत चंद्रावर जाऊन आपण आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली आपण कुठून आलो या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधायला तिथे जायला पाहिजे तीथे जाऊन सखोल संशोधन करायला पाहिजे अस मलाही वाटायच  ह्या विश्वात आपण कुठे आहोत आपल स्थान नेमक कुठे आहे हे शोधायला पाहिजे कारण आपली पृथ्वी ह्या अथांग ब्रम्हांडातील एक छोटा भाग आहे आजवर मिळालेली संशोधीत माहिती खूपच कमी आहे जगभरातले शास्त्रज्ञ आपल्याला अजूनही अज्ञात असलेली माहिती शोधण्यासाठी सतत संशोधन करत असतात 

Reid Wiseman-

नासाची हि महत्त्वाकांक्षी मोहीम मानवाला अजूनही अज्ञात असलेली माहिती मिळवण्यासाठी चंद्रावर जाण्यासाठी प्रवृत्त करते मी जेव्हा पाहिल कि,माझ्यासोबत Victor,Christina आणी Jeremy सारखे अंतराळवीर ह्या मोहिमेत सहभागी होणार आहेत तेव्हा आनंद झाला कारण ते चंद्रावर जाण्यासाठी पात्र आहेत आणी सुपीरीअर आहेत मला खात्री आहे आम्ही हि मोहीम यशस्वी करु आणी पृथ्वीवर सुखरूप परत येऊ  

नासाची हि आर्टिमस- ll चांद्रमोहिम चंद्रावर पुन्हा अंतराळवीरांना जाण्यायेण्यासाठीची Flight test आहे Space Launch Rocket आणी Orion अंतराळयानाची चंद्राच्या कक्षेतील भ्रमण क्षमता आणी ह्या अंतराळप्रवासा दरम्यानची मानवी क्षमता चेक करण्यासाठी हि आर्टेमिसची दुसरी मोहीम आहे नासाची अंतराळ विश्वातील भविष्यकालीन मानवसहित मंगळ मोहीम आणी दूरवरच्या अंतराळ मोहिमाची हि पहिली पायरी आहे चंद्रावरील सायंटिफिक संशोधन आणी मानवी वास्तव्यासाठी तेथील पोषक वातावरण शोधण्यासाठी आम्ही तेथे जाणार आहोत तेथे जाण्यासाठी ऊत्सुक आहोत! आम्ही सज्ज आहोत ! असे मत ह्या अंतराळवीरांनी व्यक्त केले

Friday, 7 April 2023

नासाच्या Artemis II मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची नावे घोषित

  The crew of NASA’s Artemis II mission (left to right): Christina Hammock Koch, Reid Wiseman (seated), Victor Glover, and Jeremy Hansen.

नासाच्या आर्टेमिस-II मोहिमेतील सहभागी अंतराळवीर Christina Koch,Reid Wiseman,Victor Gloverआणि कॅनडाचे अंतराळवीर Jeremy Hanson-फोटो नासा संस्था

नासा संस्था -3 मार्च

अमेरीकेची बंद पडलेली चांद्रमोहिम पन्नास वर्षांनी पुन्हा सुरू झाल्यानंतर आणी आर्टिमस-l मोहिमेच्या  यशस्वीतेनंतर नासाने आता आर्टिमस-ll मोहिमेची जय्यत तयारी सुरू केली आहे ह्याच मोहिमे अंतर्गत चंद्रावर जाण्यासाठी नासा आणी कॅनडीयन स्पेस एजन्सीने(CSA) चार अंतराळवीरांची निवड केली असुन त्यांची नावे नुकतीच घोषित करण्यात आली नासाने आधीच सांगितल्या प्रमाणे ह्या चार अंतराळवीरांमध्ये एक महिला अंतराळवीर व एका अफ्रिकन अंतराळवीराचा समावेश करण्यात आला आहे 

नासाचे अंतराळवीर Reid Wiseman, आफ्रिकन अंतराळवीर Victor Glover, रेकॉर्ड ब्रेकर महिला अंतराळवीर Christina Koch आणी कॅनडाचे अंतराळवीर Jeremy Hansen ह्या चार अंतराळवीरांची ह्या मोहिमेसाठी निवड करण्यात आली आहे ह्या मोहिमेत अंतराळवीर Reid Wiseman कमांडरपद व Victor Glover पायलटपद सांभाळणार असुन अंतराळवीर Christina Koch आणी अंतराळवीर Jeremy Hansen ह्या मोहिमेत मिशन स्पेशालिस्ट म्हणून काम पाहणार आहेत हे चार अंतराळवीर 2024 मध्ये चंद्रावर जाणार आहेत नासाचे Orion अंतराळयान ह्या चार अंतराळवीरांसह नासाच्या केनेडी स्पेस सेंटर Florida येथील 39 B ह्या ऊड्डान स्थळावरून Mega Moon Rocket च्या सहाय्याने चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात ऊड्डाण करेल 

चंद्रावर पुन्हा मानवी येजा सुरु करण्यासाठी नासा संस्थेतील आर्टेमिस मोहिमेतील हजारो कर्मचारी अहोरात्र अथक परीश्रम करत आहेत हे निवडक अंतराळवीर त्यांचे नेतृत्व करणारे अंतराळवीर आहेत,ते आमचे अंतराळवीर आहेत ते साऱ्या जगाचे प्रतिनिधित्व करणारे अंतराळवीर आहेत  हे चारही अंतराळवीर अनुभवी आहेत त्यांनी त्यांच्या क्षेत्रात त्यांचे असामान्य कर्तृत्व सिद्ध केले आहे म्हणूनच ह्या चार अंतराळवीरांची टीम एकत्रित आल्याने भविष्यकालीन अंतराळविश्वातील मोहिमातील नव्या युगाचा शुभारंभ होईल ह्या देशाचे ह्या मोहिमेचे आणि भावी पिढीचे स्वप्न साकारणारे हे कर्तृत्वान अंतराळवीर आहेत असे नासाचे Administrator Bill Nelson म्हणतात 

ह्या आर्टेमिस मोहिमेत नासा संस्थेसोबत कॅनडा देखील केंद्रस्थानीं आहे आम्ही पुन्हा एकदा चंद्रावर जात आहोत ह्या चंद्रप्रवास रोमांचकारी आहे ! नासाच्या भागीदारीबद्दल Thanks! असे कॅनडियन स्पेस एजन्सीचे आदरणीय मंत्री Francois-Philippe Champagne म्हणतात अंतराळवीर Jeremy Hansen आता कॅनडियन देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे सर्व देशवासीयांकडून त्याचे अभिनंदन ! ह्या महत्वाकांक्षी मोहिमेतील सहभागाबद्दल! पुढाकाराबद्दल! अमेरिकेसोबत आमची आधीपासूनच मैत्री होती आता अंतराळविश्वातील ऐतिहासिक भागीदारीचा शुभारंभ झाला आहे!

डिसेंबरमधील आर्टेमिस-1 मोहिमेच्या यशानंतर आता ह्या दुसऱ्या मोहीमेचा शुभारंभ आहे अंतराळविश्वातील भविष्यकालीन मंगळ मोहीम आणि दूरवरच्या मोहिमांची हि पूर्वतयारी आहे पन्नास वर्षानंतर प्रथमच हे चार अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत पृथ्वीच्या आणि मानवतेच्या उपयुक्ततेसाठी आणि चंद्रावरील सायंटिफिक प्रयोगासाठी हि मोहीम राबविण्यात येत आहे हे अंतराळवीर प्रत्यक्ष चंद्रावर न उतरता चंद्राच्या कक्षेत शिरून त्याच्या भोवती भ्रमण करून तेथील भौगोलिक आणि मानवी वास्तव्यासाठी पोषक वातावरण आणि पाण्याचे अस्तित्व असलेली जागा शोधणार आहेत हि मोहीम दहा दिवसांची आहे शिवाय Orion अंतराळयान आणि चंद्रावरील अंतराळ प्रवासादरम्यान मानवी आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात ह्याचे निरीक्षणही नोंदवण्यात येणार आहे

अंतराळवीर Reid Wiseman ह्यांची हि दुसरी अंतराळवारी आहे 2014 मध्ये नासाच्या अंतराळ मोहीम -41अंतर्गत त्यांनी स्थानकात 165 दिवस वास्तव्य केले होते आणि त्या दरम्यान अंतराळस्थानकाच्या कामासाठी दोनवेळा तेरा तासांचा स्पेसवॉक केला होता 2020-2022 मध्ये नासा संस्थेतील Astronaut Office मधील प्रमुखपद त्यांनी सांभाळले होते 

अंतराळवीर Victor Glover ह्यांची देखील हि दुसरी अंतराळवारी आहे 2021मध्ये  नासाच्या Space X Crew-1 मोहिमेतील पायलटपद त्यांनी सांभाळले होते स्थानकात 168 दिवसांच्या वास्तव्यात त्यांनी मोहीम 64 चे Flight Engineer म्हणूनही काम केले ह्या वास्तव्या दरम्यान त्यांनी तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभाग नोंदवला आणि स्थानकाच्या कामासाठी चारवेळा स्पेसवॉक केला 

अंतराळवीर Christina Koch ह्यांची देखील हि दुसरी अंतराळवारी आहे त्यांनी नासाच्या अंतराळ मोहीम 59-60-61 मध्ये सलग 328 दिवस स्थानकात वास्तव्य करून आणि स्थानकाच्या कामासाठी फक्त महिलांचा सहभाग असलेला स्पेसवॉक करून सर्वात जास्त दिवस स्थानकात राहणारी महिला अंतराळवीर आणि पहिली महिला स्पेसवॉकर होण्याचा रेकॉर्ड प्रस्थापित केला आहे 

कॅनडाचे अंतराळवीर Jeremy Hansen मात्र पहिल्यांदाच अंतराळ प्रवास करणार आहेत त्यांनी कॅनडाच्या Arm Forces मध्ये Fighter Pilot पदी काम केले आहे