कॅनडियन स्पेस एजन्सी (C.SA) - 1 मे
भविष्यकालीन दूरवरच्या अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर आणि अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांना पौष्टिक,सकस आणि चविष्ट अन्न निर्मिती करता यावी ह्या साठी आणी पृथ्वीवरील धान्य ऊत्पादन तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नासा संस्था
आणी कॅनडीयन स्पेस एजन्सी (C.SA) ह्यांनी Deep Space Food Challenge स्पर्धा जाहीर केली होती ह्या स्पर्धेत धान्य निर्मितीची नाविन्यपूर्ण पध्दत विकसित करण्याची संधी देण्यात आली होती कॅनडियन स्पेस एजन्सीने जाहीर केलेल्या स्पर्धेत भाग घेणारी धान्य उत्पादक संस्था आणि नागरिक कॅनडा मधील रहिवासी असणे आवश्यक होते आता ह्या स्पर्धेत सहभागी झालेल्या चार स्पर्धक गटांची प्राथमिक फेरीतून निवड करण्यात आली आहे
ह्या स्पर्धेत
अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी त्यांना जीवनसत्त्वयुक्त सकस आणी
पौष्टिक अन्न ऊत्पादन संशोधनाची संधी जाहीर करण्यात आली होती हे अन्न
ऊत्पादन कमी साहित्य,कमी पाणी वापरून,कमी जागेत करता येणे आवश्यक होते स्थानकातील झीरो ग्रव्हिटित सगळ्या वस्तू तरंगत असल्याने आणी तीथे पाणी
नसल्याने पाणी कमी प्रमाणात वापरणे आवश्यक असते तेथे पाणी देखील थेंबाच्या
स्वरूपात तरंगते त्यामुळे तेथे पदार्थ बनवणे अशक्यच ह्या बाबी लक्षात घेऊन ह्या समस्यावर मात करून धान्य ऊत्पादन
निर्मितीची नवीन विकसीत पध्दत सादर करणे आवश्यक होते हे संशोधित नवीन धान्य उत्पादनाचे तंत्रज्ञान भविष्यकालीन अंतराळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी उपयुक्त ठरेल विशेषतः चंद्र आणि मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी तेथील वास्तव्यात आणि भविष्यकालीन मानवी निवासात उपयुक्त ठरेल
पृथ्वीपासुन दुर अंतराळात स्थानकातील झीरो ग्रॅव्हीटीत सतत तरंगत्या अवस्थेत रहाणाऱ्या अंतराळविरांना पृथ्वीवरच्या सारखे ताजे गरम जेवण ताज्या भाज्या व फळे खायला मिळत नाहीत त्यांना पृथ्वीवरुन पाठवलेले प्रिर्झव्ह थंड अन्न व भाज्या खाव्या लागतात कारण तेथे ईथल्या सारखी सृष्ठी किंवा वातावरणच नाही म्हणून नासा संस्थेतील शास्त्रज्ञ स्थानकातील व्हेजी चेंबरमधील कृत्रीम बागेत पृथ्वीसारखे वातावरण निर्माण करून व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या,फळे व धान्य पिकवण्याचे प्रयोग सतत करत असतात आणि ते यशस्वीही होत आहेत पृथ्वीवरील नासा संस्थेत देखील परग्रहावरच्या सारखे कृत्रिम वातावरण आणि सृष्ठी निर्माण करून यशस्वी धान्य आणि भाजी लागवड करण्यात येत आहे
अंतराळविरांना सतत झीरो ग्रॅव्हिटीत तरंगत्या अवस्थेत रहावे लागत असल्याने त्यांच्या शरीरावर विपरीत परीणाम होतो त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यांची हाडे ठिसूळ होतात त्यांच्या दृष्ठीवर परिणाम होतो म्हणूनच त्यांना व्हिटॅमिन युक्त आरोग्यदायी जेवण मिळावे विषेशतः ताजी हिरवी पालेभाजी व फळे मिळावीत म्हणून संशोधक सतत प्रयत्न करत आहेत त्या साठीच अंतराळवीरांना निरोगी राहण्यासाठी जीवनसत्त्वयुक्त सकस अन्न मिळणे आवश्यक आहे भविष्यकालीन दुरवरच्या अंतराळ निवासात अंतराळविरांना पृथ्वीवरून अन्न पाठविताना वेळ लागेल त्यामुळे त्यांना स्थानकातच अन्न.भाजी व फळे लागवड करावी लागेल म्हणून नासाचे शास्त्रज्ञ स्थानकात व्हेजी प्रोजेक्ट राबवत आहेत शास्त्रज्ञांच्या ह्या प्रयत्नांना आता पुन्हा यश मिळाले आहे स्थानकातील व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत लावलेल्या टोमॅटोच्या रोपांना टोमॅटो आले आहेत ह्या आधी देखील अंतराळविरांनी स्थानकात मीरची,गहु, Lettuce, लाल कोबी, ह्या सारख्या भाज्या लावून त्यांची चवही चाखली आहे परंतु परग्रहावरील विपरीत वातावरणात अन्न धान्य पिकवणे सोपे नाही त्या साठीच पृथ्वीवर तसेच वातावरण निर्माण करून सकस,जीवनसत्वयुक्त,पौष्टीक अन्न निर्मितीसाठी संशोधन करण्यात येत आहे ह्या स्पर्धेचा उपयोग अंतराळवीरांप्रमाणेच कॅनडा मधील उत्तरेकडील दुर्गम दुष्काळी भागातील लोकांना अन्न उत्पादन करण्यासाठी होणार आहे
ह्या चार विजेत्या स्पर्धकांना आता दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळाला असून त्या नंतर सर्व बाबीची पूर्तता करून विकसित केलेल्या संशोधित धान्य उत्पादकाची अंतिम निवड होईल
No comments:
Post a Comment