Sunday, 24 December 2017

अंतराळ मोहीम 54 चे आणखी तीन अंतराळवीर स्थानकात पोहोचले



                   अंतराळ वीरांसह अंतराळयान अंतराळ स्थानकाकडे उड्डाण करताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -२२ डिसेंबर
रविवारी सतरा तारखेला नासाच्या अंतराळ मोहीम 54 चे अंतराळवीर Scott Tingle ,रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov आणि जापनीज अंतराळवीर Norishige Kanai सोयूझ अंतरिक्ष यानाने अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले बैकानूर Cosmodrome वरून 2.21 a.m.ला सोयूझ यानाने अंतराळ स्थानकाकडे प्रयाण केले आणि मंगळवारी 3.43a.m.ला ते अंतराळ स्थानकात पोहोचले

                                       अंतराळवीर स्थानकात पोहोचल्यानंतर फोटो -नासा संस्था

स्थानकात पोहोचल्यावर अंतराळ स्थानकात राहत असलेले सध्याचे कमांडर Alexander Misurkin ,अंतराळवीर Joe Acaba आणि Mark Vande ह्यांनी त्यांचे स्वागत केले
आता हे तीन नवीन अंतराळवीर सहा महिने अंतराळ स्थानकात मुक्काम करतील व तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील आता स्थानकातील अंतराळवीरांची संख्या सहा झाली असून त्यातील चारजण अमेरिकन आहेत
हे सारे मिळून अंतराळ स्थानकातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम व त्यावर आधुनिक उपचार ह्यावर संशोधन करतील विशेषतः निद्रानाश व मानवी स्नायूंवरील दुष्परिणाम शिवाय fiber optic filament manufacturing benefits design of advanced optical materials& electronic devices ह्याचा त्यात समावेश आहे
अंतराळवीर Joe Acaba ,Alexander आणि Mark Vande फेब्रुवारी 2018 मध्ये पृथ्वीवर परततील तर हे नवीन तीन अंतराळवीर जून महिन्यात पृथ्वीवर परत येतील

Saturday, 16 December 2017

अंतराळवीर Randy Bresnik,Paolo Nespoli आणी SergeyRyazanskiy पृथ्वीवर परतले

                                       सोयूझ MS-05 अंतराळवीरांसह पृथ्वीवर उतरताना -फोटो नासा संस्था

नासा संस्था -14 dec.
नासाच्या अंतराळ मोहीम 54चे अंतराळवीर व कमांडर Randy Bresnik ,फ्लाईट इंजिनीअर Paolo Nespoli आणी Sergey Ryazanskiy गुरुवारी दुपारी अंतराळस्थानकातून पृथ्वीवर परतले
गुरुवारी दुपारी 3.37 मिनिटाला त्यांचे सोयूझ MS-05 हे अंतरिक्ष यान कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पोहोचले

ह्या तिघांनी अंतराळ स्थानकात 138 दिवस वास्तव्य केले अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान त्यांनी स्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी अंतराळातील microgravity  चा शरीरावर होणाऱ्या बॅक्टेरियल इफेक्टवर ,पार्किसन्स ह्या रोगाचे ओरिजिन व त्यावरील आधुनिक उपचार आणि history of cosmic ray ह्यावरील संशोधनात सहभाग नोंदवला
शिवाय त्यांच्या कार्यकाळात स्थानकात आलेल्या तीन कार्गोशिप चे स्वागत करून त्यांच्या डॉकिंगची सोयही केली
Randy Bresnik ह्यांनी त्यांच्या वास्तव्यादरम्यान अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी तीन स्पेसवॉक केले
तर अंतराळवीर Sergey Ryazanskiy ह्यांनी देखील स्थानकाच्या कामासाठी एकदा स्पेसवॉक केला
ह्या अंतराळवीरांच्या वास्तव्यात पहिल्यांदाच स्थानकात सहाजणांनी एकत्रित राहून संशोधन केले
आता स्थानकाची सूत्रे अंतराळवीर Alexander Misurkin ह्यांच्या हाती असून त्यांच्या सोबत अंतराळवीर Joe  Acaba  आणि Mark Vande Hei  हे दोघे स्थानकात राहून आपले संशोधन सुरु ठेवतील  सतरा डिसेम्बरला नवीन तीन अंतराळस्थानकात राहण्यासाठी जातील

Monday, 4 December 2017

चाळीस वर्षांनी घडल सुपरमूनच विलोभनीय दर्शन



                                                           आकाशातील तेजोमय सुपरमून

 यवतमाळ -३डिसेंबर
 एरव्ही आपण आकाशात कलाकलाने वाढणारी चंद्रकोर किंवा पौर्णिमेचा चंद्र नेहमीच पाहतो पण कालच्या पौर्णिमेचा चंद्र मात्र वेगळा होता तब्बल चाळीस वर्षांनी चंद्र सुपर मॅन सारखा सुपरमूनच्या रूपात उगवला तो नेहमीपेक्षा सातपट मोठया आकाराचा अन पंधरा पटीन अधिक प्रकाशान अवस्थेत आकाशात अवतरला एरव्ही उशिराने पूर्ण रूपात प्रगटणारा हा तेजस्वी सुपरमुन काल मात्र संध्याकाळीच मोट्या आकारातील तेजोमय रुपात उगवला
आकाशात नजर जाताच त्याच्या भोवती पसरलेली तेजोमय आभा आणि त्याचा वाढीव आकार दृष्टीस पडत होता
त्याच्या ह्या मोट्या आकारामुळे त्याचे नामकरण सुपरमून असे झाले शिवाय सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे त्याला कोल्ड सुपरमून असं म्हटल जातंय
चंद्राला हे सुपरमूनच रूप प्राप्त होण्यामागे शास्त्रीय कारण आहे आकाशात जेव्हा  चंद्र व पृथ्वी परिक्रमा करतात तेव्हा चंद्र आणि पृथ्वी ह्यांच्या मधील अंतर कमी होत तेव्हा ते जवळ येतात आणि त्यांच्यातील कमी झालेल्या अंतराने चंद्राचा आकार व प्रकाशात वाढ होते काल चाळीस वर्षांनी हे अंतर जवळ जवळ पाच हजार किलोमीटरने कमी झाल होत त्या मुळे पृथ्वीवासीयांना सुपरमूनच विलोभनीय दर्शन घडल
   

Friday, 3 November 2017

अंतराळ स्थानकात सहाव्यांदा उगवलेल्या भाजीची अंतराळवीर Joe Acaba ह्यांनी केली कापणी

                 अंतराळ स्थानकातील आधुनिक चेंबर मध्ये उगवलेली नवी भाजीची रोपे -फोटो -नासा संस्था

नासा संस्था - 28 ऑक्टोबर
शुक्रवारी 27 ऑक्टोबरला अंतराळवीर अंतराळस्थानकातील व्हेजी प्रोजेक्ट मध्ये व्यस्त होते कारण त्या दिवशी अंतराळ स्थानकात सहाव्यांदा उगवलेल्या भाजीची अंतराळवीर Joe Acaba ह्यांनी कापणी केली
अंतराळवीर Joe Acaba ह्यांनी Mizuna Mustard ,Waldmanns ग्रीन लेट्युस आणि Outredgeous ,Red Romaine Lettuce ह्या भाज्यांची पाने कापली त्यांनी ह्या भाज्या मुळापासून न कापता अर्ध्याच कापल्या त्यामुळे उरलेल्या भाजीच्या रोपांना पुन्हा पाने येतील Joe Acaba ह्यांच्या ह्या कामाने ह्या व्हेजी प्रोजेक्टचे मॅनेजर Nicole Dufour प्रभावित झाले असून Joe ने छान काम केले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे
अंतराळवीरांनी स्थानकात ऊगवलेल्या ह्या ताज्या भाज्यांचा आस्वादही घेतला फ्लोरिडा तेथील केनेडी स्पेस सेंटर मधील संशोधकांच्या टीमने स्थानकात पाठवलेल्या ड्रेसिंगचा उपयोग अंतराळवीरांनी ह्या भाज्यांची चव वाढवण्यासाठी  केला
अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान अंतराळवीर स्कॉट केली,पेगी व्हाइटसॉन व इतर अंतराळवीरांनी अंतराळस्थानकात राहत असलेल्या अंतराळ वीरांना ताजी भाजी व फळे खाता यावीत म्हणून व्हेजी प्रोजेक्ट राबवला ह्या प्रोजेक्ट अंतर्गत त्यांनी स्थानकात भाजी व फुलांच्या रोपांची यशस्वी लागवड करून आधुनिक तंत्रज्ञानाने निगा राखत त्यांची जोपासना केली आणि त्यांच्या ह्या प्रयत्नांना यशही मिळाले अंतराळात फुले तर फुललीच शिवाय लेट्युस ,कोबीची भाजीही उगवली त्या मुळे प्रेरित होऊन अंतराळवीर आता ह्या व्हेजी प्रोजेक्ट अंतर्गत नवनवीन प्रयोग करत आहेत

 स्थानकातील व्हेजी चेंबर मधील Mizuna ,Red romaine Lettuce आणि Wehldmons ग्रीन lettuce ह्या भाज्यांचे   Joe Acaba ह्यांनी काढलेले फोटो - नासा संस्था

व्हेजी प्रोजेक्ट च्या टीमने ह्या वेळेस प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकत स्थानकातील आधुनिक तंत्रज्ञानानें विकसित केलेल्या प्रयोगशाळेतील बागेत नुकतीच नवीन तीन पालेभाज्यांची लागवड केली आहे भाजी लागवडीची हि स्थानकातील सहावी वेळ आहे
ह्या Veg-03 ह्या प्रोजेक्ट अंतर्गत अंतराळवीरांना वेगळा व नवीन प्रयोग करायचा होता म्हणून त्यांनी मिश्र पालेभाज्यांची लागवड केली त्यांच्या ह्या यशामुळे अंतराळवीरांना नवी वेगवेगळी रोपे पाहायला मिळाली शिवाय त्यांची चवही चाखता आली तीन वेगवेगळ्या भाज्या लाऊन त्यांची निगा राखत स्थानकात वाढवणे पृथ्वीइतके सोपे नव्हतेच Mizuna जातीच्या भाजीचे पाने लांब व टोकदार असल्याने पाणी घालताना अडकत होती
ह्या भाज्यांच्या कापणीनंतर आता अंतराळवीरांनी स्थानकात नवे Plant Growth Chamber (Advanced Plant Habitat ) बसवले आहे आधीपेक्षा हे चेंबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहे हा आधुनिक चेंबर स्थानकात Install करण्यासाठी अमेरिकेतील नासा सेंटर मधील संशोधकांनी Joe Acaba ह्यांना योग्य त्या सूचना दिल्या
ह्या नवीन चेंबर मधील सगळ्या आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर आठवड्या नंतर अंतराळवीर तिथे Arabidopsis ह्या नव्या फुलाच्या रोपाच्या बिया पेरतील हे फुलझाड कोबी आणि मोहरी ह्या जातीचे आहे शिवाय Dwarf Wheat ह्या प्रजातीच्या गव्हाचे रोपही स्थानकातील आधुनिक चेंबरमध्ये  अंतराळवीर लावणार असून पाच आठवडे ग्रोथ चेंबर मधील वातावरण, पाण्याचे शोषण व पुनर्वापर ह्यांचे निरीक्षण नोंदवून रोपांची जोपासना करणार आहेत
अशीच रोपे अमेरिकेतील स्पेस सेंटर मधील प्रयोग शाळेत लावण्यात येतील आणि पृथ्वी आणि स्थानकातील रोपांच्या वाढीतील बदल टिपुन त्यावर संशोधन करण्यात येईल ह्याचा उपयोग आगामी अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांना होईल व नव्या व्हेजी प्रोजेक्ट साठीही होईल



    

Saturday, 21 October 2017

अंतराळवीर Randy Bresnik आणि Joe Acaba ह्यांचा स्पेसवॉक यशस्वी


                      अंतराळ वीर स्थानकाबाहेर स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -20 ऑक्टोबर
अंतराळमोहीम 53 चे कमांडर Randy Bresnik आणि फ्लाईट इंजिनीअर Joe Acaba ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी यशस्वी स्पेसवॉक केला हा स्पेसवॉक सहा तास एकोणपन्नास मिनिटांनी संपला
ह्या दोन्ही अंतराळवीरांनी ह्या स्पेसवॉक दरम्यान अंतराळ स्थानकाच्या रोबोटिक आर्मच्या latching end effector वरील खराब झालेला fuse बदलवून नवा हाय डेफिनेशन कॅमेरा बसवला ह्या दोघांनी हे काम अत्यंत शीघ्रतेने व कमी वेळात पूर्ण करून भविष्यात उपयुक्त अशी इतर अनेक कामेही केली
Joe Acaba ह्यांनी रोबोटिक आर्मच्या नव्या effectorला ग्रीस लावले तर Randy Bresnik ह्यांनी नवे रेडिएटर ग्रीपल बार फिट केले व भविष्यातील रोबोटिक रिप्लेसमेंट साठी आवश्यक प्लॅटफॉर्म तयार केला शिवाय Randy ह्यांनी अंतराळ स्थानकावर असलेल्या दोन स्पेअर पंप मोड्युल पैकी एकाचे प्रिपरेशन वर्क पूर्ण केले
ह्या दोन अंतराळ वीरांनी ऑक्टोबर मध्ये केलेला हा तिसरा व शेवटचा स्पेसवॉक होता
Randy Bresnik ह्यांच्या आजवरच्या अंतराळमोहिमेतील हा पाचवा स्पेसवॉक होता त्यांनी आजवर अंतराळात 32 तासाचा स्पेसवॉक यशस्वीपणे पूर्ण केला आहे तर Joe Acaba ह्यांचा हा तिसरा स्पेसवॉक होता त्यांनी त्यांच्या करिअर मध्ये आजवर अंतराळात 19 तास 46 मिनिटांचा स्पेसवॉक केला आहे
अंतराळ स्थानकाच्या कामासाठी आजवर अंतराळवीरांनी केलेला हा 205 वा स्पेसवॉक होता तर आतापर्यंत  अंतराळवीरांनी स्पेसवॉक साठी 53 दिवस 6 तास व्यतीत केले आहेत

Monday, 25 September 2017

अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनीं साधला Space To Earth विद्यार्थ्यांशी लाईव्ह संवाद

         अंतराळवीर Mark Vande Hei  अंतराळस्थानकातून लाईव्ह संवाद साधताना फोटो-नासा संस्था

नासा संस्था- 18 सप्टेंबर
नासाच्या अंतराळ मोहीम 53 चे अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनीं नुकताच अमेरिकेतील Pine over back at school मधील विद्यार्थ्यांशी Space To Earth साधलेल्या लाईव्ह संवादाचा हा वृत्तांत
P.V.K स्कूलच्या Emma ह्यांनी स्कूल तर्फे mark ह्यांच स्वागत केल  Senator Eichorn आणि Representative Layman ह्या क्षणी उपस्थित असल्याचे सांगीतले शिवाय आम्ही तुमच्या पहिल्या इंटरव्हू मध्ये सहभागी होतेय हे आमच्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगत मुलाखतीला प्रारंभ केला

             P.V.K.schoolच्या Emma  Mark ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

Emma - मिलिटरीमन असल्याचा अनुभव तुमच्या अंतराळवीर होण्यासाठी व अंतराळ मोहिमेसाठी फायदेमंद ठरला का ?
Mark - मिलिटरी मधल्या अनुभवाचा आणि अंतराळात काम करण्याचा निश्चितच फायदा झाला मिलिटरी मध्ये लोकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण तसच आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेण महत्वाच असत अंतराळातील अंतराळ स्थानकात आम्ही सहाजण पृथ्वीपासून सारया लोकांपासून दूर राहतो इथल्या विपरीत परिस्थितीत काम करताना तशीच एकमेकांची काळजी घेतो आणि संघर्षरत आयुष्य जगताना मिलिटरीमन असल्याचा निश्चितच फायदा होतो
Abilene (विध्यार्थी )- लाँचिंगच्या वेळेस अंतराळात झेप घेताना गुरुत्वाकर्षणाचा अनुभव कसा होता?
Mark -अंतराळात प्रक्षेपणाचा वेळेस यानासाठी वापरण्यात येणारा G-force नेहमीच्या फोर्सपेक्षा तिप्पट असतो पाठीवर बसलेल्या स्थितीतल्या आम्हाला प्रक्षेपणाच्या ह्या प्रचंड फोर्स मुळे जोरात सीटवर ढकलल्या गेल्याचा अनुभव आला तो थरारक आणि इंटरेस्टिंग होता !
 Kyla -तुम्हाला कधीतरी Oh! My God! I am in Space! असा विचार मनात येऊन भीती वाटते का ?
Mark - हो अनेकवेळा असे Wow ! क्षण आले कारण इथल्या मायक्रो ग्रॅव्हिटी मध्ये तरंगण सोप पण चालण महाकठीण असत इथे आल्यानंतर इथल्या परिस्थितीत adjust व्हायला दोनतीन दिवस लागले चालण्याचा अनुभव इतका वेगळा आहे कि लहानपणी चालायला शिकतानाची आठवण झाली नव्यान चालायला शिकण्याचा अनुभव विलक्षण होता सतत तरंगत्या अवस्थेत असल्यामुळे जिथे थांबायच असत त्याच्या पुढे आम्ही पोहोचतो म्हणून सतत तोल सावरत सजग राहाव लागत म्हणजे जिथे उभ राहायचय तिथे स्थिर राहता येत कधी अंतराळ स्थानकाच्या भिंतीवर पाय ठेवून आधार घ्यावा लागतो आणि तरंगत जाणारया वस्तू पकडताना तारांबळ उडते ,कसरत करावी लागते आणि आम्ही ते सार एन्जॉय करतो! भीती नाही वाटत!

            अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात भिंतीचा आधार घेताना Mark Vande Hei  फोटो -नासा संस्था

Eleanor -तुम्ही तिथे कोणते प्रयोग करत आहात ?
खूपच छान प्रश्न आहे ! इथे शंभरावर सायन्स विषयक प्रयोगांवर संशोधन सुरु आहे आम्ही lung cancer वरील आधुनिक उपचारावर संशोधन करणार आहोत ईथल्या अंतराळ संशोधकांनी अंतराळातील वातावरणात lung tissue growth वर संशोधन करून त्यांचे सॅम्पल्स  नुकतेच पृथ्वीवर आणलेत आणि हे त्यांचे संशोधन भविष्यात  कॅन्सर वरील प्रभावी इलाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल
River - अंतराळ स्थानकातील वास्तव्यादरम्यान तुम्हाला तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सोबत बोलायला कितीवेळा संधी मिळते
Mark  -इथे फोन असला तरीही स्थानकातून पृथ्वीवर संवाद साधण तिथल्या सारख सोप नसत कित्येकदा संपर्क होत नाही कारण कधी कधी satellite च coverage नसत तरीही आम्ही बरेचदा घरच्यांशी संवाद साधतो दोन दिवसातून एकदातरी मी पत्नीशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो काल पहिल्यांदा मी माझ्या मुलांशी बोललो त्यांना स्पेस स्टेशनची टुर घडवली त्यांनींही ती खूप एन्जॉय केली!
Cameron - भविष्यात मानव मंगळावर राहू शकेल का?
Mark - नक्कीच ! जो पर्यंत मानव शांतीं अन समाधानान एकत्रित राहील तो पर्यंत मानव मंगळावर वस्ती करून राहू शकेल आणि त्या साठी आपल्याला खूप प्रयत्न आणि कष्ठ करावे लागतील नवीन गोष्टी आत्मसात कराव्या लागतील
Grady - आजवर अंतराळ स्थानकाला एखादी उल्का धडकली आहे का ? आणि तस घडल असेल तर कशी दुरुस्ती करण्यात आली
Mark - हो! बऱ्याचवेळा असं घडलय छोटया,छोटया उल्का धडकल्या,त्याच्या खुणाही आहेत त्यामुळे नुकसान झाल नाही कारण स्थानकाची रचनाच तशी करण्यात आलीय फक्त स्पेसवॉक साठी जाताना विशेष खबरदारी घ्यावी लागते कधी उल्का मध्ये आली तर स्थानकाचा मार्ग बदलण्यात येतो
Hannah  -स्पेसमध्ये राहताना येणारया संभावित धोक्याला सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी कशी करता?
Mark  आम्हाला लाँचिंगच्या आधीच ह्या सर्व गोष्ठीसाठी ट्रेनिंग दिल जात ते खूप कठीण आणि कठोर असत कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची आमची तयारी करून घेतली जाते त्या मुळे काही अडचण येत नाही म्हणूनच लाँचिंग पासून स्थानकातील प्रवेशापर्यंत सार सुरळीत पार पडल
Kelly - सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात तुमच रोजच काम कस पार पडत ?
Mark - हे काम एकाचे नाही तर साऱया टीमचे असते पृथ्वीवरून स्पेस स्टेशनच काम मॅनेज केल्या जात सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाची सवय व्हायला थोडा वेळ लागतो ह्या वातावरणात काम करताना स्वत:ला स्थिर ठेवण्यासाठी आधार शोधावा लागतो दोन्ही हात कामात असतील तर पायांनी भिंतींचा आधार घेत स्थिर राहील तरच काम करता येत नाहीतर आम्ही तरंगत राहून काम करण अशक्य असत
Andrew - तुम्हाला एखाद्या ग्रहावर जायची संधी मिळाली तर तुम्हाला कुठे जायला आवडेल ? आणि का?
Mark - खरतर माझा सर्वात आवडता ग्रह पृथ्वी आहे कारण आपण पृथ्वीवर जन्म घेतलाय आणि नंतर मला मंगळावर जायला आवडेल त्या साठी सध्या मंगळ मोहीम राबवल्या जातेय पृथ्वीपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि मानवी निवासासाठी अनुकूल असलेल्या ग्रहावर राहण्यासाठी जातानाचा दूरवरचा प्रवास उत्सुकतापूर्ण आणि थरारक असेल
 Abbie -  स्थानकात अंतराळवीर आजारी पडले तर काय करता ?
 Mark -सुदैवाने आमच्या टीममध्ये एक डॉक्टर आहे पण नेहमीच असं नसत त्या मुळेच आम्हाला ट्रेनिंगच्या वेळेस डेंटल,मेडिकल ट्रेनिंग दिल्या जाते शिवाय पृथ्वीवरून नासाची टीम मार्गदर्शन करते आणि समजा खूपच कठीण परिस्थिती आली आणि पृथ्वीवर जाण अत्यावश्यक असेल तर इथे स्पेसक्राफ्ट असत त्याचा उपयोग होऊ शकतो
Miles - स्पेस स्टेशन मधून पृथ्वीपेक्षा जास्तवेळा सूर्य ग्रहण दिसत का ?
Mark -  नाही !आम्ही अंतराळात असलो तरी पृथ्वीपासून जवळच्या अंतरावर असल्यामुळे पृथ्वीवर जेव्हा ग्रहण दिसत तेव्हाच आम्हालाही दिसत कारण सूर्य पृथ्वी आणि चंद्र जेव्हा एका रेषेत येतात तेव्हाच ग्रहण होत फक्त अंतराळातून पृथ्वीवर आम्हाला ग्रहणाची सावली दिसते
Hudson - स्थानकात पोहोचल्या नंतर आजवर तुमचा किती प्रवास झाला ?
Mark -स्पेस स्टेशन ताशी 17000700 मैल वेगाने फिरत आहे आणि दिवसाचे चोवीस तास आम्ही बुधवारी पोहोचलो आता सहा दिवस झालेत तेव्हा हिशोब कर
RD -तुम्ही स्थानकातून घरी परत कसे येता ?
Mark - आणखी एक इंटरेस्टिंग प्रश्न ! आम्ही पृथ्वीवर सोयूझ यानाने परत येतो ज्या यानाने स्थानकात आलो त्याच यानाने परतताना यानाचा वेग कमी करत पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करून पॅराशूटच्या सहाय्यानें पृथ्वीवर परततो
Modi - तुम्हाला अंतराळवीर व्हाव असं का वाटलं?
Mark - मला हे काम शारीरिक आणि मानसिक दृष्टया आव्हानात्मक वाटल तसही मला परिघाबाहेरच काम करायला आवडत इथे वेगवेगळ्या देशातील संशोधकांसोबत मानवी आरोग्यासाठी उपयुक्त प्रयोगांमध्ये सहभाग नोंदवायला मिळतो
Lyton - अंतराळ वीर होण्यासाठी कितीकाळ ट्रेनिंग घ्याव लागत
Mark - तस तर आयुष्यभर! मी 2009 साली नासा मध्ये अंतराळवीर म्हणून दाखल झालो आणि आता 2017साली स्थानकात पोहोचालो तब्बल आठ वर्षांनी
Toni - सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा तुमच्यावर काय परिणाम झाला ?
Mark - खूपच विनम्र करणारा अनुभव आहे हा ! नवीन अंतराळवीरांच्या आजूबाजूला जेव्हा आधीचे अंतराळवीर सारी कामे सराईतपणे करतात तेव्हा सवय व्हायला वेळ लागतो एखाद काम करताना एखादी वस्तू तिथेच ठेवून दुसरीकडे वळल तर ती वस्तू तिथे नसते कारण तरंगत ती दुसरीकडे जाते कधी कधी लक्ष नसल कि धडक लागते आता हळू हळू सवयीन स्वत:वर नियंत्रण ठेवता येतेय

             स्थानकात तोल सावरतानाचे प्रात्यक्षित दाखवताना Mark Vande Hei -फोटो -नासा संस्था

Billy - स्थानकातून चंद्र कसा दिसतो ?
Mark - पृथ्वीपेक्षा वेगळा नसला तरी मध्ये ढग नसतात त्या मुळे चंद्र स्पष्टपणे दिसतो
Brook - अंतराळात कितीकाळ राहता येत ? तुम्ही सध्या ज्या मोड्युल मध्ये राहताय त्या बद्दल सांगा
इथल्या सारखेच Northern lights दिसतात कि वेगळे ? Aurora कसा दिसतो तिथून ?
Mark -तशी ठराविक मर्यादा अजून माहीत नाही पण वर्षभर मानव राहू शकतो आम्ही आगामी दूरवरच्या मानवासहित अंतराळ मोहिमेत मानव निरोगी आणि दीर्घकाळ वास्तव्य करू शकेल असे प्रयत्न करतोय
मी सध्या US Hub मध्ये आहे तिथे खूप सोयी सुविधा आहेत ,इंटरनॅशनल पेलोड रॉक्स आहेत इथली बहुतांश जागा यंत्रांनी आणि storage ने व्यापलीय आम्हाला लागणारे प्रयोगांसाठीचे सामान स्थानकासाठीची आवश्यक सामग्री इथेच आहे
मी स्थानकात पोहोचलो तेव्हा सार खूप वेलकमिंग होत आम्हाला खूप काम असल्याने बिझी होतो नंतर मात्र मी विश्रांती न घेता खिडकी जवळ सूर्यास्त आणि सूर्योदय पाहण्यासाठी गेलो तेव्हा आधीच्या अंतराळवीरांनी northern lights आणि aurora दाखवला पृथ्वीवरून हिरव्या पडद्याप्रमाणे दिसणारा aurora  इथून हिरव्या तरंगाप्रमाणे अप्रतिम दिसतो
मुलांना जर अंतराळवीर व्हायचे असेल तर त्या साठी खूप कष्ट करत ध्येय साध्य करा असे सांगत Mark ह्यांनी मुलाखतीचा शेवट केला


Saturday, 16 September 2017

शनी ग्रहावर कॅसिनी अंतराळ यानाचा ग्रँड फिनाले संपन्न


            शनी ग्रहावर गेलेले व आता अंतराळात विलीन झालेले कॅसिनी अंतराळ यान  - फोटो -  नासा संस्था                                                                                                                    
नासा संस्था -15 सप्टेंबर
13 वर्षे अविरतपणे शनीभोवती भ्रमण करीत पृथ्वीवर उपयुक्त माहिती पाठवणारया कॅसिनी यानाने अखेर काल अपेक्षेप्रमाणे शनी ग्रहाच्या वरच्या वातावरणात प्रवेश केला
आणि ठरल्या प्रमाणे ठरल्या वेळेला 15 सप्टेंबरला ह्या कॅसिनी यानाचा फेअरवेल सोहळा निर्विघ्नपणे पार पडला सकाळी  7.55  मिनिटाला कॅसिनी यानाचा पृथ्वीशी असलेला संपर्क तुटला आणि त्याचे Thrusters सुरु झाले.काही वेळातच कॅसिनी यान नियंत्रणाविना अंतराळात भरकटले आणि यानाचा स्फोट होऊन ते शनिग्रहावर आदळले वातावरणातील प्रचंड वादळी वाऱ्याचा वेगाने आणि स्फोटाने कॅसिनी यानाने पेट घेताच यान आणि त्याचे पेटते भाग वातावरणात इतरत्र उडाले. क्षणाभरातच गेल्या वीस वर्षांपासूनचे सुरु असलेले कॅसिनी मिशन संपुष्ठात आले आणि सौरमंडळातील थरारक युगाचा अंत झाला

           शनीच्या कक्षेत शिरून शनी ग्रहावर धडकताना कॅसिनी अंतराळ यानाची हि शेवटची प्रतिमा
                                                                                                                   फोटो -नासा संस्था
कॅसिनी अंतराळ यानाचा हा फेअरवेल सोहळा पाहण्यासाठी अमेरिकेतील नासाच्या जेट प्रपल्शन लॅब व इतर सेंटर मध्ये नासाचे 1500 शास्त्रज्ञ,इंजिनीअर्स,तंत्रज्ञ आणि ह्या मोहिमेशी संबंधीत अधिकारी व कर्मचारी एकत्र जमले होते  कॅसिनीचा ग्रँड फिनाले यशस्वी झाल्याचे संकेत मिळताच साऱ्यांनी आनंद साजरा केला

            कॅसिनीचा ग्रँड फिनाले यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करताना मोहिमेतील शास्त्रज्ञ व पदाधिकारी
                                                                                                                                फोटो -नासा संस्था

कॅसिनी यान 1997 मध्ये अमेरिकेतील फ्लोरिडा येथील  Cape Canveral Air Force Station येथून 13 ऑक्टोबरला प्रक्षेपित करण्यात आले होते आणि शनीच्या प्रवासाला निघालेले कॅसिनी अंतराळयान तब्बल 7 वर्षे अंतराळ प्रवास करून 2004 साली शनीवर पोहोचले कॅसिनीने शनीवर पोहोचताच यशस्वी कामगिरी करत त्यातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे उपयुक्त माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवत हि मोहीम यशस्वी केली कॅसिनीतील इंधन कमी होताच आणि त्याचा अपेक्षित कार्यकाळ पूर्ण होताच शास्त्रज्ञानीं हि मोहीम थाबवण्याचे ठरवले होते पण कॅसिनीची कमी इंधनातली जास्त काळाची यशस्वी कार्यक्षमता पाहून हि मोहीम प्रथम दोन वर्षे आणि नंतर सात वर्षापर्यंत वाढवण्यात आली ह्या काळात कॅसिनीने पाठविलेली शनीची सखोल माहिती पाहून शास्त्रज्ञही अचंबित झाले
शनीचे चंद्र तेथील बर्फ,वातावरण आणि मानवाला आकर्षित करणाऱ्या शनीच्या कड्याचे गूढ कॅसिनीने घेतलेल्या फोटोमूळे आणि गोळा केलेल्या माहितीमुळे उलगडले शिवाय शनीबद्दल मानवामध्ये असलेले गैरसमजही दूर झाले शनी पीडादायक नसून तोही पृथ्वी सारखाच सुंदर ग्रह असून पूर्वी तिथेही सजीवसृष्ठी अस्तित्वात असण्याची शक्यताही बळावली
कॅसिनीच्या ग्रँड फिनाले नंतर नासाच्या शास्त्रज्ञानीं,आणि इतर अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या
Thomas Zurbuchen (Associate Admin Science mission & Directorate Washington ) म्हणतात ,
" एका विस्मयकारी मिशनचा हा अंत असला तरी हि नवीन मोहिमेची सुरवात आहे कॅसिनी मुळे शनीच्या दोन चंद्राची माहिती मिळाली शिवाय तिथे पूर्वी अस्तित्वात असलेले व लोप पावलेले समुद्राच्या ठिकाणाचे पुरावे पुरातन जीवसृष्ठीची शक्यता दर्शवतात ह्यामुळे ब्रह्मांडात पृथ्वीसारख्या जीवसृष्ठी असलेल्या ठिकाणांच्या शोधात मोलाची भर पडली आहे "
Michael Watkins -( Director Nasa JPL Lab California ) म्हणाले ,
" हा कडू गोड निरोपाचा अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण आहे! ह्या  कॅसिनी मोहिमेने शनी बद्दलचे पूर्व दूषित मत बदलून गेले आहे आणि ह्या नवीन आच्श्चर्य कारक उपयुक्त माहितीमुळे आगामी अंतराळ मोहीम आणि संशोधनास नवा आयाम प्राप्त झाला आहे आजवर कुठलेही यान शनिग्रहावर पोहोचले नव्हते पण कॅसिनीने हि अवघड व अशक्य कामगिरी यशस्वी केली आता ह्या ग्रँड फिनालेचा अंत झाला आहे "
Earl Maize -(Cassini Project Manager J PL) म्हणतात ,
" Cassini Opration Team मधील सर्वच जण ह्या यशाचे मानकरी आहेत त्यांनी कुशलतेने आणि कर्तृत्वाने हे दैदिप्यमान यश मिळवले आहे ह्या यानाचे डिझाईन करणारे तंत्रज्ञ ग्रेट आहेत सात वर्षांपूर्वी कॅसिनी यानाची कक्षा वाढवुन बावीसवेळा शनीच्या कड्यांमधल्या कॅसिनीच्या भ्रमणावर नियंत्रण ठेवण अत्यंत कठीण होत ते त्यांनी कार्यकुशलतेन यशस्वी केल आणि त्याचा शेवटही कॅसिनी यानामार्फत पूर्ण माहिती मिळवून यशस्वीपणे केला हे निश्चितच अभिमानास्पद आहे "
Linda Spilker -(Cassini Project Scientist ) म्हणाल्या ,
" आता कॅसिनी मिशन संपले आहे त्या मुळे रोज आकाशात पाहताना त्याची उणीव जाणवेल पण मी त्याला सौरमालेतील फिरणाऱ्या प्लॅनेट मध्ये पाहीन कारण त्याच्या काही भागांचे अवशेष शनीग्रहावर पडलेले असतीलच "
कॅसिनीने जाता जाताही पृथ्वीवर अँटेना व इमेजिंग कॅमेराच्या साहाय्याने काही शेवटचे संदेश व सिग्नल दिले आहेत ते नासाच्या डीप स्पेस नेटवर्क अँटेना complex Canberra Australia इथे प्राप्त झाले आहेत
आणि अपेक्षेप्रमाणे कॅसिनी यानाच्या वेगवेगळ्या उपकराणाद्वारे पाठवलेली माहिती संकलित करून त्याचे परीक्षण केल्यानंतरची संशोधित माहिती येत्या काही आठवड्यात प्राप्त होईल आणि शनी व त्याची उत्पत्ती ह्याचे गूढ उलगडेल