Monday, 29 May 2017

कमांडर Peggy Whitson आणि अंतराळवीर Jack Fischer ह्यांनी पुन्हा केला स्पेसवॉक

              नासाची कमांडर Peggy Whitson  स्पेसवॉक करतानाचा थरारक क्षण   फोटो-नासा संस्था

नासा संस्था-23 मे
नासाच्या अंतराळ मोहीम 51 ची कमांडर Peggy Whitson आणि अंतराळवीर Jack Fischer ह्यांनी 23 मेला अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी पुन्हा एकदा यशस्वी स्पेसवॉक केला मे महिन्यातील हा दुसरा स्पेसवॉक होता ह्या आधी बारा तारखेला ह्या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकाच्या कामासाठी स्पेस वॉक केला होता ह्या वेळेसचा स्पेसवॉक आधीच्या तुलनेत कमी वेळाचा म्हणजे दोन तास पंचेचाळीस मिनिटांचा होता  
अंतराळ स्थानकातील computer relay box बदलण्यासाठी व अंतराळस्थानकाला antennaची जोडी बसवण्यासाठी अंतराळवीरांनी हा स्पेसवॉक केला computer relay बॉक्स स्थानकातील सोलर arrays ,cooling loop आणि radiatorsचे काम नियंत्रित करतो आधीचा बॉक्स बिघडल्यामुळे त्या जागी नवीन बॉक्स बसवण्यात आला
अंतराळवीरांनी अंतराळस्थानकात अँटेनाची जोडी बसवल्यामुळे आगामी स्पेसवॉकच्या वेळेस अंतराळवीरांना वायरलेस संवाद साधता येणार आहे
अंतराळवीरांनी केलेल्या स्पेसवॉक व स्पेसवॉकच्या वेळेत आता वाढ झालेली असून अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 201 वा स्पेसवॉक होता आजवर अंतराळात अंतराळवीरांनी केलेल्या स्पेसवॉकची वेळ आता 1,250  तास 41 मिनिटे इतकी झाली आहे
अंतराळस्थानकातील सध्याच्या कमांडर Peggy Whitson ह्यांचा ह्या अंतराळ मोहिमेतील हा तिसरा स्पेसवॉक होता आणि त्यांनी आजवरच्या अंतराळ मोहिमेत केलेला हा दहावा स्पेसवॉक होता त्या अत्यंत कुशलतेने व लीलया हा स्पेसवॉक करतात

                  नासाचे अंतराळवीर Jack Fischer 201 व्या स्पेसवॉक दरम्यान -  फोटो -नासा संस्था

नासाचे flight engineer Jack Fischer ह्यांचा ह्या मोहिमेतील हा दुसरा यशस्वी स्पेसवॉक होता

Monday, 15 May 2017

अंतराळवीर Jack Fischer आणि कमांडर Peggy Whitson ह्यांनी केला यशस्वी स्पेस वॉक

 
           नासाचे अंतराळवीर  Jack Fischer  आणि Peggy Whitson 200 वा स्पेसवॉक करताना 
                                                                                                                     फोटो- नासा संस्था 
नासा संस्था -13 मे 
नासाच्या अंतराळ मोहीम 51 च्या कमांडर Peggy Whitson आणि flight engineer Jack Fischer ह्यांनी 12 मेला अंतराळ स्थानकातील तांत्रिक कामासाठी व दुरुस्तीसाठी  केलेला हा यशस्वी स्पेस वॉक अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे चार तासात पूर्ण झाला अंतराळात अत्यंत वेगाने भ्रमण करणारया अंतराळस्थानकाबाहेर झिरो ग्रॅव्हिटीमध्ये आपला तोल सावरत स्थानकाची दुरुस्ती करणे अत्यंत जोखमीचे,थरारक आणि धोकादायक असते अशा वेळेस स्थानकाबाहेर ठेवलेले सामान काढून ते अंतराळात तरंगू न देता व्यवस्थित पकडून हातातील अवजारे सांभाळत स्थानकाची दुरुस्ती करणे, नवीन उपकरणे बसवणे ,कनेक्शनस जोडणे अशी अनेक कठीण कामे Peggy Whitson ह्यांनी तब्बल नऊवेळा लीलया केली हे खरोखरच वाखाणण्याजोगे
ह्या आधीच्या बातमीत दिलेल्या माहितीनुसार ह्या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकातील पूर्व नियोजित तांत्रिक कामे पूर्ण केली शिवाय ह्या दोघांनी Alpha Magnetic Spectrometer साठी आवश्यक असलेला डाटा स्टोअर करण्यासाठी connector install केले आणि जापनीज रोबोटिक आर्मच्या connecting पॉईंटचे इन्सुलेशन दुरुस्त केले    
अंतराळवीरांनी आतापर्यंत केलेला हा 200 वा यशस्वी स्पेसवॉक होता अंतराळस्थानकाच्या दुरुस्तीसाठी आणि तांत्रिक कामासाठी आतापर्यंत अंतराळवीरांनी एकूण 1,247 तास व 55 मिनिटे काम केले आहे 

       नासाची अंतराळवीरांगना Peggy Whitson 30 मार्चला आठवा स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था  

अंतराळ स्थानकाची सध्याची कमांडर Peggy Whitson ह्यांनी ह्या आधीच सर्वात जास्तवेळा स्पेसवॉक करणारया महिला Astronaut असा विक्रम प्रस्थापित केला आहे आणि आता त्यांनी केलेला हा नववा यशस्वी स्पेसवॉक होता त्यांनी लाल रंगाच्या रेषा असलेला स्पेससूट परिधान केला होता 
Jack Fischer ह्यांचा हा पहिलाच यशस्वी स्पेसवॉक होता त्यांनी परिधान केलेल्या स्पेससूटवर रेषा नव्हत्या 

Thursday, 11 May 2017

12 मेला अंतराळवीरांगना Peggy Whitson व अंतराळवीर Jack Fischer 200 वा स्पेस वॉक करणार

   
            नासाची कमांडर Peggy  Whitson  6 जानेवारी 2017 च्या स्पेस वॉक दरम्यान  फोटो - नासा संस्था
नासा संस्था -10 मे
सध्याची अंतराळ स्थानकाची कमांडर Peggy  Whitson व अंतराळवीर Jack Fischer उद्या शुक्रवारी
12 मेला 200 वा स्पेस वॉक करणार आहेत अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केल्या जाणारया
ह्या 6.5 तासाच्या स्पेस वॉकचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T V वरून करण्यात येणार आहे
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या देखरेखीसाठी व दुरुस्तीसाठी  7 Dec.1998  ह्या दिवशी नासाच्या
STS-88 मिशन दरम्यान नासाचे अंतराळवीर Jerry Ross  व Jim Newman ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी पहिल्यांदा स्पेसवॉक केला होता

अंतराळवीर  Jack Fischer  उद्याच्या स्पेसवॉक च्या तयारीत - फोटो- नासा संस्था










 उद्याच्या स्पेसवॉक दरम्यान Peggy  Whitson व Jack  Fischer अंतराळस्थानकाच्या Quest airlock ह्या भागाबाहेर येतील आणि तेथील avionics box बदलतील . ह्या उपकरणातून स्थानकातील वैज्ञानिक प्रयोगांना लागणारी ऊर्जा पुरवली जाते ह्या भागात स्थानकासाठी लागणारे spare parts हि ठेवण्यात आले आहेत ह्या शिवाय स्थानकातील जुने ExPCA युनिट बदलून त्या जागी नुकतेच स्थानकात आलेल्या ATK- Cygnus ह्या कार्गोशिप मधून आलेले नवीन युनिट  बसविण्यात येईल

            अंतराळवीर Jack Fischer spacesuit घालून त्यांच्या पहिल्या spacewalkची तयारी करताना  
                                                                                                                   फोटो -नासा संस्था 
ह्या 6.5 तास चालणाऱया स्पेसवॉक दरम्यान हे अंतराळवीर Pressurized Mating Adapter-3 ह्या उपकरणावर protective shield बसवतील हे adapter बसविल्याने आगामी काळात स्थानकात येणारया कमर्शिअल crew space craft साठी डॉकिंगची सोय होईल तसेच हे दोघे स्थानकाच्या बाह्यभागावर  high definition camera आणि अँटेनाची जोडीही बसवतील ह्या शिवाय स्थानकात सध्या सुरु असलेल्या Alpha Magnetic Spectrometer ह्या प्रयोगासाठी लागणारे connector हि स्थानकात बसविण्यात येईल
ह्या प्रयोगामुळे Cosmic Ray Detector चे Maintenance योग्य प्रकारे कसे करता येईल हेही शोधण्यात येईल 

Thursday, 27 April 2017

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump ह्यांनी अंतराळवीरांगना Peggy Whitson ह्यांचे केले अभिनंदन

          अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump ,त्यांची कन्या Ivanka आणि अंतराळ वीरांगना Kate Rubins
              Peggy आणि Jack ह्यांच्याशी फोनवरून संपर्क साधताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -  25 एप्रिल
Peggy  whitson आता तिसऱयांदा अंतराळ स्थानकात दीर्घ मुक्काम करणार आहेत त्यांनी सतरा नोव्हेंबरला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी प्रयाण केले होते आतापर्यंत पेगीनीं 377 दिवस स्थानकात मुक्काम केला आहे महिलांमध्ये सर्वात जास्तवेळा स्पेसवॉक करण्याचा विक्रमही त्यांनी नुकताच स्थापित केला आहे शिवाय त्या दुसऱयांदा अंतराळ स्थानकात राहून कमांड करणाऱ्या पहिल्या महिला अंतराळवीरांगना ठरल्या आहेत 24 एप्रिलला Jeff  Williams यांचा 2008 मधला 534 दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम  Peggy ह्यांनी मोडला आहे

                          अंतराळ वीरांगना Peggy Whitson 2001 च्या अंतराळ मोहिमेच्या तयारी दरम्यान
                                                                                                                फोटो -नासा संस्था
Peggy ह्यांच्या ह्या अतुलनीय अभिमानास्पद कामाच कौतुक करण्यासाठी अमेरिकेचे  राष्ट्राध्यक्ष Donald Trump  ह्यांनी अंतराळवीरांगना Peggy Whitson ह्यांच्याशी  24  एप्रिलला फोनवरून लाईव्ह संपर्क साधला आणि त्यांच्या ह्या धाडसी यशाच कौतुक करून त्यांच्या पाठीवर अभिनंदनाची थाप दिली व त्यांच्याशी फोनवरून संवाद साधत तिथे सुरु असलेल्या संशोधनाची माहितीही घेतली
राष्ट्राध्यक्ष  Donald Trump ह्यांच्या सोबत त्यांची जेष्ठ कन्या Ivanka Trump आणि नासाची अंतराळवीरांगना Kate Rubins  देखील ह्या लाईव्ह संवादात सहभागी झाल्या होत्या
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प ह्यांनी प्रथम पेगीचे ह्या यशाबद्दल अभिनंदन केले ट्रम्प म्हणाले कि,Peggy Whitson आजच्या तरुणींसाठी रोल मॉडेल आहेतच तसेच त्या सर्वच युवा वर्ग आणि नागरिकांसाठीही प्रेरणादायी आहेत विशेषतः जे नागरिक व विद्यार्धी स्टेम Education व Program मध्ये सहभागी आहेत ते पुढे म्हणाले कि, मी ह्या आधीच अमेरिका महान राष्ट्र होण्यासाठी व देशाचा विकास होण्यासाठीच्या कामात महिलांचा सहभाग होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले होते Peggy ह्यांच्या ह्या रेकॉर्ड ब्रेक यशाने ह्या मताला बळ मिळाले आहे
त्याचा मला आनंद होतोय!
संवादाच्या वेळी नुकत्याच स्थानकात पोहोचलेल्या अंतराळवीरांसोबत नासाने पेगीचे अभिनंदन करणारे बॅनर पाठवले होते ते स्थानकात मागे लावले होते स्थानकातून Peggy Whitson आणि वीस तारखेला स्थानकात पोहोचलेले नासाचे अंतराळवीरJack Fischer ह्यांनी Donald Trump ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली
Donald Trump ह्यांनी Peggy Whitson  व Jack Fischer ह्यांच्याशी साधलेला हा संवाद
Donald Trump -  Congratulations  Peggy ! हा विक्रम प्रस्थापित केल्यावर कसे वाटतेय ?
Peggy -  Thanks !  हे यश माझ्यासाठी खूपच गौरवास्पद आहे !  आणि हे यश माझ्या एकटीचे नसून नासाच्या पूर्ण टीमचे आहे आणि मला त्यांचे कौतुक वाटते मी खूप आनंदी आणि उत्साहित आहे माझ्यासाठी हा काळ खूप छान आहे !  इथे केलेल्या संशोधनाचा उपयोग आगामी अंतराळ मोहिमांसाठी विशेषतः मंगळ मोहिमेसाठी होणार असल्याने मी एक्सायटेड आहे !
Donald  - Space मध्ये राहून तुम्ही काय शिकत आहात? मला माहितीय कि तुम्ही स्थानकात राहून वेगवेगळे प्रयोग करताय पण त्याचे नेमके परिणाम व त्याचे फलित कसे मिळेल? हे मला जाणून घ्यायचेय !
Peggy -सध्या आम्ही सोलर पॅनल द्वारे पाण्यातील Oxygen आणि Hydrogen वेगळे करून Oxygen Breathing साठी तर hydrogen व Co2एकत्रित करून पुन्हा पाणी तयार करण्याचा आणि इतरही प्रयोगाने पाणी परत मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत कारण स्थानकात पाणी पृथ्वीवरून येत आणि ते अत्यल्प असत स्थानकातील सध्याचे प्रयोग आगामी दूरवरच्या अंतराळमोहिमांसाठी सेतू सारखे आहेत आगामी दूरवरच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात अंतराळ स्थानकात राहून संशोधन करताना मानवाला येणारया अडचणींवर मात करून तिथे तग धरून जास्त दिवस निवास करण्यासाठी इथले प्रयोग उपयुक्त ठरतील तसेच ह्या मोहिमांसाठी लागणारे आधुनिक संशोधित तंत्रज्ञान, त्यासाठीचे कसब व कसोटीचा उपयोगही अशा आगामी दूरवरच्या अंतराळमोहीम आणि ग्रहावर निवास करण्यासाठी मानवाला होईल

          अंतराळ वीरांगना  Peggy अंतराळ स्थानकातील फिरत्या प्रयोग शाळेत संशोधन करताना
                                                                                                                           -फोटो -नासा संस्था

Donald -मला आगामी मंगळ मोहिमेबद्दल सांगा,ती केव्हा प्रत्यक्षात येईल काही Schedule ठरले आहेत का ?
Peggy - अंदाजे  2030 मध्ये हि मोहीम यशस्वी होईल त्यासाठी सध्या पृथ्वीवर नासा संस्थेत वेगवेगळे Hardware तयार करण्यात येत आहेत S LS Rocket Launch पण आहे हे सर्व सध्या टेस्ट फ्लाईट साठी तयार होत आहेत अशा मोहिमा दीर्घ कालीन आणि खर्चिक असतात त्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य सुद्धा लागत

       अंतराळ वीरांगना Peggy Whitson  मार्च 2017  मध्ये  रेकॉर्ड ब्रेक स्पेसवॉक दरम्यान -फोटो- नासा संस्था

Donald -माझी इच्छा आहे कि माझ्या पाच वर्षांच्या कार्यकाळात हि मोहीम पूर्ण व्हावी किंवा कदाचित पुढच्या पाच वर्षात !
Peggy -आम्ही आमचे सर्वस्व पणाला लावून हि मोहीम लवकर पूर्ण करण्याचा व यशस्वी करण्याचा आटोकाट प्रयत्न करू
Trump - मला माहितीय तुम्ही ते कराल मला तुमच्याबद्दल आदर व अभिमान वाटतोय! आता आपल्या सोबत Kate Rubins पण आहेत अंतराळ स्थानकात राहून DNA sequence वर संशोधन करणारया त्या नासाच्या पहिल्या महिला अंतराळवीर आहेत आम्हाला त्या बद्दल आणखी माहिती सांगाल का?
Kate Rubins -नक्कीच! हे संशोधन अत्यंत महत्वाचे आहे तंत्रज्ञान व विज्ञान मिळून अत्यंत प्रगत संशोधन करता येउ शकत ह्याच हे उत्तम उदाहरण आहे हे फक्त प्रात्यक्षिक नाही  तर ह्या संशोधनाच्या आधारे स्थानकात Microbs शोधता येतील शिवाय ह्याचा उपयोग Health Science मध्येही होईल
Ivanka Trump- Congratulations Peggy ! तुम्हाला माहिती असेलच माझ्या डॅडनी Inspire Women Act वर साइन केलय ह्या द्वारे स्टेम एज्युकेशन व करिअर मध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर दिलाय
इथे Kates पण आहेत मला तुमच्या दोघींची ह्या क्षेत्रात येण्यामागची प्रेरणा कोणती होती हे जाणून घ्यायला आवडेल !
Kate - मी पंधरा वर्षांची असताना एका DNA Conference मध्ये भाग घेतला होता तेव्हा मला त्यात आवड निर्माण झाली आणि Science Scientist, Biology ,DNA ह्या विषयी औसुक्य आणि आवड निर्माण झाली
Peggy -Apollo Program हे माझे प्रेरणास्थान होते माझी शाळा,college,माझे guide ह्या सगळ्यांनीच माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली खूप सहकार्यही केले
Trump - मी नुकतेच NASA चे मानव सहित मार्स मिशन बिल साइन केलेय तुमच्या पैकी कोण मंगळावर जाण्यास उत्सुक आहे Kate तर तयार आहेतच
Peggy -Jack -आम्ही दोघेही तयार आहोत आणखी खूप शास्त्रज्ञ ,अंतराळवीर ह्या मिशनवर काम करत आहेत त्याला अजून बरीच वर्षे लागतील
Ivanka Trump- मला एका गोष्टीची खूप उत्सुकता आहे आणि मला खात्री आहे कि अनेक जणांना हे जाणून घ्यायला आवडेल कि, अंतराळ स्थानकात अंतराळवीरांचा दिवस कसा असतो ?
Peggy -मी रोज उठल्यानंतर Messages check करते पृथ्वीवर आमची खूप मोठी सपोर्ट टीम आहे जी आमची Schedule ठरवते त्या प्रमाणे आम्ही दिवसभर काम करतो इथल्या दोनशेच्या वर सुरु असलेल्या प्रयोगात सहभागी होतो कधी रोबोटिक वर काम करतो तर कधी दुसरे कुठले काम असते रोज इथे आव्हानात्मक वेगवेगळे काम करायला मिळते हीच खरी गंमत असते जॅक आताच आलाय तो अधिक माहिती देईल
Jack -पृथ्वीपेक्षा इथला दिवस वेगळा असतो आम्ही वेगवेगळे प्रयोग करतोच तसेच अंतराळस्थानकातल्या वास्तव्यातील गमतीजमती पण एन्जॉय करतो मी जिथे व्यायाम करतो तिथे एक खिडकी आहे तिथुन दिसणारी वेगवेगळी दृश्ये पाहताना मजा येते इथले काम अत्यंत कठीण आहे आणि राहणे त्याहून कठीण पण माझे डॅड म्हणायचे तूम्ही जेव्हा आवडीचे काम करता तेव्हा तुम्हाला कष्ठ जाणवत नाहीत
Donald -आताचा काळ अमेरिकेसाठी खूप आशादायक आहे अंतराळ विज्ञान ,मिलिटरी आणि अंतराळ क्षेत्रात बरेच व्यावसायिक उतरत आहेत तुम्हाला काय वाटते त्यांनी ह्या क्षेत्रात याव कि अन्य व्यवसाय करावा?
Peggy -Jack - खरंच हे क्षेत्र अत्यंत आव्हानात्मक आहे!  मला वाटते विद्यार्थ्यांनी आधी वेगवेगळ्या तंत्रज्ञानात प्रगत होऊनच अंतराळ मोहिमेत सहभागी व्हाव
Jack -हो खरय ! आता Space X सारखे बरेच खाजगी व्यवसायिक ह्या क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत ते चांगेच आहे ह्या मुळे पायाभूत सुविधा निर्माण होतील व दुरवरच्या अंतराळ मोहिमेसाठी मदत होईल नासा तर उत्तम काम करत आहेच
Donald - जॅक तुम्ही नुकतेच स्थानकात पोहोचला आहात तुमचा प्रवास कसा होतो सोपा त्रासदायक कि अवघड ?
Jack -प्रवास अत्यंत अदभुत आहे! अवर्णनीय आहे! मी रशियन यानातून रशियन अंतराळवीरांसोबत पृथ्वीवरून कझाकस्थानातून निघून सहा तासांनी इथे पोहोचलो इथल्या संशोधनात व्यग्र अंतराळवीरांना पाहिलं कार्गो डॉकिंगसाठी रोबोटिक ऑपरेट करताना पाहिलं आणि आता स्थानकातील भिंतीला लटकून अमेरिकेच्या प्रेसीडेंटशी बोलतोय सारच अमेझिंग आहे माझ्यासाठी आणि अभिनंदनीयही आहे !

Saturday, 22 April 2017

26 एप्रिलला शनी ग्रहावर होणार कॅसिनी यानाच्या ग्रँड फिनालेची सुरवात

    शनी ग्रह व त्याच्या कड्याभोवती भ्रमण करणारे Cassini  यान   फोटो -नासा संस्था


 नासा संस्था -21 एप्रिल
शनिग्रह व त्याच्याभोवतीच्या कड्यांचे गूढ उकलण्यासाठी शास्त्रज्ञ वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहेत अमेरिकेच्या नासा संस्थेने वीस वर्षांपूर्वी पृथ्वीवरून शनिग्रहावर पाठवलेल्या आणि आजपर्यंत सतत कार्यरत असलेल्या कॅसिनी ह्या अंतरिक्ष यानाचा आता 26 एप्रिलला ग्रँड फिनाले होणार आहे
शनी ग्रह,त्याच्या भोवतीचे कडे तेथील वातावरण आणि तिथल्या जीवसृष्टीच्या अस्तित्वाची शक्यता ह्या विषयी सखोल माहिती मिळवण्यासाठी वीस वर्षांपूर्वी नासाने कॅसिनी अंतराळ यान पृथ्वीवरून शनीग्रहावर पाठवले होते सात वर्षांच्या प्रवासानंतर ते शनिग्रहाच्या कक्षेत पोहोचले आणि गेल्या तेरा वर्षांपासून हे यान शनीभोवती अविरत भ्रमण करत असून तिथली इतंभूत माहिती पृथ्वीवर पाठवत आहे
शनीच्या  Enceladus ह्या चंद्रावरील बर्फ़ाळ प्रदेशात जागतिक महासागर असून त्याचा दुसरा चंद्र Titan वर  देखील द्रव्य रूपातील मिथेनचा महासागर वहात असल्याचे संकेत कॅसिनी यानाने दिले असून ह्या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती कॅसिनी यानाने पृथ्वीवर पाठवली आहे
अनेक चक्रीवादळांना तोंड देत आणि अनेक ग्रह पार करीत शनीपर्यंत पोहोचलेल्या आणि अविरतपणे शनीभोवती भ्रमण करत सतत शनीची माहिती पृथ्वीवर त्वरित पोहोचवणाऱया कॅसिनी यानाचे इंधन आता मात्र संपत आलय त्यामुळेच आता हे मिशन संपवण्याचा निर्णय नासाच्या खगोल शास्त्रज्ञांनी घेतला आहे येत्या 26 एप्रिलला ह्या कॅसिनी यानाचा ग्रँड फिनाले होणार आहे

                 शेवटच्या टप्यातील कॅसिनी यान  21 एप्रिलला शनीच्या Titan  चंद्राच्या अत्यंत जवळून जाताना
                                                                                                                                  फोटो -नासा संस्था
कॅसिनी यान शनीला धडकणार 
शास्त्रज्ञांनी हे यान नष्ट करण्यापूर्वी कॅसिनीला शनिग्रहाच्या कक्षेत धडकवून यानाचा शेवट करण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे सव्वीस एप्रिलला बुधवारी ह्या ग्रँड फिनालेची सुरवात होईल तेव्हा कॅसिनी यान शनी ग्रह व त्याच्या कड्यामधील 1500 मैल रुंद पट्यात शिरेल
नासाच्या वॉशिंग्टन येथील सायंन्स मिशनचे असोसिएट Administrator Thomas Zurbuchen म्हणतात
कि, " आजवर एकही यान शनीच्या कक्षेत शिरले नाही पण आम्ही मात्र हे धाडस बावीसवेळा करणार आहोत ह्या धाडसामुळे ब्रम्हांडातील मोठे ग्रह व ग्रहमालांच्या उगमाचे रहस्य उलगडेल " ह्या कॅसिनी यानाचा शेवट जरी झाला तरी तो नवीन मोहिमेसारखाच असेल
इतक्या वर्षांमध्ये कॅसिनीने मिळवलेल्या माहितीच्या आधारे कॅसिनीच्या इंजिनीअर्सनी Flight Plan तयार केला आहे  15 सप्टेंबरला कॅसिनी यान शनिग्रहावर आढळेल ( उतरेल ) दरम्यान ह्या पाच महिन्यांच्या प्रवासात कॅसिनी मार्फत शनीविषयी जास्तीतजास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल शनी ग्रहाची अंतर्गत रचना ,त्याच्या कड्यांचा उगम ,तेथील वातावरणातील सॅम्पल्स मुख्य कड्यातील पार्टिकल्स ,तसेच शनिग्रहावरील ढगांचा जवळून वेध घेतला जाईल
सद्या नासाचे इंजिनीअर्स कॅसिनीच्या अंतिम ग्रँड फिनालेची तयारी करण्यात गुंतले आहेत त्या साठी कॅसिनी यानातील रोबोटिक प्रोब ला आवश्यक ते निरीक्षण करण्यासाठी कमांड देण्यात येईल
22 एप्रिलला कॅसिनी यान  Titan ह्या शनीच्या चंद्राच्या अतिशय जवळून प्रवास करेल तेव्हा Titan च्या गुरुत्वाकर्षणाच्या परिणामामुळे कॅसिनीची भ्रमण कक्षा थोडीशी झुकेल त्यामुळे हे यान कड्यांच्या बाहेरून न फिरता ग्रह व कड्यांच्या आतल्या कक्षेत पोहोचेल
शास्त्रज्ञाच्या माहितीनुसार ह्या प्रक्रियेत अडचणी येणार नाहीत असा प्राथमिक अंदाज आहे पण तरीही आवश्यक ती सावधगिरी बाळगली जाईल यानासमोरील अँटेना द्वारे मार्गाची सुरक्षितता तपासल्या जाईल काही अनपेक्षित धोके टाळण्यासाठी हे धाडस मोहिमेच्या शेवटी करण्यात येणार आहे 15 सप्टेंबरला यान  जेव्हा शनी वर धडकेत तेव्हा जोवर हे यान पूर्णपणे नष्ठ होत नाही तोवर त्यातील वेगवेगळ्या उपकरणाद्वारे हे यान शेवटपर्यंत पृथ्वीवर माहिती पाठवत राहील

          कॅसिनी यान ग्रँड फिनालेच्या क्षणी शनी आणि त्याचे कडे ह्यांच्या मध्ये बावीस वेळा भ्रमण करेल 
                                                                                                                              फोटो -नासा संस्था 
शास्त्रज्ञांच्या दृष्टीने कॅसिनी यानाचा ग्रँड फिनाले अत्यंत उत्कंठावर्धक असेल ह्या मोहिमेच्या साहसासाठी हि योग्य निवड आहे असे नासाच्या शास्त्रज्ञांना वाटतेय 


Friday, 14 April 2017

Peggy Whitsonचा अंतराळस्थानकातील मुक्काम तीन महिन्यांनी वाढला

       अंतराळ वीरांगना Peggy Whitson  स्थानकात जास्तही दिवस राहण्याच्या आनंदात फोटो -नासा संस्था

नासा संस्था -
आधीच जास्ती दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम करणारी नासाची अंतराळ मोहीम 50 ची सध्याची कमांडर Peggy Whitson हीचा अंतराळस्थानकातील मुक्काम आणखी तीन महिन्यांनी वाढला आहे
अमेरिकेच्या नासा आणि रशियाच्या Roscosmos एजन्सीजने नुकतेच Peggy च्या स्थानकातील वाढीव तीन महिन्याच्या वास्तव्यास मंजुरी देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले
आधी ठरल्याप्रमाणे Peggy रशियाचे अंतराळवीर Oleg Novitsky आणि युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet ह्या दोन अंतराळवीरांसोबत जूनमध्ये पृथ्वीवर परतणारहोती पण आता तीन महिन्यानंतर ती नवीन दोन अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर पोहोचेल
पेगीच्या न येण्याने परतीच्या सोयूझ अंतरिक्ष यानातील एक सीट रिकामी राहणार असली तरी अंतराळ स्थानकात मात्र सहा अंतराळवीर एकत्र राहून तिथे सुरु असलेले महत्वाचे संशोधन पूर्ण करतील
पेगी म्हणते," मला आता खूप आनंद होतोय कारण मला स्थानकात राहून संशोधन करायला खूप आवडते स्थानकातील हा काळ कधीच संपू नये तर हे क्षण स्तब्ध व्हावेत सरूच नयेत असे मला वाटतेय!  " स्थानकातील नव्या संशोधनाच्या कामात सहभाग नोंदवणे माझे कित्येक दिवसाचे स्वप्न आहे जास्ती दिवस इथे राहायला मिळाल्यामुळे ते आता पूर्ण होईल
नासाच्या इंटरनॅशनल स्पेस सेंटरचे प्रोग्राम मॅनेजर म्हणतात," पेगीचा उत्साह,तिचा अनुभव आणि तिची बुद्धिमत्ता विलक्षण आणि अतुलनीय आहे! तिच्या स्थानकातील वाढीव वास्तव्यामुळे आमच्या रिसर्च आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेन्टला फायदा होईलच शिवाय तिच्या संशोधनाचा फायदा आमच्या कमर्शियल आणि इंटरनॅशनल पार्टनर्सनांही होईल "
Peggy  तिसऱयांदा अंतराळ स्थानकात दीर्घ मुक्काम करणार आहे तिने सतरा नोव्हेंबरला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी प्रयाण केले होते आतापर्यंत तिने 377 दिवस स्थानकात मुक्काम केला आहे
महिलांमध्ये सर्वात जास्तवेळा स्पेसवॉक करण्याचा विक्रमही तिने नुकताच केला आहे शिवाय आता ती दुसऱयांदा अंतराळ स्थानकात राहून कमांड करणारी पहिली महिला अंतराळवीरांगना ठरली आहे
आणि 24 एप्रिलला Jeff  Williams यांचा 2008 मधला 534 दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम  Peggy तोडेल 

Wednesday, 12 April 2017

अंतराळवीर Shane Kimbrough ,Andry Borisenko आणि Sergey Ryzhikov सुखरूप पृथ्वीवर परतले

                 सोयूझ MS-02 तीनही अंतराळवीरांना घेऊन जमिनीवर उतरताना  फोटो -नासा संस्था

नासा संस्था -10 एप्रिल
नासाच्या अंतराळ मोहीम 50 चे कमांडर Shane Kimbrough ,Andry Borisenko आणि Sergey Ryzhikov  सोयूझ MS-02 ह्या अंतरिक्ष यानाने अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परतले आहेत
हे तीनही अंतराळवीर सोमवारी 7.30a.m. वाजता कझाकस्थानातील Dzhezkazhgan येथे सुखरूप पोहोचले
अंतराळ स्थानकातून निघण्याआधी हे सहाही अंतराळवीर निरोपाच्या क्षणी भावनावश झाले एकमेकांचा निरोप घेताना त्यांचे डोळे पाणावले होते ह्या अंतराळवीरांना घेऊन सोयूझ अंतराळयान जेव्हा पृथ्वीवर उतरत होते तेव्हा क्षणभर सार वातावरण स्तब्ध झाल पण अंतराळवीर सुखरूप पोहोचताच सारे आनंदित झाले ह्या
अंतराळवीरांना उचलून आणुन त्यांना खुर्चीवर बसवण्यात आले ,त्यांना पाणी देण्यात आले,त्यांची नाडी चेक करण्यात आली

                          अंतराळवीर Shane Kimbrough पृथ्वीवर पोहोचल्यानंतर  फोटो-नासा संस्था

ह्या अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकात 173 दिवस वास्तव्य करून तिथे सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला त्यांनी अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा मानवी शरीरातील Stem cell वर होणारया परिणामांवर सखोल संशोधन केले हे संशोधन स्थानकात राहताना अंतराळवीरांना होणारया अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी व त्यांना जखम झाल्यास ती बरी करण्यासाठी उपयुक्त ठरेल शिवाय पृथ्वीवरील मानवी आरोग्यासाठीही उपयुक्त Stem cell निर्माण करून आजारांवर नियंत्रण मिळवता येईल
अंतराळवीरांनी Tissue Regeneration- Bone Defect ह्या विषयांवरही संशोधन केले माणूस व कुरतडणारया  प्राण्यांमध्ये हाड व Tissue ह्यांची पुनर्नर्मिती होत नाही त्या मुळे तुटलेले हात ,पाय किंवा सांधे पुन्हा निर्माण होत नाहीत त्याचे नेमके शास्त्रीय कारण काय ह्या वरही संशोधन केले अधिक संशोधनाअंती त्यावरील  उपचारपद्धतीत सुधारणा करता येतील अंतराळवीर अंतराळस्थानकातील फिरत्या प्रयोगशाळेत व नासाच्या अमेरिकेतील संशोधन केंद्रात संशोधक सतत ह्या महत्वपूर्ण विषयांवर संशोधन करत आहेत
अंतराळवीर Shane Kimbrough ह्यांनी ह्या वास्तव्यात जानेवारी व मार्च मध्ये मिळून चार वेळा अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी स्पेसवॉक केला तसेच ह्या अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकासाठी ,स्थानकातील प्रयोगासाठी लागणारे कित्येक टन सामान ,इंधन आणि अंतराळवीरांसाठी लागणारे अन्न आणि पाणी घेऊन आलेल्या चार कार्गो स्पेस क्राफ्टचेही स्थानकात स्वागत केले आणि त्या साठी आवश्यक डॉकिंग सुविधा निर्माण केली
Shane kimbrough ह्यांनी त्यांच्या दोनवेळच्या अंतराळ मोहिमेत 189 दिवस स्थानकात मुक्काम केला
तर रशियन अंतराळवीर Borisenko  ह्यांनीही त्यांच्या दोन अंतराळ मोहिमेत 337 दिवस स्थानकात मुक्काम केला असून दुसरे रशियन अंतराळवीर Ryzhikov ह्यांची मात्र हि पहिलीच अंतराळवारी होती आणि त्यांनी आता स्थानकात 173 दिवस मुक्काम केला आहे

नासा संस्था -11 एप्रिल 



          Johnson Space सेंटर च्या  डायरेक्टर Ellen Ochoa  Shane Kimbrough होस्टन येथे पोहोचल्यावर स्वागत करताना 

अंतराळवीर Shane Kimbrough मंगळवारी नासाच्या aircraft ने Houston येथे पोहोचले असुन तिथे त्यांचे नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरच्या डायरेक्टर Ellen Ochoa ह्यांनी स्वागत केले
रशियाचे अंतराळवीर Sergey Ryzhikov आणि Andry borisenko हे दोघेही आता मास्कोला पोहोचले आहेत