नासाचे अंतराळवीर Jack Fischer आणि Peggy Whitson 200 वा स्पेसवॉक करताना
फोटो- नासा संस्था
नासा संस्था -13 मे
नासाच्या अंतराळ मोहीम 51 च्या कमांडर Peggy Whitson आणि flight engineer Jack Fischer ह्यांनी 12 मेला अंतराळ स्थानकातील तांत्रिक कामासाठी व दुरुस्तीसाठी केलेला हा यशस्वी स्पेस वॉक अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजे चार तासात पूर्ण झाला अंतराळात अत्यंत वेगाने भ्रमण करणारया अंतराळस्थानकाबाहेर झिरो ग्रॅव्हिटीमध्ये आपला तोल सावरत स्थानकाची दुरुस्ती करणे अत्यंत जोखमीचे,थरारक आणि धोकादायक असते अशा वेळेस स्थानकाबाहेर ठेवलेले सामान काढून ते अंतराळात तरंगू न देता व्यवस्थित पकडून हातातील अवजारे सांभाळत स्थानकाची दुरुस्ती करणे, नवीन उपकरणे बसवणे ,कनेक्शनस जोडणे अशी अनेक कठीण कामे Peggy Whitson ह्यांनी तब्बल नऊवेळा लीलया केली हे खरोखरच वाखाणण्याजोगे
ह्या आधीच्या बातमीत दिलेल्या माहितीनुसार ह्या दोन्ही अंतराळवीरांनी अंतराळ स्थानकातील पूर्व नियोजित तांत्रिक कामे पूर्ण केली शिवाय ह्या दोघांनी Alpha Magnetic Spectrometer साठी आवश्यक असलेला डाटा स्टोअर करण्यासाठी connector install केले आणि जापनीज रोबोटिक आर्मच्या connecting पॉईंटचे इन्सुलेशन दुरुस्त केले
अंतराळवीरांनी आतापर्यंत केलेला हा 200 वा यशस्वी स्पेसवॉक होता अंतराळस्थानकाच्या दुरुस्तीसाठी आणि तांत्रिक कामासाठी आतापर्यंत अंतराळवीरांनी एकूण 1,247 तास व 55 मिनिटे काम केले आहे
नासाची अंतराळवीरांगना Peggy Whitson 30 मार्चला आठवा स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था
अंतराळ स्थानकाची सध्याची कमांडर Peggy Whitson ह्यांनी ह्या आधीच सर्वात जास्तवेळा स्पेसवॉक करणारया महिला Astronaut असा विक्रम प्रस्थापित केला आहे आणि आता त्यांनी केलेला हा नववा यशस्वी स्पेसवॉक होता त्यांनी लाल रंगाच्या रेषा असलेला स्पेससूट परिधान केला होता
Jack Fischer ह्यांचा हा पहिलाच यशस्वी स्पेसवॉक होता त्यांनी परिधान केलेल्या स्पेससूटवर रेषा नव्हत्या
No comments:
Post a Comment