अंतराळ वीरांगना Peggy Whitson स्थानकात जास्तही दिवस राहण्याच्या आनंदात फोटो -नासा संस्था
नासा संस्था -
आधीच जास्ती दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम करणारी नासाची अंतराळ मोहीम 50 ची सध्याची कमांडर Peggy Whitson हीचा अंतराळस्थानकातील मुक्काम आणखी तीन महिन्यांनी वाढला आहे
अमेरिकेच्या नासा आणि रशियाच्या Roscosmos एजन्सीजने नुकतेच Peggy च्या स्थानकातील वाढीव तीन महिन्याच्या वास्तव्यास मंजुरी देऊन त्यावर शिक्कामोर्तब केले
आधी ठरल्याप्रमाणे Peggy रशियाचे अंतराळवीर Oleg Novitsky आणि युरोपियन अंतराळवीर Thomas Pesquet ह्या दोन अंतराळवीरांसोबत जूनमध्ये पृथ्वीवर परतणारहोती पण आता तीन महिन्यानंतर ती नवीन दोन अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर पोहोचेल
पेगीच्या न येण्याने परतीच्या सोयूझ अंतरिक्ष यानातील एक सीट रिकामी राहणार असली तरी अंतराळ स्थानकात मात्र सहा अंतराळवीर एकत्र राहून तिथे सुरु असलेले महत्वाचे संशोधन पूर्ण करतील
पेगी म्हणते," मला आता खूप आनंद होतोय कारण मला स्थानकात राहून संशोधन करायला खूप आवडते स्थानकातील हा काळ कधीच संपू नये तर हे क्षण स्तब्ध व्हावेत सरूच नयेत असे मला वाटतेय! " स्थानकातील नव्या संशोधनाच्या कामात सहभाग नोंदवणे माझे कित्येक दिवसाचे स्वप्न आहे जास्ती दिवस इथे राहायला मिळाल्यामुळे ते आता पूर्ण होईल
नासाच्या इंटरनॅशनल स्पेस सेंटरचे प्रोग्राम मॅनेजर म्हणतात," पेगीचा उत्साह,तिचा अनुभव आणि तिची बुद्धिमत्ता विलक्षण आणि अतुलनीय आहे! तिच्या स्थानकातील वाढीव वास्तव्यामुळे आमच्या रिसर्च आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेन्टला फायदा होईलच शिवाय तिच्या संशोधनाचा फायदा आमच्या कमर्शियल आणि इंटरनॅशनल पार्टनर्सनांही होईल "
Peggy तिसऱयांदा अंतराळ स्थानकात दीर्घ मुक्काम करणार आहे तिने सतरा नोव्हेंबरला अंतराळ स्थानकात राहण्यासाठी प्रयाण केले होते आतापर्यंत तिने 377 दिवस स्थानकात मुक्काम केला आहे
महिलांमध्ये सर्वात जास्तवेळा स्पेसवॉक करण्याचा विक्रमही तिने नुकताच केला आहे शिवाय आता ती दुसऱयांदा अंतराळ स्थानकात राहून कमांड करणारी पहिली महिला अंतराळवीरांगना ठरली आहे
आणि 24 एप्रिलला Jeff Williams यांचा 2008 मधला 534 दिवस अंतराळ स्थानकात राहण्याचा विक्रम Peggy तोडेल

No comments:
Post a Comment