
ESA आणि JAXA चे बेपिकोलंबो अंतराळयान बुध ग्रहाभोवती फेऱ्या मारताना फोटो -ESA- संस्था
ESA संस्था - 15 ऑक्टोबर
ESA आणि JAXA संस्थेचे बेपिकोलंबो अंतराळयान आठ वर्षांच्या अंतराळ प्रवासानंतर आता बुध ग्रहाच्या कक्षेत शिरण्याच्या अंतिम टप्प्यात पोहोचले आहे युरोपियन स्पेस एजेंसी चे Mercury Planetary Orbiter ( MPO किंवा कार्टून कॅरेक्टर बेपी) जपानचे Mercury Magnetospheric Orbiter (MIO) आणि त्यांचा रोबोट मित्र Mercury Transfer Module(MTM) या तीन अंतराळयानांनी आतापर्यतचा हा कठीण अंतराळप्रवास एकत्रित केला आहे
ह्या दीर्घ कालावधीच्या अंतराळ प्रवासादरम्यान त्यांनी सौरमालेतील ग्रहांजवळून नऊ फेऱ्या मारल्या त्या पैकी एक पृथ्वीजवळून दोन शुक्र ग्रहांजवळून आणि सहा वेळा बुध ग्रहांजवळून फेऱ्या मारल्या आता ते बुध ग्रहावर कार्यरत होण्यासाठी पोहोचण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत

सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीला ह्या मोहिमेतील अनेक महत्वपूर्ण टप्पे पार पडण्यास सुरवात झाली होती त्या मुळे येत्या काही महिन्यात MPO आणि MIO हि दोन्ही अंतराळयाने बुध ग्रहाच्या वैज्ञानिक कक्षेत प्रवेश करतील तीन सप्टेंबरला बेपीकोलंबो अंतराळयानाला ऊर्जा देणाऱ्या आणि दिशादर्शक असलेले दोन्ही ऑर्बिटर MTM पासून वेगळे झाले
एकवीस नोव्हेंबरला MPO आणि MIO एकत्रितपणे बुध ग्रहाच्या कक्षेत खेचले जातील नऊ आणि दहा डिसेंबरला MPO आणि MIO वेगळे होतील आणि MIO स्वतंत्रपणे वैज्ञानिक कक्षेत कार्यरत होईल एकोणीस मार्च 2027 मध्ये MPO देखील त्याच्या अंतिम वैज्ञानिक कक्षेत प्रवेश करेल आणि दहा डिसेंबरला ह्या अंतराळयानाचे विलगीकरण आणि बेपिकोलंबोच्या बुध ग्रहावरील प्रवेशाची अधिकृतपणे नोंद होईल
हा प्रवास अत्यंत कठीण आणि साहसी होता आणि आमच्यासाठी अविश्वसनीय यशाचा होता हा क्षण आमच्यासाठी जितका उत्साहवर्धक आहे तितकाच रोमांचक आहे असे ह्या टीममधील शास्त्रज्ञ म्हणतात त्या मूळे ESA ने ह्या यशात सामान्य नागरिकांना देखील सहभागी होण्याची संधी जाहीर केली आहे जर्मनी मधील ESA च्या Space Corporation Center मध्ये 9 डिसेंबरला साजरा होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे विजेत्या नागरिकांना बेपिकोलंबो टीमच्या सदस्यांना भेटण्याची संधी मिळणार आहे आणि अंतराळयानाच्या विलगीकरणाचा थरारक क्षण प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देखील मिळणार आहे
हि स्पर्धा फक्त ESA सदस्य आणि सहयोगी राज्यातील नागरिकांसाठी खुली असून ह्या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना चित्र,गाणे,कविता,फोटो किंवा व्हिडीओच्या स्वरूपात स्वागत संदेश तयार करण्याची संधी मिळणार आहे शिवाय ह्या मोहिमेबद्दल स्पर्धकाच मत आणि मोहिमेतील त्यांच्या आवडत्या गोष्ठीच महत्व सांगणे आवश्यक आहे स्पर्धकांनी केलेली त्यांची निर्मिती सोशल मीडियावरून शेअर करावी लागेल आणि त्याची सार्वजनिक माहिती संस्थेला द्यावी लागेल
No comments:
Post a Comment