
Space X Crew Dragon अंतराळवीरांसह California -Los Angeles येथील समुद्राच्या खाडीत पॅराशूटच्या साहाय्याने खाली उतरले -फोटो -नासा संस्था
नासा संस्था /ESA -
नासाच्या Space X Crew -12 चे अंतराळवीर Jessica Meir ,Jack Hathaway ,युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot आणि रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev हे स्थानकातील 237 दिवसांचे वास्तव्य संपवून पृथ्वीवर सुखरूप पोहोचले आहेत हे चारही अंतराळवीर सात ऑक्टोबरला सकाळी12.05 (GMT) वाजता Space X Crew Dragon मधून पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले आणि 27.तास 29 मिनिटांच्या अंतराळ प्रवासा नंतर 8 ऑक्टोबरला सकाळी 11.34 (PDT)8.34 (EDT) वाजता पृथ्वीवर परतले
निघण्याआधी नासाच्या लाईव्ह संपर्कात स्थानकात ह्या अंतराळवीरांच्या Farewell Ceremony आणि Change The Command Ceremony पार पडला त्या वेळी स्थानकाच्या सध्याच्या कमांडर Jessica ह्यांनी सर्वांच्या वतीने मनोगत व्यक्त केले
Space X Crew-12 अंतराळवीर Farewell ceremony आणि Change the Command ceremony दरम्यान स्थाकातील सर्व अंतराळवीरांचा निरोप घेताना Jessica Meir सोबत -फोटो -नासा संस्था
पृथ्वीवर परतण्याआधीचा हा निरोपाचा क्षण सुखदु:खाचा आहे आठ महिन्यांचे इथले वास्तव्य संपवून आता पृथ्वीवर परतण्याचा आमच्या कुटुंबियांना भेटण्याचा हा आनंदी क्षण पण स्थानक इथले सहकारी अंतराळवीर मित्र ह्यांना सोडून जाण्याचे दु:ख आमच जाण थोडस लांबल त्या मुळे आम्हाला Space X Crew -13 मोहिमेतील अंतराळवीरांसोबत राहता आल अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतील ह्या फिरत्या घरात वास्तव्य करताना सायंटिफिक संशोधन करताना Space Walk आणि स्थानकाची इतर तांत्रिक कामे करताना आमचा वेळ व्यस्ततेत गेला पण रिकामा वेळ ह्या सहकारी अंतराळवीरांसोबत मजेत गेला आम्ही खूप enjoy केल खूप हास्यविनोद केले त्यांच्या आठवणी कायम सोबत राहतील इथे वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या अंतराळयानातून अंतराळवीर वास्तव्यासाठी येतात एकत्र संशोधन करतात तेव्हा त्यांची ओळख जागतिक अंतराळवीर अशी होते ते कुठल्या देशातून आले हि ओळख गौण ठरते इथे ते एकरूप होतात आणि विविधतेतून एकता हिच स्थानकातील वास्तव्याची खरी ओळख आहे मी इथे दुसऱ्यांदा आले तेव्हाच ठरवल होत कि खूप मित्र जोडायचे खूप अनुभव गोळा करायचा नव्या अंतराळवीरांना मदत करायची माझा तो उद्देश साध्य झाला हे सारेच अंतराळवीर खूप छान आहेत इथे येण्याआधी अंतराळवीरांनी कितीही ट्रेनिंग घेतलेले असले तरी झिरो ग्रॅव्हीटीतल्या प्रथम प्रवेशाच्या वेळी आपली अवस्था लहान बाळासारखी होते पाणी पिण,खाण,झोप आणि इतर गोष्टी करताना फजिती होते तेव्हा आम्ही आमचा अनुभव आठवतो त्या गोष्टींची मजा लुटतो कारण हे खरच खूपच कठीण असत गुरुत्वाकर्षण नसल्याने तरंगत्या अवस्थेत राहण तेव्हा आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो हे सार शिकवतो तेव्हा मानसिक आनंद मिळतो समाधान मिळत आता पुन्हा इथे येता येईल कि नाही सांगता येत नाही त्या मुळे हे स्थानक सोडून जाताना वाईट वाटत कारण पृथ्वीवर अंतराळातील हे आश्चर्यकारक फिरत स्थानक रिप्लेस होऊ शकत नाही ते युनिक आहे इथल्या लॅब मध्ये संशोधन करताना अंतराळातून पृथ्वीदर्शन करताना अंतराळातील तारे न्याहाळतानाचा आनंद अमूल्य आहे त्या साठी जगभरातील नासा आणि सहभागी संस्थेतील मान्यवरांचे आभार त्यांच्यामुळे आम्ही इथे स्थानकात सुरक्षित राहू शकतो आता ह्या स्थानकाच्या कमांडरपदाची सूत्रे मी अंतराळवीर Pyotr ह्यांच्या हाती सोपवत आहे ते अनुभवी आहेत अंतराळवीर आणि स्थानकाची जबाबदारी ते व्यवस्थित सांभाळतील आम्ही देखील अनेकदा समस्या उद्भवल्यावर त्यांचा सल्ला घेतलाय !"
Pyotr -"Thank You Jessica ! तुम्ही सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून हि जबाबदारी सोपवल्याबद्दल अंतराळातील ह्या फिरत्या स्थानकातील हा सन्मान माझ्यासाठी गौरवास्पद आहे कारण 69 वर्षांपूर्वी ह्याच दिवशी रशियाच Sputnik अंतराळयान लाँच झाल होत आणि आता हे स्थानकातील मानवी वास्तव्य एकता आणि अंतराळवीरांतील मानवतेचे प्रतीक आहे आपण एकत्र आलो तर काहीही अशक्य नाही हे सिद्ध करणार हे युग आहे हे अंतराळवीर कर्तृत्ववान आहेत तुमच्या सोबतच काळ मजेत गेला खूप शिकायला मिळाल ह्या साऱ्यांचा कमांडर होताना गौरवास्पद वाटतय !"त्या नंतर सर्वांनी एकत्र येत शेवटचा निरोप घेतला आणि अंतराळवीर परतीच्या तयारीला लागले

Space X Crew 12चे अंतराळवीर पृथ्वीवर पोहोचल्यानंतर Sophie Adenot आनंदाने अभिवादन करताना - फोटो ESA संस्था
अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेत शिरताच चारही अंतराळवीर पॅराशूटच्या साहाय्याने कॅलिफोर्निया येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरले तेव्हा नासा /इसा /Space X आणि Roscosmos संस्थेच्या Recovery बोटी त्वरित तेथे पोहोचल्या त्यात दोन Fast recovery बोटी आणि recovery teams ह्यांचा समावेश होता त्यांनी Dragon ला ओढत Space X च्या जहाजापर्यंत आणले तेथे hatching Docking प्रक्रिया पार पडली
Docking नंतर Deck वर Recovery टीममधील सदस्य अंतराळवीरांना Dragon मधून बाहेर काढताना -फोटो -नासा संस्था
त्या नंतर Recovery टीममधील डॉक्टरांनी ह्या अंतराळवीरांचे प्राथमिक चेकअप केल्यानंतर त्यांना एकामागून एक बाहेर काढले पृथ्वीवर परतल्यावर सर्व अंतराळवीर आनंदित झाले होते ह्या अंतराळवीरांना आधी हेलिकॉप्टरने Recovery Camp मध्ये पुढील चेकअप साठी नेण्यात आले त्या नंतर नासाच्या विमानाने त्यांना नासाच्या Johnson Space Center Huston येथे पाठवण्यात आले आवश्यक प्रक्रिया पार पडल्यावर हे अंतराळवीर त्यांच्या देशात परततील


No comments:
Post a Comment