Wednesday, 14 October 2026

मंगळावर तीस सप्टेंबरला नवीन वर्षाचा आरंभ

 Mars Express images combined to produce global Mars in colour

 फोटो -ESA -संस्था  

 ESA संस्था - 14

आपल्या पृथ्वीवरील जगभरातील बहुतांश देशात एक जानेवारीला नवीन वर्षाची सुरवात होते पण मंगळावर मात्र  नवीन वर्षाची सुरवात 30 सप्टेंबरला होते ह्या वर्षी तीस सप्टेंबरला पृथ्वीवरील वेळेनुसार आठ वाजून सोळा मिनिटांनी मंगळवार नवीन वर्षाचा आरंभ झाला मंगळावर आता 39 वे वर्ष सुरु झाले आहे 

मंगळावरील वर्ष गणना 1955 पासून  शास्त्रज्ञांनी सुरू केली आणि पहिल्या वर्षी 1956 रोजी मंगळावर मोठे धुळी वादळ झाले त्या मुळे पहिल्या वर्षाची नोंद धुळीचे वर्ष असे झाले

पृथ्वीवरील दिन गणना आणि मंगळावरील दिन गणना ह्यात फरक आहे पृथ्वीला सूर्याभोवती परिक्रमा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात म्हणजेच एक वर्ष पण मंगळाला सुर्याभोवती परीक्रमा करण्यासाठी 687 किंवा 668 दिवस लागतात म्हणजे पृथ्वीच्या दुप्पट मंगळावरील दिवसाला सोल म्हणतात आणि तो 24 तास 39 मिनिटांचा असतो आणि वर्षाचा कालावधी पृथ्वीच्या दुप्पट वर्ष 

मंगळावरील नववर्षाची सुरवात उत्तर विषुवदिनी होते मंगळावरील उत्तर गोलार्धात वसंतऋतू आणि दक्षिण गोलार्धात शरद ऋतूचे आगमन झालेले असते आपल्या पृथ्वीप्रमाणे मंगळवार देखील  हिवाळा,वसंत,उन्हाळा , आणि शरद असे चार ऋतू असतात पण मंगळ ग्रह लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत असल्याने महिन्यांचा कालावधी अनियमित असतो त्या मुळे मंगळावरील उत्तरेकडील भागात उन्हाळ्यात जास्त ऊन पडते तर दक्षिणेकडील भागात हिवाळ्यात जास्त ऊन पडते 

मंगळावर दर सहा महिन्यांनी तीव्र धुळीचे वादळ होते आणि ते प्रचंड मोठे आणी वेगवान असते अनेकदा त्यामुळे वातावरणात उंचावर उडालेली उष्ण कणांची धूळ सर्व मंगळग्रह व्यापून टाकते तेथे उष्णता देखील कमीजास्त प्रमाणात असते दिवसा तापमान अत्युच्च प्रमाणात वाढते तर रात्री थंडी उणे अंश सेल्सिअस पर्यंत पडते 


No comments:

Post a Comment