Sunday, 15 March 2026

नासाच्या James Webb Space Telescope ने टिपले गुरु ग्रहावरील Aurora मध्ये बर्फाचे ठसे

 A marble-like planet in space, against the darkness of the cosmos, with a blue glowing light all around it.

 नासाच्या James Webb Space Telescope ने गुरु ग्रहावरील Amalthea आणि Adrastea ह्या चंद्रभ्रमणा दरम्यान टिपलेल्या तेजस्वी Aurora मधील बर्फ़ाचे ठसे  -फोटो -नासा संस्था 

 Space News -  15 मार्च 

सौरमालेतील सर्वात जवळचा आणि आकाराने मोठ्या असलेल्या गुरु ग्रहाला अनेक चंद्र आहेत त्यातील Ganymede ,Callisto,Io आणि Europa हे चार मोठे चंद्र आहेत पृथ्वीच्या चंद्रासारखेच हे चंद्र देखील गुरूच्या कक्षेत नियमित भ्रमण करत असतात गुरूच्या कक्षेतील Amalthea आणि Adrastea ह्या दोन चंद्राच्या भ्रमणादरम्यान गुरु ग्रहावरील वातावरणात नैसर्गिक रंगीत वायुपटल म्हणजेच Aurora निर्माण झाला होता नासाच्या James Webb Space Telescope ने ह्या गुरु ग्रहावरील वातावरणातील रंगीत झगमगत्या प्रकाशमान Aurora चे आकर्षक फोटो टिपले आहेत 

James Webb Telescope ने घेतलेल्या ह्या नवीन फोटोत शास्त्रज्ञांना ह्या Aurora मध्ये बर्फाचे ठसे आढळले आहेत त्यांनी ह्या ठशाला Cold Foot Print असे नाव दिले आहे गुरु ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणीय वातावरणातील चंद्रभ्रमणामुळे हे ठसे निर्माण झाल्याची संशोधित माहिती ह्या फोटोच्या निरीक्षणानंतर शास्त्रज्ञांना प्राप्त झाली आहे 

सूर्याच्या अंतर्गत भागातील प्रचंड उष्णता मॅग्नेटिक भागातील उष्ण वारे सौर वादळे आणि त्यातून बाहेर पडणारे अतिउष्ण आगीचे लोट प्रकाश किरणे हानिकारक सौरवारे आणि प्रचंड धूळ सतत अंतराळात बाहेर फेकल्या जातात पण ग्रहांभोवतीच्या सुरक्षित वातावरणामुळे हि हानिकारक सौरकिरणे धूळ ज्वलनशील वायू ग्रहांच्या कक्षेत शिरत नाहीत पण कधीकधी हि विद्युतभारित किरणे आणि वायू ग्रहांच्या गुरुत्वाकरणीय कक्षेत ओढल्या जातात आणि वातावरणातील अस्तित्वात असलेल्या वायू संपर्कामुळे असा वेगवेगळ्या रंगांचा वायुपटल निर्माण होतो पृथ्वीवर अनेकदा असा आकर्षक रंगीत Aurora दिसतो पण गुरु ग्रहावरचा हा Aurora झगमगीत हलणारा आणि तेजस्वी होता पृथ्वीवर असे आकर्षक दृश्य दिसत नाही कारण तेथील वातावरण वेगळे आहे 

गुरु ग्रहाभोवतीच्या भ्रमणादरम्यान त्याचे चंद्र अंतराळातील हानिकारक विद्युतभारित सौरकिरणे,सौरप्रकाशीत ज्वाळा,धूळीचे लोट ह्यांच्या संपर्कात येतात आणि कधीकधी ते गुरु ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणीय कक्षेत ओढले जातात आणि गुरु ग्रहाभोवती ह्या Aurora चे वलय तयार होते आणि हे कण विद्युतभारित असल्यामुळे विजेप्रमाणे चकाकतात विशेषतः गुरूच्या ध्रुवीय थंड भागात हा Aurora निर्माण होतो गुरूचा चंद्र Io वर भूकंप प्रवण सक्रिय भाग आहे त्यातून सतत उष्ण वारे व धूळ बाहेर उत्सर्जित होते आणि गुरूच्या कक्षीय भ्रमणादरम्यान हि किरणे अत्यंत वेगाने गुरूच्या कक्षेत खेचल्या गेल्यामुळे तो भाग प्रकाशित होतो गुरूच्या ह्या थंड भागात ह्या कणांचे चमकते वलय निर्माण होते हि किरणे अत्यंत वेगाने वातावरणात शिरतात तितक्याच वेगाने थंड देखील होतात त्या मुळे बंद चालु प्रकाशमान विजेच्या बल्ब प्रमाणे भासतात आणि हा भाग समतोल नसल्यामुळे नागमोडी प्रकाशमान आकर्षक गुलाबी निळे जांभळे रंगीत झगमगते वलय निर्माण होते आणि तेथे बर्फ़ाचा दाट थर आणि तेजस्वी ठसे उमटतात 

पृथ्वीवरील Aurora मध्ये असे बर्फ़ाचे Foot Print आढळत नाहीत त्या मूळे James Webb Telescope ने टिपलेल्या ह्या गुरुग्रहांवरील संशोधित माहितीचा उपयोग भविष्यकालीन मोहिमेत सौरमालेतील इतर मोठ्या ग्रहावरील संशोधनासाठी उपयुक्त ठरेल   

No comments:

Post a Comment