Wednesday, 4 March 2026

ESA ची अंतराळवीर Sophie Adenotने स्थानकातून फ्रेंच पत्रकारांशी संवाद साधला

 

 E.SA ची अंतराळवीर Sophie Adenot नासाच्या Houston संस्थेच्या लाईव्ह संपर्कात स्थानकातून फ्रेंच पत्रकारांशी संवाद साधताना -फोटो -ESA संस्था 

E.SA संस्था - 4 मार्च 

नासाच्या Space X Crew 12 मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर 14 फेब्रुवारीला अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी झाले आहेत  ESAची महिला अंतराळवीर Sophie Adenot पहिल्यांदाच अंतराळस्थानकात राहायला गेली आहे पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अंतराळवीर स्थानकात वास्तव्यास गेल्यामुळे युरोपात तिच्या ह्या स्थानकातील वास्तव्याबद्दल उत्सुकता आहे 26 फेब्रुवारीला नासाच्या Houston येथील संस्थेच्या लाईव्ह संपर्कात Sophie ने स्थानकातून निवडक फ्रेंच मीडिया पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली 

प्रथम नासाच्या Houston येथील संस्थेतील प्रमुखांनी तिचे स्वागत केले आणि संवादाला सुरवात झाली Sophie हिने फ्रेंच मधील निवडक पत्रकारांशी फ्रेंच मधून संवाद साधला 

पत्रकार- Sophie तुझा अंतराळ प्रवास कसा झाला स्थानकातील पहिल्या प्रवेशाच्या क्षणी काय वाटले तू स्थानकातून प्रथम पृथ्वीदर्शन घडवलेस त्या विषयी सांग ह्या दहा दिवसात तुझ्या मानसिक आणि शारीरिक तब्येतीत काय फरक जाणवला तू ठीक आहेस ना ? स्थानक कसे आहे तिथल्या झिरो ग्रॅव्हीटीत वास्तव्य करताना तिथे प्रवेश केल्यानंतर Motion sickness, Nauseaचा त्रास झाला का ? तुझी दिनचर्या कशी आहे? तुझ्या सायंटिफिक संशोधनास सुरवात केलीस का ? ह्या सारखे अनेक प्रश्न विचारले 

 Sophie - माझा अंतराळ प्रवास ,अंतराळ स्थानकातील प्रवेश आणि इथून खाली पृथ्वीच अलौकिक सोंदर्य पाहण्याचा क्षण अद्भुत होता स्थानकात प्रवेश केल्यावर मला पृथ्वीवरील पाण्यातील मासा असल्यासारख फीलिंग आल मी त्या क्षणी सर्व बाजूने तरंगण्याचा अद्भुत आनंद घेतला माझ्या शरीरातील पेशींमध्ये ह्या संवेदना जागृत झाल्या माझी शारीरिक आणि मानसिक तब्येत सुदैवाने ठीक आहे मला वाटल तस इथल्या वास्तव्यात Motion sickness ,Nausea ह्यासारखे त्रास झाले नाहीत स्थानकात प्रवेश केल्यानंतर अंतराळातील हे फिरते स्थानक त्यातील लॅब पाहून आश्चर्यचकित झाले स्थानकातील अत्याधुनिक यंत्रणा उपकरणे  व्यवस्थापन सारच व्यवस्थित Organized आहे सार जिथल्या तिथे व्यवस्थित manage केलय हे बनवणारे नासा संस्थेतील सहभागी देशातील शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ ,इंजिनीअर्स ह्यांच कर्तृत्व गौरवास्पद आहे इथे आल्यावर स्थानकातील कमांडरने पूर्ण स्थानक दाखवल तेव्हाच इथल्या धोकादायक यंत्रणे बद्दल माहिती दिली आणि इथे वावरताना आपला बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची सूचना दिली तसेच काही समस्या उद्भवल्यास कशी खबरदारी घ्यायची Oxygen Mask कुठे आहेत वै गोष्टी दाखवल्या स्थानकातील सर्व अंतराळवीर खूप छान आहेत त्यांनी आम्हाला इथल्या झिरो ग्रॅव्हीटीत कशी काळजी घ्यायची हे शिकवल आणि इतर कामासाठी मदत केली 

इथे प्रवेश केल्यापासूनचा आठवडा अत्यंत व्यस्ततेत गेला खूप काम होत स्थानकातून पृथ्वीवर Space X - कार्गोशीप परत गेल त्यातून स्थानकातील अंतराळवीरांनी संशोधित केलेल्या सायंटिफिक प्रयोगाचे नमुने व इतर सामानाच पॅकिंग केल आम्ही देखील आमचे Blood व इतर आवश्यक Samples घेऊन ते पृथ्वीवर पाठवले आता हळू हळू E.SA संस्थेने सोपविलेले सायंटिफिक संशोधन करण्यास सुरवात करेन मी आल्या आल्या लगेचच CADMOS Expt सुरु केलय सध्या इथे सुरु असलेल्या नासा संस्थेच्या संशोधनात सहभागी झालेय 

सकाळी लवकर उठण्याची सवय असल्यामुळे पहाटे साडे पाचला उठते आणि साडेसात पर्यंत मी रोजची दिनचर्चा आणि व्यायाम करते व्यायामाच्या मशिन्सवर त्या नंतर नासा संस्थेतील सर्व सहभागी देशांच्या लाईव्ह संपर्कात आम्हाला रोजच्या कामाचे ब्रिफींग केल्या जाते त्या नुसार आमच रोजच काम सुरु होत रात्री झोपण्यासाठी स्लीपिंग बॅगचा वापर करावा लागतो माझ्या सहकारी अंतराळवीरांनी मला ती बॅग तयार करून दिलीय स्थानकातील छोट्या जागेत प्रत्येकासाठी छोटी खोली असते मी अजूनही माझ्या सुटकेसमधील सार सामान काढल नाही पृथ्वीसारख इथे सार स्थिर नसत इथे फिरताना खूप काळजी घ्यावी लागते आता मला सर्व बाजूने तरंगत सहजतेने फिरता येतय 

इथे येताना मला माहिती मिळाली होती कि इथे वेगवेगळे आवाज येतात काही स्फोटासारखे असतात पण मी अनुभवी पायलट असल्यामुळे मला अशा आवाजाची सवय आहे काही मशिनरीचे आवाज येतात कधी फ्लॅश चे ,कधी valve सुरु झाल्याचे ,फॅनचे तर कधी इतर पण काही वेळेस काही वस्तू एकमेकांच्या संपर्कात आल्यावर घर्षणाने मधुर संगीताचा आवाज येतो तो श्रवणीय असतो 

आता मी Columbus Module मध्ये आहे  इथे कृत्रिम निळा प्रकाश आहे  फक्त Cupola मध्ये नॅचरल प्रकाश पडतो तिथे दररोज जायला वेळ नसतो त्यामुळे इथून पुन्हा पृथ्वीदर्शन केले नाही मोकळा वेळ सर्वांशी संवाद साधताना मजेत जातो असे तिने सांगितले त्या नंतर सर्वांनी तिला स्थानकातील वास्तव्यासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या 

No comments:

Post a Comment