Friday, 27 March 2026

नासाच्या Artemis II मोहिमेतील चार अंतराळवीर एक एप्रिलला चंद्रावर जाणार

 

नासाच्या Artemis II मोहिमेतील अंतराळवीर Jeremy Hansan Christina Koch Victor Glover  आणि Reid Wiseman -फोटो -नासा संस्था 

 

नासा संस्था - 27 मार्च 

नासाच्या आर्टिमस मोहिमेतील अंतराळवीर Reid Wiseman,Victor Glover,Christina Koch आणी कॅनडाचे अंतराळवीर Jeremy Nansen हे चार अंतराळवीर एक एप्रिलला दहा दिवसांच्या चंद्र मोहिमेवर जाणार आहेत ह्या आधी Artemis मोहिमेतील Orion अंतराळयान आणी Orion Space Launch System च्या ऊड्डाणपुर्व चेकिंग साठी ऊड्डाणस्थळी आणण्यात आले होते पण टेस्ट दरम्यान SLS राँकेटच्या वरच्या भागातील हेलीयम वायुच्या दबावात समस्या निर्माण झाल्यामुळे ह्या अंतराळवीरांचे ऊड्डाण लांबले होते 

त्या नंतर Orion अंतराळयान आणी रॉकेट ऊड्डाणस्थळावरुन पुन्हा नासाच्या Kennedy Space Center येथील Vehicle Assembly Building मध्ये नेण्यात आले तेथे ह्या टीममधील इंजिनीअर्स आणि शास्त्रज्ञांनी अथक प्रयत्न करून Orion अंतराळयानाच्या Space Launch System Rocket मध्ये आढळलेल्या त्रुटी दूर करून आवश्यक बदल केले आणि त्यातील समस्या दूर केली त्या नंतर 19 मार्चला Orion अंतराळयान आणि Space Launch System Rocket पुन्हा उड्डाणस्थळी आणण्यात आले आणि उड्डाणपूर्व अंतिम टेस्ट घेण्यात आली तेव्हा अंतराळयान आणि रॉकेट मधील सर्व सिस्टिम व्यवस्थित कार्यरत असल्याचे टीमच्या लक्षात आले 

त्यामुळे आता नासाच्या लांबलेल्या आर्टेमिस मोहीमेतील अंतराळवीर एक एप्रिलला चंद्र मोहिमेवर जाणार असल्याचे नासा संस्थेने जाहीर केले आहे ह्या मोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी आणि मोहिमेच्या यशस्वीतेसाठी ऐनवेळी काही समस्या उद्भवू नये या साठी आता सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत नासाच्या Kennedy Space Center Florida येथील उड्डाणस्थळावरून एक एप्रिलला संद्याकाळी 6.24 मिनिटांनी Orion अंतराळयानातून हे चारही अंतराळवीर SLS रॉकेटच्या साहाय्याने चंद्रावर जाण्यासाठी अंतराळात झेपावतील

Artemis II मोहीम चार टप्प्यात पार पडेल सुरवातीला अंतराळयान अंतराळात झेपावल्या नंतर यानातील  स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित होईल व नियोजित प्रक्रिया पार पडेल त्या नंतर निर्धारित वेळेनंतर अंतराळयान रॉकेट पासून वेगळे होईल आणि अंतराळप्रवासास सुरवात होईल अंतराळयान सुरवातीला पृथ्वीच्या वरच्या कक्षेत चोवीस तास भ्रमण करेल 

अंतराळयान तेथील वातावरणाचा वेध घेईल आणि यानात बसविलेल्या नवीन अत्याधुनिक यंत्रणेची कार्यक्षमता चेक करेल ह्या यंत्रणेद्वारे Environmental Control आणि Support system ची कार्यक्षमता आणि सुरक्षितता चेक केल्या जाईल हि यंत्रणा अंतराळवीरांच्या अंतराळ प्रवासादरम्यान त्यांना सुरक्षित आणि निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरेल 

त्या नंतरच्या टप्प्यात अंतराळवीर यानातील Cryogenic propulsion Stage,Manual control system चेक करतील काही कारणाने पृथ्वीवरील संस्थेशी संपर्क झाला नाही तर यानाचा अंतराळ प्रवास सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी हि चाचणी आवश्यक आहे एकदा का सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यरत झाल्याची खात्री अंतराळवीरांना होईल तेव्हा हे अंतराळवीर चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्यासाठी सज्ज होतील 

चार दिवसांनी चंद्राच्या कक्षेत शिरल्या नंतर हे अंतराळवीर चंद्राभोवती भ्रमण करतील आणि चंद्रावरील दूरवरच्या भागातील वातावरणातील संशोधित माहिती गोळा करतील ह्या वेळेस आधीच्या अपोलो मोहिमेतील संशोधित माहितीपेक्षा अत्याधुनिक माहिती आणि अज्ञात भागाचा शोध घेतील

त्यानंतर ह्या अंतराळवीरांच्या पुन्हा पृथ्वीवर परतण्यासाठीचा प्रवास सुरु होईल त्या साठी अंतराळयान चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल त्यासाठी अंतराळवीरांना पुन्हा चार दिवस लागतील आणि त्या नंतर Orion अंतराळयान ह्या अंतराळवीरांसह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करेल आणि अमेरिकेतील San Diego येथील समुद्राच्या खाडीत खाली उतरेल 

ह्या अंतराळवीरांच्या दहा दिवसांच्या चंद्र मोहिमेनंतर पृथ्वीवर सुरक्षित परतण्यासाठी नासा संस्थेतील सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे सध्या हे चारही अंतराळवीर उड्डाणपूर्व Quarantine मध्ये राहण्यासाठी गेले आहेत 

Artemis II हि नासाची  पन्नास वर्षानंतरची पुन्हा सुरु झालेली पहिली मानवी टेस्ट मोहीम आहे ह्या अंतराळवीरांच्या Artemis मोहिमेचे लाईव्ह प्रक्षेपण नासा T.V.वरून करण्यात येणार असून जगभरातील हौशी नागरिकांना ह्या अंतराळवीरांच्या चंद्रावरील प्रवेश आणि पृथ्वीवर परतण्याच्या मोहिमेत Virtually उपस्थित राहण्यासाठीची संधीही नासा संस्थेने उपलब्ध केली आहे 

No comments:

Post a Comment