
Space X Crew Dragon चारही अंतराळवीरांसह California मधील San Diego येथील समुद्रात खाली उतरताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -16 जानेवारी
नासाच्या Space X Crew-11चे अंतराळवीर Mike Fincke,Zena Cardman जपानचे अंतराळवीर kimiya Yui आणी रशियन अंतराळवीर Oleg Platonov गुरुवारी 15 जानेवारीला पृथ्वीवर सुरक्षीत परतले ह्या चारही अंतराळविरांसह Space X Crew Dragon बुधवारी 5.20a.m.वाजता पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले आणि गुरुवारी 12.41a.m.(स्थानिक वेळ) वाजता California मधील San Diego येथील समुद्राच्या खाडीत सुरक्षित पणे खाली ऊतरले
पृथ्वीवर येण्यासाठी निघण्याआधी अंतराळस्थानकात नासाच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीराचा Farewell आणी Change the Command ceremony पार पडला त्या वेळी अंतराळवीरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले
नासाच्या Houston Space Center मधील प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाला सुरवात झाली
Mike- नासा संस्थेतील मान्यवर आणि मित्र ह्यांचे स्थानकात स्वागत आम्ही इथे Change the Command ceremony साठी जमलो आहोत आज Farewell Ceremony पण आहे ह्या सुंदर अंतराळस्थानकातुन बाहेर पडतानाचा क्षण माझ्या साठी दुःखी आहे पण आज तितकाच महत्त्वाचा दिवस पण आहे आमच्या मोहीम 74 मधील आम्ही चौघे पृथ्वीवर परतत आहोत ऊर्वरित अंतराळवीर नव्या नेतृत्वाचे स्वागत करणार आहेत आणी लवकरच स्थानकात वास्तव्यास येणाऱ्या Space X Crew-12 मधील अंतराळवीरांच्या स्वागताची तयारी करीत आहेत ह्या अंतराळ स्थानकात पंचवीस वर्षांपासून सतत अंतराळवीर वास्तव्यास येतात आणि नवनवीन संशोधन करतात जगभरातील नासा संस्थेतील इंजिनीयर तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांनी बनविलेले हे अंतराळस्थानक म्हणजे मानवी उत्कृष्टतेच असामान्य प्रतीक आहे अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतल्या ह्या फिरत्या स्थानकातील सायंटिफिक लॅब,इथली सायन्स संशोधनाची सुविधा आणि व्यवस्थापन सारच आश्चर्यकारक आहे माझा इथला वास्तव्याचा काळ मजेत गेला मोहीम 73 आणि 74 मधील अंतराळवीरांची टीम खूप छान होती माझा मित्र Scott Kelly म्हणतो Spaceflight is biggest team sport अगदी तशीच आमची टीम ग्रेट होती प्रत्येक जण कठीण प्रसंगी सुखदुःखाच्या प्रसंगी मदतीला धावला त्या बद्दल सर्वांचे आभार सर्वांनी कठोर मेहनतीने संशोधनात सहकार्य केले आपण एकत्र मजेत वेळ व्यतीत केला मी काही जोक केले ते विशेष नव्हते तरीही मी प्रयत्न करीत राहिलो आता निरोपाची वेळ आलीय मी माझे कमांडरपद आणि स्थानकाची चावी अंतराळवीर Sergey ह्यांच्या हाती सोपवत आहे
Space X Crew -11 चे अंतराळवीर Mike Change The Command Ceremony दरम्यान स्थानकातील अंतराळवीरांसोबत फोटो -नासा संस्था
Sergey -Thank You ! हा माझा बहुमान आहे ! आपण सर्वांनी मिळून ह्या कठीण प्रसंगी इथल संशोधन Maintenance आणि इतर कार्य सुरु ठेवल आणि नासा संस्थेतील जगभरातील पार्टनर्सचे देखील आभार त्यांनी मला हा बहुमान दिला आणि वेळोवेळी आम्हाला इतक्या दुरून पृथ्वीवरून मार्गदर्शन केल मदत केली आम्ही हे कार्य असच सुरु ठेवून यशस्वी करू आता कमांडर पद स्वीकारल्यानंतर माझी तुम्हाला पहिली आज्ञा आहे आपण सर्वजण मिळून एकमेकांचा निरोप घेऊ आमची आठवण ठेवा! असे म्हणत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि हे चारही अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले
Space X Crew Dragon ह्या चारही अंतराळवीरांसह सुरक्षितपणे समुद्रात खाली उतरल्यानंतर नासाचे Shannon रिकव्हरी जहाज व दोन रिकव्हरी बोट तेथे पोहोचल्या रिकव्हरी बोटींच्या सहाय्याने Space X Crew Dragon (Endeavour )अंतराळयानाला जहाजावर चढवण्यात आले जहाज आणी अंतराळयान ह्यांच्यातील Docking Hatching प्रक्रिया पार पडल्यानंतर नासाच्या रिकव्हरी टिममधील डॉक्टरांनी अंतराळयानात प्रवेश करून ह्या अंतराळविरांचे प्राथमिक चेकअप केले आणी अंतराळवीरांना एकामागून एक बाहेर काढले प्रथम अंतराळवीर Mike Fincke,Zena Cardman,Kimiya Yui आणी शेवटी Oleg Platonov अंतराळयानातुन बाहेर आले तेव्हा आनंदी दिसत होते त्यांनी सर्वांंना हसतमुखाने अभिवादन केले

रशियन अंतराळवीर Oleg Platonov नासाचे अंतराळवीर Mike Fincke ,Zena Cardman आणि जपानचे अंतराळवीरो Kimiya Yui 16 तारखेला Houston येथे पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था
अंतराळयानातुन बाहेर आल्यानंतर ह्या अंतराळवीरांचे रिकव्हरी कॅम्प मध्ये प्राथमिक चेकअप करण्यात आले आणी पुढील चेकअप साठी स्थानिक हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले तेथे अंतराळवीरांना रात्रभर ठेवण्यात आले व आवश्यक ते उपचार देण्यात आले ऊड्डाणानंतरच्या सर्व प्रक्रिया पार पडल्यावर नासाच्या विमानाने त्यांना Houston येथील संस्थेत पोहोचविण्यात आले
हे अंतराळवीर एक ऑगस्टला स्थानकात सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी गेले होते आणि 167 दिवसांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर परतले त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला आणि स्थानकाचा 25 वा वर्धापन दिन आणि अनेक सण साजरे केले अंतराळवीर Mike चवथ्यांदा स्थानकात वास्तव्यास गेले होते त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 549 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Kimiya दुसऱ्यांदा वास्तव्यास गेले होते अंतराळवीर Zena आणि Oleg मात्र पहिल्यांदाच स्थानकात वास्तव्यास गेले होते
No comments:
Post a Comment