
नासाच्या Space X Crew -11 अंतराळ मोहीमेतील रशियन अंतराळवीर Oleg Platonov नासाचे अंतराळवीर Mike Fincke आणि Zena Cardman जपानचे अंतराळवीर Kimiya Yui-फोटो -नासा संस्था
नासा संस्था- 9 जानेवारी
नासाच्या Space X crew 11 अंतराळ मोहिमे अंतर्गत नासाचे अंतराळवीर Zena Cardman ,Mike Fincke जपानचे अंतराळवीर Kimiya Yui आणि रशियन अंतराळवीर Oleg Platonov सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते पण हे चारही अंतराळवीर मोहिम पुर्ण होण्याआधीच पृथ्वीवर परतणार आहेत ह्या चार अंतराळविरांपैकी एकाची तब्येत बिघडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे
हे चारही अंतराळवीर बुधवारी 14 जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी स्थानका बाहेर पडतील आणी गुरुवारी दुपारी 3.40 मिनिटांनी पृथ्वीवर परततील पृथ्वीच्या कक्षेत शिरताच Space X Crew Dragon ह्या चार अंतराळवीरांसह California येथील समुद्राच्या खाडीत खाली ऊतरेल
हे अंतराळवीर स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आठ तारखेला Space Walk करणार होते पण सात तारखेला अचानक एका अंतराळवीराची तब्येत बिघडल्यामुळे हा Space Walk रद्द करून पुढे ढकलण्यात आला सध्या त्या अंतराळवीराची तब्येत स्थिर आहे हे अंतराळवीर पृथ्वीवरील नासा संस्थेतील डॉक्टरांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या सल्यानुसार आजारी अंतराळवीरावर उपचार करीत आहेत परंतु अंतराळविराच्या सुरक्षिततेसाठी आणी पृथ्वीवर योग्य ऊपचार देण्यासाठी आठ जानेवारीला अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्याचा हा निर्णय घेण्यात आला नेमका कुठला अंतराळवीर आजारी आहे त्याला काय झाले आहे ह्याची माहिती मेडिकल प्रायव्हसी मुळे सांगण्यात आली नाही
गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच ह्या सर्व अंतराळवीरांना मोहीम पूर्ण होण्याआधीच पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे ह्या अंतराळवीरांना इमर्जन्सी मध्ये मेडिकल उपचार करण्यासाठीचे ट्रेनिंग आणि मेडिकल किट औषध गोळ्या दिलेल्या असतात पण काही उपचार झिरो ग्रॅविटीत करता येत नाहीत तिथे आवश्यक अत्याधुनिक उपकरणे नसतात फक्त पृथ्वीवरच उपचार करणे आवश्यक असते शिवाय हे चारही अंतराळवीर ऑगष्ट महिन्यात सहा महिन्याच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते आणि त्यांची मोहीम पूर्ण होत आली होती पण नासा संस्था नेहमीच अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देते त्या मुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असे नासाचे Administrator Jared Isaacman म्हणतात
No comments:
Post a Comment