
नासाच्या आर्टीमस मोहिमेतील अंतराळवीर Johnson Space Center Florida येथील Orion Simulator समोर -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -(Space News) -23 जानेवारी
अमेरिकेच्या पन्नास वर्षांनी सुरु झालेल्या चंद्र मोहिमेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे नासाच्या Artemis II मोहिमेअंतर्गत नासाचे अंतराळवीर Ried Wisewman ,Victor Glover ,Christina Koch आणि कॅनडाचे अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत आणि तेथील वातावरणातील आणि भूगर्भातील संशोधित माहिती गोळा करणार आहेत
त्यांच्या ह्या दहा दिवसांच्या मोहिमेत ह्या आंतराळवीरांची तब्येत ठीक राहावी त्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार होऊ नये आणि कुठलीही समस्या निर्माण होऊन मोहिमेला उशीर होऊ नये ह्या साठी नासा संस्थेतर्फे ह्या चारही अंतराळवीरांना Quarantine मध्ये ठेवण्यात आले आहे अंतराळ मोहिमेआधी नासाच्या Health Stabilization Program अंतर्गत ह्या अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी चौदा दिवस क्वारंटाईन मध्ये ठेवले जाते
हे अंतराळवीर फेब्रुवारी महिन्यात चंद्रावर जाण्यासाठी उड्डाण करणार असून अजून निश्चित तारीख जाहीर झाली नाही सध्या आर्टीमस मोहिमेतील Orion अंतराळयान आणि रॉकेट उड्डाणस्थळी दाखल झाले असून अंतिम Test करण्यात येत आहे Wet Dress rehearsal व इतर Testing होईपर्यंत ह्या आंतराळवीरांचे क्वारंटाईन संपेल सध्या हे अंतराळवीर नासाच्या Huston Space Center येथील Astronaut Crew Quarter मध्ये रहात असून उड्डाणाच्या सहा दिवस आधी ते नासाच्या Kennedy Space Center Florida येथे दाखल होतील
क्वारंटाईन मध्ये रहात असले तरीही क्वारंटाईनचे नियम पाळून हे अंतराळवीर त्यांच्या कुटुंबीयांसोबत व मित्रांसोबत फोनवरून संपर्क साधू शकतात ह्या अंतराळवीरांना मास्क वापरावा लागेल आणि लोकांच्या संपर्कात गेल्यास ठराविक अंतर ठेवावे लागेल
No comments:
Post a Comment