Friday, 20 March 2026

अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी नासाचे अंतराळवीर Jessica Meir आणि Chris Williams ह्यांचा Space Walk पूर्ण

 NASA astronauts Jessica Meir and Chris Williams are seen outside the International Space Station installing a solar array modification kit during U.S. EVA 94 on March 18, 2026. Credit: NASA

नासाच्या अंतराळ मोहीम 74 चे अंतराळवीर Jessica Meir आणि Chris Williams स्थानकाबाहेरील भागात स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था -18 मार्च 

नासाच्या अंतराळ मोहीम 74चे अंतराळवीर Jessica Meir आणि Chris Williams ह्यांनी अंतराळ स्थानकाच्या  बाहेरील भागातील तांत्रिक कामासाठी 18 मार्चला Space Walk केला 

ह्या अंतराळवीरांनी ह्या Space Walk ची तयारी आधीच करून ठेवली होती त्यांनी आदल्या दिवशी त्यांच्या स्पेससूटचे लिकेज व इतर बाबी चेक केल्या स्पेससूट चार्ज केला आणि ह्या स्पेसवॉक साठी लागणारे साहित्य आणि कॅमेरा देखील चेक करून स्पेससूट मध्ये ठेवले  

   NASA astronaut and Expedition 74 flight engineer Jessica Meir’s reflection is captured in a spacesuit helmet visor. The visor assembly is coated with a microscopic layer of gold that reflects infrared radiation to protect an astronaut’s eyes while allowing visible light to pass through. Meir was working inside the International Space Station's Quest airlock, installing leg and arm components on the spacesuit and swapping components from one suit to another.

अंतराळवीर Jessica Meir स्पेसवॉकच्या पूर्व तयारी दरम्यान Space Suit Helmet Visor चेक करताना -फोटो नासा संस्था 

18 मार्चला सकाळी 8.52 मिनिटाला हे दोन्हीही अंतराळवीर स्थानकाच्या Quest Airlock ह्या भागात स्पेसवॉक करण्यासाठी स्थानका बाहेर पडले ह्या  स्पेसवॉक साठी अंतराळवीर Jessica ह्यांनी लाल रंगांच्या रेषा असलेला स्पेससूट परिधान केला होता तर अंतराळवीर Chris ह्यांनी रेषा विरहित स्पेससूट परिधान केला होता हा स्पेसवॉक सात तासांनी संपला 

 From left, NASA astronauts Jessica Meir and Chris Williams are conducting a spacewalk to install a modification kit and route cables on the port side of the orbital lab where a new roll-out solar array will be attached on a future spacewalk.

अंतराळवीर Jessica Meir आणि अंतराळवीर Chris Williams स्पेसवॉकसाठी बाहेर पडताना -फोटो -नासा संस्था 

सात तासांच्या ह्या Space Walk दरम्यान ह्या दोन्ही अंतराळवीरांनी ह्या भागात आधी आवश्यक कामे पूर्ण केली त्यांनी ह्या भागात 2A पॉवर चॅनल बसविण्यासाठी व पुढील स्पेसवॉक मध्ये ह्या भागात बसविण्यात येणाऱ्या Roll out Solar Arrays साठीची तयारी करून ठेवली त्यांनी Modification Kit,Routing cables व इतर आवशक गोष्टी फिक्स केल्या अंतराळस्थानकाच्या लॅब मध्ये आवश्यक प्रकाश,ऊर्जाशक्ती व लॅबमधील Critical सपोर्ट सिस्टिमच्या सुरक्षिततेसाठी हा Solar Arrays बसविण्यात येणार आहे 

ह्या शिवाय ह्या स्पेसवॉक मध्ये ह्या अंतराळवीरांनी ह्या पुढील स्पेसवॉक साठीची पूर्वतयारीही करून ठेवली त्यांनी 2A power system jumper cable fix केले हे दोन्ही अंतराळवीर सात तासांनी हा स्पेसवॉक संपल्यावर दुपारी  3.54 वाजता अंतराळस्थानकात परतले 

अंतराळवीर Jessica ह्यांचा हा चवथा स्पेसवॉक होता तर अंतराळवीर Chris ह्यांचा मात्र हा पहिलाच स्पेसवॉक होता स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेला हा 278 व आणि ह्या वर्षातील हा पहिलाच स्पेसवॉक होता ह्या स्पेसवॉकचे लाईव्ह प्रसारण नासा टी .वी वरून करण्यात आले 

Sunday, 15 March 2026

नासाच्या James Webb Space Telescope ने टिपले गुरु ग्रहावरील Aurora मध्ये बर्फाचे ठसे

 A marble-like planet in space, against the darkness of the cosmos, with a blue glowing light all around it.

 नासाच्या James Webb Space Telescope ने गुरु ग्रहावरील Amalthea आणि Adrastea ह्या चंद्रभ्रमणा दरम्यान टिपलेल्या तेजस्वी Aurora मधील बर्फ़ाचे ठसे  -फोटो -नासा संस्था 

 Space News -  15 मार्च 

सौरमालेतील सर्वात जवळचा आणि आकाराने मोठ्या असलेल्या गुरु ग्रहाला अनेक चंद्र आहेत त्यातील Ganymede ,Callisto,Io आणि Europa हे चार मोठे चंद्र आहेत पृथ्वीच्या चंद्रासारखेच हे चंद्र देखील गुरूच्या कक्षेत नियमित भ्रमण करत असतात गुरूच्या कक्षेतील Amalthea आणि Adrastea ह्या दोन चंद्राच्या भ्रमणादरम्यान गुरु ग्रहावरील वातावरणात नैसर्गिक रंगीत वायुपटल म्हणजेच Aurora निर्माण झाला होता नासाच्या James Webb Space Telescope ने ह्या गुरु ग्रहावरील वातावरणातील रंगीत झगमगत्या प्रकाशमान Aurora चे आकर्षक फोटो टिपले आहेत 

James Webb Telescope ने घेतलेल्या ह्या नवीन फोटोत शास्त्रज्ञांना ह्या Aurora मध्ये बर्फाचे ठसे आढळले आहेत त्यांनी ह्या ठशाला Cold Foot Print असे नाव दिले आहे गुरु ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणीय वातावरणातील चंद्रभ्रमणामुळे हे ठसे निर्माण झाल्याची संशोधित माहिती ह्या फोटोच्या निरीक्षणानंतर शास्त्रज्ञांना प्राप्त झाली आहे 

सूर्याच्या अंतर्गत भागातील प्रचंड उष्णता मॅग्नेटिक भागातील उष्ण वारे सौर वादळे आणि त्यातून बाहेर पडणारे अतिउष्ण आगीचे लोट प्रकाश किरणे हानिकारक सौरवारे आणि प्रचंड धूळ सतत अंतराळात बाहेर फेकल्या जातात पण ग्रहांभोवतीच्या सुरक्षित वातावरणामुळे हि हानिकारक सौरकिरणे धूळ ज्वलनशील वायू ग्रहांच्या कक्षेत शिरत नाहीत पण कधीकधी हि विद्युतभारित किरणे आणि वायू ग्रहांच्या गुरुत्वाकरणीय कक्षेत ओढल्या जातात आणि वातावरणातील अस्तित्वात असलेल्या वायू संपर्कामुळे असा वेगवेगळ्या रंगांचा वायुपटल निर्माण होतो पृथ्वीवर अनेकदा असा आकर्षक रंगीत Aurora दिसतो पण गुरु ग्रहावरचा हा Aurora झगमगीत हलणारा आणि तेजस्वी होता पृथ्वीवर असे आकर्षक दृश्य दिसत नाही कारण तेथील वातावरण वेगळे आहे 

गुरु ग्रहाभोवतीच्या भ्रमणादरम्यान त्याचे चंद्र अंतराळातील हानिकारक विद्युतभारित सौरकिरणे,सौरप्रकाशीत ज्वाळा,धूळीचे लोट ह्यांच्या संपर्कात येतात आणि कधीकधी ते गुरु ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणीय कक्षेत ओढले जातात आणि गुरु ग्रहाभोवती ह्या Aurora चे वलय तयार होते आणि हे कण विद्युतभारित असल्यामुळे विजेप्रमाणे चकाकतात विशेषतः गुरूच्या ध्रुवीय थंड भागात हा Aurora निर्माण होतो गुरूचा चंद्र Io वर भूकंप प्रवण सक्रिय भाग आहे त्यातून सतत उष्ण वारे व धूळ बाहेर उत्सर्जित होते आणि गुरूच्या कक्षीय भ्रमणादरम्यान हि किरणे अत्यंत वेगाने गुरूच्या कक्षेत खेचल्या गेल्यामुळे तो भाग प्रकाशित होतो गुरूच्या ह्या थंड भागात ह्या कणांचे चमकते वलय निर्माण होते हि किरणे अत्यंत वेगाने वातावरणात शिरतात तितक्याच वेगाने थंड देखील होतात त्या मुळे बंद चालु प्रकाशमान विजेच्या बल्ब प्रमाणे भासतात आणि हा भाग समतोल नसल्यामुळे नागमोडी प्रकाशमान आकर्षक गुलाबी निळे जांभळे रंगीत झगमगते वलय निर्माण होते आणि तेथे बर्फ़ाचा दाट थर आणि तेजस्वी ठसे उमटतात 

पृथ्वीवरील Aurora मध्ये असे बर्फ़ाचे Foot Print आढळत नाहीत त्या मूळे James Webb Telescope ने टिपलेल्या ह्या गुरुग्रहांवरील संशोधित माहितीचा उपयोग भविष्यकालीन मोहिमेत सौरमालेतील इतर मोठ्या ग्रहावरील संशोधनासाठी उपयुक्त ठरेल   

Wednesday, 4 March 2026

ESA ची अंतराळवीर Sophie Adenotने स्थानकातून फ्रेंच पत्रकारांशी संवाद साधला

 

 E.SA ची अंतराळवीर Sophie Adenot नासाच्या Houston संस्थेच्या लाईव्ह संपर्कात स्थानकातून फ्रेंच पत्रकारांशी संवाद साधताना -फोटो -ESA संस्था 

E.SA संस्था - 4 मार्च 

नासाच्या Space X Crew 12 मोहिमे अंतर्गत चार अंतराळवीर 14 फेब्रुवारीला अंतराळ स्थानकात पोहोचल्यानंतर तेथे सुरु असलेल्या सायंटिफिक संशोधनात सहभागी झाले आहेत  ESAची महिला अंतराळवीर Sophie Adenot पहिल्यांदाच अंतराळस्थानकात राहायला गेली आहे पंचवीस वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अंतराळवीर स्थानकात वास्तव्यास गेल्यामुळे युरोपात तिच्या ह्या स्थानकातील वास्तव्याबद्दल उत्सुकता आहे 26 फेब्रुवारीला नासाच्या Houston येथील संस्थेच्या लाईव्ह संपर्कात Sophie ने स्थानकातून निवडक फ्रेंच मीडिया पत्रकारांशी संवाद साधत त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली 

प्रथम नासाच्या Houston येथील संस्थेतील प्रमुखांनी तिचे स्वागत केले आणि संवादाला सुरवात झाली Sophie हिने फ्रेंच मधील निवडक पत्रकारांशी फ्रेंच मधून संवाद साधला 

पत्रकार- Sophie तुझा अंतराळ प्रवास कसा झाला स्थानकातील पहिल्या प्रवेशाच्या क्षणी काय वाटले तू स्थानकातून प्रथम पृथ्वीदर्शन घडवलेस त्या विषयी सांग ह्या दहा दिवसात तुझ्या मानसिक आणि शारीरिक तब्येतीत काय फरक जाणवला तू ठीक आहेस ना ? स्थानक कसे आहे तिथल्या झिरो ग्रॅव्हीटीत वास्तव्य करताना तिथे प्रवेश केल्यानंतर Motion sickness, Nauseaचा त्रास झाला का ? तुझी दिनचर्या कशी आहे? तुझ्या सायंटिफिक संशोधनास सुरवात केलीस का ? ह्या सारखे अनेक प्रश्न विचारले 

 Sophie - माझा अंतराळ प्रवास ,अंतराळ स्थानकातील प्रवेश आणि इथून खाली पृथ्वीच अलौकिक सोंदर्य पाहण्याचा क्षण अद्भुत होता स्थानकात प्रवेश केल्यावर मला पृथ्वीवरील पाण्यातील मासा असल्यासारख फीलिंग आल मी त्या क्षणी सर्व बाजूने तरंगण्याचा अद्भुत आनंद घेतला माझ्या शरीरातील पेशींमध्ये ह्या संवेदना जागृत झाल्या माझी शारीरिक आणि मानसिक तब्येत सुदैवाने ठीक आहे मला वाटल तस इथल्या वास्तव्यात Motion sickness ,Nausea ह्यासारखे त्रास झाले नाहीत स्थानकात प्रवेश केल्यानंतर अंतराळातील हे फिरते स्थानक त्यातील लॅब पाहून आश्चर्यचकित झाले स्थानकातील अत्याधुनिक यंत्रणा उपकरणे  व्यवस्थापन सारच व्यवस्थित Organized आहे सार जिथल्या तिथे व्यवस्थित manage केलय हे बनवणारे नासा संस्थेतील सहभागी देशातील शास्त्रज्ञ,तंत्रज्ञ ,इंजिनीअर्स ह्यांच कर्तृत्व गौरवास्पद आहे इथे आल्यावर स्थानकातील कमांडरने पूर्ण स्थानक दाखवल तेव्हाच इथल्या धोकादायक यंत्रणे बद्दल माहिती दिली आणि इथे वावरताना आपला बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याची सूचना दिली तसेच काही समस्या उद्भवल्यास कशी खबरदारी घ्यायची Oxygen Mask कुठे आहेत वै गोष्टी दाखवल्या स्थानकातील सर्व अंतराळवीर खूप छान आहेत त्यांनी आम्हाला इथल्या झिरो ग्रॅव्हीटीत कशी काळजी घ्यायची हे शिकवल आणि इतर कामासाठी मदत केली 

इथे प्रवेश केल्यापासूनचा आठवडा अत्यंत व्यस्ततेत गेला खूप काम होत स्थानकातून पृथ्वीवर Space X - कार्गोशीप परत गेल त्यातून स्थानकातील अंतराळवीरांनी संशोधित केलेल्या सायंटिफिक प्रयोगाचे नमुने व इतर सामानाच पॅकिंग केल आम्ही देखील आमचे Blood व इतर आवश्यक Samples घेऊन ते पृथ्वीवर पाठवले आता हळू हळू E.SA संस्थेने सोपविलेले सायंटिफिक संशोधन करण्यास सुरवात करेन मी आल्या आल्या लगेचच CADMOS Expt सुरु केलय सध्या इथे सुरु असलेल्या नासा संस्थेच्या संशोधनात सहभागी झालेय 

सकाळी लवकर उठण्याची सवय असल्यामुळे पहाटे साडे पाचला उठते आणि साडेसात पर्यंत मी रोजची दिनचर्चा आणि व्यायाम करते व्यायामाच्या मशिन्सवर त्या नंतर नासा संस्थेतील सर्व सहभागी देशांच्या लाईव्ह संपर्कात आम्हाला रोजच्या कामाचे ब्रिफींग केल्या जाते त्या नुसार आमच रोजच काम सुरु होत रात्री झोपण्यासाठी स्लीपिंग बॅगचा वापर करावा लागतो माझ्या सहकारी अंतराळवीरांनी मला ती बॅग तयार करून दिलीय स्थानकातील छोट्या जागेत प्रत्येकासाठी छोटी खोली असते मी अजूनही माझ्या सुटकेसमधील सार सामान काढल नाही पृथ्वीसारख इथे सार स्थिर नसत इथे फिरताना खूप काळजी घ्यावी लागते आता मला सर्व बाजूने तरंगत सहजतेने फिरता येतय 

इथे येताना मला माहिती मिळाली होती कि इथे वेगवेगळे आवाज येतात काही स्फोटासारखे असतात पण मी अनुभवी पायलट असल्यामुळे मला अशा आवाजाची सवय आहे काही मशिनरीचे आवाज येतात कधी फ्लॅश चे ,कधी valve सुरु झाल्याचे ,फॅनचे तर कधी इतर पण काही वेळेस काही वस्तू एकमेकांच्या संपर्कात आल्यावर घर्षणाने मधुर संगीताचा आवाज येतो तो श्रवणीय असतो 

आता मी Columbus Module मध्ये आहे  इथे कृत्रिम निळा प्रकाश आहे  फक्त Cupola मध्ये नॅचरल प्रकाश पडतो तिथे दररोज जायला वेळ नसतो त्यामुळे इथून पुन्हा पृथ्वीदर्शन केले नाही मोकळा वेळ सर्वांशी संवाद साधताना मजेत जातो असे तिने सांगितले त्या नंतर सर्वांनी तिला स्थानकातील वास्तव्यासाठी आणि संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या 

Monday, 23 February 2026

युरोपियन स्पेस एजन्सीच्या Proba -2 Satellites मधील अत्याधुनिक कॅमेऱ्याने सुर्याच्या कंकणाकृती ग्रहणाचे विलोभनीय दृश्य टिपले

 Proba-2's view from Earth orbit of an annular solar eclipse

युरोपियन स्पेस एजन्सीच्या Proba-2 Satellites मधील अत्याधुनिक कॅमेऱ्याने टिपलेले कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य -फोटो -ESA संस्था 

 

ESA संस्था - 20 फेब्रुवारी 

ह्या वर्षीचे पहिले सुर्यग्रहण 17 फेब्रुवारीला झाले पण पृथ्वीवरील सर्वभागात ते दिसले नाही आपल्या भारतातुनही आपल्याला ते पहाता आले नाही युरोपियन स्पेस एजन्सीच्या Proba -2 Satellitesमधील अत्याधुनिक कॅमेऱ्याने अंतराळातून सुर्याच्या कंकणाकृती ग्रहणाचे विलोभनीय दृश्य टिपले  

हि खगोलीय घटना अंतराळात घडली एरव्ही चंद्र पृथ्वीभोवती भ्रमण करतो पण 17 तारखेला चंद्र सुर्य आणी पृथ्वी  सरळरेषेत आले त्यामुळे हे सुर्य ग्रहण घडले ह्या ग्रहणकाळात चंद्र पृथ्वी पासून लांब अंतरावरून लंबवर्तुळाकार कक्षेत भ्रमण करत होता आणि चंद्राचा आकार सुर्यापेक्षा लहान असल्यामुळे सुर्य पुर्ण पणे झाकला गेला नाही सूर्याच्या करोना ह्या भागातील अग्नी वलयातील प्रखर प्रकाशमान भाग ऊघडा राहिला त्या मुळे सुर्याभोवती प्रकाशमान कंकणाकृती प्रतिमा निर्माण झाली 

युरोपियन स्पेस एजन्सीच्या Proba -2 Satellites ने SWAP ह्या Extreme ultraviolet imager च्या सहाय्याने वीस सेकंदात हा क्षण टिपला ग्रहणकाळात ह्या कॅमेऱ्याने ह्या पूर्ण घडामोडीचे अनेक फोटो कॅमेराबद्ध केले सूर्याभोवतीची हि कंकणाकृती प्रतिमा 11.31 a.m.( universal time) वाजता निर्माण झाली होती 

हे ग्रहण सर्वत्र दिसले नाही त्यामुळे सर्वांना हे ग्रहण पाहता आले नाही फक्त पृथ्वीवरील काही भागातच हे ग्रहण पूर्ण स्वरूपात दिसले Antarctica येथे पुर्ण कंकणाकृती सुर्यग्रहण दिसले आणी Argentina ,Chile Africa देशाच्या दक्षिण भागात खंडग्रास स्वरूपात दिसले अंतराळातून मात्र  हि ग्रहण प्रक्रिया पुर्णपणे दिसल्यामुळे प्रोबा -2 मधील अत्याधुनिक कॅमेऱ्याने टिपलेल्या ह्या सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य सर्व देशातील नागरिकांना पाहायला मिळाले 

Monday, 16 February 2026

नासाच्या Space X Crew-12 मोहिमेतील अंतराळवीर स्थानकात पोहोचले

 Crew-12 inside the International Space Station 

नासाच्या Space X -Crew 12 चे अंतराळवीर Welcome ceremony दरम्यान स्थानकातील अंतराळवीरांसोबत एकत्रित -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था - (E.SA) 14 फेब्रुवारी 

नासाच्या Space X Crew -12 मोहिमेतील अंतराळवीर Jessica Mier, Jack Hathaway,युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot आणी रशियन अंतराळवीरAndery Fedyaev हे चारही अंतराळवीर स्थानकातील आठ महिन्यांच्या वास्तव्यासाठी शुक्रवारी Space X Crew Dragon मधून अंतराळ स्थानकाच्या दिशेने मार्गस्थ झाले हवामान ऊड्डाणास अनुकुल नसल्यामुळे ह्या अंतराळवीराचे जाणे दोन दिवस लांबले

उड्डाणा आधी ह्या चारही अंतराळवीरांचे उड्डाणपूर्व चेकअप करण्यात आले त्यांचे स्पेससूट आणि इतर आवश्यक गोष्टींचे चेकअप झाल्यानंतर हे अंतराळवीर उड्डाणस्थळी निघाले तेव्हा त्यांना भेटायला त्यांचे नातेवाईक व संस्थेतील मान्यवर उपस्थित होते शुक्रवारी 13 फेब्रुवारीला Space X Crew Dragon ह्या चारही अंतराळवीरांसह सकाळी 5.15a.m.(EST) वाजता (EST)नासाच्या Cape Canaveral Space Force Station Florida येथील Space Launch Complex 40 ह्या उड्डाणस्थळावरून Falcon 9 रॉकेटच्या साहाय्याने स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले

 आणि 14 फेब्रुवारीला दुपारी 3.15p.m.(EST) वाजता Space X Crew Dragon स्थानकाच्या समोरील भागातील Harmony Module जवळ पोहोचले काही वेळाने अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणि स्थानक आणि अंतराळयान ह्यांच्यातील Hatching ,Docking प्रक्रिया पार पडली त्या नंतर ह्या अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला स्थानकात सध्या वास्तव्यास असलेल्या नासाच्या अंतराळवीरांनी ह्या अंतराळवीरांचे स्वागत केले प्रथम युरोपियन अंतराळवीर Sophie ह्यांनी स्थानकात प्रवेश केला त्या नंतर अंतराळवीर Jack अंतराळवीर Andrey आणि शेवटी Jessica ह्यांनी स्थानकात प्रवेश केला 

  Sophie Adenot entering the International Space Station

  युरोपियन अंतराळवीर Sophie अंतराळस्थानकात प्रथम प्रवेश करताना- फोटो ESA -संस्था 

त्या नंतर काही वेळातच नासाच्या Houston Space station येथून नासा प्रमुखांच्या उपस्थितीत ह्या अंतराळवीरांचा स्थानकात Welcome Ceremony पार पडला सुरवातीला स्थानकाचे सध्याचे कमांडरअंतराळवीर Sergey ह्यांनी ह्या अंतराळवीरांचे स्वागत केले 

 Sergey Kud Sverchkov - "हे चारही अंतराळवीर सुखरूप स्थानकात पोहोचले आहेत हे पाहून आम्ही आनंदी झालो आहोत.आम्ही ह्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होतो !"

Jessica - "आमच्या स्वागता बद्दल आभार  Andrey आणि मला पुन्हा स्थानकात प्रवेश करताना छान वाटतय पण आम्हाला Sophie आणि Jack ह्यांच्या प्रथम प्रवेशाचा आनंद पाहण्याची उत्सुकता होती आता मोहीम 74 मधील ह्या वेगवेगळ्या देशातून वातावरणातून आलेल्या ह्या अंतराळवीरांसोबत संशोधन करताना मजा येईल स्वागत तर उत्साहात झाल Sophie आणि माझी फॅमिली आणि मित्र ह्यांना सांगायचे आहे कि,आम्ही इथे सुखरूप पोहोचलो आहोत !"

Jack - "Jessica Thanks ! मला ह्या क्षणी इथे प्रवेश करतानाच्या क्षणाच वर्णन करायला शब्द सुचत नाहीत इथे प्रवेश करताच तरंगण्याचा हा अनुभव मजेशीर आहे खूप सुंदर! ह्या ग्रेट अंतराळवीरांसोबतचा हा अंतराळ प्रवास ग्रेट होता ह्या मोहीम 74 मधील अंतराळवीरांसोबत काम करायला उत्सुक आहे !"

 Sophie - "खरच हा अंतराळप्रवास खूप मजेत केला Jessica आणि Andrey ह्यांच्या पूर्वानुभवाचा फायदा झाला त्यांनी आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्या बद्दल त्यांचे आभार आणि हा प्रवेशाचा अद्भुत क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्वपूर्ण आणि मौल्यवान आहे इथून पृथ्वीच अद्भुत सौन्दर्य आश्चर्यकारक आहे कुठेही सीमारेषा नाही सीमा नाही Mind -blowing! !Jack आणि मी हे प्रथमच पाहील आता भविष्यात त्या बद्दल बोलायला मला नक्कीच आवडेल !"

Andrey - "Kelly Thanks ! मला  सपोर्ट केल्याबद्दल मला माहितीय हे काम खूप कठीण आहे पण तुम्ही उत्कृष्ट काम केल नासा संस्थेतील सर्व टीमचे आभार ह्या मोहिमेतील सहकार्याबद्दल आता मोहीम 74 मधील ह्या अंतराळवीरांसोबत संशोधन करताना मजा येईल !"


Saturday, 14 February 2026

Elysee Palace मधील Celebration कार्यक्रमात French President Emmanuel Macron ह्यांनी अंतराळवीर Sophie ह्यांच्या ऐतिहासिक अंतराळ उड्डाणासाठी शुभेच्छा दिल्या

  ESA astronaut Sophie Adenot speaking with French President Emmanuel Macron

Elysee Palace मधील Celebration कार्यक्रमात French President Emmanuel Macron युरोपियन महिला अंतराळवीर Sophie Adenot ह्यांच्या पहिल्या ऐतिहासिक उड्डाणासाठी नासाच्या लाईव्ह संपर्कांत शुभेच्छा देताना सोबत ESA चे Director General Josef Aschbacher-फोटो -ESA संस्था 


E.SA news  -5  फेब्रुवारी 

नासाच्या Space X Crew -12च्या मोहिमे अंतर्गत स्थानकात वास्तव्यास जाणाऱ्या अंतराळवीरांसोबत युरोपियन महिला अंतराळवीर Sophie Adenot देखील स्थानकात वास्तव्यास जाणार असल्यामुळे E.SA संस्थेत उत्साहाचे वातावरण होते पंचवीस वर्षानंतर महिला अंतराळवीर Sophie Adenot अंतराळ उड्डाण करणार असल्याने नागरिक देखील उत्साहित होते अंतराळवीर Claudie Haignere ह्यांनी प्रथम 1996 मध्ये आणी नंतर 2001 मध्ये अंतराळ प्रवास केला होता त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 25 दिवस वास्तव्य केले आणी तेथे सुरू असलेल्या Critical research मध्ये सहभाग नोंदवला होता

French President Emmanuel Macron ह्यांनी Elysee Palace मध्ये पंचवीस वर्षानंतरच्या Sophie ह्यांच्या ह्या पहिल्या ऐतिहासिक उड्डाणाचे Celebration करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि  Sophie ह्यांचे अभिनंदन करून त्यांना सुरक्षित उड्डाणासाठी शुभेच्छा दिल्या ह्या समारंभाच्या वेळी Sophie उड्डाणपूर्व Quarantine मध्ये असल्याने  President Emmanuel ह्यांनी नासा संस्थेतर्फे लाईव्ह संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधला ह्या शुभेच्छा आणी ऊड्डाणपुर्व पाठिंबा माझ्यासाठी महत्त्वपुर्ण असल्याचे सांगत त्या वेळी तेथे जमलेल्या तरुण आणि उत्साही नागरिकांच्या उपस्थितीत ह्या मोहिमेचा आणि युरोपियन अंतराळविश्वातील महत्वाकांक्षी प्रवेशाचा त्यांनी आनंद व्यक्त केला 

ह्या कार्यक्रमात E.SA चे Director General Josef Aschbacher उपस्थित होते ते म्हणाले,मानवी अंतराळ उड्डाणाचा क्षण अंतराळवीरांसाठी वैयक्तिक आव्हानाचा असतो तसेच देशासाठी,पृथ्वीसाठी संशोधित माहिती मिळविण्याची अमूल्य संधीचाही असतो हि संशोधित माहिती अंतराळविश्वातील भविष्यकालीन अंतराळमोहिमेतील अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी आणि पृथ्वी रक्षण ,विकास आणि मानवी आरोग्यासाठी उपयुक्त ठरते मानवाचा अंतराळ विश्वातील संशोधनाचा हा टप्पा युरोपच्या भविष्यकालीन मोहिमांसाठी उपयुक्त ठरेल अंतराळवीर Sophie ह्यांनी ह्या मोहिमेसाठी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे Burgundy येथील रहिवासी Sophie Adenot ईंजीनियर आणी  France मधील पहिल्या महिला Helicopter test pilot आहेत 2022 मध्ये अंतराळवीर पदासाठी निवड झाल्या पासून ह्या अंतराळ ऊड्डाणासाठीची तयारी करत आहेत स्थानकातील Zero g वातावरणातील वास्तव्यासाठी आवश्यक ट्रेनिंग त्यांनी घेतले आहे 

 

 Elysee Palace मधील Celebration कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि नागरिक -फोटो -ESA संस्था 

Sophie ह्यांनी ह्या मोहिमेला Epsilion नाव दिले असुन ऊड्डाणाआधी त्यांनी ह्या मोहिमेविषयी माहिती दिली त्या म्हणाल्या,"फ्रेंच आणी युरोपियन महिला अंतराळवीर असल्यामुळे आणी पंचवीस वर्षांनी स्थानकात जाण्यासाठी माझी निवड झाली माझ्यासाठी हा क्षण गौरवास्पद आहे माझे लहाणपणीचे अंतराळात जाण्याचे स्वप्न आता पुर्ण होणार म्हणून मी आनंदित आहे E.SA संस्थेने,ह्या देशातील नागरिकांनी मला सन्मानित केल्यामुळे त्यांचा विश्वास  सार्थ ठरवण्याची माझ्यावरील जबाबदारीची मला जाणीव आहे 

स्थानकात माझ्या सहकारी अंतराळवीर मित्रांसोबत आणी ईतर देशातील अंतराळवीरांंसोबत संशोधनात्मक सायंटिफिक प्रयोग करणार आहे मी युरोपियन आणी French led सायंटिफिक प्रयोग करणार आहे मी मानवी आरोग्यावर आधारित सायंटिफिक प्रयोगाला प्राधान्य देणार आहे आम्ही Echo Finder ह्या CNS आणी CADMOS ह्यांनी विकसित केलेले सायंटिफिक प्रयोग करणार आहोत Zero g मध्ये AI च्या मदतीने Ultra sound effect मधील होणाऱ्या बदलांचे निरीक्षण नोंदवून संशोधीत माहिती गोळा करणार आहोत 

युरोपियन स्पेस एजन्सी मधील शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या E4D ह्या अत्याधुनिक Exercise machine ची चाचणी देखील घेणार आहे अंतराळस्थानकातील अंतराळवीर आणी भविष्य कालिन चंद्र मोहिमेतील अंतराळविरांच्या निरोगी आरोग्यासाठी स्थानकात व्यायाम करण्यासाठी हे व्यायामाचे ऊपकरण तयार करण्यात आले आहेत

शिवाय 4500 फ्रेंच शाळेतील विद्यार्थ्यांनाही ह्या मोहिमेत सहभागी करण्यात आले असून ChorISS ह्या सायंटिफिक प्रयोगाअंतर्गत पृथ्वीवर आणी अंतराळात बियांणांची लागवड करून अंतराळातील Zero g मधील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रीम बागेत आणी पृथ्वी वरील सुर्यप्रकाशात वाढणाऱ्या रोपांच्या फरकातील निरक्षीत संशोधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे 

युरोप आणी फ्रान्स देशाचा अंतराळविश्वातील ह्या मोहिमेतील एकत्रित सहभाग ह्या देशातील,विश्वातील लोकांसाठी त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी,पृथ्वी संरक्षणासाठी आणी औद्योगिक विकासासाठी आवश्यक आहे शिवाय सायन्स आणि अत्याधुनिक संशोधीत यंत्रणा निर्माण करण्यासाठी हि एकत्रित मोहीम ऊपयुक्त ठरणार आहे

पंचवीस वर्षानंतरचा Sophie ह्यांच्या ह्या अंतराळस्थानकातील प्रवेशाचा हा ऐतिहासिक क्षण भावी अंतराळवीरांसाठीची पाऊलवाट ठरेल अशी प्रतिक्रिया ESA संस्थेतील मान्यवरांनी ह्या वेळी व्यक्त केली 

Tuesday, 3 February 2026

नासाच्या Space X -Crew 12 अंतराळमोहिमेतील चार अंतराळवीर स्थानकात जाणार

 Four side-by-side astronauts in white spacesuits look toward the camera.

 नासाच्या  Space X Crew -12 चे अंतराळवीर Jessica Meir ,Jack Hathaway युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot आणि रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev -फोटो -नासा संस्था 

  नासा संस्था - 3 फेब्रुवारी 

नासाच्या Space X -Crew 12 अंतराळमोहिमेअंतर्गत नासाचे अंतराळवीर Jessica Meir,Jack Hathaway,युरोपियन अंतराळवीर Sophie Adenot आणि रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात जाणार आहेत ह्या मोहिमेतील कमांडरपद नासाच्या अंतराळवीर Jessica Meir पायलटपद अंतराळवीर Jack Hathaway सांभाळणार असून अंतराळवीर Sophie Adenot आणि अंतराळवीर Andrey Fedyaev हे दोघे मिशन स्पेशॅलिस्ट पद सांभाळणार आहेत 

Space X Crew Dragon ह्या चारही अंतराळवीरांसह नासाच्या Florida येथील Cape Canaveral Space Force Station मधील Launch Complex 40 ह्या उड्डाणस्थळावरून Falcon -9 रॉकेटच्या सहाय्याने स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावेल 

अंतराळवीर Jessica ह्यांची हि दुसरी अंतराळवारी असून नासाच्या अंतराळमोहीम  61/62 अंतर्गत त्या स्थानकात गेल्या होत्या ह्या मोहिमेत त्या Flight Engineer पदी कार्यरत होत्या आणि त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 205 दिवस वास्तव्य केले आणि पहिल्या तीन All Woman Space Walk मध्ये Christina Koch ह्यांच्या सोबत सहभाग नोंदवून 21 तास 44 मिनिटांचा Space Walk करण्याचा विक्रम प्रस्थापित केला होता 

अंतराळवीर Andry ह्यांची हि पहिलीच अंतराळवारी असून ते पहिल्यांदाच स्थानकात वास्तव्यास जाणार आहेत 2021मध्ये त्यांची नासा संस्थेत अंतराळवीरपदासाठी निवड झाली ते US Navy मध्ये कमांडरपदी कार्यरत होते ते अनुभवी पायलट असून त्यांनी वेवेगळ्या तीस Aircraft मधून 2500 तास उड्डाण केले आहे 

युरोपियन अंतराळवीर Sophie ह्याही प्रथमच स्थानकात वास्तव्यास जाणार असून त्यांची हि पहिलीच अंतराळयात्रा आहे त्या Engineer आहेत त्यांनी Aircraft Flight Dynamics आणि Helicopter Cockpit Design Engineer, Air Bus Helicopters Design Engineer मध्ये Specialization केले त्या नंतर त्यांनी 2008-2012 पर्यंत Cazaux Air Base मध्ये Search & Rescue Pilot पदी काम केले आणि त्या Flight Test Center DGA येथे Test Pilot पदी कार्यरत होत्या त्या दरम्यान त्यांनी 22 वेगवेगळ्या Aircraft मधून 3000 तास उड्डाण केले आहे 

Fedyaev ह्यांची हि तिसरी अंतराळवारी आहे ते Aircraft Operations Air Traffic Organization Specialist Pilot Engineer आहेत त्यांनी 38 Aircraft मधून 600तास उड्डाण केले आहे  2012 मध्ये त्यांची Gagarin Research &Test Cosmonaut Training Center Cosmonaut Crop मध्ये निवड झाली तेथे 2014 पर्यंत  ते Test Cosmonaut पदी कार्यरत होते 2023मध्ये नासाच्या Space X Crew -6 मोहिमेअंतर्गत ते स्थानकात गेले त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 156 दिवस वास्तव्य केले आणि अंतराळ मोहीम 69चे Flight Engineer पद सांभाळले होते त्यांच्या यशस्वी कर्तृत्वा मुळे त्यांना Hero Of The Russian Federation तर्फे Yuri Gagarin Medal देऊन सन्मानित करण्यात आले 

हे चारही अंतराळवीर सहा फेब्रुवारीला उड्डाणपूर्व दोन आठवडे Quarantine मध्ये राहण्यासाठी नासाच्या Johnson Space Center Florida येथे जाणार असून उड्डाणाची निश्चित तारीख ठरली नसली तरीही हे अंतराळवीर 11ते 13फेब्रुवारी दरम्यान स्थानकात जाण्यासाठी उड्डाण करतील असे नासा संस्थेतर्फे जाहीर करण्यात आले आहे 


Wednesday, 28 January 2026

नासाच्या Artemis II मोहिमेतील आंतराळवीरांचा उड्डाणाआधीच्या Quarantine मध्ये प्रवेश

  The four Artemis II astronauts pose for a photo in front of an Orion simulator. The crew members are in matching grey polo shirts with their mission insignia.

नासाच्या आर्टीमस मोहिमेतील अंतराळवीर Johnson Space Center Florida येथील Orion Simulator समोर -फोटो -नासा संस्था 

 

नासा संस्था -(Space News) -23 जानेवारी  

अमेरिकेच्या पन्नास वर्षांनी सुरु झालेल्या चंद्र मोहिमेची तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे नासाच्या Artemis II मोहिमेअंतर्गत नासाचे अंतराळवीर Ried Wisewman ,Victor Glover ,Christina Koch आणि कॅनडाचे अंतराळवीर चंद्रावर जाणार आहेत आणि तेथील वातावरणातील आणि भूगर्भातील संशोधित माहिती गोळा करणार आहेत 

त्यांच्या ह्या दहा दिवसांच्या मोहिमेत ह्या आंतराळवीरांची तब्येत ठीक राहावी त्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्गजन्य आजार होऊ नये आणि कुठलीही समस्या निर्माण होऊन मोहिमेला उशीर होऊ नये ह्या साठी नासा संस्थेतर्फे ह्या चारही अंतराळवीरांना Quarantine मध्ये ठेवण्यात आले आहे अंतराळ मोहिमेआधी नासाच्या Health Stabilization Program अंतर्गत ह्या अंतराळवीरांच्या निरोगी आरोग्यासाठी चौदा दिवस क्वारंटाईन मध्ये ठेवले जाते

हे अंतराळवीर फेब्रुवारी महिन्यात चंद्रावर जाण्यासाठी उड्डाण करणार असून अजून निश्चित तारीख जाहीर झाली नाही सध्या आर्टीमस मोहिमेतील Orion अंतराळयान आणि रॉकेट उड्डाणस्थळी दाखल झाले असून अंतिम Test करण्यात येत आहे Wet Dress rehearsal व इतर Testing होईपर्यंत ह्या आंतराळवीरांचे क्वारंटाईन संपेल सध्या हे अंतराळवीर नासाच्या Huston Space Center येथील Astronaut Crew Quarter मध्ये रहात असून उड्डाणाच्या सहा दिवस आधी ते नासाच्या Kennedy Space Center Florida येथे दाखल होतील 

क्वारंटाईन मध्ये रहात असले तरीही क्वारंटाईनचे नियम पाळून हे अंतराळवीर त्यांच्या कुटुंबीयांसोबत व मित्रांसोबत फोनवरून संपर्क साधू शकतात ह्या अंतराळवीरांना मास्क वापरावा लागेल आणि लोकांच्या संपर्कात गेल्यास ठराविक अंतर ठेवावे लागेल 

Saturday, 24 January 2026

Blue Origin NS -38 मोहिमेतील सहा प्रवासी अंतराळ पर्यटनावरून परतले

Blue Origin - NS -38 मोहीमेतील अंतराळ पर्यटक Dr.Laura Stiles,Alain Fernandez,Alberto,Dr Linda,Tim &Jim Hendren- फोटो -Blue Origin 


Blue Origin -22 जानेवारी 

Blue Origin NS -38 मोहिमेअंतर्गत सहा अंतराळ प्रवासी  22 तारखेला अंतराळ पर्यटनावरून परतले Blue Origin च्या व्यावसायिक अंतराळ पर्यटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने हि अंतराळ पर्यटन सेवा आता नियमित सुरु झाली आहे ह्या मोहिमे अंतर्गत अंतराळ पर्यटनास गेलेल्या प्रवाशांमध्ये Tim Drexler, Dr.Linda Edwords, Alain Fernandez, Alberto Gutierrez, Jim Hendren  आणी Laura Stiles ह्यांचा समावेश होता Tim  रिटायर्ड पायलट आणि Entrepreneur ,Linda Gynecologist Alain रियल इस्टेट डेव्हलपर,Alberto रिटायर्ड US Air force Colonel Jim आणि Laura डायरेक्टर New Shepard Launch Operations मध्ये कार्यरत आहेत  

हे सहाही प्रवासी 22 तारखेला Blue Origin च्या West Texas येथील ऊड्डाणस्थळावरुन 11.25a.m. वाजता New Shepard अंतराळ यानातुन रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात झेपावले काही वेळाने यानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यरत झाली आणी यान रॉकेट पासून वेगळे झाले आणी अत्यंत वेगाने अंतराळात पुढील प्रवासास मार्गस्थ झाले  अंतराळपर्यटनास निघण्याआधी सर्वजण अंतराळप्रवासाचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी उत्सुक झाले होते 

अंतराळयान अत्यंत वेगाने अंतराळातील अंतर कापत पृथ्वी व अंतराळ ह्याच्या मधील 62 मैल अंतरावरील कर्मन रेषेपर्यंत पोहोचले आणि काही क्षणातच यानाने अंतराळातील झीरो ग्रॅव्हिटीत प्रवेश केला तेव्हा ह्या सहाही प्रवाशांनी अंतराळातून खाली पृथ्वीसौन्दर्य पाहण्याचा आणि अंतराळातील वजनरहित अवस्थेत तरंगण्याचा आनंद लुटला  सर्वांच्या तोंडुन Oh! My God! Its Unbelievable ! Awesome! WOW! Exceptional ! अशा ऊत्स्फुर्त प्रतिक्रिया बाहेर पडल्या

अवघ्या दहाबारा मिनिटात पृथ्वी ते अंतराळ असा प्रवास करुन झीरो ग्रॅव्हिटीतील वजनरहित अवस्थेत काही मिनिट पक्षाप्रमाणे तरंगण्याचा अदभूत आनंद (जो पृथ्वीवर घेता येत नाही )अनुभऊन हे सर्व प्रवासी अंतराळ पर्यटनावरुन पृथ्वीवर परतले तेव्हाहि त्यांनी अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या 

 

अंतराळपर्यटक Laura Stiles अंतराळातील प्रवासादरम्यान-फोटो -Blue Origin 

"अंतराळातील प्रवास रॉकेट आणि यानाचे सेपरेशन प्रचंड अंधार ,त्यानंतरचा अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतील वरखाली सर्व बाजूने तरंगण्याचा अद्भुत आनंद सारच आश्चर्यजनक! Alain  म्हणाले "! "Airforce Pilot आणि Civillian pilot असल्यामुळे माझ्यासाठी हा अनुभव वेगळा होता Soundच्या वेगापेक्षा तिप्पट वेगाने यानातून केलेल्या ह्या अंतराळपर्यटनाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही अविश्वसनीय !"  Jim म्हणाले, Laura  म्हणाल्या "दोन दिवसांपूर्वी अचानक माझी निवड झाली तेव्हाचा क्षण अत्यंत रोमांचक होता ह्या पर्यटन मोहिमेसाठी संस्थेतील अनेकजण अहोरात्र मेहनत घेतात त्यांचे आभार अंतराळातील प्रचंड अंधार ,झिरो ग्रॅव्हीटीतील अद्भुत तरंगण्याचा अनुभव ,तिथून पृथ्वीदर्शन आणि चंद्रदर्शन सारच माझ्या स्वप्नवत होत माझ्या अपेक्षेपेक्षाही सुंदर !"

ह्या सर्व प्रवाशांना Blue Origin co.ने त्यांची कर्तुत्व वैशिष्ट्ये कोरलेला NS-38 Patch आणी अंतराळवीर झाल्याचे सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले 

  

NS-38 पर्यटक चिन्ह -खिडक्यामधील नागरिक ,कर्मनरेषा -Drexler ह्यांची अंतराळतील कर्मनरेषा पाहण्याची महत्त्व कांक्षा ,Cu &Fly -Yaffe ह्यांच्या दिवंगत वडिलांसाठी ते नामवंत Copper उद्योजक होते आणि Fly त्यांच्या आईच्या नावाची आद्याक्षरे ,Diamond DA42S Gutierrezs & DreXlers च्या उड्डाणप्रेमाचे चिन्ह ,F-15 Hendron & Son ह्यांच्या एकत्रित उड्डाणाचे चिन्ह Eagle,Stethoscope & Female -Edward ह्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातील अनुभवाचे आणि यशाचे प्रतीक आणि A Beacon Of Light -Fernandez ह्यांच्या जीवनातील बोधवाक्याकाचे प्रतीक 

ह्या वर्षातील हे पहिले अंतराळपर्यटन होते आणि आजवरची हि सतरावी मानवी अंतराळपर्यटन मोहीम होती आजवर 98 नागरिकांनी अंतराळ पर्यटन केले आहे ह्या वर्षात प्रवेश करतानाच हि पर्यटनसेवा आणखी नियमित करण्याचे आम्ही ठरवले होते ह्या मोहिमेद्वारे अंतराळपर्यटन करणाऱ्या नागरिकांचा अनुभव आणि  Blue Origin ची विश्वासहर्ता,सुरक्षितता आणि  तंत्रज्ञान क्षमता ह्यामुळे आमच्या व्यावसायिक अंतराळ पर्यटनाला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि यश मिळत आहे असे Blue Origin चे वरिष्ठ उपाध्यक्ष Phil Joyce म्हणतात 

Saturday, 17 January 2026

नासाच्या अंतराळ मोहीम Space X Crew-11चे अंतराळवीर पृथ्वीवर परतले

  Spacecraft splashes down in ocean.

 Space X Crew Dragon चारही अंतराळवीरांसह California मधील San Diego येथील समुद्रात खाली उतरताना -फोटो -नासा संस्था  

नासा संस्था -16 जानेवारी    

नासाच्या Space X Crew-11चे अंतराळवीर Mike Fincke,Zena Cardman जपानचे अंतराळवीर kimiya Yui आणी रशियन अंतराळवीर Oleg Platonov गुरुवारी 15 जानेवारीला पृथ्वीवर सुरक्षीत परतले ह्या चारही अंतराळविरांसह Space X Crew Dragon  बुधवारी 5.20a.m.वाजता पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकातून बाहेर पडले आणि गुरुवारी 12.41a.m.(स्थानिक वेळ) वाजता California मधील San Diego येथील समुद्राच्या खाडीत सुरक्षित पणे खाली ऊतरले 

पृथ्वीवर येण्यासाठी निघण्याआधी अंतराळस्थानकात नासाच्या लाईव्ह संपर्कात ह्या अंतराळवीराचा Farewell आणी Change the Command ceremony पार पडला त्या वेळी अंतराळवीरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले 

नासाच्या Houston Space Center मधील प्रमुखांनी त्यांचे स्वागत केले व कार्यक्रमाला सुरवात झाली 

Mike- नासा संस्थेतील मान्यवर आणि मित्र ह्यांचे स्थानकात स्वागत आम्ही इथे Change the Command ceremony साठी जमलो आहोत आज Farewell Ceremony पण आहे ह्या सुंदर अंतराळस्थानकातुन बाहेर पडतानाचा क्षण माझ्या साठी दुःखी आहे पण आज तितकाच महत्त्वाचा दिवस पण आहे आमच्या मोहीम 74 मधील आम्ही चौघे पृथ्वीवर परतत आहोत ऊर्वरित अंतराळवीर नव्या नेतृत्वाचे स्वागत करणार आहेत आणी लवकरच स्थानकात वास्तव्यास येणाऱ्या Space X Crew-12 मधील अंतराळवीरांच्या स्वागताची तयारी करीत आहेत ह्या अंतराळ स्थानकात पंचवीस वर्षांपासून सतत अंतराळवीर वास्तव्यास येतात आणि नवनवीन संशोधन करतात जगभरातील नासा संस्थेतील इंजिनीयर तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञांनी बनविलेले हे अंतराळस्थानक म्हणजे मानवी उत्कृष्टतेच असामान्य प्रतीक आहे अंतराळातील झिरो ग्रॅव्हीटीतल्या ह्या फिरत्या स्थानकातील सायंटिफिक लॅब,इथली सायन्स संशोधनाची सुविधा आणि व्यवस्थापन सारच आश्चर्यकारक आहे माझा इथला वास्तव्याचा काळ मजेत गेला मोहीम 73 आणि 74 मधील अंतराळवीरांची टीम खूप छान होती माझा मित्र Scott Kelly म्हणतो Spaceflight is biggest team sport अगदी तशीच आमची टीम ग्रेट होती प्रत्येक जण कठीण प्रसंगी सुखदुःखाच्या प्रसंगी मदतीला धावला त्या बद्दल सर्वांचे आभार सर्वांनी कठोर मेहनतीने संशोधनात सहकार्य केले आपण एकत्र मजेत वेळ व्यतीत केला  मी काही जोक केले ते विशेष नव्हते तरीही मी प्रयत्न करीत राहिलो आता निरोपाची वेळ आलीय मी  माझे कमांडरपद आणि स्थानकाची चावी अंतराळवीर Sergey ह्यांच्या हाती सोपवत आहे 

astronauts in blue aboard the ISS 

 Space X Crew -11 चे अंतराळवीर Mike Change The Command Ceremony दरम्यान स्थानकातील अंतराळवीरांसोबत फोटो -नासा संस्था 

Sergey -Thank You ! हा माझा बहुमान आहे ! आपण सर्वांनी मिळून ह्या कठीण प्रसंगी  इथल संशोधन Maintenance आणि इतर कार्य सुरु ठेवल आणि नासा संस्थेतील जगभरातील पार्टनर्सचे देखील आभार त्यांनी मला हा बहुमान दिला आणि वेळोवेळी आम्हाला इतक्या दुरून पृथ्वीवरून मार्गदर्शन केल मदत केली आम्ही हे कार्य असच सुरु ठेवून यशस्वी करू आता कमांडर पद स्वीकारल्यानंतर माझी तुम्हाला पहिली आज्ञा आहे आपण सर्वजण मिळून एकमेकांचा निरोप घेऊ आमची आठवण ठेवा! असे म्हणत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला आणि हे चारही अंतराळवीर पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले 

Space X Crew Dragon ह्या चारही अंतराळवीरांसह सुरक्षितपणे समुद्रात खाली उतरल्यानंतर नासाचे Shannon रिकव्हरी जहाज व दोन रिकव्हरी बोट तेथे पोहोचल्या रिकव्हरी बोटींच्या सहाय्याने Space X Crew Dragon (Endeavour )अंतराळयानाला जहाजावर चढवण्यात आले जहाज आणी अंतराळयान ह्यांच्यातील Docking Hatching प्रक्रिया पार पडल्यानंतर नासाच्या रिकव्हरी टिममधील डॉक्टरांनी अंतराळयानात प्रवेश करून ह्या अंतराळविरांचे प्राथमिक चेकअप केले आणी अंतराळवीरांना एकामागून एक बाहेर काढले प्रथम अंतराळवीर Mike Fincke,Zena Cardman,Kimiya Yui आणी शेवटी Oleg Platonov अंतराळयानातुन बाहेर आले तेव्हा आनंदी दिसत होते त्यांनी सर्वांंना हसतमुखाने अभिवादन केले 

NASA’s SpaceX Crew-11 crew returns to Ellington Field’s Guppy Hangar in Houston on Jan. 16, 2026, from left to right is Roscosmos cosmonaut Oleg Platonov, NASA astronauts Mike Fincke, and Zena Cardman, and JAXA (Japan Aerospace Exploration Agency) astronaut Kimya Yui.

रशियन अंतराळवीर Oleg Platonov नासाचे अंतराळवीर Mike Fincke ,Zena Cardman आणि जपानचे अंतराळवीरो Kimiya Yui 16 तारखेला Houston येथे पोहोचल्यानंतर -फोटो -नासा संस्था 

अंतराळयानातुन बाहेर आल्यानंतर ह्या अंतराळवीरांचे रिकव्हरी कॅम्प मध्ये प्राथमिक चेकअप करण्यात आले आणी पुढील चेकअप साठी स्थानिक हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले तेथे अंतराळवीरांना रात्रभर ठेवण्यात आले व आवश्यक ते उपचार देण्यात आले ऊड्डाणानंतरच्या सर्व प्रक्रिया पार पडल्यावर नासाच्या विमानाने त्यांना Houston येथील संस्थेत पोहोचविण्यात आले 

हे अंतराळवीर एक ऑगस्टला स्थानकात सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी गेले होते आणि 167 दिवसांच्या वास्तव्यानंतर पृथ्वीवर परतले त्यांच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभाग नोंदवला आणि स्थानकाचा 25 वा वर्धापन दिन आणि अनेक सण साजरे केले अंतराळवीर Mike चवथ्यांदा स्थानकात वास्तव्यास  गेले होते त्या दरम्यान त्यांनी स्थानकात 549 दिवस वास्तव्य केले अंतराळवीर Kimiya दुसऱ्यांदा वास्तव्यास गेले होते अंतराळवीर Zena आणि Oleg मात्र पहिल्यांदाच स्थानकात वास्तव्यास गेले होते 

Sunday, 11 January 2026

नासाच्या Space X Crew-11 अंतराळ मोहिमेतील अंतराळवीर मोहीम पूर्ण होण्याआधीच पृथ्वीवर परतणार

  astronauts in white spacesuits pose for portraits

 नासाच्या Space X Crew -11 अंतराळ मोहीमेतील रशियन अंतराळवीर Oleg Platonov नासाचे अंतराळवीर Mike Fincke आणि Zena Cardman जपानचे अंतराळवीर Kimiya Yui-फोटो -नासा संस्था 

 

नासा संस्था- 9 जानेवारी 

नासाच्या Space X crew 11 अंतराळ मोहिमे अंतर्गत नासाचे अंतराळवीर Zena Cardman ,Mike Fincke जपानचे अंतराळवीर Kimiya Yui आणि रशियन अंतराळवीर Oleg Platonov सहा महिन्यांच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते पण हे चारही अंतराळवीर मोहिम पुर्ण होण्याआधीच पृथ्वीवर परतणार आहेत ह्या चार अंतराळविरांपैकी एकाची तब्येत बिघडल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे 

हे चारही अंतराळवीर बुधवारी 14 जानेवारीला संध्याकाळी पाच वाजता स्थानकातून पृथ्वीवर येण्यासाठी स्थानका  बाहेर पडतील आणी गुरुवारी दुपारी 3.40 मिनिटांनी पृथ्वीवर परततील पृथ्वीच्या कक्षेत शिरताच Space X Crew Dragon ह्या चार अंतराळवीरांसह California येथील समुद्राच्या खाडीत खाली ऊतरेल

हे अंतराळवीर स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आठ तारखेला Space Walk करणार होते पण सात तारखेला अचानक एका अंतराळवीराची तब्येत बिघडल्यामुळे हा Space Walk रद्द करून पुढे ढकलण्यात आला सध्या त्या अंतराळवीराची तब्येत स्थिर आहे हे अंतराळवीर पृथ्वीवरील नासा संस्थेतील डॉक्टरांच्या संपर्कात आहेत आणि त्यांच्या सल्यानुसार आजारी अंतराळवीरावर उपचार करीत आहेत परंतु अंतराळविराच्या सुरक्षिततेसाठी आणी पृथ्वीवर योग्य ऊपचार देण्यासाठी आठ जानेवारीला अंतराळवीरांना पृथ्वीवर आणण्याचा हा निर्णय घेण्यात आला नेमका कुठला अंतराळवीर आजारी आहे त्याला काय झाले आहे ह्याची माहिती मेडिकल प्रायव्हसी मुळे सांगण्यात आली नाही 

गेल्या पंचवीस वर्षात पहिल्यांदाच ह्या सर्व अंतराळवीरांना मोहीम पूर्ण होण्याआधीच पृथ्वीवर परत आणण्यात येणार आहे ह्या अंतराळवीरांना इमर्जन्सी मध्ये मेडिकल उपचार करण्यासाठीचे ट्रेनिंग आणि मेडिकल किट औषध गोळ्या दिलेल्या असतात पण काही उपचार  झिरो ग्रॅविटीत करता येत नाहीत तिथे आवश्यक अत्याधुनिक उपकरणे नसतात फक्त पृथ्वीवरच उपचार करणे आवश्यक असते शिवाय हे चारही अंतराळवीर ऑगष्ट महिन्यात सहा महिन्याच्या वास्तव्यासाठी स्थानकात गेले होते आणि त्यांची मोहीम पूर्ण होत आली होती पण नासा संस्था नेहमीच अंतराळवीरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देते त्या मुळे डॉक्टरांच्या सल्यानुसार हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असे नासाचे  Administrator Jared Isaacman म्हणतात 

Tuesday, 6 January 2026

नासाच्या आर्टीमस II मोहिमेतील अंतराळवीरांची उड्डाणपूर्व तयारीची चाचणी संपन्न

 https://www.nasa.gov/wp-content/uploads/2025/12/54995898021-a2402a1f4f-o.jpg

 कॅनडाचे अंतराळवीर Jeremy Hansen नासाची अंतराळवीर Christina Koch ,Victor Glover आणि Reid Wiseman नासाच्या Kennedy Space Center मधील उड्डाणपूर्व चाचणीसाठी एकत्रित -फोटो -नासा संस्था 

 

 नासा संस्था - 6 जानेवारी 

अमेरिकेची चंद्र मोहीम पन्नास वर्षांनी पुन्हा सुरु झाल्यानंतर नासाच्या आर्टीमस II मोहिमेतील अंतराळवीर Jeremy Hansen ,Christina Koch,Victor Glover Reid Wiseman हे चार जण ह्या वर्षी चंद्रावर जाणार आहेत चंद्रभूमीवर पाऊल टाकून  तेथील भूमीवरील,भूगर्भातील व वातावरणातील संशोधित माहिती आणि पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचा शोध घेणार आहेत आता त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे ह्या मोहिमेच्या पूर्व तयारी साठी वीस डिसेंबरला नासाच्या Kennedy Space Center Florida येथे ह्या अंतराळवीरांची उड्डाणपुर्ण चाचणी घेण्यात आली  

ह्या मोहिमेतील  Orion Space Craft ,Rocket,Launch System आणि Ground System ह्यांची अंतिम चाचणी इंजिनीअर्स करीत आहेत त्यामुळे ह्या अंतराळवीरांची उड्डाणपूर्व चाचणी प्रत्यक्ष उड्डाणस्थळी न होता Kennedy Space Center मधील Vehicle Assembly Building मध्ये घेण्यात आली ह्या चारही अंतराळवीरांची उड्डाणपूर्व चाचणी प्रक्रिया प्रत्यक्ष उड्डाणाच्या दिवसाप्रमाणे पार पडण्यासाठी उड्डाणपुर्वीच्या अंतिम क्षणासाठी घड्याळाची वेळ देखील सेट करण्यात आली होती ह्या साठी अंतराळवीरांना Launch आणि Flight Control टीमने सहकार्य केले ह्या अंतराळवीरांनी उड्डाणासाठी आणि नंतर प्रवेशासाठीचे स्पेससूट परिधान करून सुरक्षितता आणि परिपूर्णतेचा खात्री केली ह्या अंतराळवीरांच्या Orion Crew Survival System Spacesuits ची चाचणी Kennedy Space Center मधील Astronauts Crew Quarters येथील Neil A.Armstrong Operations & Checkout Building मध्ये घेण्यात आली 

ह्या अंतराळवीरांनी स्पेस सूट परिधान केल्यानंतर त्यांनी Gemini ,Apollo,Space Shuttle आणि Commercial Crew Program मोहिमेतील अंतराळवीरांनी साठ वर्षांपूर्वी उड्डाणापूर्वी Florida Space Coast वर केला होता तसा Walk केला त्यांनी Suit-up room ,Hallway आणि Elevator मधून जलद फेरी मारली हे अंतराळवीर जेव्हा दोन दारांच्या मध्ये असलेल्या डझनभर मानवी उड्डाण मिशन पॅच,स्टिकर्स असलेल्या इमारतीतून बाहेर पडले तेव्हा उत्साहित झाले होते बाहेर त्यांना प्रत्यक्ष उड्डाणाच्या वेळेच्या Space Launch System Rocket स्थळी नेण्यासाठी नासाची Artemis Astronaut Van हजर होती उड्डाणाच्या दिवशी हेअंतराळवीर वीस मिनिटात Kennedy Space Center  येथील 39 B उड्डाणस्थळी पोहोचतील पण हि उड्डाणपूर्व चाचणी असल्यामुळे Kennedy Space Center मधील Vehicle Assembly Building High Bay-3वर हि प्रक्रिया पार पडली जिथे आर्टीमस II Moon Rocket Launch Pad वर नेण्याआधी अंतिम चेकअप सुरु आहे ह्या अंतराळवीरांना सपोर्ट करण्यासाठी आर्टीमस II मोहिमेतील Backup Crew member,नासाचे अंतराळवीर Andre Douglasआणि कॅनडाचे अंतराळवीर Jenni Gibbons चाचणीस्थळी हजार होते 

ह्या इमारतीत काही वेळ फिरल्यानंतर हे अंतराळवीर Mobile Launcher Elevator च्या साहाय्याने 300 फूट उंचीवरील Crew access arm &White room पर्यंत पोहोचले जिथून हे अंतराळवीर अंतराळयानात प्रवेश करतात तेथे हजर असलेल्या Closeout Crew नी त्यांना Orion अंतराळयानातील (अंतराळवीरांनी त्याचे नामकरण Integrity केले आहे) सीटवर बसण्यासाठी सीटबेल्ट बांधण्यासाठी मदत केली आणि इतर Closeout प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षिततेची खात्री केली आणि Hatch Close केले त्यानंतर पुन्हा अंतराळवीरांनी स्पेस सूट लिकेज आणि Communications checkup पूर्ण केले  ह्या सर्व चाचणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साडेपाच तास लागले प्रत्यक्ष उड्डाणाआधी तीस सेकंदाच्या count down आधी सुरक्षिततेसाठी ह्या पुर्व चाचणीची आवश्यकता असते 

आर्टीमस मोहिमेतील अंतराळयान त्यातील सर्व यंत्रणा आणि अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठी ह्या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी हि सुरक्षित उड्डाणपूर्व परिपूर्णता चाचणी घेण्यात आली