नासा संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रीम मंगळभुमीत HERA मोहिमेतील अंतराळविरांच्या प्रतिनिधींनी Loft area मधील Plant growth chamber मध्ये उगवलेल्या Lettuce च्या भाजी सोबत काढलेला फोटो-फोटो -नासा संस्था
नासा संस्था -25-जुन
नासाच्या भविष्य कालीन मंगळ मोहिमेत अंतराळवीर मंगळावर जाणार आहेत तिथे मानवी वास्तव्यासाठी पृथ्वी सारखे पोषक वातावरण असलेल्या ठिकाणाचा शोध घेऊन मंगळावरील संशोधित माहिती मिळवणार आहेत ह्या मोहिमेची पूर्वतयारी सध्या नासा संस्थेतील शास्त्रज्ञ करीत आहेत त्या साठी नासाच्या J.PL संस्थेतील शास्त्रज्ञांनी संस्थेतील मोकळ्या जागेत मंगळासारखे वातावरण असलेली कृत्रीम मंगळभूमी निर्माण केली आहे मंगळ मोहिमेतील अंतराळविरांची मोहीम सुरक्षित होण्यासाठी आणी मंगळावरील वातावरणाचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हे संशोधीत करण्यासाठी HERA मोहीम राबविण्यात येत आहे
HERA mission मधील अंतराळवीरांचे प्रतिनिधी नासाच्या शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगळ भूमीत प्रवेश करताना -फोटो -नासा संस्था
ह्या मोहिमे अंतर्गत Jason Lee ,Stephanie Navarro,Shareef Al Romaithi आणि Piyumi Wijesekara हे चार धाडसी नागरिक ह्या मोहीमेत सहभागी झाले होते भविष्यकालीन मंगळ मोहिमेतील अंतराळविरांचे प्रतिनिधीत्व करणारे हे धाडसी नागरिक 10 मेला नासाच्या JPL संस्थेतील शास्त्रज्ञ निर्मित पृथ्वीवरील कृत्रीम मंगळभुमीत 45 दिवसांच्या वास्तव्या साठी गेले होते आता 24 जुनला ते ह्या भुमीतील वास्तव्य संपवुन परतले
HERA Mission मधील सहभागी अंतराळवीरांचे प्रतिनिधी Shareef Al Romaithi आणि Josan Lee नासा संस्थेतील कृत्रिम मंगळ भूमीतील Plant Growth Chamber मध्ये उगवलेली Lettuce च्या भाजीची पाने दाखवताना -फोटो -नासा संस्था
ह्या अंतराळविरांचे प्रातिनिधित्व करणाऱ्या धाडसी नागरिकांना ह्या कृत्रीम मंगळभुमीत बंदिस्त करण्यात आले होते त्यांंना त्यांच्या कुटुंबीयांपासुन दुर ठेवण्यात आले होते फक्त नासा संस्थेतील प्रमुख त्यांच्या संपर्कात होते
ह्या 45 दिवसांच्या वास्तव्यासाठी त्यांना भविष्यकालिन मंगळ मोहिमेतील अंतराळवीरांसाठी आवश्यक असलेल्या अंतराळवीरांसारखे ट्रेनिंग देण्यात आले होते त्यांनी ह्या शास्त्रज्ञ निर्मित मंगळ भुमीत सध्या अंतराळ स्थानकात रहात असलेल्या अंतराळ विरांसारखाच Space Walk केला संशोधनात सहभाग नोंदवला आणी रोपांची लागवड देखील केली भविष्य कालीन मंगळ मोहिमेतील अंतराळविरांना पृथ्वीवरील अन्नावर अवलंबून न रहाता ताजे व पोषक अन्न मिळावे ह्या साठी त्यांना मंगळभूमीत अन्न भाजी,फळे ह्यांची लागवड करावी लागेल त्या साठी मंगळासारख्या वातावरणात आणी मातीत रोपांची लागवड करण्यात येत आहे ह्या चार अंतराळवीरांच्या प्रतिनिधींनी ह्या कृत्रीम मंगळ भुमीतील Loft Area मधील Plant Growth Chamber मध्ये Lettuceच्या रोपाची लागवड केली आता त्यांची वाढ झाली आहे ह्या प्रतिनिधित्व करणाऱ्या ऊमेदवारांनी ह्या भाजीच्या पानासोबत त्यांचे सेल्फी काढून नासा संस्थेला पाठवले नासा संस्थेने हे फोटो सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत
मंगळ मोहिमेतील अंतराळवीर प्रत्यक्ष मंगळावर जाण्याआधी मंगळासारख्या वातावरणात राहिल्यावर मानवी शारीरावर काय विपरीत परिणाम होतो ह्या कठीण परीस्थितीला मानवी शरीर कसे सामोरे जाते त्यांच्यात काय मानसिक बदल होतात ह्या विषयीचे संशोधन करण्यासाठी हि मोहीम राबविण्यात येत आहे
मंगळ मोहिमेतील अंतराळवीर पृथ्वी पासुन हजारो मैल दुर अंतरावर
अंतराळ प्रवास करणार आहेत तेव्हा त्यांना पृथ्वीवरील लोकांशी त्यांच्या
कुटुंबीयांशी संवाद साधता येणार नाही म्हणून त्यांना सगळ्यांपासून दुर ह्या
भुमीत बंदिस्त करण्यात आले हे अंतराळवीर त्या काळात ह्या कृत्रीम
मंगळभुमीतुन बाहेर पडु शकले नाहीत त्यांच्या कुटुंबीयांशी किंवा बाहेरच्या
कोणाशीही संपर्क साधु शकले नाही फक्त नासा संस्थेतील प्रमुख त्यांच्या
संपर्कात होते
भविष्य कालीन अंतराळवीर मंगळावर जाण्यासाठी अंतराळ प्रवास
करतील तेव्हा काही कारणाने त्यांना पृथ्वीवरील नासा संस्थेशी संपर्क साधण्यास वेळ
झाल्यास किंवा संपर्क यंत्रणा बंद पडल्यास,अचानक काही समस्या उद्भवल्यास
किंवा यानात बिघाड झाल्यास त्या वर कुशलतेने मात करून परिस्थतीवर नियंत्रण मिळवुन
पुढे मार्गक्रमण करता यावे म्हणून ह्या अंतराळविरांना आपदकालीन Operation, Maintainence Training देण्यात आले होते हे चार भावी अंतराळवीरांचे प्रतिनिधी
तेथे Human health Studies वर सुरू असलेल्या वेगवेगळ्या अठरा संशोधनात
सहभागी झाले होते
आता हे चारही प्रतिनिधी नासा संस्थेतील पृथ्वीवरील कृत्रिम मंगळ भूमीतून पृथ्वीच्या वातावरणात बाहेर आले आहेत त्यांनी ह्या वास्तव्या दरम्यान ह्या पृथ्वीवरील कृत्रीम मंगळभुमीतील बंदिस्त वातावरणात राहिल्यावर मानवी आरोग्यावर शारीरिक मानसिक व मानवी प्रतिकार शक्तीमधे काय बदल जाणवतात ह्याचे निरीक्षण नोंदवून संशोधीत माहिती गोळा केली आहे
No comments:
Post a Comment