नासाच्या Boeing Star liner अंतराळयानातुन सुरक्षितपणे स्थानकात पोहोचल्याच्या आनंदात Dance करताना अंतराळवीर Sunita Williams-फोटो -नासा संस्था
नासा संस्था -11 जुन
Boeing Star liner अंतराळ यानाच्या पहिल्या मानवी उड्डाण टेस्ट अंतर्गत अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore सहा जूनला 3.45p.m.ला स्थानकात पोहोचले तेव्हा स्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळवीरांनी त्यांचे स्वागत केले अनेक अडचणींवर मात करीत अखेर जिद्दीने आणि धाडसाने हि मोहीम यशस्वी झाल्याने आनंदित झालेल्या अंतराळवीर Sunita Williams ह्यांनी स्थानकाच्या दारातून नाचतच प्रवेश केला आणि काही क्षण नाचून आनंद व्यक्त केला स्थानकातील अंतराळवीरांनी देखील त्यांना साथ दिली आमचे स्वागताचे हे क्षण खूप छान आहेत आमची Welcome Dance पार्टी झाली असे त्यांनी त्या नंतर नासा संस्थेशी साधलेल्या लाईव्ह संवादात सांगितले होते
नासाच्या Boeing Star liner अंतराळयानाच्या Flight Test अंतर्गत स्थानकात पोहोचलेले अंतराळवीर Sunita Williams आणि Butch Wilmore -फोटो -नासा संस्था
आता स्थानकातील वास्तव्यादरम्यान 10 जूनला नासा संस्थेतील अधिकाऱ्यांनी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधून त्यांच्या Star liner अंतराळयान आणि अंतराळप्रवासाचा पहिला अनुभव ह्या विषयी जाणून घेतले नासाचे Administrator Bill Nelson, Deputy Administrator Pam Melroy ,Associate Administrator Jim Free आणि Johnson Space Center च्या Director Venessa Wyche ह्यांनी ह्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधला
Bill Nelson -"तुमचे स्थानकात स्वागत! तुम्ही ग्रेट आहात ! तुमचा अंतराळ प्रवास कसा झाला,तुमच्या अंतराळयानाचा त्यातून केलेल्या पहिल्या अंतराळ प्रवासाचा अनुभव कसा होता आणि स्थानकात पोहोचल्यावर तुम्ही आता काय फील करत आहात !"
अंतराळवीर Butch Wilmore -"Just Amazing ! प्रवास छान झाला Atlas रॉकेट स्थिर होऊन मार्गी लागले आणि जेव्हा अंतराळयान रॉकेट पासून वेगळे होत होते तेव्हा आम्ही सीटवरून मागे पुढे होत होतो Centaur Starts झाल्यावर लाईट गेले अंधार झाला हा नवा अनुभव थरारक होता कारण कुणालाच हि स्टेज माहिती नव्हती कारण पहिल्यांदाच हे यान अंतराळ प्रवास करत होते काही अंतर पार केल्यानंतर यान स्थिर झाले आणि आमचा अंतराळ प्रवास व्यवस्थित सुरु झाला तेव्हा आम्ही काही क्षण स्तब्ध होतो !"
अंतराळवीर Sunita Williams - "खरोखरच हि सुंदर Spectacular ride होती आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून ह्या क्षणाची वाट पाहात होतो त्या मुळे सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्या आणि यानाचा अंतराळ प्रवास सुरु झाला तेव्हा आम्ही दोघे आपण खरच अंतराळ प्रवास करत आहोत अस एकमेकाला सांगत होतो अखेर प्रत्येक वेळी काहीतरी इंटरेस्टिंग घडत होत आम्ही दोधेही Tester असल्यामुळे आमच्या Prelaunch क्षणाचा अनुभव लिहून ठेवला कारण भावी पिढीतील अंतराळवीर जेव्हा Atlas रॉकेटचा अनुभव घेतील तेव्हा त्यांना हा अनुभव उपयोगी पडेल आम्ही अंतराळात प्रवेश केला यान प्रवासास लागले आणि आम्ही अनुभवाने शिकत गेलो अंतराळ प्रवासादरम्यान यानातील यंत्रणा देखील आम्ही चेक करत होतो !"
Pam Melroy -" तुम्हा दोघांना पुन्हा अंतराळ स्थानकात पाहून आनंद होत आहे तुमचे अभिनंदन ! Pretty Awesome ! एखाद्या नव्या यानाची Flight Test करण्यासाठीचा पहिला अंतराळ प्रवास करण अत्यंत कठीण आहे त्यात थ्रिल आहे आणि जबाबदारीही ! तुम्ही ती धैर्याने यशस्वीपणे पार पाडली आम्ही पण Super Exited आहोत त्या विषयी जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या Launch बद्दलची लिहून ठेवलेली माहिती मी देखील वाचली मला ती आवडली तुमच्या पहिल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे अंतराळयानाविषयी,प्रवासादरम्यानची यंत्रणा हाताळणी त्यांची कार्यक्षमता ह्या विषयी !"
Butch Wilmore - "ह्यातील यंत्रणा Aircraft पेक्षा थोडी वेगळी आहे त्यातील Simulators चा अनुभव वेगळा आहे ते पॉवरफुल आहेत सुपीरिअर आहेत अत्याधुनिक आहेत त्या मुळे त्याची हाताळणी करताना अडचण आली नाही यानाच्या वेगावर नियंत्रण ठेवण वेग कमीजास्त करण,दिशा बदलण आणि काही अडचण आली तर त्यावर मात करून पुढे मार्गक्रमण करताना गरज पडली तर यान काही क्षण स्थिर ठेवण ह्या गोष्टी सहजतेने करता येतात तुम्ही म्हणालात तस हि पहिली मोहीम होती टेस्ट घेतानाचा प्रत्येक क्षण महत्वाचा होता प्रत्येक स्टेज महत्वाची होती नवीन होती त्या मूळे त्यावर control करताना दक्ष राहण आवश्यक होत हे सार थरारक होत तितकच जाबाबदारीचही शेवटी आम्ही ते साध्य केल !"
Sunita Williams - "मी यानातील डाव्या बाजूच्या सीटवर बसले होते मी बाहेर पाहात होते जोक करत होते मी म्हटल ,Its Mooning Sun Putting Tail !आणि यान अत्यंत स्मूथली प्रवास करू लागल आणि आम्हालाही थोडेस रिलॅक्स वाटायला लागल आम्हाला कोणाचाच गायडन्स नव्हता यानाचा वेग कधी कमीजास्त करायचा बाकीच्या यंत्रणा कशा वापरायच्या हे आम्हालाच ठरवायच होत आणि आम्ही एकमेकांना सूचना देत सार व्यवस्थित हाताळत मार्गक्रमण करत होतो ,खरच हा अंतराळ प्रवास छान आणि थक्क करणारा होता एका पॉईंट वर आम्ही यान स्थिर ठेवता येत का ह्याचाही अनुभव घेतला यानाची दिशा अशा रीतीने बदलली ज्यामुळे पृथ्वीवर संदेश पाठवताना संपर्क करताना अडचण येणार नाही आणि यानातील सौर यंत्रणेला सूर्याच्या दिशेने वळवून सौरऊर्जा मिळेल यान गोलाकार फिरवूनही पाहिले ह्या सर्व यंत्रणा चेक करताना काही वेळ आम्ही नासा संस्थेच्या संपर्कांबाहेर होतो काहीवेळ यानातील स्वयंचलित यंत्रणा बंद करून आम्ही यंत्रणा हाताळली अंतराळ प्रवासा दरम्यान संपर्क तुटला तर काही आपत्ती आल्यास त्यावर कसे नियंत्रण मिळवता येईल ह्या साठी आम्ही ह्या टेस्ट केल्या !"
Butch Wilmore - "ह्या Star liner यानातून पहिला अंतराळ प्रवास करायचा मान मिळण आमच्यासाठी गौरवास्पद आहे आम्ही लकी आहोत ह्या यानाच्या यशस्वी टेस्ट साठी सारेच उत्सुक होते जेव्हा रॉकेट प्रज्वलित होऊन यान स्थानकाच्या दिशेने अंतराळात झेपावले तेव्हा ह्या मोहिमेतील टीममधील सर्वांना आनंद झाला आणि आम्ही स्थानकात सुखरूप पोहोचल्यावर सर्वांनीं मोकळा श्वास घेतला आम्हाला निरोप द्यायला टीममधील सर्वजण,आमचे नातेवाईक मित्र हजर होते त्यांचे लक्ष आमच्या सुरक्षित अंतराळ प्रवास आणि स्थानकातील प्रवेशावर लागले होते अखेर आम्ही स्थानकात पोहोचलो हि मोहीम यशस्वी झाली पण हे यश आम्हा दोघांचं नाही तर टीममधील सर्वांच आहे आम्ही पुन्हा एकदा स्थानकात पोहोचलो आहोत इथे काही दिवस राहणार आहोत आमच्यासाठी अंतराळस्थानाक नवीन नाही आम्ही ह्या आधीही इथे येऊन राहून गेलो आहोत आता स्थानकाची रचना बदललीय स्थानक अत्याधुनिक झालय अंतराळस्थानकात एकाच वेळी तीन वेगवेगळे अंतराळयान पोहोचले आहेत जोडले गेले आहेत अस ह्या पूर्वी कधीही झाल नसेल!"
Bill Nelson -"तुम्ही अंतराळ प्रवासादरम्यान धैर्याने वेगवेगळे प्रयोग करून पाहिले हि संशोधित माहिती मिळवल्याबद्द्ल आभार आता तुमचा स्थानकातील मुक्काम थोडा वाढलाय तुम्ही गौरवास्पद काम केलय !"
Sunita Williams -"प्रत्येक अंतराळवीरांची इथे येण्याची स्थानकात वास्तव्य करण्याची इथल्या सायंटिफिक प्रयोगात संशोधनात सहभागी होण्याची इच्छा असते आता आम्ही इथे थोडे जास्त दिवस राहू शकू त्या बद्दल आभार साऱ्या जागाच लक्ष ह्या मोहिमेकडे होत हि मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद आहे !"
Vanessa Wyche - "तुम्हा दोघांना स्थानकात सुरक्षित पोहोचलेले पाहून आनंद होतोय तुमच अभिनंदन ! तुम्ही ह्या सर्वाचं ट्रेनिंग घेतलं असल तरीही नागरिकांना हे जाणून घेण्याची इच्छा आहे कि ह्या नव्या यानातून अंतराळ प्रवासाचा अनुभव वेगळा होता का!"
Butch Wilmore -"आमच अतराळयान नवीन असल्याने अंतराळवीरांचा अंतराळ प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा ह्या साठी यानाची रचना,अंतराळवीरांना बसण्यासाठीचे सीट,त्यातील यंत्रणा,उपकरण आणि त्यांची कार्यप्रणाली अत्याधुनिक सोयीने उपयुक्त आहे त्या मुळे यंत्रणेची कार्यप्रणाली त्यांची हाताळणी नवी होती आमचे स्पेस सुट पण नवीन आहेत स्थानक मला नवीन नाही मी इथे येऊन गेलो आहे इथे वास्तव्य केले आहे त्या मुळे स्थानक मला माझ्या परिवारासारख वाटत जिथे आपण जा,ये करतो तसच !"
Sunita Williams - "मी पण इथे आधी वास्तव्य केलय पण आता स्थानक बदललय अत्याधुनिक झालय त्याची रचना बदललीय आता प्रत्येक कामासाठी इकडे तिकडे जाव लागत नाही एका ठिकाणाहून सर्व गोष्टी हाताळता येतात इथल जेवण,इथली व्यवस्था नवीन झालीय इथे पायाला IPad लाऊन तरंगत्या अवस्थेत फिरताना,काम करताना मजा येते बोअर होत नाही खूप सुंदर अनुभव आहे हा !"
Vanessa -"Sunita तुझ्या स्थानकातील प्रवेशाच्या वेळचा Dance सोशल मिडीयावर सर्वत्र व्हायरल झालाय त्या बद्दल सांग !
Sunita Williams -" खरच खूप सुंदर क्षण होता तो! अनेकदा आमच उड्डाण ऐनवेळी रद्द झाल लांबल होत अखेर अनेक अडचणींवर मात करून स्थानकात पोहोचल्याचा आनंदाचा क्षण ! थोडफार hatching च्या वेळच Background Music होत आमच्या स्वागताला स्थानकातील सारे अंतराळवीर हजर होते त्यातील काही ओळखीचे होते त्यांची पुन्हा स्थानकात भेट झाली होती Tracy ,Pojo,Janette आम्ही एकत्र ट्रेनिंग घेतलय Mike ,Bar Classmate होते आम्ही खूप दिवसापासून एकमेकांना ओळखतो ,Oleg Nikollai ,Sasha ची launching च्या आधी ओळख झाली त्या मुळे आमची पुनर्भेट झाल्याचा आनंद व्यक्त करण्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती ती!"
Butch Wilmore -"Suni चा Dance व्हायरल होणार अस मला वाटल होत म्हणूनच मी Dance केला नव्हता !
त्या नंतर नासा आणि बोईंगच्या अधिकाऱ्यांनी अनेक अडचणींवर मात करून धैर्याने स्थानकात पोहोचून हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल आणि प्रवासादरम्यान नवीन संशोधित माहिती मिळवल्याबद्दल पुन्हा एकदा ह्या दोन्ही अंतराळवीरांचे अभिनंदन केले आणि कार्गोशिप स्थानकात पोहोचल्यामुळे आणि Space Walk मुळे त्यांचे पृथ्वीवर परतणे काही दिवस लांबल्याचे सांगितले आणि त्यांना स्थानकातील वास्तव्यासाठी शुभेच्छा देऊन त्यांचा निरोप घेतला
No comments:
Post a Comment