Space X Crew -6 चे अंतराळवीर Stephen Bowen ,Woody Houburg रशियन अंतराळवीर Andry Fedyaev आणि अरबी अंतराळवीर Sultan Alneyadi स्थानकाकडे जाण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था
नासा संस्था -3 मार्च
नासाच्या अंतराळ मोहीमेअंर्गत Space X Crew -6चे अंतराळवीर Stephen Bowen ,Woody Houburg अरबचे अंतराळवीर Sultan Alneyadi आणि रशियन अंतराळवीर Andry Fedyaev शुक्रवारी अंतराळ स्थानकात सुखरूप पोहोचले आहेत हे अंतराळवीर 26 फेब्रुवारीलाच स्थानकात जाणार होते पण उड्डाणाआधी Space X Crew Dragon मध्ये अचानक समस्या उद्भवल्यामुळे त्यांचे उड्डाण रद्द झाले होते पण नंतर 2 मार्चला Space X च्या दुरुस्ती नंतर हे अंतराळवीर स्थानकाकडे रवाना झाले
नासाच्या केनेडी स्पेस सेंटर मधील 39-A ह्या उड्डाणस्थळावरून Space X Crew Dragon Endeavour गुरुवारी 2 मार्चला 12.15a.m. वाजता ह्या चार अंतराळवीरांसह स्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणि शुक्रवारी 3 मार्चला 25 तासांच्या अंतराळ प्रवासानंतर 1.40a.m. वाजता स्थानकाजवळ पोहोचले
स्थानकाजवळ पोहोचताच Endeavour अंतराळयानातील स्वयंचलित यंत्रणेने स्थानक आणि अंतराळयान ह्यांच्यातील Hatching आणि Docking प्रक्रिया पार पडल्यानंतर दोन तासांनी अंतराळवीरांनी स्थानकात प्रवेश केला
अंतराळस्थानकात सध्या राहात असलेल्या अंतराळ मोहीम 68 च्या अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले त्यानंतर ह्या अंतराळवीरांचा Welcome Ceremony पार पडला आता अंतराळस्थानकात अंतराळवीरांची संख्या 11 झाली असून हे सर्वजण एकत्रित तेथे सुरु असलेल्या संशोधनात सहभागी होतील लवकरच अंतराळ मोहीम 68चे Crew-5अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत
No comments:
Post a Comment