Tuesday 28 February 2023

रशियाचे सोयुझ MS-23अंतराळयान स्थानकात पोहोचले

  The Soyuz MS-23 spacecraft is seen approaching the Poisk module of the space station prior to docking at 7:58 p.m. EST as the space station was flying 260 miles above northern Mongolia.

 

नासा संस्था-24फेब्रुवारी

रशियाचे मानवविरहित अंतराळयान अंतराळस्थानकात पोहोचले रशियाचे MS-23 हे अंतराळयान 23फेब्रुवारीला 7.24 ला कझाकस्थानातील बैकोनुर ह्या ऊड्डाणस्थळावरून अंतराळस्थानकात जाण्यासाठी अंतराळात झेपावले आणी 25 तारखेला 7.58p.m.ला  स्थानकाच्या रशियन सेगमेंट मधील Poisk Module ह्या भागाजवळ पोहोचले

ह्या पायलट विरहित स्वयंचलित अंतराळयानातुन अंतराळवीर व स्थानकाच्या कामासाठी लागणारे 946पौंड वजनाचे सामान स्थानकात पाठविण्यात आले आहे 

रशियाच्या सोयुझ MS-22 ह्या अंतराळयानात बिघाड झाल्यामुळे त्या बदल्यात हे नवीन सोयुझ यान स्थानकात पाठविण्यात आले आहे सोयुझ MS-22 हे अंतराळयान मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये नासाच्या तीन अंतराळविरांना घेऊन स्थानकात पोहोचले होते 14 डिसेंबरला स्पेसवॉक दरम्यान ह्या यानात बिघाड झाल्याचे अंतराळवीरांच्या लक्षात आले ह्या सोयुझ यानातील Coolant radiator मध्ये बिघाड झाल्याने लिकेज होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते 

ह्या सोयुझ यानातुन पृथ्वीवर परतणे अंतराळवीरांंसाठी धोकादायक होते त्यामुळे नासा स्ंस्थेने ह्या यानातुन स्थानकात गेलेल्या नासाचे अंतराळवीर Frank Rubio,रशियन अंतराळवीर Sergey Prokopyev आणी Dmitri Petelin ह्या तीन अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी नवीन सोयुझ यान पाठविण्याचा निर्णय घेतला होता

आता हे तिघे सोयुझ MS-23 ह्या यानातुन पृथ्वीवर परततील आणी आधीचे नादुरुस्त MS-22 हे मानवविरहित अंतराळयान मार्च महिन्याच्या शेवटी पृथ्वीवर परत येईल पृथ्वीच्या कक्षेत पोहोचल्यावर पॅराशुटच्या सहाय्याने सोयुझ यान खाली ऊतरेल

No comments:

Post a Comment