Thursday 9 March 2023

अंतराळवीर स्थानकात पोहोचताच पार पडला Welcome Ceremony

 The four SpaceX Crew-6 members joined the seven Expedition 68 crew members aboard the space station expanding its population to 11. Credit: NASA TV

Welcome Ceremony दरम्यान नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधताना स्थानकातील अकरा अंतराळवीरांसोबत Space X Crew 6 चे अंतराळवीर -फोटो -नासा संस्था

 नासा संस्था - 3 मार्च

Space X Crew -6 चे अंतराळवीर Steve Bowen ,Woody Houburg अरबी अंतराळवीर Sultan Alneyadi आणि रशियन अंतराळवीरAndry Fedyaev शुक्रवारी 3.45 a.m.वाजता स्थानकात पोहोचले तेव्हा अंतराळस्थानकातील अंतराळवीरांनी त्यांचे स्थानकात स्वागत केले स्थानकातील सातही अंतराळवीर स्थानकाच्या Hatchway मध्ये त्यांच्या स्वागतासाठी आधीच एकत्र जमले होते ह्या अंतराळवीरांनी एकमेकांशी हस्तांदोलन करून स्थानकात सुरक्षित पोहोचल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले त्या नंतर त्यांनी थोडावेळ एकमेकांशी संवाद साधला 

काही वेळातच स्थानकात  Welcome Ceremony  पार पडला तेव्हा सारे अंतराळवीर एकत्र जमले नासाच्या Associate Administrator  Kathy Leaders ह्यांनी Space X Crew -6 च्या अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधला आणि  स्थानकात सुरक्षित पोहोचल्या बद्दल त्यांचे अभिनंदन केले त्या म्हणाल्या," तुमचे अंतराळ स्थानकात जाणे अचानक समस्या ऊदभवल्यामुळे लांबले होते तरीही ऊशीराने तुम्ही स्थानकात सुरक्षित पोहोचला आहात हे पाहून आम्हाला आनंद झाला येत्या काही महिन्यात तुम्हाला खूप काम करावे लागेल लवकरच Space X Crew-5 चे अंतराळवीर पृथ्वीवर परतणार आहेत आणी Crew Vehicles पण स्थानकात येणार आहेत त्याची तयारी तुम्हाला करावयाची आहे शिवाय तिथे सुरू असलेल्या सांयटिफीक संशोधनात तुम्ही सहभागी व्हाल तेव्हा त्यातील प्रगती आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे नेहमीप्रमाणेच आम्हाला तुम्ही स्थानकात पोहोचल्याबद्दल अभिमान वाटतोय तुमचे अभिनंदन !आणी स्थानकात स्वागत !

मला U.A.E च्या Space Center चे डायरेक्टर Hamad Al Monsori ह्यांची ओळख करून देताना अभिमान वाटतोय ते सध्या आपल्या संपर्कात आहेत आणी तुमच्याशी लाईव्ह संवाद साधणार आहेत 

Hamad Al Monsori -Kathy,Thank you so much!  Woody,Bowen,Andrey आणी छोटा अंतराळवीर Sultan  Congratulations! तुम्हा सर्वांचे स्थानकात सुरक्षित पोहोचल्याबद्दल अभिनंदन! आता नासा Space X आणी UA.E ची अंतराळ संस्था एकत्रित काम करणार आहेत त्यामुळे कृपया मला आमच्या अरबी भाषेत बोलण्याची परवानगी द्या असे म्हणत त्यांनी अरबीत संवाद साधत अंतराळवीर सुलतान ह्याचे अभिनंदन करून त्याचे स्थानकात स्वागत केले आम्हाला तुझ्याकडून आता चांगल्या कामाची अपेक्षा आहे तुझ्यामुळे आपल्या देशाचे नाव उंचावले आहे आम्हाला तुझा अभिमान वाटतोय तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा ! असे म्हणत त्याचे अभिनंदन केले त्यांनी नासा संस्था ,Space X चेही आभार मानले तुम्हा सर्वांचे काम ह्या तीनही देशाला प्रगतीपथावर नेणार आहे असेही ते म्हणाले 

 Sergey Prokopyev - Woody,Bowen,Andrey आणि Sultanतुमचे स्थानकात स्वागत!आता आपल्याला एकत्र काम करावयाचे आहे Woody, Sultan,Andrey तुम्ही इथे स्थानकात पोहोचला आहात आता खरोखरच तुम्ही  अंतराळवीर झाला आहात तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो आणी तुमच्या हातुन चांगले कार्य घडो हि सदिच्छा ! तुमच्या स्थानकातील प्रथम प्रवेशाबद्दल अभिनंदन !

Stephen Bowen -मी पुन्हा अकरा वर्षांनी माझ्या स्थानकातल्या घरी पोहोचलो आहे Launching ला उशीर झाला पण अखेर आम्ही इथे पोहोचलो स्थानकाजवळ पोहोचलो तेव्हा बाहेरुन येताना मी स्थानकाकडे नजर टाकली तेव्हा  मला स्थानकातील बदल जाणवले स्थानकाबाहेरील वायर्सची संख्या वाढलीय आणि स्थानकातील अंतराळवीरांचीही संख्या वाढलीय हे पाहून आनंद झाला स्थानक आतूनही अत्याधुनिक झालय आता इथे मला सहा महिने काम करावयाचे आहे अंतराळवीर Koichi ला पाहून मला आनंद झाला 

Woody - खरंच आश्चर्यकारक आहे सार ! हे स्थानक बनविणारे शास्त्रज्ञ,इंजिनीअर्स,तंत्रज्ञ हयांच हे असामान्य कर्तृत्व पाहून मी चकित झालो कित्येक वर्षे ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्ही आता खऱ्या अंतराळस्थानकात येऊन पोहोचलो आहोत नासाच्या Johnson Space Center मधल्या बिल्डिंग सारखच हे स्थानक आहे पण हे अंतराळात आहे मी ह्या क्षणी खूप आनंदात आहे ह्या Crew -6 मधील अंतराळविरांसोबतचा हा अंतराळप्रवास Space X सारच अमेझिंग ! ह्या मोहीम 68च्या अंतराळवीरांचा मला आदर वाटतोय त्यांच्यासोबत आता मला काम करायला मिळेल मला Frank सोबत काम करायला त्यांच्याकडून शिकायला आवडेल 

Sultan -मी अखेर इथे पोहोचलो ! खरंच मी हे आव्हान पेललय यशस्वी झालोय ! मी सुरक्षित आहे ! मला हि संधी दिल्याबद्दल U.A.E च्या Muhammad Center चे आभार त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला नासा Space X संस्थेचेही आभार !माझे कुटुंबीय सहकारी ह्यांनी देखील मला इथे येण्यास प्रवृत्त केल त्याबद्दल त्यांचेही आभार !आमच्या देशाने अंतराळविश्वातील उचललेल हे प्रगतीपथावरच पाऊल कौतुकास्पद आहे मी माझ्या देशातील अंतराळप्रवास करणारा दुसरा अंतराळवीर आहे आणि स्थानकात राहणारा पहिला अंतराळवीर आहे मी खरोखरच भाग्यवान आहे मला हि संधी मिळाली मला देखील थोडेसे आमच्या अरबी भाषेत बोलावयाचे आहे आभार मानावयाचे आहेत असे म्हणत त्यांनी अरबी भाषेत संवाद साधत संस्था प्रमुखांचे आभार मानले 

रशियन अंतराळवीर Andrey Fedyaev ह्यांनी देखील रशियन भाषेत संवाद साधत रशियन संस्था Roscosmos मधील प्रमुख,नासा संस्था आणि Space X चे आभार मानले

No comments:

Post a Comment