Space X Crew-5 चे अंतराळवीर नुकतेच पृथ्वीवर परतले परतण्याआधी स्थानकात Farewell Ceremony पार पडला तेव्हा नासा संस्थेशी लाईव्ह संवाद साधत त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या
Nicole Mann -मला ह्या क्षणी माझ्या भावना व्यक्त करावयाच्या आहेत मला नासा संस्थेचे,नासा संस्थेतील हजारो कर्मचाऱ्यांचे आभार मानावयाचे आहेत त्यांच्या सहकार्यानेच स्थानकात आम्ही सहा महिने राहू शकलो त्यांच्या योग्य मार्गदर्शनामुळे आम्ही सायंटिफिक संशोधन आणि Space Walk करू शकलो त्यांच्या मुळेच आम्हाला हि संधी मिळाली ह्या अंतराळ मोहीम 68 मध्ये आम्हाला सहभागी होण्याचा मान मिळाला मला आज माझ्या सहकारी अंतराळवीरांचेही आभार मानावयाचे आहेत ते खूप अमेझिंग आहेत आम्ही एकत्र ट्रेनिंग घेतल एकत्र काम केल ह्या सहा महिन्यांच्या स्थानकातील वास्तव्या दरम्यान खूपदा कठीण परिस्थितीशी सामना करावा लागला खूप challenges आले प्रत्येकवेळी आम्ही त्याला यशस्वीपणे सामोरे गेलो त्यावर मात केली आम्हाला जेव्हा गरज वाटली तेव्हा सारे एकमेकांच्या मदतीला धावले Josh बुद्धिमान पायलट आहे त्याच व्यावसायिक कर्तृत्व कौतुकास्पद आहे त्याने कितीतरी वेळा आम्हाला वाचवल आहे त्या बद्दल Thanks Josh ! Koichi खूप शांत आहे त्याच्याकडे असाधारण बुद्धिमत्ता आहे कित्येकदा आम्हाला संशोधनात अडचण आली किंवा काही प्रश्न निर्माण झाले तर तो लगेच सोडवतो तो नेहमीच सगळ्यांच्या मदतीला धावतो Anna देखील कर्तृत्ववान आणि कुशाग्र आहे एखादी गोष्ट तिच्या लगेचच लक्षात येते तिच्यात माहिती आत्मसात करण्याची कुवत आहे आमची हि टीम खूप छान होती ह्या झिरो ग्रॅव्हीटीतील वास्तव्यात अनेक गमतीजमती अनुभवल्या जगण्याच वास्तव समजल आम्हाला आमच्या संशोधनाच्या कामातून मोकळा वेळ मिळाला की,आम्ही स्थानकाच्या खिडकीतून खाली पृथ्वीकडे पाहायचो तिचे सौन्दर्य न्याहाळायचो ह्या अफाट विश्वाकडे पाहताना ह्या विश्वातील आपली जागा कुठे आहे ?आपण कुठे आहोत? किती छोटे आहोत हे जाणवल आता आगामी काळात अंतराळविश्वात नव्या मोहिमा राबविल्या जातील त्यांची प्रगती आपण पहाणार आहोत Artemis ,Orion आणि मंगळ मोहिमेसाठी आमच संशोधन उपयुक्त पडणार आहे आम्ही ह्या मोहिमांचा भाग होतो ह्याचा आनंद होतोय आमच्यासाठी हि अभिमानाची बाब आहे हा सन्मान आम्हाला नासा संस्थेमुळे मिळाला त्यांनी हि संधी आम्हाला दिल्यामुळे आम्ही लकी आहोत नासा संस्थेचे पुन्हा आभार ! काही दिवस आम्ही ह्या नव्या अंतराळवीरांसोबत अकराजण एकत्र राहिलो खूप छान आहेत सारे आम्ही खूप एन्जॉय केल
Josh Cassada - मला Duck चेही सहकारी अंतराळवीरांसोबत आभार मानावयाचे आहेत त्याची लीडरशिप चांगली होती आमच्या स्थानकात येण्यापासून पृथ्वीवर परत जाण्यापर्यंतची ह्या माझ्या सहकारी Crew 6 च्या अंतराळ वीरांसोबत काही दिवस राहायला मिळाल आमची मोहीम 68 ची टीम छान होती त्यांच्या सोबतचे स्थानकातील दिवस आनंदात गेले नासा संस्थेतील सर्वांचे आभार ! ज्यांच्यामुळे मी इथे आलो त्यांनी इथल्या वास्तव्या दरम्यान वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केल त्याशिवाय हे शक्य नव्हत माझे कुटुंबीय,मित्र ज्यांनी आम्हाला सपोर्ट केल,प्रोत्साहन दिल त्या साऱ्यांचे आभार मला आशा आहे कि,मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे उत्तम काम केलय निश्चितच त्यांना माझा अभिमान वाटेल ! इथल्या वास्तव्या दरम्यान आम्ही संशोधन केल Space Walk केले आणि पृथ्वीवरून स्थानकात आलेल्या अंतराळयान ,Cargo Ship च स्थानकात स्वागत केल आम्हाला त्या मुळे शिकायला अनुभवायला मिळाल त्या बद्दल नासा संस्थेचे आभार !
Koichi Wakata - ह्या क्षणी माझ्या भावना संमिश्र स्वरूपाच्या आहेत ह्या स्थानकातील वास्तव्यातील कडू गोड आठवणी मनात दाटून आल्या आहेत मी ह्या झिरो ग्रॅव्हीटीत सहा महिने वास्तव्य केल आणि आता पृथ्वीवर घरी परत जातोय ह्या सुपर अंतराळवीरांसोबत काम करायला मिळाल ते दिवस आनंददायी होते ह्या विपरीत वातावरणातील वास्तव्यात अनेकदा कठीण प्रसंग आले पण आमच्या टीमच्या सहकार्याने आणि नासा संस्थेच्या मार्गदर्शनामुळे आम्ही त्यावर मात करू शकलो म्हणून जगभरातील नासा संस्थेतील सर्वांचे आभार ! आमच्या launching पासून इथे पोहोचेपर्यंत आणि इथल्या वास्तव्यातील प्रत्येक क्षणी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केल आता पृथ्वीवर परतणार आहोत स्थानकाची धुरा आता योग्य हाती आहे Sergey ती जाबाबदारी छान सांभाळेल आम्ही चौघेही तुला मिस करू Sergey तुझ्या सहकार्याबद्दल Thanks !आणि तुला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा !
Anna Kikina - मी कित्येक वर्षे स्थानकात येण्याच स्वप्न पाहायची आणि एक दिवस अचानक ती संधी मिळाली मी स्वप्नातल्यासारख क्षणात स्थानकात पोहोचले सुद्धा क्षणभर मला हे सार स्वप्नच वाटल पण इथल्या झिरो ग्रॅव्हीटीत हे खर असल्याची खात्री पटली हे सारच अद्भुत होत माझ्यासाठी मला हि संधी दिल्याबद्दल नासा संस्थेचे आभार माझे सहकारी अंतराळवीर खूप छान होते आम्ही एकत्र काम केल एन्जॉय केल त्यांच्या प्रमाणेच माझ्याही भावना आहेत ह्या विश्वातील नासा संस्थेतील सर्वांचे खूप,खूप आभार त्यांच्या मुळेच मी इथे पोहोचले ज्यांनी आम्हाला सपोर्ट केल मार्गदर्शन केलं त्या सर्वांचे आभार ह्या मोहिमेचा भाग होण माझ्यासाठी आनंददायी होत त्यांच्या सोबत काम करताना सुरक्षित वाटल सर्वांनाच असे मित्र आणि अस इंटरेस्टिंग काम करायला मिळो तुमच्या आयुष्यात ,तुमच्या करिअर मध्ये तुम्हा सर्वांचे आभार !
No comments:
Post a Comment