Monday 3 April 2023

नासाच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत चार धाडसी नागरिक पृथ्वीवरील कृत्रीम मंगळभूमीत एक वर्ष राहण्यास जाणार

      NASA’s simulated Mars habitat includes a 1,200-square-foot sandbox with red sand to simulate the Martian landscape. The area will be used to conduct simulated spacewalks or “Marswalks” during the analog missions.              नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी लाल वाळूचा उपयोग करून तयार केलेली मंगळासारखे वातावरण निर्मित पृथ्वीवरील कृत्रिम  मंगळभूमी -फोटो -नासा संस्था  

नासा संस्था - 24 मार्च

सध्या नासाचे Curiosity आणि Perseverance मंगळयान आणि Ingenuity mars Helicopter मंगळावर कार्यरत आहे त्यांच्या मार्फत मंगळावरील पुरातन सजीव सृष्टीला दुजोरा देणारे पुरावे गोळा केल्या जात आहेत शिवाय भविष्यकालीन मंगळमोहिमेत मानव निवासासाठी पृथ्वीसारख्या पोषक वातावरणाचाही शोध घेतल्या जात आहे इथे पृथ्वीवरील नासा संस्थेतही भविष्यकालीन मंगळ मोहिमेची जोरदार तयारी सुरु आहे आगामी मानवासहित मंगळ मोहिमेसाठी आवश्यक वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत नासाचे अंतराळवीर प्रत्यक्षात मंगळ ग्रहांवर राहायला जाण्याआधी त्यांच्या मंगळनिवासासाठी उपयुक्त अभिनव उपक्रम राबविले जात आहेत

नासाच्या Crew Health & Performance Exploration Analog (CHAPEA) मोहिमेअंतर्गत नासा संस्थेने मंगळावर राहण्यासाठी जायला उत्सुक असलेल्या धाडसी  उमेदवारासाठी सुवर्णसंधी जाहीर केली होती  ह्या उपक्रमाअंतर्गत निवड झालेल्या चार शिकाऊ अंतराळवीरांचा समावेश असलेले तीन ग्रुप तयार करण्यात आले आणि त्यातीलच निवडक चार धाडसी उमेदवारांच्या पहिल्या ग्रुपला आता नासाच्या Johnson Space Center संस्थेतील मंगळासारख्या कृत्रिम  वातावरण निर्मिती केलेल्या छोट्या खोलीत एकवर्ष निवास करण्यासाठी पाठवण्यात येणार आहे भविष्यकालीन मंगळमोहिमेतील अंतराळवीरांच्या मंगळनिवासासाठी हा प्रयोग करण्यात येणार असून त्याची सुरवात आता होणार  आहे 

ह्या धाडसी उमेदवारांची निवड करताना त्यांची आवश्यक  शैक्षणिक पात्रता, Aircraft उड्डाण आणि कमीतकमी आकाशात 1000 तासांच्या उड्डाणाचा अनुभव ह्या गोष्टीना प्राधान्य दिले गेले  शिवाय एक वर्षाच्या निवासादरम्यान नासा संस्थेशी संपर्क साधताना अडचण येऊ नये म्हणून त्यांना ईंग्लीश व इतर भाषा अवगत असणे आवश्यक होते  ह्या सर्व आवश्यक बाबीची पूर्तता करून ह्या मोहिमेत सहभागी होण्यास पात्र ठरलेल्या ह्या उमेदवारांना आता नासा संस्थेच्या Houston येथील Johnson Space Center मधील शास्त्रज्ञ निर्मित कृत्रिम मंगलसृष्टी असलेल्या वातावरणात एका छोट्या खोलीत एक वर्ष राहायचे आहे 

ह्या मोहिमेला Crew Health &Performance Exploration Analog असे नाव देण्यात आले आहे निवड झालेल्या ऊमेदवारांना Johnson Space Center मधील 1,700 sq.foot जागेत तयार केलेल्या Mars Dune Alpha ह्या 3D printing  चा वापर केलेल्या खोलीत वर्षभर रहावे लागेल ह्या एक वर्षाच्या निवासादरम्यान ऊमेदवारांच्या मानसिक आणी शारिरीक दृष्ठ्या काय समस्या ऊद्भवतात त्यांच्या आरोग्यात काय बदल होतात मानवी शरीर मंगळासारख्या वातावरणाला कसे सामोरे जाते ह्याचे निरीक्षण नोंदवण्यात येणार आहे आणी त्या समस्या निवारण्यासाठी ऊपाय शोधले जाणार आहेत त्या साठी नवीन Technology शोधल्या जातील ह्या मोहिमेचा ऊपयोग भविष्यातील मंगळमोहिमेतील अंतराळविरांना होईल अंतराळवीर प्रत्यक्षात जेव्हा मंगळावर निवास करतील तेव्हा त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खबरदारीचे ऊपाय शोधले जातील त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठीच हा मोहीम पुर्व अभिनव ऊपक्रम राबविण्यात येत आहे असे Johnson Space Center चे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणतात शीवाय ह्या अंतराळविरांचे निरीक्षण नोंदवून त्या वर संशोधन करून भविष्य कालीन मानवसहित मंगळ मोहिमेतील अंतराळविरांसाठी त्यांच्या सोबत हेल्दी अन्न,आवश्यक गोष्टी व सामान मंगळावर पाठवता येतील कारण भविष्यात मंगळावर मानवी वसाहत निर्माण करण्याचा शास्त्रज्ञांचा विचार आहे त्या द्रुष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत 

हे धाडसी उमेदवार अंतराळवीर नसल्यामुळे ह्या निवासादरम्यान त्यांना मंगळग्रहावरील वातावरणात रहाण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग देण्यात येणार असून त्यांना अंतराळवीरांसारखे झिरो ग्रॅव्हीटीत राहण्याचे आणी तेथील निवासा दरम्यान कराव्या लागणाऱ्या Space Walk ,Robotic operations,Habitat Maintenance ,personal hygiene ह्या गोष्टींचेही  ट्रेनिंग देण्यात येणार आहे  मंगळ ग्रह पृथ्वीपासुन दुर असल्यामुळे अंतराळविरांना तेथून पृथ्वीवर संपर्क साधताना अडचण आली किंवा काही समस्या उद्भवल्यास त्यांना त्वरीत मदत पाठवता येणार नाही त्यामुळे अशा समस्या आल्यास त्यावर मात कशी करता येईल ह्याचे ट्रेनिंगही देण्यात येईल,शीवाय तेथील वातावरणातील बदलामुळे येणारा मानसिक ताण किंवा ऊपकरणात अचानक काही कठीण समस्या निर्माण झाली तर आपद्कालीन संकटांशी सामना करण्यासाठी प्रशिक्षीत केल्या जाईल 

जूनमध्ये हा पहिला चार जणांचा निवडक ग्रुप पृथ्वीवरील कृत्रीम मंगळ भूमीत एका वर्षासाठी राहायला जाणार आहे हि शास्त्रज्ञ निर्मित पृथ्वीवरील कृत्रिम  मंगळभूमी पाहण्याची संधी काही निवडक पत्रकारांना देण्यात येणार आहे पण ह्या उपक्रमातील सहभागी धाडसी नागरिकांना मात्र त्यांना भेटता येणार नाही कारण सद्या हा ग्रुप ट्रेनिंगमध्ये व्यस्त आहे  

No comments:

Post a Comment