पॅराशूटच्या साहाय्याने नासाचे अंतराळवीर पृथ्वीवर उतरताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -30 मार्च
नासाच्या अंतराळमोहीम 66 चे रेकॉर्ड ब्रेकर अंतराळवीर Mark Vande Hei त्यांचा स्थानकातील 355 दिवसांचा दीर्घ मुक्काम संपवून तीस तारखेला त्यांचे सहकारी रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov आणि Pyotr Dubrov ह्यांच्या सोबत पृथ्वीवर सुखरूप परतले आहेत
अंतराळवीर Mark Vande Hei Soyuz अंतराळयानातून पृथ्वीवर परतल्यानंतर - फोटो -नासा संस्था
हे तिन्ही अंतराळवीर पृथ्वीवर सुखरूप परतल्यानंतर नासाचे Administrator Bill Nelson ह्यांनी ह्या तिघांचे अभिनंदन आणि स्वागत केले ते म्हणाले "ह्या अंतराळवीरांनी खूप मोलाची कामगिरी केली आहे विशेषतः रेकॉर्डब्रेकर अंतराळवीर Mark Vande Hei ह्यांनी स्थानकातील झिरो ग्रॅविटीत सलग 355 दिवस राहून संशोधनात सहभाग नोंदवला त्यांच्या दीर्घकाळच्या वास्तव्याचा उपयोग भविष्यकालीन चांद्र आणि मंगळ मोहिमेत होणार आहे त्यांच्या ह्या असामान्य कर्तृत्वामुळे अंतराळविश्वात आपल्या देशाची मान उंचावली आहे साऱ्या देशाला त्यांचा अभिमान वाटतो!"
हे तिन्ही अंतराळवीर Soyuz अंतराळ यानातून तीस तारखेला दुपारी 3.27a.m.ला पृथ्वीवर येण्यासाठी स्थानकाबाहेर पडले आणि 7.28a.m.(5.28a.m.स्थानिक वेळ ) वाजता पृथ्वीवर परतले कझाकस्थानातील Dzhezkazgan येथे पॅराशूटच्या साहाय्याने हे अंतराळवीर पृथ्वीवर उतरले
स्थानकातून पृथ्वीवर परतण्यासाठी निघण्याआधी ह्या तिन्ही अंतराळवीरांचा स्थानकात Command Change Ceremony आणि Farewell Ceremony पार पडला ह्या वेळी स्थानकाचे कमांडर Anton Shkaplerov ह्यांनी कमांडरपदाची जबाबदारी अंतराळवीर Tom Marshburn ह्यांच्याकडे सोपवली ह्या वेळी बोलताना ते म्हणाले आमचा स्थानकातील कार्यकाळ ह्या अंतराळवीरांसोबत खूप मजेत गेला आम्ही सर्वांनी संशोधनासोबतच आमच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान येणारे सगळे सण उत्साहात साजरे केले संशोधनातून वेळ काढून एकत्रित येऊन पार्टी केली स्थानकात उगवलेल्या मिरचीचा आस्वाद घेतला हे क्षण अविस्मरणीय आहेत हे सर्वजण खूप छान आहेत सर्वजण एकमेकांना मदत करतात मला स्थानकातील रशियाच्या Nauka Module च्या hatching ची आठवण झाली त्या वेळेस Hatching दरम्यान छोटीशी दुर्घटना घडली होती काहीवेळ स्थानकाचा पृथ्वीवरील नासा संस्थेशी संपर्क तुटला सारेच टेन्शनमध्ये होते पण ह्या अंतराळवीरांनी आणि पृथ्वीवरील नासा संस्थेतील शास्त्रज्ञांनी ह्या आपत्कालीन परिस्थितीवर त्वरित मात केली आणि सारे सुरळीत झाले आणि आता रशिया युक्रेन युद्धामुळे आम्ही अंतराळवीर Mark Vande ह्यांना इथेच स्थानकात सोडून देऊ अशा बातम्या पृथ्वीवर प्रकाशित झाल्याचे आम्हाला कळाले पण आम्ही तसे करणार नाही आम्ही Mark सोबतच पृथ्वीवर रशियात परतणार आहोत आम्ही नासा संस्थेतील सर्वच देशातील अंतराळवीर इथे एकत्रित राहतो संशोधन करतो आमचा अनुभव चागला आहे तिथल्या तणावपूर्ण वातावरणाचा आमच्यावर काहीही परिणाम होत नाही आमचे नाते मित्रत्वाचे आहे
आणि खरोखरच हे तीनही अंतराळवीर जेव्हा सोयूझ यानातून पृथ्वीवर परतले तेव्हा नासाची रशियातील रिकव्हरी टीम त्वरित तेथे पोहोचली त्यांनी अंतराळवीर Mark Vande ह्यांना देखील रशियन अंतराळवीरांसोबत यानातून बाहेर काढले हे तिन्ही अंतराळवीर पॅराशूटच्या साहाय्याने सुरक्षित पृथ्वीवर उतरल्यानंतर त्यांचे प्राथमिक चेकअप करण्यात आले आवश्यक चेकअप व इतर प्रक्रिया पार पडल्यानंतर नासाच्या विमानाने अंतराळवीर Mark Vande अमेरिकेतील त्यांच्या घरी आणि रशियन अंतराळवीर रशियातील ट्रेनिंग सेंटर मध्ये परतले तेथून ते त्यांच्या घरी पोहोचतील