रशियन अंतराळवीर Anton Shkaplerov आणि अंतराळवीर Pyotr Dubrov स्पेसवॉकसाठी स्पेससूट घालून चेकअप करताना -फोटो नासा संस्था
नासा संस्था - 19 जानेवारीनासाच्या अंतराळ मोहीम 66 चे रशियन अंतराळवीर Anton Shkaplerovआणि अंतराळवीर Pyotr Dubrov ह्यांनी एकोणीस तारखेला अंतराळस्थानकाच्या तांत्रिक जोडणीसाठी स्पेसवॉक केला हे दोन्ही अंतराळवीर सकाळी सात वाजून 17 मिनिटाला स्पेसवॉकसाठी स्थानकाबाहेर पडले आणि सात तास अकरा मिनिटांचा स्पेसवॉक पूर्ण करून दुपारी दोन वाजून अठ्ठावीस मिनिटाला स्थानकात पोहोचले
सात तासांच्या ह्या स्पेसवॉक दरम्यान ह्या अंतराळवीरांनी रशियन सेगमेंटच्या नुकत्याच अंतराळस्थानकाशी जोडल्या गेलेल्या Nauka Moduleआणी Prichal Module भागात तांत्रिक जोडणीचे काम केले ह्या दोघांनी ह्या भागात Handrails,Rendezvous,Antennas,Television Camera आणि Docking साठी आवश्यक उपकरणांचे फिटिंग केले रशियन सेगमेंट मध्ये आगामी काळात स्थानकात येणाऱ्या अंतराळयान आणि स्थानक ह्यांच्यातील Docking साठीच्या मार्गावर हि तांत्रिक जोडणी करण्यात आली ह्या जोडणीमुळे स्थानक आणि अंतराळयान स्वयंचलित यंत्रणेने एकमेकांशी जोडले जातील
स्पेसवॉक दरम्यान अंतराळवीर Anton Shkaplerov आणि Pyotr Dubrov अंतराळस्थानकाबाहेरील Nauka आणि Prichal Module मध्ये फिटिंग करताना फोटो-नासा संस्था
ह्या स्पेसवॉकसाठी अंतराळवीरांनी आधीच तयारी केली होती त्यांनी त्यांचे स्पेससूट चार्ज करून pressure leak चे चेकअप केले शिवाय Communication System हि चेक केली ह्या स्पेसवॉक साठी अंतराळवीर Anton ह्यांनी Orlan स्पेससूट परिधान केला होता त्यांच्या स्पेससूटवर लाल रंगाच्या रेषा होत्या अंतराळवीर Anton Shkaplerov ह्यांच्या अंतराळ कारकिर्दीतला हा तिसरा स्पेसवॉक होता त्या दरम्यान त्यांनी स्थानकाच्या कामासाठी अंतराळात 21तास 39मिनिटे व्यतीत केली आहेत
अंतराळवीर Pyotr Dubrov ह्यांचा अंतराळस्थानकातील वास्तव्यादरम्यान केलेला हा चवथा स्पेसवॉक होता त्या साठी त्यांनी अंतराळात 29 तास 49 मिनिटे व्यतीत केली आहेत त्यांनी ह्या स्पेसवॉकसाठी परिधान केलेल्या Orlan स्पेससूटवर निळ्या रंगाच्या रेषा होत्या
नवीन वर्षातला स्थानकाच्या कामासाठी केलेला हा पहिलाच स्पेसवॉक होता आणि अंतराळस्थानकाच्या तांत्रिक कामासाठी अंतराळवीरांनी आजवर केलेला हा 246 वा स्पेसवॉक होता
No comments:
Post a Comment