ह्या मंगळावरील आटलेल्या पाण्याच्या प्रवाहित भागात मिठाचे अस्तित्व आढळले तो पांढऱ्या रंगाचा भाग -फोटो नासा संस्था
नासा संस्था -( JP.L Lab) -26 जानेवारी
मंगळावर अब्जावधी वर्षांआधी पाणी आणि सजीवसृष्ठी अस्तित्वात होती ह्या गोष्ठीला पृष्ठी देणारे पुरावे नासाचे शास्त्रज्ञ मंगळावर कार्यरत असलेल्या मंगळयान, हेलिकॉप्टर आणि अद्ययावत उपकरणांच्या द्वारे सतत शोधत असतात ह्याच मोहिमेअंतर्गत Mars Reconnaissance Orbiter मार्फत घेतलेल्या फोटोतून आणि मिळालेल्या संशोधित माहितीतून मंगळावर पुरातनकाळी पाणी अस्तित्वात होते ह्या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे
आजवरच्या संशोधनातून मंगळावर तीन अब्ज वर्षांपर्यंत पाणी आणि सजीवसृष्ठी अस्तित्वात होती आणि कालांतराने ती नष्ठ झाली असा समज होता पण आता मिळालेल्या नव्या संशोधित माहितीनुसार मंगळावर दोन अडीच अब्ज वर्षांपर्यंत पाण्याचे अस्तित्व होते म्हणजे एक अब्ज वर्ष जास्तकाळ पर्यंत तेथे पाणी अस्तित्वात होते आणि शास्त्रज्ञांच्या मते जिथे पाणी असते तिथे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व असते पृथ्वीप्रमाणेच त्यामुळे तिथे निश्चितच सजीवसृष्ठी अस्तित्वात असेल कालांतराने तेथील वातावरण विरळ झाले असावे त्यामुळे वातावरणात बदल झाला असावा वादळवाऱ्यांमुळे जंगलाला लागलेल्या आगीमुळे झाडे नष्ठ झाली असावी,प्रचंड उष्णतेमुळे,उन्हाच्या तीव्रतेमुळे तेथील पाणी आटले आणि वाफेच्या स्वरूपात नष्ठ झाले असावे अती थंडीमुळे बर्फाच्या स्वरूपात काही ठिकाणचे पाणी गोठले गेले आणि त्यातील काही थेंब खडकात मुरले आणि वाळलेल्या स्वरूपात अस्तित्वात राहिले असावे असा निष्कर्ष M.R.O ने काढलेल्या फोटोतून आणि गोळा केलेल्या माहितीच्या संशोधनातून शास्त्रज्ञांनी काढला आहे
नासाच्या JPL-Caltech -Pasadena येथील ह्या मंगळ मोहिमेतील प्रमुख महिला संशोधक Ellen Leask आणि प्रोफेसर Bethany Ehlmann ह्या दोघांनी मिळून M.R.O Spectrometer द्वारे घेतलेल्या फोटोच्या नकाशावरून आणि गोळा केलेल्या माहितीवर सखोल संशोधन केले तेव्हा हा भाग मंगळावरील दक्षिणेकडील आहे तेथे आटलेल्या नदीप्रवाहाच्या आणि पाणवठ्याच्या खुणा आहेत आणि तेथे अनेक आटलेले Craters आहेत हि माहिती मिळाली तेथील Craters ची संख्या ह्या संशोधकांनी मोजली तेव्हा त्यात काही नवीन Crater असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यावरून त्यांनी त्यांच्या निर्मितीचा काळ मोजला ह्या नवीन संशोधित माहितीमुळे नदीशी जोडल्या गेलेल्या आटलेल्या खाऱ्या पाण्याच्या तळ्याच्या निर्मितीचा नेमका काळ समजण्यास मदत मिळाली हा भाग मंगळावरील भूगर्भातील Volcanic घडामोडींमुळे निर्माण झाला असावा कालांतराने त्या खोल भागात पाणी साचले आणि प्रवाहित झाले असावे असे मत शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे
MR.O मध्ये दोन कॅमेरे आहेत एक Black &White आणि दुसरा Color Camera ह्या कॅमेऱ्यांच्या झूम लेन्स च्या साहाय्याने शास्त्रज्ञांनी हे फोटो झूम करून पाहिले आणि तेथील Chlorides Extent असलेल्या भागाचा सखोल अभ्यास केला शिवाय तेथील पाणवठ्याचा भाग तेथील मिठाच्या अस्तिव असलेल्या मातीखडकांच्या,गाळाच्या भागाचे निरीक्षण केले हा भाग तेथील भूगर्भातील volcanic घडामोडींमुळे निर्माण झाला असावा आणि तेथे पुरातन काळी पाणी प्रवाहित होत होते कदाचित ते प्रवाहित पाणी पावसाचे असावे किंवा गोठलेल्या बर्फाच्या वितळलेल्या पाण्यामुळे ह्या खोलगट भागात पाणी साचले असावे असा निष्कर्ष त्यांनी काढला त्यामुळेच तेथे आटलेल्या नदीप्रवाहाच्या खुणा आढळल्या आहेत
2021 च्या डिसेंबर महिन्यात देखील संशोधित केलेल्या माहितीनुसार मंगळावर आढळलेल्या गोठलेल्या पाण्याच्या अंशात Chloride salt आढळले होते शिवाय तेथील भूरचनेवरून तेथे पुरातन काळी पाणी प्रवाहित अवस्थेत होते हे सिद्ध झाले आहे आणि पाण्याच्या अंशात सापडलेल्या मिठाच्या अस्तित्वामुळे आणी मिनरल्स मुळे तेथे सजीवांचे किंवा सूक्ष्मजीवांचे अस्तित्व होते ह्या शक्यतेला पृष्ठी मिळाली असली तरी हि सजीवसृष्ठी कितीकाळ अस्तित्वात होती आणि कधी नष्ठ झाली हे अजूनतरी निश्चितपणे सांगू शकत नाही असे शास्त्रज्ञाचे मत आहे
No comments:
Post a Comment