सध्या अंतराळस्थानकात राहात असलेले अंतराळवीर Kayla Barron आणि राजा चारी -फोटो नासा संस्था
नासा संस्था- 4 जानेवारी
सध्या अंतराळ स्थानकात रहात असलेले अंतराळवीर राजा चारी आणी Kayla Barron ह्यांनी चार जानेवारीला Nevada Civil Air Patrol मधील कॅडेट सोबत लाईव्ह संवाद साधला त्याचाच हा वृतांत
सुरवातीला Nevada Wing Cadet च्या Captain Lou Sanoval ह्यांनी दोन्ही अंतराळवीरांचे आणी तेथे ऊपस्थित असलेल्या गेस्टचे स्वागत करत त्यांनी त्यांच्या व्यस्त दिनचर्येतुन वेळ काढुन ह्या कार्यक्रमासाठी वेळ दिल्याबद्दल आभार मानले आणी प्रश्र्नोत्तराला सुरुवात केली
Dawayne Grasnik- तुम्ही स्थानकातुन पृथ्वीवरच्या नैसर्गिक आणी अनैसर्गिक घडामोडी कशा पाहता?
राजा चारी- आम्ही रोजच पृथ्वीवरील नैसर्गिक घटना पाहतो पण जर काही अनैसर्गिक घडामोडी घडल्यास आम्हाला त्याची माहिती दिली जाते आणि त्याचे निरीक्षण नोंदवण्यास सांगितले जाते आम्ही देखील ईथुन त्या घडामोडी पहातो त्याचे फोटो घेतो विषेशतः जंगलात लागलेल्या मोठ्या आगीचे निरीक्षण करतो आगीच्या केशरी ज्वाळा,वरपर्यंत पसरलेला प्रचंड धुर आम्हाला ईथुन स्पष्ट दिसतो तसेच ज्वालामुखीच्या ऊद्रेकामुळे बाहेर पडणाऱ्या अत्यंत ऊष्ण लाव्हाचे प्रवाह देखील ईथुन आम्ही पाहु शकतो तसेच विश्वातील कीती तरी सुंदर घडामोडी आम्हाला पहाता येतात तो क्षण आमच्यासाठी अविस्मरणीय असतो तो अनमोल क्षण आम्ही फोटोबध्द करतो
Dana- स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत तुम्ही पाणी कसे पिता?
Kayla- पृथ्वीपेक्षा ईथे अत्यंत कमी ग्रव्हिटी आहे त्यामुळे तिथल्यासारखे सहजतेने पाणी पिण शक्य नसत कारण ईथे स्थिरपणे ऊभे रहाता येत नाही ईथे सारच हवेत तरंगत पाणी देखील! पाण्याचे थेंब गोलाकार मोठे होऊन स्थानकात तरंगू लागतात आम्ही आमच्या pack water bag मधून स्ट्राच्या सहाय्याने थेंब पकडण्याची कसरत करत पाणी पितो सुरवातीला कठीण जात पण मग सवय होते
David Crowder- स्थानकातील मायक्रोग्रव्हिटीचा 3D printing वर कसा परीणाम होतो
राजा चारी- ईथे कोलंबस मोड्युलमध्ये कॅमेऱ्यामागे 3DPrinter आहे आम्हाला आणी पृथ्वीवरील संशोधकांना असा अनुभव आलाय की दोन्हीकडील प्रिंटिंग सारखे आहे खरेतर हा प्रश्न शास्त्रज्ञांना खूप आधी पडला होता स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत हे शक्य होईल का? पण अंतराळवीर आणी शास्त्रज्ञांनी ईथे 3D प्रिंटिंग वापरून पहायच ठरवल आणी त्यात यश मिळाल आता ईथुन आम्ही केलेल्या प्रयोगाचे आणी अंतराळस्थानकातुन घेतलेल्या वेगवेगळ्या नैसर्गिक आणी अनैसर्गिक घडामोडींचे फोटो आम्ही पृथ्वीवर पाठऊ शकतो
Gavin Asbby - खरच !मी आश्चर्यचकीत झालोय! तुम्ही ज्यांना अंतराळवीर व्हायचय त्यांना काय सल्ला द्याल त्यासाठी काय कराव लागत ? विषेशतः 14 वर्षाच्या मुलांनी त्यासाठी काय तयारी सुरु करावी म्हणजे तेव्हापासुनच अंतराळवीर होण्याच्या दृष्टीने त्यांना शिक्षण आणी स्किल डेव्हलप करता येईल आणि अंतराळवीर होण्याचा मार्ग सोपा होईल
Kayla- आधी सांगायच तर अंतराळवीर होण्यासाठीचा एक ठराविक मार्ग नाही,अंतराळवीर होण वाटत तितक सोप नाही आम्ही दोघे अंतराळवीर झालो त्या आधी आम्ही दोघेही मिलीटरी मध्ये सर्विस करत होतो म्हणून तुम्ही त्याच मार्गाने जायला हव अस नाही त्यासाठी अनेक मार्ग आहेत आमच्या संस्थेमध्ये सायंटिस्ट, डॉक्टर, ईंजीनिअर क्षेत्रातले अंतराळवीर आहेत तसेच सिव्हिलीयन पण आहेत काहीजणांनी ईंडस्ट्रिमध्ये करीअर केलेय त्यामुळे कुठल्याही फिल्डमध्ये करीअर केलेल्यांंना अंतराळवीर होता येत अंतराळवीर होण्याची आंतरीक ईच्छा मात्र असायला हवी मग ते ध्येय साध्य करण्यासाठी त्या दिशेने प्रयत्न करायची,कठोर परिश्रम,अथक प्रयत्न करायची मानसिक तयारी हवी त्यासाठी सखोल अभ्यास करण्याचीही गरज असते स्किल डेव्हलप करण्यासाठी तुमच्या Civil air Petrol मधील स्कुल प्रोजेक्ट मध्ये तुम्ही प्रविण्य मिळवा कारण अंतराळवीर होण्यासाठी टिमवर्कची आवश्यकता असते ईथे वेगवेगळ्या देशातील,प्रांतातील,वेगवेगळ्या फिल्डमधील लोक एकत्र काम करतात ईथे स्थानकात तर त्याची खूप गरज असते सर्वांना एकत्रित राहून संशोधन कराव लागत तुम्ही शाळेपासूनच सुरुवात केलीतर भविष्यात तुम्हाला अंतराळवीर होण्यासाठी त्याचा निश्चितच ऊपयोग होईल
Luz Sandoval-अंतराळस्थानकातील ऑक्सिजनच्या नियमित पुरवठ्यासाठी स्थानकात काय व्यवस्था असते?जर अचानक समस्या ऊद्भवली तर काय करता?
राजा चारी- स्थानकातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे ईलेक्ट्रोलीसिस करून पाण्यातून,कार्बनडाय आँक्साईड मधून रासायनिक प्रक्रिया करून Oxygen वायु वेगळा काढून ऑक्सिजन निर्मिती केल्या जाते त्यामुळे आम्हाला आमच्या श्वासोच्छवासाठी आणी नियमित सायकल साठी आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा होतो पण समजा तुम्ही विचारल तशी काही समस्या ऊद्भवली आणी ऑक्सिजनच्या निर्मितीत बिघाड झाला तर High Pressure Oxygen Tanks स्थानकाबाहेर बसविण्यात आले आहेत त्यातून आतमध्ये पंपिग करून पुरवठा केला जातो त्यामुळे Oxygen generation System मध्ये बिघाड झाला तर Oxygen tank द्वारे स्थानकातील Oxygen cycle सुरू होते शीवाय स्थानकातील रशियन आणी युरोपियन मोड्युलमध्ये आमच्यासाठी जास्तीची लाईफ सपोर्ट सिस्टीम बसविण्यात आली आहे त्या मुळे अशा अनेक सिस्टिमद्वारे Oxygen ची गरज पडल्यास Oxygen पुरवठा केल्या जातो
MacDonald- पृथ्वीवरून Rocketच्या सहाय्याने अंतराळात प्रवेश करतानाचा अनुभव कसा होता ?
राजा चारी- खूप अदभूत! थरारक राईड! खर सांगायच तर Kayla आणी मी ईतर अंतराळविरांसोबत Crew Dragon मधून स्थानकात पोहोचलो आम्ही ट्रेनिंगमध्ये जसा अनुभव घेतला तसाच ईथेही होता सेन्सेशन ,आवाज सारखाच होता पण ईथे आम्ही प्रत्यक्षात अंतराळात प्रवेश करत होतो सुरवातीला मला Elevator मध्ये बसल्यासारख वाटल रॉकेट खूप वेगाने वर जात होत पण खूप Smoothly मला नवल वाटल कारण मला वाटल होत तसा खूप मोठा आवाज झाला नाही खूप घक्के बसतील अस वाटल होत पण तस झाले नाही डोक्यावर हेलमेट होत तरीही आवाज जाणवत होता पण मला वाटल तेवढा मोठा नव्हता Rocket खूप वेगाने जात होत मला प्रथमच आपण यानात मध्ये बसलो आहोत हे जाणवल यानाने पहिल्या स्टेज मधून दुसऱ्या स्टेजमध्ये प्रवेश केला तेव्हा आम्ही आमच्या सिटवरून जोरात समोर ढकलल्या गेलो आणि त्याच क्षणी आम्हाला आम्ही वजनरहित झाल्याची जाणीव झाली पुन्हा आम्ही आमच्या सिटवर मागे ढकलल्या गेलो तो क्षण खुपच अदभुत होता!सुंदर होता! काही वेळाने दुसरी स्टेजही संपली आणी आम्ही पुर्णपणे वजनरहित अवस्थेत गेलो अंतराळातील तरंगण्याचा हा पहिलावहिला खरा अनुभव आम्ही घेत होतो तो क्षण तो दिवस खरच खूप ग्रेट होता अविस्मरणीय क्षण होता तो! आम्ही तरंगण्याचा थरारक अनुभव घेत अंतराळ प्रवास करत होतो प्रवासाचा तो थरारक अनुभव घेत होतो
Wonne Attanen- तुम्ही अंतराळातून पृथ्वीकडे पहाताना तुमच्या मानवतावादी दृष्टीकोनात काही फरक झाला का?
Kayla- पृथ्वीवरील विश्व एकमेकांशी कस जोडल्या गेलय हे स्थानकातुन पहाता आल शाळेत शिकताना आपण वेगवेगळ्या देशाच्या सिमारेषा पहातो प्रत्यक्षात अशा रेशा दिसत नाहीत पण आपल्या पृथ्वीचा आकार गोलाकार आहे पृथ्वी एकमेव आहे जीथे सजीव सृष्ठीचे अस्तित्व आहे तिथे जीवनासाठी आवश्यक पाणी आहे वातावरण आहे ईथे आल्यावर त्याच महत्त्व पटल त्या मुळे ह्या सुंदर,अनमोल पृथ्विच संरक्षण करायला हव ईथल वातावरण जपायला हवे म्हणजे पृथ्वीचे अस्तित्व टिकेल भविष्यकालीन पीढीसाठी मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी पृथ्वीवरील वातावरण टिकवण आवश्यक आहे म्हणून पर्यावरण रक्षण करण अत्यंत आवश्यक आहे हे जाणवल
Michael Ramirez- अंतराळवीर होण्यासाठीच्या ट्रेनिंग मधला कुठला भाग तुम्हाला जास्त आवडला ?
राजा चारी-मला तिथल्या लोकांना भेटायला आवडल अंतराळवीर होण माझ्यासाठी सोप नव्हत मी अंतराळ वीर होण्यासाठी अनेकदा apply केला होता दुसऱ्यांंदा मी प्रयत्न केला कारण मला ज्यांनी पहिल्यांदा apply केला त्यांना भेटायच होत अंतराळवीर होण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात खूप टफ कॉम्पिटेशन असते खूप तयारी करावी लागते निवडीसाठी. 2017 मध्ये मी आणी Kayla एकाच ट्रेनिंग क्लासमध्ये होतो आमचे ईतर क्लासमेट पण तिथे होते मला ट्रेनिंगमधला सगळ्यात आवडलेला भाग म्हणजे लोकांना भेटण नासा संस्थेच्या वेगवेगळ्या भागातील संस्थेला भेट देण तिथे आमची ट्रिप असायची तेव्हा नासाच्या वेगवेगळ्या सेंटरमध्ये आम्ही गेलो तिथे अनेक विषयावर चाललेल संशोधन पाहून मी आश्चर्यचकीत झालो माझे डोळे ऊघडले मला फक्त अंतराळवीर होण्यासाठीचीच माहिती होती आणी ईथे तर अनेक विषय होते Aerospace,Human Space Flight,Planetary Science,Geology, तीथे सायन्सचे अनेक विषय होते ज्यावर सखोल संशोधन सुरू होत नासा संस्थेत ह्या साऱ्या विषयांंची स्पेशॅलिटी होती मला ते खूप ईंटरेस्टिंग वाटल आणी माझ्यासाठी खूप आवडणारी गोष्ठ म्हणजे माझ्या आवडत्या मित्रांसोबत ईथे काम करण आणी आधी सांगितले त्या प्रमाणे तिथल्या लोकांना भेटण
Kayla -राजा ने सांगितले तसच मलाही वाटत मला Challenging job करायची ईच्छा मला लहानपणापासूनच होती मला स्वतःला सिध्द करायच होत मी नेव्हीत job केला तेव्हा सबमरीन फोर्स मधल काम Challenging होत मला तिथे Complex engineering operational mission मध्ये टिमवर्क करताना ईथे आणी स्पेस फ्लाईट मध्ये साम्य असल्याच लक्षात आल आणी मला जाणवल की,नासामधल्या असामान्य कर्तबगार लोकांसोबत काम करायला मिळाल तर मला ते नक्कीच आवडेल तिथले शास्त्रज्ञ लोकांच्या भल्यासाठी अंतराळ मोहिमेत काम करतात नव नवीन शोध लावतात त्या साठी त्यांच संपूर्ण आयुष्य खर्ची घालतात माझ संपूर्ण जग बघण्याच,अंतराळवीर होण्याच स्वप्न ईथे पुर्ण होईल अस वाटल मी अंतराळवीर होण्यासाठी नासा संस्थेत अप्लाय केला माझी नासा संस्थेत निवड झाली माझ स्वप्न पुर्ण झाल मला खरच अंतराळवीर होता आल नासा संस्थेतील असमान्य कर्तृत्ववान लोकांना भेटता आल त्यांच्या सोबत काम करता आल,शिकता आल आणी माझ्या सोबतच्या बुद्धीमान मित्रांसोबत मी आता स्थानकात राहतेय संशोधन करतेय
Maximus Floor- स्थानकात सध्या कोणत्या प्रकारचे सायंटिफिक प्रयोग सुरू आहेत ?
Kayla- ईथे जवळपास 350 प्रकारचे प्रयोग सुरू आहेत आम्ही मानवी शरीरावर मायक्रोग्रव्हिटीत काय परिणाम होतात हे पहाण्यासाठी संपूर्ण शरीरावर संशोधन करत आहोत काही मेडिकल प्रयोग आहेत मानवी रोगावर ऊपयुक्त औषध शोधण्यासाठी काही ऊद्योग जगतातील आधुनिक तत्रंज्ञान शोधण्यासाठी आणी पर्यावरण रक्षणासाठी वै अनेक प्रयोग सुरू आहेत नुकत्याच स्थानकात आलेल्या कार्गोशिपमधुन रोबो आलाय Astrobee नावाच त्यात सेंसर ,पेलोड बसविण्यात आले आहेत फ्री फ्लांईंग असल्याने त्याच्या सहाय्याने कार्गो ऑपरेशन आणी ईतर कामे करण सोप ह़ोईल
Rachel Crowder- अंतराळस्थानकातुन पहाताना आकाशातील तारे वेगळे दिसतात का?
राजा चारी-हो थोडेसे वेगळे! कारण आपण पृथ्वीवरुन वर आकाशात पहातो ईथे स्थानकाला खालच्या दिशेने खिडक्या आहेत शीवाय ईथे आजुबाजुला पाहिल तर तारे जवळ दिसतात आपण सहजतेने त्यांना स्पर्श करु शकु अस वाटत पण ते दुर असतात ते जेव्हा चमकत नाहीत तेव्हा जरा स्पष्ट दिसतात,मोठे दिसतात सुर्य एक तेजस्वी चमकदार केशरी रंगाचा गोळा दिसतो पण त्याच्याकडे एकटक पहाताना त्रास होतो ईथुन पृथ्वीवरच्या क्षितिजावरचा रंगीबेरंगी avora दिसतो एकिकडे सुर्य ऊगवत असतो दुसरीकडे चंद्र खूप विलोभनीय दृष्य दिसत त्यासाठी नासा संस्थेचे आभार! त्यांच्यामुळेच आम्ही ईथे आहोत
Jx Pedrini- अंतराळवीर निवडीसाठी कोणते निकष असतात विषेशतः Physical Standard?
राजा चारी -निवडीसाठी असे विषेश ठराविक निकष नसतात पण अंतराळात प्रवास करताना,स्थानकातील झीरो ग्रव्हिटीत शरीरावर विपरित परिणाम होऊ नये म्हणून अंतराळवीराच शरीर निरोगी आणी फिट असण आवश्यक असत त्यासाठी ट्रेनिंग दरम्यान नियमित चेकअप केल्या जाते अंतराळ प्रवास करताना Launching आधी आणी पृथ्वीवर परतल्यावर कारण अंतराळवीर जेव्हा परत येतात तेव्हा तिथल्या मायक्रो ग्रव्हिटीत त्यांच्या बोन डेन्सिटी मसल डेन्सिटीवर परीणाम होतो आणी आधी सांगितले त्या प्रमाणे आम्ही दोघे मिलीटरी सर्व्हिसमध्ये होतो तेथे केलेल्या कामामुळे आमच स्किल पाहून आणी अथक परीश्रम,प्रयत्न करून आम्ही ईथवर पोहोचलो ईथे नासा संस्थेत वेगवेगळ्या शैक्षणिक फिल्डमधल्या कर्तबगार लोकांचा समावेश आहे
katylen cattrel- अंतराळ स्थानकातील वाढलेली रोपे पाहुन मी आश्चर्यचकीत झाले तुम्ही तीथे गार्डन कशी फुलवलीत?
Kayla - हो! आम्हाला देखील आश्चर्य वाटत ईथे पृथ्वीसारख वातावरण नाही,ऊन,पाऊस,ऊजेड नाही तरीही नासा संस्थेतील संशोधक आणी अंतराळवीरांनी हे करून दाखवलय ईथल्या व्हेजी चेंबरमध्ये पृथ्वीवरच्या सारख कृत्रीम वातावरण,तापमान,ऊजेड,अंधार निर्मिती करून रोपांची लागवड केली जाते आणी स्थानकातील अंतराळवीर त्यांची नीगा राखतात पाणी घालण,रोपांना खत घालण वै.आम्ही मागच्या महिन्यात ईथे ऊगवलेली मिरची खाल्ली रात्री मिरची घालून टोकोज पार्टी देखील केली भविष्यकालीन दुरवरच्या अंतराळमोहिमातील अंतराळवीरांना ताजे अन्न आणी भाजी खाता यावी म्हणून आम्ही ईथे स्थानकात हा प्रयोग करतोय
Hannah Cattrell - स्थानकात पाण्याच नियोजन कस करता?
राजा चारी- ईथे अत्यंत कमी पाणी असत त्यामुळे आधी सांगितले त्या प्रमाणे स्थानकातील अत्याधुनिक यंत्रणेने पाणी रिसायकलिंग करुन आणी कार्बन डाय ऑक्साईड रिमुव्हल करुन ऑक्सिजन प्रमाणे जनरेटरद्वारे पाणी निर्मिती केल्या जाते आम्ही पाणी पीतो तेव्हा त्यातल ऊरलेल पाणी प्रेस करून काढल्या जाते वापरलेल्या पाण्याच रीसायकलींग केल्या जाते शिवाय मला आवडलेली चांगली गोष्ट म्हणजे ईथे स्थानकातील अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आमच्या घामावाटे,श्वासोच्छ्वासावाटे बाहेर पडलेल आणी हवेतील मॉइश्चर स्थानकातील फिल्टरद्वारे शोषल्या जाते आणी त्यापसुन पुन्हा पाणी निर्मिती केल्या जाते भविष्यकालीन मंगळ आणी चांद्र मोहिमेसाठी हे ऊपयुक्त ठरेल
Oscar Colbert-स्थानकातील वास्तव्यात मिळालेला मोकळ्या वेळात काय करता?
Kayla- आम्ही मोकळ्या वेळेत स्थानकातील Cupola मधून अंतराळातील घडामोडीं पहातो त्यांचे फोटो काढतो एकत्र येतो गप्पा मारतो ,पुस्तके वाचतो पार्टी करतो आता न्यु ईयरला आम्ही डान्स पार्टी केली
No comments:
Post a Comment