नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough आणि Megan McArthur W.F.I.A T.V. शी संवाद साधताना -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -8 जुलै
अंतराळ मोहीम 65चे अंतराळवीर Shane Kimbrough व Megan McArthur ह्यांनी W.FLA-T.V. Tampa ह्यांच्याशी लाईव्ह संवाद साधला त्याचाच हा वृत्तांत
Megan तुझ्या पासून सुरू करुयात तु स्थानकातून घेतलेले फोटो खूप छान आले आहेत तुम्ही स्थानकातून हवामानाचा वेध घेत होतात का? कारण तु Hurricane वादळाचे घेतललेले फोटो खूपच चांगले आहेत तुम्हाला स्थानकातून हे वादळ कस दिसल त्या बद्दल सांग
Megan- ईथुन दुर 250 मैल अंतरावरून अवकाशातुन पृथ्वीकडे पहाताना निसर्गातील अनेक सुंदर घडामोडी दिसतात स्थानकाला खूप खिडक्या आहेत आम्हाला आमच्या कामातून वेळ मिळाला की,weekend ला आम्ही स्थानकाच्या Cupola मधून पृथ्वीकडे पहाताना निसर्गातील सुंदर दृश्य कॅमेराबद्ध करतो समुद्राच्या लाटांचे विलोभनीय दृश्य असो की ढगांचे बदलते आकार सारच एकदा Shane आणी मी बोलत असताना weekend ला आम्ही खिडकीतून Caribbean sea पहात होतो तेव्हा Shane ला कल्पना सुचली तो म्हणाला आपण जेव्हा पुन्हा ह्या भागातून जाऊ तेव्हा ईथले फोटो काढु लकीली आम्ही त्या भागातून जात होतो मी Shane ला हाक मारली पण तो कामात बिझी होता मी पटकन कॅमेरा घेतला आणी फोटो घेतले तेव्हाच hurricane वादळाचे फोटोही आले मला वादळाचे गोलाकार रुप आकार घेताना दिसले खूपच ईंटरेस्टींग दृश्य होत ते वादळाच ते गोलाकार घेतानाच दृश्य नंतरची गोलाकार वावटळ,प्रचंड धुरळा आणी भयानकता ईथुन वरुन मी पाहु शकत होते वादळाची सुरुवात,आणी वादळ घडतानाचा त्याच आकारबद्ध स्वरूप प्रत्यक्ष पाहण आश्चर्यकारक होत मी पृथ्वीवर ज्या भागात रहाते तीथली वादळाची भयानकता आणी नंतरचा विध्वंस मी पाहिला आहे त्यामुळे मी जर तिथे असते तर असे फोटो घेऊ शकले नसते पण ईथुन वरुन मला ते घेता आले ह्या फोटोतून सगळ्यांना घरबसल्या वादळाच ईथुन दिसलेल स्वरूप पहाता याव म्हणून मी ते फोटो शेअर केले मी वादळाचे फोटो घेत नव्हते किंंवा हवामानाचा वेध पण अचानक योगायोगाने मला ते दिसल आणी मी कॅमेराबध्द केल
प्रश्न - तुम्ही त्या भागातून जाताना तुम्हाला स्थानकातील सिस्टीम मध्ये काही बदल करावे लागले का?विषेशतः Atlantic सागरावरील भागातून जाताना तुम्हाला काही माहिती दिली जाते का? फोटो घ्यायला सांगितले जाते का?
Megan- आम्ही नासाच्या प्रोग्राम अंतर्गत अंतराळ स्थानकातून अंतराळातील व पृथ्वीवरील घडामोडींची नोंद घेतो विषेशतः जंगलातील आगी,वादळ ज्वालामुखी,समुद्रातील घडामोडी,पक्षांचे स्थलांतर वै. गोष्टींची नोंद घेतो,फोटो काढतो आमचा जास्त वेळ स्थानकातील labमध्ये संशोधन करण्यात जातो कधी,कधी संस्थेतर्फे जर आम्हाला काही घडामोडींची नोंद घ्यायला फोटो काढायला सांगितले तर मात्र आम्ही थांबून फोटो घेतो
प्रश्न -तुम्ही पृथ्वीवरून स्थानकात जाता तेव्हा तिथल्या वातावरणात आणी पृथ्वीवर परतल्यावर ईथल्या वातावरणात adjust व्हायला कीती वेळ लागला परतल्यानंतर तुम्हाला Quarantine केल जात का?
Megan- आम्ही स्थानकात जातो तेव्हा ईथल्यासारख वातावरण नसल्याने झीरो ग्रव्हिटित adjust व्हायला वेळ लागतो कारण तिथ सतत तरंगत रहाव लागत ईथल्या सारख स्थीर ऊभ राहता,चालता,बसता येत नाही पण माणसाचा मेंदू आणी शरीराची जुळवून घेण्याची तग धरून रहाण्याची क्षमता अमेजिंग आहे मानवी शरीर लवकरच त्या वातावरणाला सरावत साधारण एकदोन आठवड्यात तिथल्या वातावरणाची सवय होते सुरवातीला कठीण जात लक्ष नसल की,कुठेही धडकण्याची,ईजा होण्याची भीती असते सतत सतर्क रहाव लागत परतल्यानंतरही झीरो ग्रव्हिटितुन वातावरणात आल्यावर सतत तरंगत्या अवस्थेत राहिल्याने आपण तरंगतोय असा भास होत राहातो चालण,ऊभ राहण विसरलेल असत थकवा आलेला असतो त्यामुळे पुर्ववत व्हायला थोडा वेळ लागतो पुन्हा एकदोन आठवडे नॉर्मल व्हायला लागतात आम्हाला नातेवाईक,डॉक्टर त्यासाठी मदत करतात आम्हाला Quarantine केल जात नाही पण काही आवश्यक मेडिकल चेकअप केल्या जाते ट्रिटमेंट घ्यावी लागते नंतर आम्ही आमच्या कुटुंबीय नातेवाईक आणि मित्रांसोबत राहु शकतो
प्रश्न -तुम्ही दोघांनीही अमेरीकेचा शटल प्रोग्रॅम बंद होण्याआधी आणी आता सुरू झाल्यावर स्थानकात जाण्यासाठी अंतराळ प्रवास केला आहे आधीच्या अंतराळ यानातील केलेला अंतराळप्रवास आणी आताच्या Space X Crew Dragon मधील प्रवास यातला फरक सांगा
Shane- दोन्ही वेळेसचा अनुभव अविस्मरणीय आहे आधीच्या तुलनेत आताचा प्रवास आरामदायी होता यानात जागा अत्यंत कमी असते तीनच अंतराळवीर बसू शकतात पण Space X Crew Dragon मध्ये चार अंतराळवीर अंतराळ प्रवास करु शकतात Crew Dragon स्पेसीयस आहे त्यात स्वयंचलीत यंत्रणा आहे खरच Crew Dragon बनवणाऱ्या ईंजीनीअर्सनी खूप असामान्य कर्तृत्व सीध्द केलय Megan चे पती Bob आणी Dug ह्यांनी Dragon मधून पहिला अंतराळ प्रवास केला त्यांच्या कडून ऐकल होत आता प्रत्यक्ष अनुभवल स्थानकही आता अत्याधुनिक यंत्रणेने अद्ययावत झालय आम्ही launching च्या वेळेस launch pad वरून Rocket चे ज्वलन आणी प्रत्यक्ष launch होतानाची प्रक्रिया पाहु शकलो,अनुभऊ शकलो जे अंतराळयानातुन पहाता आल नव्हत
प्रश्न -Megan भविष्यात स्त्रियांना अंतराळविश्वात कीती scope आहे आणी आता तर चंद्रावर महिला अंतराळवीराला जाण्याची संधी दिली जाणार आहे त्या बद्दल तुला काय वाटत
Megan -निश्चितच आता खूप संधी ऊपलब्ध आहेत मी जेव्हा अंतराळवीर होण्यासाठी नासा संस्थेत जॉईन झाले तेव्हा फक्त विसटक्के स्त्रियांना संधी होती आता त्यांना बरोबरीच स्थान मिळतय,कितीतरी कर्तृत्ववान स्त्रिया आता अंतराळवीर होण्यासाठी ऊत्सुक आहेत,सध्या नवनवीन कल्पना अस्तित्वात येत आहेत आणि आता तर महिला अंतराळवीराला आर्टिमस मोहिमेअंतर्गत चंद्रावरच नाही तर मंगळावरही जाण्याची सुवर्ण संधी मिळतेय आम्ही ह्या नवतरुण,तरुणींना चंद्रावर गेलेल पहाण्यासाठी ऊत्सुक आहोत
प्रश्न - Atlantic परीसरातील hurricane वादळाची शक्यता किंवा अंदाज वर्तवल्यानंतर तुम्ही त्याचा मागोवा घेतला का? त्यावेळी तुम्हाला काही काळजी घ्यायला सांगीतली गेली होती का?
Shane- हो! वादळ खाली पृथ्वीवर झाल असल आम्ही त्यापसुन दुर असलो तरीसुद्धा ह्या दरम्यान सुर्यापासुन निघणाऱ्या Radiation मुळे आमच्या शररीरावर विपरीत परीणाम होऊ नये म्हणून आम्हाला सतर्क केले जाते अशा काही अडचणी आल्या तर आम्हाला स्वतः चे संरक्षण कसे करायचे हे सांगितले जाते आणी स्थानकातील शील्ड असलेल्या भागात आम्हाला काही वेळ थांबायला सांगितले जाते
प्रश्न -आता ह्या महिन्यात लवकरच काही व्यवसायिक कंपन्याचे अंतराळयान आणि Star line Capsule स्थानकात येणार आहे अंतराळ ऊड्डान मोहिमेअंतर्गत काही हौशी नागरिकही त्यातून अंतराळ प्रवास करणार आहेत त्या बद्दल तुझ मत काय
Shane- आम्ही खूप excited आहोत अमेरीकेची दहा वर्षांपूर्वी बंद झालेली अंतराळ विश्वातील ऊड्डान मोहीम पून्हा सुरू झाली आहे त्यामुळे व्यावसायिकांना आणी अंतराळवीरांना त्याचा फायदा होईल Space X Crew Dragon चा शुभारंभ Megan चे पती Bob आणी Douglas ह्यांनी केल्यानंतर आम्ही तिसऱ्यांदा Space X Crew Dragon मधून स्थानकात आलो आहोत आमच्यासाठी आणी अमेरिकेसाठी हि अभिमानास्पद बाब आहे आता हौशी नागरिकांनाही अंतराळप्रवास करता येणार आहे
प्रश्न -स्थानकातील हवामान आणी पृथ्वीवरील हवामान ह्यात काय फरक आहे विषेशतः स्थानकातून अंतराळातील ढग,वातावरण वै नैसर्गिक घडामोडींच तुम्ही नेहमीच निरीक्षण करता तेव्हा काय फरक जाणवतो
Shane- खूप फरक जाणवतो ईथे स्थानकात झीरो ग्रॅव्हिटी असल्याने वातावरण नसत आणी अंतराळात देखील निर्वात पोकळी असल्याने वातावरण नसत,पृथ्वीसारखे नैसर्गिक वातावरण हिरवळ,झाडे, फुले अस वातावरण बाहेर नसल्यामुळे ढगांचा गडगडाट,विजेचा कडकडाट,पाऊसाची बरसात ,ऊन,वारा ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्हाला घेता येत नाही पण ढगामधील चमकती वीज आम्ही पाहु शकतो स्थानकातून सार पाहु शकतो पण पृथ्वीवरच्या सारख घराबाहेर पडुन पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटता येत नाही मोकळ्या हवेत बाहेर फिरता येत नाही पण आमच्या कुटुंबियांकडून आम्हाला माहिती मिळते त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी होतो
प्रश्न -Megan तु नेहमीच आकाशातील तारे, ढग,नैसर्गिक घडामोडी पहातेस त्यांचे फोटो घेतेस शेअर करतेस त्या बद्दल सांग
Megan- ईथे स्थानकातील संशोधनातून वेळ मिळाला की,Weekend ला आम्ही स्थानकाच्या खिडकीतून अंतराळात,प्रुथ्वीकडे पहातो ईथे दर 90 मिनिटानी सुर्योदय आणि सुर्यास्त पहायला मिळतो आम्ही अंधार, प्रकाशांचा खेळ अनुभवतो,चकाकते ग्रहतारे,आकाशगंगा, पृथ्वीवरील क्षितिजावरच्या Auora चे विलोभनीय इंद्रधनुषी रंग ,चकाकणारी वीज समुद्राच्या खळाळत्या लाटा,ढगांचे बदलते रोजचे वेगवेगळे आकार अशा सुंदर नैसर्गिक लीला पाहून मी आकर्षित होते अशी दृश्य मी कॅमेराबध्द करते हे सार पाहून क्षणभर आम्ही आनंदित होतो एकदा मला असच निसर्गाच अनोख दृश्य पहायला मिळाल बहुधा ढगांच्या गडगडटानंतर वीज चमकते आणी ती पृथ्वीकडे आकर्षित होऊन पृथ्वीवर पडते तेव्हा मी एकटीच विजांचा कडकडाट,ढगांचा गडगडाट पहात होते खूप विजा चमकत होत्या आणी अचानक विपरीत घडल ढगांच्या मधून चकाकणारी वीज पृथ्वीकडे न जाता ढगांच्या वर आकाशाच्या दिशेने येताना दिसली तो प्रकाशझोत पाहून मी आश्चर्यचकीत झाले मी लगेच सगळ्यांना बोलावून ते दृश्य दाखवल पण अस क्वचितच घडत
प्रश्न -Megan तुला Scuba diving आवडत ईथे पृथ्वीवर समुद्रात पोहताना आणी अंतराळात स्थानकातील झीरो ग्रॅव्हीटीत तरंगताना काय बदल जाणवतो
Megan- तरंगण दोन्ही कडे सारखच आहे तिथे समुद्रात पाण्यात पोहताना आपल्याला शरीराला पुश करून पुढे जाव लागत ईथे झीरो ग्रॅव्हिटित स्थानकातील वातावरणात हि प्रक्रिया आपोआप घडते तीथे फक्त एकाच दिशेने पोहता येत ईथे वर,खाली,समोर मागे सगळ्या दिशेने तरंगता येत अगदी वर छतावर,भिंतीवर कुठेही,कसही तरंगत जाऊन ऊभ रहाता येत ऊलट,सुलट कसही तो खूप मजेशीर अनुभव असतो
प्रश्न -ईथुन Florida वरुन जाताना तुमच्या मनात ह्यावेळी नेमक्या कोणत्या भावना आहेत तुम्हाला काय आठवत ईथल White sandy beach की Disney World?
Shane- मला माझी फॅमिली आठवते कारण ते तिथे रहातात काल रात्री मी तीथे लायटिंग पाहिली त्या लायटिंगप्रेमी लोकांच मला कौतुक वाटल अभिनंदन करावस वाटल कारण अमेरिकननांच्या स्वातंत्र्याच ते सेलिब्रेशन होत
Megan- मला नेहमी Florida मधील Rocket launch ची आठवण येते मी जेव्हा,जेव्हा तिथे गेले तेव्हा तेव्हा तिथे Rocket launching पाहिल की,मी नेहमी फोटो काढायचे
प्रश्न -पृथ्वीपासुन दुर स्थानकात रहातानाचा अनुभव कसा आहे
Shane- खूप छान आहे ईथे तिथल्या सारख टेबलावर बसुन एकत्र जेवता येत नसल तरीही आम्ही टेबलाभोवती जमुन एकत्र जेवण्याचा आनंद घेतो
No comments:
Post a Comment