नासाचे अंतराळवीर Shane Kimbrough आणि Megan McArthur Space X कार्गोशिप च्या परत पाठवण्याच्या तयारीत -फोटो नासा संस्था
नासा संस्था -5 जुलै
चार जुलैला अमेरिकेत सर्वत्र 245 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला यंदा रविवारी स्वातंत्र्य दिन आल्याने विकेंड होता पण कोरोनाच्या लॉक डाऊनमुळे निर्बंध पाळत नागरिकांनी तो आनंदात साजरा केला एरव्ही अमेरिकन नागरिक अत्यंत उत्साही आपल्यासारखेच एकत्र जमून पिकनिकला जाऊन हा स्वातंत्रदिन तेथील नागरिक साजरा करतात ह्या दिवशी अमेरिकेच्या झेंड्यातील लाल,निळा पांढऱ्या रंगाचा वापर करून लाइटिंग करून सजावट करतात वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश जेवणात करून मेजवानीचे आयोजन केल्या जाते 4 जुलै 1776 ला अमेरिकेची निर्मिती झाल्याने तेव्हापासून हा दिवस तिथे स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि म्हणूनच तिथे स्वातंत्र्य दिनाला अमेरिकेचा Birthday ही म्हणल्या जाते
नासाचे अंतराळवीर मात्र पृथ्वीपासून दूर अंतराळस्थानकातील झिरो ग्राव्हीटीत राहून संशोधन करत असतात त्यांना इथल्या प्रमाणे स्वातंत्र्य दिन साजरा करता येत नाही तरी देखील दरवर्षी त्यांच्या कामातून वेळ काढून अंतराळवीर हा दिवस उत्साहात पार्टी करून साजरा करतात सध्या नासाच्या अंतराळ मोहीम 65चे अंतराळवीर स्थानकात राहात आहेत स्वातंत्र्य दिन रविवारी आल्याने त्यांचा देखील विकेंड होता पण पृथ्वीवरून स्थानकात अंतराळवीरांसाठी आवश्यक सामान घेऊन गेलेले Space X कार्गोशिप सहा जुलैला पृथ्वीवर परतणार असल्याने अंतराळवीर ह्या आठवड्यात खूप बिझी होते त्यांनी केलेल्या संशोधित नमुन्याचे सॅम्पल्स पॅक आणि इतर सामान पृथ्वीवर पाठवणे आणि कार्गोशिपच्या परत पाठवण्याची तयारी करण्यात ते बिझी होते तरी देखील त्यांनी सर्व कामे लवकर आटोपून स्वातंत्र्यदिन साजरा केला त्या वेळी अंतराळवीर Shane Kimbrough ,Mark Vande Hei आणि Megan McArthur ह्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी लाईव्ह चॅट करून संवाद साधला त्यांनी सोशल मीडियावरून अमेरिकन नागरिकांशी संवाद साधत त्यांना अमेरिकेच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या
Megan McArthur -मी नासाच्या मोहीम 65 ची अंतराळवीर पृथ्वीपासून 250 मैलांच्याही वरून अंतराळस्थानकातून तुमच्याशी संवाद साधतेय माझ्यासोबत अंतराळवीर Mark Vande Hei आणि Shane Kimbrough आहेत
"तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा! आजचा दिवस,दिवासातील प्रत्येक क्षण तुम्हाला आनंदात जावो !"
Shane Kimbrough- आम्हाला आम्ही अमेरिकन असल्याचा अभिमान आहे नासा संस्थेतर्फे अमेरिकेने अंतराळविश्वात उंच भरारी मारून जगभरात कर्तृत्व सिद्ध केले आहे मंगळ मोहिमेच्या यशानंतर आता अमेरिका चंद्रावर जाण्यासाठी सज्ज आहे आम्हाला स्थानकात राहून संशोधन करण्याची संधी नासाने दिली त्याचा आम्हाला अभिमान वाटतो
"America Happy Birthday! तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा !"
Mark Vande Hei - नासा संस्थेमुळे आम्ही स्थानकातून तुमच्याशी संवाद साधू शकतो,इथे राहून नवनवीन संशोधन करू शकतो त्यामुळेच आम्हाला स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची संधी मिळते आम्ही जगभरातील लोकांपर्यंत पोहोचू शकतो आम्हाला हि संधी दिल्यामुळे आम्ही नासाचे आभारी आहोत आम्हाला अमेरिकन असल्याचा अभिमान वाटतो
तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! आजचा दिवस तुम्हाला आनंदात जावो ! सर्व निरोगी राहावेत अशी शुभेच्छा !
No comments:
Post a Comment