Jezero Crater ह्या मंगळावरील भागातील Delta Scarp -फोटो - नासा संस्था -JP.L lab California
नासा संस्था - 1 जुलै
मंगळावर पोहल्यानंतर त्वरीत स्वतः चा सेल्फी काढून पाठवणाऱ्या Perseverance मंगळयानाने आता मंगळभुमीवरील भुपृष्ठाखालील भागाच्या खोदकामास सुरवात केली आहे विषेश म्हणजे आता हे सहा चाकी यान स्वयंचलित यंत्रणेने कार्यरत होऊन कामाला लागले आहे त्यासाठी आता यानाला पृथ्वीवरून कार्यरत करण्याची गरज नसल्याची बातमी नुकतीच नासा संस्थेने प्रसारित केली आहे सध्या हे यान मंगळ ग्रहावरील Jezero Crater ह्या खोलगट भागात कार्यरत होऊन रोबोटिक आर्मच्या सहाय्याने ऊत्खनन करीत आहे Perseverance मंगळ यान यानाला बसविलेल्या RMI ह्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने मंगळावरील आजूबाजूच्या परिसरातील व भुपृष्ठाखालील भागातील क्लोजअप फोटो काढून पृथ्वीवरील नासा संस्थेत पाठवत आहे
मागच्या महिन्यात Perseverance यानाने पाठविलेल्या Jezero Crater ह्या भागातील फोटोत मंगळावर पुरातन काळात पाणी अस्तित्वात होत ह्या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे ह्या फोटोत यानाने त्या भागातील बारकावे ठळकपणे टिपले आहेत त्यामुळे तेथील पुर्वी अस्तित्वात असलेले आणी कालांतराने आटलेले नदीपात्र,तळे नदी काठचे दगड,कडा स्पष्ट पणे दिसत आहेत नासाच्या California येथील JPL lab मधील शास्त्रज्ञ हा फोटो पाहून आनंदित झाले आहेत त्यांनी ह्या भागाला Delta Scarp असे नाव दिले आहे
JPL lab मधील प्रमुख शास्त्रज्ञ Vivian Sun हे म्हणतात अंतराळ विश्वातील अंतराळवीरांना विचारले की,तुम्हाला अंतराळात गेल्यावर पृथ्वीकडे पहाताना कसे वाटल तर सर्व जण पृथ्वीच अलौकिक सौंदर्य पाहून थक्क झाल्याच सांगतात Apollo 8 च्या चांद्रमोहिमेतील अंतराळवीर Bill Anders ह्यांचा चंद्रावरुन प्रुथ्वीकडे पहातानाचा फोटो फेव्हरिट आहे तर अंतराळवीर Randy Bresnik ह्यांना स्थानकातून घेतलेला पृथ्वीवरील Auora चा फोटो.मी कित्येक वर्षांपासून ह्या Jezero Crater भागाचा अभ्यास करतोय आणी तिथल्या नदिकाठच्या भागाची सखोल माहिती मिळवतोय आजवर मी हजारो फोटो पाहिलेत पण ह्या वेळेसचे फोटो पाहून मी थक्क झालो कारण ह्या फोटोत त्या परीसरातील बारकावे ठळकपणे दिसत आहेत त्यामुळे आता कित्येक वर्षांपासून हवी असलेली माहिती मिळेल म्हणून हा माझा फेव्हरिट फोटो आहे
Sun ह्यांना आवडलेल्या फोटोत 377 फुट रूंदिचा आटलेल्या नदिपात्राचा भाग छायाचित्रित झाला आहे नदिचा काठ,त्या भोवतीचा खडकाळ भाग आहे तो नदी सोबत वहात आलेल्या माती,चिखल,वाळुच्या थराने बनला आहे ह्या दगडावरील अनेक थर स्पष्ट दिसत आहेत त्यावरील लाटाच्या खुणा देखील ठळक आहेत बाजूला तळ्यासारखा खोलगट भाग दिसत आहे पंख्याचा आकाराचा नदिकाठ आणी भोवताली गाळापासून बनलेले खडक पाहून ईथे पुरातन काळी प्रवाहित नदी असावी आणी दरवर्षी पावसाळ्यात नदीच्या प्रवाहाबरोबर माती,गाळ,कचरा वहात येत असावा नदिला आलेल्या पुरामुळे तो कचरा पाण्याच्या प्रचंड फोर्स मुळे वहात आला असावा आणी पुर ओसरल्यावर किंवा पावसाळा संपल्यावर नदिकाठी जमलेला हा गाळ तसाच राहिला आणी गाळ,वाळु दगडाचा चुरा ,मातीनी हा दगड तयार झाला आणी तो भाग कडक झाला असावा दरवर्षी असेच एकावर एक थर साचत गेले आणी टणक खडक तयार होत गेले असावेत शास्त्रज्ञांच्या मते हा काळ 3.8 बिलीयन वर्षापूर्वीचा असावा त्याकाळी मंगळावर पाण्याचे अस्तित्व होते आणी दरवर्षी जर गाळ वहात येत होता तर निश्चितच तिथे सजीव सृष्ठी अस्तित्वात होती आता ह्या फोटोवरून व Perseverance मंगळयानाने गोळा केलेल्या नमुन्यावर सखोल संशोधन केल्यावर ह्या बाबतीत आणखी माहिती मिळवता येईल
सध्या Perseverance यान ह्याच खोलगट भागात रोबोटिक आर्मच्या सहाय्याने ऊत्खनन करत आहे पहिल्या उत्खननाच्या कामाला सुरुवात झाली आहे त्यामुळे जमीनीखालील ऊत्खननानंतर दगडाच्या खालील भागात गाढल्या गेलेले आणी कालांतराने Fossils मध्ये रुपांतरीत झालेले सजीवांचे अवषेश शिवाय जर त्या काळी सजीव सृष्ठि अस्तित्वात असेल तर त्यांच्या दैंनदिन वापरातील वस्तु वै. सापडतील दुसऱ्या ऊत्खनना नंतर आणखी सखोल माहिती मिळेल कदाचित पुढच्या वर्षी पर्यंत आणी नदिकाठच्या दगडाच्या थरावरून मंगळावर किती काळ पाणी अस्तित्वात होते कधी नष्ट झाले हे कळेल हे थर किती वर्षापासून बनले व केव्हा जमणे बंद झाले वरून हि माहिती कळेल आणी नदीच्या सखोल संशोधना नंतर नदिची रुंदी,खोली, प्रवाहाची दिशा नदीच्या ऊगमाचे ठिकाणही कळेल शीवाय हि नदी किती काळ वाहती होती कधी नदीतील पाणी आटले हे Geologist संशोधनाअंती शोधतीलच पण सध्या मंगळावर पुरातन काळी पाण्याच अस्तित्व होत ह्या गोष्टीला पुष्टी मिळाली आहे
Perseverance मंगळयानाने मंगळावरील 26 व्या दिवशी (17 मार्च) घेतलेल्या ह्या फोटोत 377 फुट रूंदिचा(115 मिटर) भाग व्यापलेला आहे मंगळयानावर बसविलेल्या RMI ह्या फुटबॉलच्या आकाराच्या कँमेऱ्याने घेतलेल्या ह्या फोटोत एका ईंचाच्या हजार पट सुक्ष्म धुळीचे कण टिपल्या गेले आहेत त्या मुळे ह्या भागातील सखोल माहिती मिळण्यास मदत होईल
No comments:
Post a Comment