Apollo - 13अंतराळयानाचे Electrical power subsystem Manager Arturo Campos - फोटो -नासा संस्था
नासा संस्था-
नासाच्या आर्टिमस चांद्रमोहिमेची तयारी आता अंतीम टप्प्यात आली आहे ह्या वर्षाअखेरीस Flight test अंतर्गत नासाचे Orion अंतराळ यान व SLS (Space Launch System)Rocket चंद्राभोवती भ्रमण करणार आहे आणी ह्या आर्टिमस मोहिमेला Commander Moonikin Compos असे नाव देण्यात आले आहे मागच्या आठवड्यात ह्या नाव निवडीची घोषणा करण्यात आली
ह्या Flight Test Orion अंतराळयानाचे नाव निवडण्यासाठी नासा संस्थेतर्फे Bracket Contest घेण्यात आली होती ह्या Contest साठी नासा संस्थेतील अंतराळ विश्वातील कर्तृत्ववान मान्यवरांची सहा नावे निवडण्यात आली आणि त्यातील आपल्या पसंतीच्या नावाला मत देण्याची संधी नागरिकांना आणि नासा संस्थेतील सदस्यांना देण्यात आली होती आणि सर्वाधिक 300,000 इतकी मते Moonikin Compos ह्या नावाला मिळाली आहेत हे नाव Arturo Campos ह्यांना समर्पित केले असून त्यांनी Apollo 13 मोहिमेतील Apollo अंतराळयान चंद्रावर नेऊन सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणले होते शिवाय ह्या मोहिमेला Apollo आणि Artemis ह्यांचे जन्मगाव असलेल्या Island चा रेफरन्स देण्यात आला आहे
नासाच्या Alabama येथील Space Flight Center मधील Chief Historian Brian Odom म्हणतात,आम्ही जागतिक चांद्रमोहीम राबवत असून त्यात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे म्हणून नवनवीन कल्पना राबवत आहोत ह्या मोहीमेद्वारा आम्ही नासा फॅमिलीतील मान्यवर Arturo Campos ह्यांचा सन्मान करणार आहोत ह्या Flight test मोहिमेनंतर Artemis मोहिमेत आम्ही तीन अंतराळवीरांमध्ये एका महिला अंतराळवीराचाही समावेश करणार आहोत आणि हि भविष्यकालीन मंगळ मोहिमेची पूर्वतयारी असेल
डमी अंतराळवीर Manikin Kennedy Space Center मध्ये Vibration Test दरम्यान -फोटो नासा संस्था
ह्या Flight Test मधील अंतराळयानातून अंतराळवीर जाणार नसून तीन डमी अंतराळवीरांना पाठवण्यात येणार आहे Moonikin हा male डमी अंतराळवीर म्हणजे माणसाचा पुतळा असून त्याचा उपयोग Orion Vibration टेस्ट साठी करण्यात येणार आहे ह्या आधीही त्याची Vibration टेस्ट घेण्यात आली होती Moonikin ह्या मोहिमेचा कमांडर असेल आणि तो कमांडर सीटवर बसेल त्याच्यासाठी खास Orion Crew Survival system suit तयार करण्यात आला आहे ह्या मोहिमेनंतर हाच सूट अंतराळवीर चंद्रावर जाताना आणि इतर मिशन साठीही वापरतील Campos ला दोन रेडिएशन सेन्सर्स बसविलेले आहेत शिवाय आणखी दोन जास्तीचे सेन्सर्सही बसविण्यात आले आहेत दोनपैकी एक त्याचे डोके सीटला जिथे टेकेल तिथे आणि दुसरा सिटमागे बसविण्यात आला आहे ह्या सेंसर्समुळे ह्या पूर्ण चांद्रमोहीमेतील अंतराळ प्रवासादरम्यानचा यानाचा स्पीड आणि धक्क्यांची नोंद ठेवली जाईल हि माहिती अंतराळवीरांच्या आगामी चांद्रमोहिमेतील अंतराळप्रवासासाठी उपयुक्त ठरेल आणि ह्या माहितीचा उपयोग अंतराळवीरांच्या सुरक्षिततेसाठीही होईल कारण पन्नास वर्षांनी अंतराळवीर पुन्हा चंद्रावर जाणार आहेत
ह्या यानातून अंतराळ प्रवास करणाऱ्या डमी अंतराळवीर Moonikin सोबत दोन डमी महिला अंतराळवीर जाणार आहेत त्यांची नावे Zohar (ISA)आणि Helga(German Aerospace Agency) अशी आहेत.इस्राईल आणि जर्मन Aerospace Agency ह्यांनी ह्या मिशन साठी नासा संस्थेला सहकार्य केले आहे
No comments:
Post a Comment