Tuesday 22 June 2021

अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी स्थानकात केला Music Day साजरा

अंतराळवीर Thomas Pesquet आणि अंतराळवीर Soichi Noguchi स्थानकातील वाद्यांवर संगीत वाजवून Music Day साजरा करतानाचे आनंदी क्षण -फोटो -नासा संस्था 

नासा संस्था- 22 जुन

नासाच्या अंतराळ मोहीम 65 चे अंतराळवीर Thomas Pesquet ह्यांनी काल 21जुनला अंतराळस्थानकात Music day साजरा केला त्या आनंदी क्षणाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केले आहेत त्या वेळेस बोलताना ते म्हणाले 

आज जागतिक French Music Day आहे France मधील नागरिक आज ऊत्साहात हा दिवस साजरा करत असतील कोणी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन लाईव्ह संगीत ऐकण्याचा आनंद घेत असतील तर कोणी मित्रमैत्रिणी सोबत आवडीच संगीत,गाण ऐकुन हा दिवस ऊत्साहात,आनंदात साजरा करत असतील 

पण ईथे स्थानकात तिथल्या सारखा हा दिवस साजरा करता येत नाही स्थानकातील झीरो ग्रव्हिटित तरंगत्या अवस्थेत संगीत वाद्य हातात घेऊन संगीत वाजवण सोप नाही कारण ईथे कमी गुरुत्वाकर्षण असल्ऱ्याने साऱ्याच वस्तू आमच्या प्रमाणे तरंगतात तरीही आम्ही हा दिवस ईथे साजरा करतोय वीस वर्षांपुर्वीच्या Alpha अंतराळ मोहिमेतील नासाचे अंतराळवीर Carl Walz ह्यांनी स्थानकात Music Band आणला होता तो अजूनही ईथे आहे त्या मधील संगीत वाद्यांवर संगीत वाजवून आम्ही हा दिवस साजरा करतोय 

अंतराळवीर Soichi  Noguchi ईथल्या Keyboard वर संगीत वाजवत आहेत आणी मी माझ्या Sax संगीत वाद्यावर संगीत वाजवतोय मी माझ्या मागच्या अंतराळ मोहिमेत हे वाद्य स्थानकात आणल होत आणी ईथेच ठेवल होत चार वर्षांनी ते वाद्य जसच्या तस पाहून मला खूप आनंद झाला होता खरतर ते साधच वाद्य असल तरी माझ्यासाठी स्पेशल आहे आधी सांगितले त्याप्रमाणे इथे स्थीर राहुन वाद्य वाजवण अवघड असल तरी आम्ही ऊत्तम वाद्य संगीत ऐकवण्याचा प्रयत्न केला आणी आम्ही त्यात यशस्वी झालो ह्याचा आम्हाला अभिमान वाटतोय

जगभरातील संगीत प्रेमी 21 जुनला जागतिक संगीत दिन साजरा करतात जवळपास 120 देशात संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रती आदर आणी प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केल्या जातो France मध्ये 21 जुन 1982 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली त्या वेळेसचे कला आणी सांस्कृतीक मंत्री Jack Lange ह्यांनी व French Music Composer  Maurice Fleured ह्यांनी हा दिवस साजरा करण्याचे ठरवले सर्व लोकांनी एकत्रित जमुन संगीताचा आस्वाद घेत आनंदात हा दिवस साजरा करावा आणी आपल्याला संगीताचा आनंद देणाऱ्या संगीत क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रती आदर व्यक्त करावा हा हेतू त्या मागे होता तेव्हापासुन France मध्ये दर वर्षी 21 जूनला हा दिवस साजरा केल्या जातो यंदा कोरोनाच्या निर्बंधामुळे नेहमी प्रमाणे हा दिवस साजरा करता आला नाही तरीही मर्यादित स्वरूपात हा दिवस  तेथील नागरिकांनी साजरा केला  

No comments:

Post a Comment