Perseverance यान मंगळभूमीवर गाडी वळवून जिथून फिरले तो भाग आणि यानाच्या चाकांच्या खुणा -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -5 मार्च
नासाचे Perseverance मंगळयानाने अठरा फेब्रुवारीला मंगळावर पोहोचताच तिथल्या लँडिंग स्थळाचे व आजूबाजूचे फोटो त्वरित पृथ्वीवर पाठवले होते आता चार मार्चला ह्या यानाने प्रत्यक्ष कामाला सुरवात करण्याआधी मंगळभूमीवर फेरफटका मारून यानाची यशस्वी mobility चाचणी केली आहे
यानाने मंगळभूमीवर जवळपास 33 मिनिटे गाडी चालविली आणि चार मीटर अंतर पार केले त्या नंतर गाडी150 degree कोनातून वळवुन पुन्हा परतीचे अडीच मीटर अंतर पार केले त्या नंतर हे यान तात्पुरते नव्या जागेवर स्थिरावले आहे यानातील अत्याधुनिक यंत्रणा आणि कॅमेऱ्यामुळे Perseverance यानाचे Driving, Parking आणि लोकेशन कॅमेराबद्ध झाले Perseverance यानाने मंगळभूमीवर अंदाजे साडेसहा मीटर ( 21.3 feet) अंतरापर्यंत गाडी चालवून तेथील भूमीचे व आजूबाजूच्या भागाचे निरीक्षण नोंदवले आणि त्याचे फोटो व व्हिडिओ पृथ्वीवर पाठवले आहेत
perseverance यानाची हि mobility test यशस्वी झाल्याने ह्या यानाचे mobility test bed Engineer Anais Zarifian आनंदित झाले आहेत,हि प्रत्यक्ष कामाला सुरवात कारण्याआधी Perseverance यानातील System,Subsystem आणि Instruments व्यवस्थित कार्य करत आहेत का ? हे पाहण्यासाठीची चाचणी होती एकदा का यान कामाला लागले की,कमीतकमी सहाशे छप्पन्न फूट (200 मीटर ) अंतर पार करेल आणि तेथील भूमीवरील व भूपृष्ठाखालील भागातील नमुने गोळा करेल शिवाय तेथील वातावरणाचेही निरीक्षण नोंदवेल परग्रहावर Perseverance यानाने गाडीला किक मारून अत्यंत कुशलतेने ह्या सहा चाकांच्या गाडीला मंगळ भूमीवर फिरवून आणले आहे त्यामुळे आम्ही आता निश्चिन्त झालो आहोत आमचा आत्मविश्वास वाढला आहे पुढील दोन वर्षांच्या काळात हे यान यशस्वी कामगिरी पार पाडेल व इतर ठिकाणीही व्यवस्थित फिरेल ह्याची आम्हाला आता खात्री वाटते
Perseverance यानाने जेथून ह्या मिशनला सुरवात केली त्या मंगळभूमीवरील स्थळाला आता Octavia E Butler ह्या दिवंगत विज्ञान लेखिकेचे नाव देण्यात आले आहे Octavia ह्या मुळच्या आफ्रिकन अमेरिकन नागरिक पण नंतर California येथील Pasadena येथील रहिवासी होत्या त्या Hugo Award व Nebula Award पुरस्कार प्राप्त वैज्ञानिक कथा लेखिका होत्या
Perseverance मंगळ यानाने जिथून mobility test मिशनला सुरवात केली ते मंगळभूमीवरील ठिकाण -फोटो -नासा संस्था
No comments:
Post a Comment