अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden Perseverance टीमशी संवाद साधताना फोटो -नासा संस्था
नासा संस्था - 5 मार्च
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden ह्यांनी चार मार्चला perseverance टीमशी लाईव्ह संवाद साधून त्यांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि ह्या मोहिमेचे प्रमुख नासाच्या JP.L labचे Director Mike Watkins आणि मूळच्या भारतीय वंशाच्या नागरिक स्वाती मोहन ह्यांच्याशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले लॉक डाऊन मुळे लॅबमधील सर्वांनीच मास्क वापरले व सुरक्षित अंतराचे निर्बंध पाळले होते
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Joe Biden ह्यांच्याशी संवाद साधताना नासाच्या JP.L चे Director Mike Watkins
-फोटो -नासा संस्था
Joe Biden -Hey Mike !How are You ?
Mike Watkins - We are very Well ! स्पेशली अठरा तारखेनंतर !
Joe Biden - तुम्ही खूप उत्कृष्ट आणी असामान्य काम केलय
Mike -तुम्ही आम्हाला ह्या मंगळमोहिमेत सहभागी होण्याची संधी दिली आणि आज आता तुम्ही आमच्याशी बोलण्यासाठी वेळ काढला हे अत्यंत कौतूकास्पद आहे इथे आज लॅबमध्ये माझे जवळपास शंभर सहकारी मित्र आणि नासाच्या कंट्रोल रूममधील सहकारी ह्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत आम्ही सारेच तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्याशी बोलण्यासाठी दिला त्याबद्दल तुमचे आभारी आहोत
Joe Biden - खरेतर तुमच्याशी बोलण्याची संधी मिळतेय हेच माझ्यासाठी महत्वाच आहे तुम्ही खूप उत्कृष्ठ काम केलत! तुम्ही बोलण्यासाठी कितीही वेळ घ्या !
Mike - इथे मिशन प्रमुख स्वाती मोहन आहेत त्या तुमच्याशी संवाद साधतील
Perseverance मंगळयान टीम प्रमुख स्वाती मोहन ह्यांचे अभिनंदन करताना राष्ट्राध्यक्ष Joe Biden
फोटो-नासा संस्था
Biden - Hey Doc ! How are You !
स्वाती मोहन - I am doing very well Mr. President ! मी प्रथमच ह्या Perseverance मंगळ मोहिमेत सहभागी झाले हे माझ पहिल मिशन आहे इथे नासाच्या JP.L लॅब मध्ये कित्येक वर्षांपासून काम करतेय ह्या मोहिमेतील टीममध्ये असामान्य बुद्धिमत्ता असलेले माझे सहकारी मला कुटुंबीयांप्रमाणे वाटतात ह्या साऱ्यांच्या साथीने हे मिशन यशस्वी झाल
Biden - तुम्ही खूप उत्कृष्ठ आणि असामान्य काम केलय तुमच्या ह्या यशाने लाखो तरुण आणि लहान मुले प्रेरित झाले आहेत त्यांच्या मनात तुम्ही आत्मविश्वासाचे बीज रुजवले अमेरिकन नागरिकांच स्वप्न तुम्ही पूर्णत्वास आणलय तुम्ही त्यांच्यापुढे यशाचा आदर्श ठेवलाय हि यशाची पाऊलवाट त्यांना मार्गदर्शक ठरेल
"You guys did it !" You guys gave a sense of America's back ,You did it ! तुम्ही हि मोहीम यशस्वी करून अमेरिकेला पुन्हा अवकाश विश्वात उंचावर नेलय हे उतुंग यश प्राप्त करण्यासाठी तुम्ही अथक परिश्रम केले ह्या महामारीच्या कठीण काळातही लाकडाऊनचे कठोर निर्बंध पाळत हि मोहीम पूर्णत्वास नेली त्यासाठी मनोनिग्रह आवश्यक आहे इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी मनाचा ठाम निश्चय आवश्यक असतो त्या शिवाय हे शक्य होत नाही आपण अशा देशात राहतो जिथे लोकांच्या बुद्धिमत्तेला वाव मिळतो ह्या संधींमुळेच अमेरिकेने पुन्हा एकदा अंतराळविश्वात भरारी मारलीय तुम्ही अमेरिकेच मंगळग्रहावर Perseverance मंगळयान उतरवण्याच,चालवण्याच स्वप्न प्रत्यक्षात साकारलत हे असामान्य कर्तृत्व आहे तुमच काम खूप उत्कृष्ठ आणि कौतुकास्पद आहे ह्या कोरोना महामारीच्या काळात हे काम अशक्य होत,कठीण होत ह्याही काळात अमेरिकेचा सायन्स विषयक दृष्ठीकोन आशादायक होता तुम्ही तो सार्थ ठरवला आणि अमेरिकेतील भावी पिढीसाठी हे प्रेरणादायी ठरेल माझ्या ऑफिस मध्ये काही लोक आले होते, त्यांनी ओव्हल ऑफिस मधल्या शेल्फमधले दगड पाहिले मी त्यांना गमतीने सांगितल ते चंद्रावरचे दगड आहेत आता लवकरच तिथे मंगळावरून आणलेले दगड तुम्हाला पाहायला मिळतील आणि खरच हे स्वप्न लवकरच खर होईल मंगळ ग्रहांवरून Perseverance मंगळयानातून तिथल्या दगडांचे नमुने पृथ्वीवर आणल्या जातील हे सार तुमच्या मुळे शक्य झाल त्या मुळे पुन्हा तुमच अभिनंदन
Thank you! Thank You! Thank You !
No comments:
Post a Comment