Perseverance मंगळयानाने पाठवलेला मंगळावरील Jezero crater हा भाग व परिसर -फोटो -नासा संस्था
नासा संस्था -25 Feb.
नासाचे Perseverance मंगळयान अठरा तारखेला मंगळावर सुरक्षित उतरले नासा संस्थेमुळे आणि perseverance मधील अत्याधुनिक यंत्रणेमुळे ह्या यानाच्या मंगळग्रहावरील वातावरण भेदून तिथल्या भूमीवर उतरतानाचे ऐतिहासिक थरारक क्षण पृथ्वीवासीयांना पाहायला मिळाले मंगळभूमीवर पोहोचताच Perseverance मंगळयानातील स्वयंचलित यंत्रणा कार्यान्वित झाली आणि मंगळयानाने मंगळावरील भूमीचे फोटो देखील पाठवले ह्या मंगळयानासोबत पाठविण्यात आलेले Ingenuity Mars Helicopter देखील यान मंगळभूमीवर पोहोचताच यानातून बाहेर पडून तिथे स्थिरावले
Perseverance यानाने मंगळावरील तिसऱ्या दिवशी वीस व एकवीस तारखेला मंगळभूमीवरील आणखी फोटो काढून पाठवले आहेत ह्या फोटोत हे यान जिथे उतरले आहे तो Jezero Crater हा भाग,आजूबाजूचा परिसर आणि Perseverance यानाच्या सेल्फीचा समावेश आहे
Perseverance मंगळ यानाच्या समोरील रोबोटिक Mast (head ) ह्या भागातील Mast Cam -Z instrument च्या साहाय्याने कॅमेरा 360अंश कोनातून फिरवून Navigationकॅमेऱ्याच्या साहाय्याने हे फोटो घेतल्या गेले आहेत Mast वर बसविलेले हे दोन कॅमेरे अत्याधुनिक यंत्रणेने युक्त आहेत ह्या कॅमेऱ्यात 3D,कलरफुल आणि लाईव्ह व्हिडीओ काढण्याची सुविधा आहे आणि दूरवरच्या आणि जवळच्या घडामोडी देखील ह्या कॅमेऱ्यामुळे चित्रित होतील ह्या कॅमेऱ्यात High resolution Image काढण्याची क्षमता असल्यामुळे मंगळावरील अत्यंत सूक्ष्म कणांचे फोटो देखील टिपल्या गेले आहेत शिवाय यानात बसविलेल्या रोबोटिक Astrobiologist यंत्रणेमुळे मंगळभूमीवरील आणि भूगर्भातील खडक,माती,मिनरल्स व इतर सूक्ष्म कणांचे फोटो अत्यंत ठळक दिसत आहेत
आधीच्या मंगळ यानांनी देखील ह्या आधी तिथले फोटो काढून पृथ्वीवर पाठवले होते पण ते आता सारखे स्पष्ट व तेथील सूक्ष्म बारकावे टिपणारे नव्हते ह्या रोबोटिक Astrobiologist मुळे आणखी फोटो व नमुने मिळतील सध्या पाठवलेल्या फोटोत मंगळावरील माती,खडक,आजूबाजूचा परिसर तेथील वातावरण आणि आटलेल्या नदी प्रवाहातील गाळातील माती नदी किनारे वै.चा भाग स्पष्ठ दिसत आहे असे मत ह्या मंगळ मोहिमेतील शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे Perseverance यानातील अत्याधुनिक यंत्रणेमुळे यानाच्या मंगळभूमीवरील प्रवेशाचा आवाजही टेप झाला आणि यानाने तो पृथ्वीवासीयांना ऐकण्यासाठी पाठवला
No comments:
Post a Comment