Monday 29 June 2020

अंतराळवीर Chris Cassidy आणि Bob Behnken ह्याचा स्पेसवॉक संपन्न

 Spacewalkers Bob Behnken (left) and Chris Cassidy (right) in the Quest Airlock before beginning today’s spacewalk. Credit: NASA TV
अंतराळवीर Bob Behnken आणी Chris Cassidy स्पेसवॉक साठी स्थानकाबाहेर पडताना -फोटो - नासा संस्था

नासा संस्था -27 जुन 
नासाच्या अंतराळ मोहीम 63चे अंतराळवीर Chris Cassidy आणि Bob Behnken ह्यांनी स्थानकाच्या दुरुस्तीसाठी 26 जूनला त्यांच्या कार्यकाळातील नियोजित चार स्पेसवॉक पैकी पहिला स्पेसवॉक पूर्ण केला
हे दोनही अंतराळवीर सकाळी 7.32a.m.ला त्यांचा स्पेससूट चार्ज करून स्पेसवॉक साठी स्थानका बाहेर पडले आणि सहा तास सात मिनिटांनी स्पेसवॉक पूर्ण करून स्थानकात परतले
ह्या सहा तासांच्या स्पेसवॉक मध्ये ह्या दोन्ही अंतराळवीरांनी स्थानकाच्या solar arrays ह्या भागातील जुन्या जीर्ण झालेल्या बॅटरीज बदलवून नवीन जास्त पॉवरफुल आणि प्रकाश देणाऱ्या बॅटरीज बसविल्या अंतराळवीरांनी स्थानकाच्या Solar arrays च्या Starboard trussह्या भागातील जुन्या बॅटरीज बदलल्या ह्या पहिल्या स्पेसवॉक मध्ये अंतराळवीरांनी दोन पॉवर चॅनल्स पैकी एका भागातील काम पूर्ण केले त्यांनी सहा पैकी खराब झालेल्या पाच जुन्या Nickel Hydrogen बॅटरीज काढून त्या जागी नव्या Lithium -ion बॅटरीज बसविल्या आणी त्यांच्या सर्किट साठी आवश्यक असणाऱ्या दोन adapter plates हि फिट केल्या

NASA Astronauts Chris Cassidy and Bob Behnken during spacewalk to replace batteries to upgrade the power supply capability
 अंतराळवीर Chris Cassidy आणि Bob Behnken स्पेसवॉक करताना -फोटो -नासा संस्था

 उर्वरित दुसऱ्या भागातील जुन्या खराब झालेल्या बॅटरीज व adapter plates बसविण्यासाठी एक जुलैला दुसरा स्पेसवॉक करण्यात येणार आहे  ह्या Lithium -ion बॅटरीज आधीच्या Nickel Hydrogen बॅटरीज पेक्षा जास्त पॉवरफुल आहेत त्या जास्त प्रकाश देतात शिवाय जास्त काळ टिकतात आणि कमी जागा व्यापतात ह्या बॅटरीजचा उपयोग अंतराळस्थानकातील  झिरो ग्रॅविटीतील लॅब मध्ये होतो अंतराळ स्थानक अंतराळात भ्रमण करताना जेव्हा अंधारात असते तेव्हा उजेड निर्मितीसाठीआणि इतर कामासाठी ह्या बॅटरीचा प्रकाश उपयुक्त ठरतो
ह्या दोन्ही अंतराळवीरांचा त्यांच्या कार्यकाळातील स्थानकाच्या दुरुस्तीसाठी केलेला हा सातवा स्पेसवॉक होता
अंतराळवीर Chris Cassidy ह्यांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी आजवर केलेल्या स्पेसवॉकसाठी 37 तास आणि 21मिनिटे व्यतीत केले तर अंतराळवीर Bob Behnken  ह्यांनी त्यांच्या स्थानकातील वास्तव्यादरम्यान स्थानकाच्या तांत्रिक कामासाठी केलेल्या सात स्पेसवॉक दरम्यान 43तास आणि 40 मिनिटे व्यतीत केले आहेत आणि स्थानकाच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी आजवर अंतराळवीरांनी केलेला हा 228 वा स्पेसवॉक होता

Friday 12 June 2020

अंतराळवीर Douglas आणी Bob ह्यांच्याशी ABC News NBC Newsच्या पत्रकारांनी साधला लाईव्ह संवाद


 The International Space Station's two newest crew members
      अंतराळवीर Bob आणी  Douglas स्थानकातील प्रयोगशाळेत प्रवेश केल्यानंतर -फोटो -नासा संस्था

नासा संस्था-8 जुन
अमेरिकेतील नासा संस्थेच्या  Huston येथील सेंटर मधुन Space X Crew Dragon च्या ऐतिहासिक यशस्वी  उड्डाणाबद्दल
अंतराळवीर Douglas Hurley आणी Bob Behnken ह्यांच्याशी ABC News आणी NBC News च्या पत्रकारांनी लाईव्ह संवाद साधला त्याचा हा वृत्तांत
ABC news-" Bob & Douglas How  are you both ?" तुमचा हा स्पेसमधला पहिला आठवडा कसा गेला?  
Bob & Douglas - Pretty Well ! Very Busy ! छान चाललय! आमचा आठवडा बिझी गेला ईथे आल्यावर आम्ही आधी ट्रेडमील वर काम केल,प्लंबीगच काम केल स्थानकतील थोड दुरूस्तीच काम पाहिले आणी आता Chris Classidy सोबत ईथे आम्ही आनंदात आहोत आता इथे सुरू असलेल्या सायंटिफिक प्रयोगात सहभागीही झालोय
ABC News-अमेरिकेत सध्या खूप कठीण परिस्थिती आहे! कोरोनाचा वाढता संसर्ग Lock  down मुळे सारे व्यवहार ठप्प आहेत आणि आता वांशिक भेदाच्या उद्रेकामुळे उसळलेली दंगल ! अशा परिस्थितीत तुम्ही पृथ्वीवरील लोकांना काय सल्ला द्याल?
Bob- पृथ्वी अनमोल आहे! ती एकमेव आहे! तिचे संरक्षण करण आवश्यक आहे सारे नागरिक समान आहेत इथे अंतराळ स्थानकात वेगवेगळ्या देशाचे अंतराळवीर एकत्र राहतात पृथ्वी संरक्षणासाठी आणी असाध्य रोग निवारणासाठी अनेक ऊपयुक्त अत्याधुनिक संशोधन करतात जे पृथ्वीवर  करता येत नाहीत आगामी मानवी अंतराळ मोहिमांसाठी आवश्यक संशोधन आणि देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक अत्याधुनिक प्रयोग देखील ईथे सुरू आहेत आम्ही जसे इथे एकोप्याने राहतो तसेच तुम्ही राहा 
ABC News-तुमच्या हातात डायनो दिसतोय तो स्थानकात तरंगताना दिसतोय तो तिथे कुठुन आला त्याबद्दल सांगा?
Bob- आम्ही अंतराळ प्रवासासाठी निघताना  शेवटच्या आठवड्यात आमच्या दोघांचे कुटुंबीय आणि त्यांचे मित्र एकत्र आलो होतो तेव्हा मुलांनी आम्हाला स्थानकात जाताना काय भेट द्यायच ह्याचा विचार केला खूप विचार केल्यावर त्यांना हे गिफ्ट सुचल माझ्या मुलाने आम्हाला ते सोबत नेण्याची विनंती केली मग त्यांनी त्याला "Tremor" हे नाव दिल दोघांच्या कुटुंबियांनी आम्हाला त्यांची स्थानकातील निवासादरम्यान आठवण रहावी म्हणून हे गिफ्ट दिल आता ते दोघेही स्थानकात त्यांनी दिलेला डायनो Tremor तरंगताना पाहून Super Exited झाले असतील त्या निमित्याने ते अंतराळ प्रवासाशी जोडले गेले त्यांच्या शाळेतील मित्रांसोबत दोघे हा अनुभव शेअर करतील आपण दिलेला स्थानकातील तरंगणारा डायनो दाखवतील माझ्या पहिल्या अंतराळवारीच्या वेळेस माझा मुलगा जन्मला नव्हता त्या मुळे त्याला माझ्या अंतराळ निवासाविषयी माहिती नव्हती आता मात्र त्याला हे सार पाहून आनंद होईल आमच्या दोघांच्या कुटुंबियांचे पारिवारिक संबंध आहेत त्या मुळे डायनो पाहून दोघांची मुले Super Exited झाली असतील
ABC News- तुमच्या Space X Dragon च्या ऐतिहासिक ऊड्डानाचा अनुभव कसा होता ? त्या बद्दल सांगा आणी तुमचे कुटुंबीय हा लाईव्ह कार्यक्रम पहात असतील विषेशतः तुमच्या पत्नी त्यांना तुम्ही काय सांगाल?
Douglas- Launching चा अनुभव खुपच अविस्मरणीय आणी छान होता नवा होता,आरामदायी होता आणी
आम्ही दोघेही आर्मीत पायलट होतो त्यामुळे कुटुंबीयांपासुन बरेच दिवस दुर होतो त्यामुळे त्यांना दुर रहाण्याची सवय आहे आम्ही त्यांना सांगितले आहे की आम्ही सुरक्षित आहोत सुखरूप पोहोचलो आहोत प्रवासाचा अनुभव आल्हाददायक होता आमची काळजी करु नका आता आम्ही स्थानकात आहोत आमच काम सुरू झालय तुम्हीही तुमची काम करा lock down मुळे सारी कामे ठप्प झाली होती मुलांना त्यांचा अभ्यास आणी ईतर कामे करायला सांगितल आहे 
NBC News- (Washington)- Congratulations! Bob & Douglas ! तुमच्या वैशिष्ठपूर्ण उड्डाणाबद्दल !
उड्डाणा दरम्यान आधीचा Shuttle program आणी आताचा Space X Dragon launch ह्यात काही फरक जाणवला का?
Douglas-निश्चितच खूप फरक जाणवला!अपोलो यान मोठ होत Space X Dragon छोट आहे पण ते अत्याधुनिक यंत्रणेनी सुसज्ज आहे नासा आणी Space X टिमने अंतराळवीरांना त्रास होऊ नये त्यांचा प्रवास आरामदायी व्हावा ह्याचा विचार करून यानाचे डिझाईन केले आहे त्या साठी हे यान बनविणाऱ्या इंजिनीअर्सनी आधीच्या अंतराळ प्रवासात आलेल्या अडचणी कमी करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा यानात बसविली आहे आणि त्यांनी अत्यंत कुशलतेने कमी वेळात उत्कृष्ठ काम केलय
Bob - Launching च्या वेळेस यान छोट असल्याने आणी अत्याधुनिक रचनेमुळे Falcon 9 rocket burn होताना वेगळे होताना आम्ही पाहु शकलो आधीची अपोलो यानाच्या वेळेस हि प्रक्रिया अवघड होती,रफ होती पण आता हि प्रक्रिया सुलभ होती यानाच विलगीकरण स्मुथ होत आवाजाची तीव्रता कमी होती शीवाय Space X Dragon मध्ये airflow चांगला असल्याने एकोणीस तासांच्या अंतराळ प्रवासात आम्ही आलटुन,पालटुन काही तास झोप घेऊ शकलो Spacesuits च्या अत्याधुनिक डिझाईन मुळे मोकळ वाटल आणी Dragon स्थानकाजवळ पोहोचल्यावर यानाची स्थानकाशी hatching,docking ची स्वयंचलित यंत्रणा सहजतेने कार्यरत झाल्याने त्रास कमी झाला
 NBC News- ह्या ऐतिहासिक उड्डाणानंतर पुन्हा एकदा अमेरिका अंतराळवीरांना अमेरिकेच्या भूमीवरून अमेरिकन बनावटीच्या अंतराळयानातून अंतराळात पाठविण्यासाठी स्वयंपूर्ण झाली अस तुम्हाला वाटतय  का ?
Bob -हो ! नक्कीच ! आता अमेरिकेचा बंद पडलेला shuttle प्रोग्रॅम पुन्हा जोमाने सुरु होईल आणि त्याचा फायदा आगामी अंतराळ मोहिमा आणि अंतराळवीरांना होईल
NBC News - भावी अंतराळवीर आणी अंतराळवीर होऊ ईच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सल्ला द्याल त्यासाठी काय आवश्यक आहे त्यासाठी अनेक जण ऊत्सुक आहेत, प्रेरित आहेत
ईथे येण्यासाठी आधी सायन्स फिल्डमधल्या कुठल्याही शाखेत graduate असण आवश्यक आहे शिवाय ईथे आधी सांगितल्याप्रमाणे स्थानकात अनेक देशाचे अंतराळवीर एकत्रित राहतात आणी संशोधन करतात त्यामुळे टिमवर्क आवश्यक आहे कठीण परिस्थितीत तग धरून ईथल्या झीरो ग्रव्हीटीत रहाण्याची क्षमता असण आवश्यक आहे आणी आपल ध्येय साध्य करण्याची जिद्द आणी चिकाटी हवी कितीही अडचणी आल्यातरी न डगमगता आपल ध्येय साध्य करायला हव सद्या सगळ्या जगाला करोनान हैराण केलय lock down मुळे सारे व्यवहार ठप्प आहेत शाळा,कॉलेजेस बंद आहेत तरीही ह्या विपरीत परिस्थितीला घाबरून,डगमगुनन जाता ह्या समस्येवर मात करून तुमच ईच्छीत ध्येय साध्य करण्यासाठी अथक प्रयत्न करण  आवश्यक आहे आम्ही ईथे येण्याआधी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर झालेल lock down,Work at home,निवडक कर्मचाऱ्यांची ऊपस्थीती आणी सुरक्षित अंतर ठेवण्यासाठीचे कडक नियम पाळून शीवाय आम्हाला Quarantine करण्यात आल होत तरीही नासा आणी Space X च्या टिमने मिळुन जिद्दीने सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करून हि मोहीम यशस्वी केली आणी ऐतिहासिक launching होऊ शकल तशीच जिद्द तुम्हीही ठेवा
NBC News-स्थानकात दुसऱ्यांदा प्रवेश केल्यावर आपल्या घरी पुन्हा आल्यासारखे वाटले का? काय बदल जाणवला?
हो! निश्चितच!खूप आनंद झाला फरकही जाणवला आता स्थानकही अत्याधुनिक यंत्रणेनी सुसज्ज झालय बऱ्याच नवीन सुविधा ऊपलब्ध आहेत त्यामुळे आधी पेक्षा ईथला मुक्काम आरामदायी होईल ह्या आधीही आम्ही स्थानकात राहून गेल्यामुळे ईथल्या झीरो ग्रव्हीटीची आणी ईतर गोष्टीची सवय होती आता Chris सोबत रहायला मिळेल अर्थात कीती दिवस ते सांगता येणार नाही Chris ची आमची जुनी ओळख आहे
NBC News- अमेरिकेतील सध्याच्या परिस्थिती बद्दल तुम्ही काय सल्ला द्याल ?
Bob - आधी सांगितल्या प्रमाणे आम्ही स्थानकात जसे सर्व देशांचे अंतराळवीर एकत्रित राहतो ,संशोधन करतो तसेच सर्वांनी एकोप्याने राहावे पृथ्वी अनमोल आहे सर्व सामान आहेत सर्वांनी समजून शांततेत राहावे सध्याच्या कोरोनाच्या महामारीच्या काळात तर हे अत्यंत आवश्यक आहे देशापुढे अनेक संकटे आणि समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी प्रयत्न करा 

Thursday 11 June 2020

Space X dragon चे Director Benji Reed ह्यांनी अंतराळवीरांशी साधला लाईव्ह संवाद

Space X Crew Dragon Manager Benji Reed अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधताना -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -2 जुन
अंतराळवीर Douglas Hurley आणी Bob Behnken अंतराळस्थानकात पोहोचल्यानंतर Space X Dragon च्या Crew Mission Management चे Director Benji Reed ह्यांनी ह्या यशस्वी उड्डाणाबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला त्याचाच हा वृत्तांत
Benji- "Its awesome ! तुम्हाला अंतराळस्थानकात सुरक्षितपणे पोहोचल्याचे पाहून आनंद होतोय! कसे आहात?
आधी तुमचे अभिनंदन हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल ! आणी नासा संस्था आणि  Space X टीमच्या सर्व कर्मचाऱ्यांचेही आभार !" आणी विशेषतः तुमच्या कुटुंबियांचे त्यांनी आमच्या वर विश्वास ठेऊन तुम्हाला Space X Dragon  मधून अंतराळ प्रवास करण्याची परवानगी दिली ह्या बद्दल !"तुमचा प्रवास कसा झाला ?
Douglas- Hey Thanks Benji!  Just an Incredible Journey we have ! Congratulations & Thanks You too! खरोखरच हा अंतराळ प्रवास खूपच छान होता आपण ठरविल्याप्रमाणे सेट केल्यानुसार सारी यंत्रणा कार्यरत झाली त्या मुळे प्रवास निर्विघ्नपणे पार पडला त्या मुळे आमच्यातर्फेही ह्या अंतराळ मोहिमेतील सर्व कर्मचारी नासा संस्था आणि Space X च्या टीमचे अभिनंदन आणी आभार ! तुम्हाला व्हर्च्युअली आणि फिजिकली पाहून आम्हालाही  आनंद झाला
Benji- Excellent! Falcon 9 Rocket मधला प्रवास कसा होता ?
Bob- खूपच छान! सुरवातीला इंजिन burn झाल तेव्हा आणी launching नंतर यान Rocket पासून वेगळे होतानाचा अनुभव नवा होता Smooth Driving आणी आवाजाची तीव्रता कमी असल्याने त्रास झाला नाही नंतर Gravity Change होताना  थोडासा स्पीड वाढला तरीही आधीच्या पेक्षा Vibrations कमी होते आपण सेट केल्या प्रमाणेच यानातील यंत्रणा कार्यरत झाली फक्त Gravity Change होतानाचा अनुभव अपेक्षेपेक्षा वेगळा होता नवा होता कारण तो आपण प्रत्यक्षात अनुभवाला नव्हता आणी तो खूपच छान होता रोमांचक होता
Benji- Awesome! खूप छान ! मला माहिती आहे की,launching Pad वर जाताना तुमच सगळ लक्ष ह्या मोहिमे वरच केंद्रित असणार पण तरीही मला विचारायचय कि शेवटच्या क्षणी तुमच्या मनात नेमके कोणते विचार आले?
Douglas & Bob - निश्चितच! आमच सार लक्ष आमच्या मोहिमेवरच केंद्रित होत गेल्या पाच,सहा वर्षांपासून आपण सारेच ह्या मोहिमेवर काम करत होतो आणी आताच्या कोरोनाच्या संसर्गामुळे देश चिंतेत असताना lock downचे कडक निर्बंध पाळून हि ऐतिहासिक मोहीम पुर्ण करण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्याचा क्षण होता तो! कारण नेहमी पेक्षा आताची परीस्थिती वेगळी आणी नावीन्यपूर्ण होती अनेकांच्या आशा आमच्यावर केंद्रित झाल्या होत्या शेवटच्या पंधरा मीनिटात आम्हाला ह्या मिशनच्या ट्रेनिंगचे दिवस आठवले गेले कित्येक वर्षांपासूनची  नव्या अंतराळ यानातुन अंतराळ प्रवास करण्याची आणी पायलट बनुन स्वतः नव यान ऊडवण्याचा आमच्या स्वप्नातला क्षण प्रत्यक्षात येऊन पोहोचला होता आता काही क्षणात ते स्वप्न साकारणार होत खुपच आनंददायी ऊत्साहवर्धक आणी रोमांचक क्षण होता तो! तो थरारक अनुभव घेण्यासाठी आम्ही सज्ज झालो होतो
Benji- Exllent! पुन्हा एकदा अभिनंदन ! हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल!
Chris आता तु सांग,तुला ह्या दोघांसाठी स्थानकाच दार ऊघडताना आणी दोघे पुन्हा स्थानकात आल्यावर कस वाटल ?
Chris- Really Cool! अनुभव होता तो मी स्थानकाच्या Cupula मधून Space X येताना पहात होतो मी फोटोही काढले Space X आणी स्थानक ह्यांच्यातील Hatching आणी Docking ची स्वयंचलित यंत्रणा अत्याधुनिक आणी नाविन्यपूर्ण आहे आधी पेक्षा कमी त्रासदायक आणी सुलभ आहे त्यासाठी नासा संस्था आणी Space X च्या सर्व टिमचे आभार ! त्यांनी खूप चांगल काम केलय आणी हे दोघे जेव्हा सुखरूप स्थानकात आले तेव्हा त्यांना पाहून खूप आनंद झाला
अंतराळवीर Bob Behnken आणी Douglas Hurley अमेरिकेचा झेंडा आणि पृथ्वीचे Mosaic दाखवताना -फोटो-नासा संस्था
Benji- तुमच्या हातात अमेरिकेचा झेंडा दिसतोय त्या बद्दल सांगा
Bob-Douglas- हो तो अमेरिकेचा झेंडा आहे नऊ वर्षांंपुर्वीच्या अंतराळ मोहिमेदरम्यान आम्ही तो आमच्या सोबत पृथ्वीवरून नेला आणी स्थानकात ठेवला होता नंतर अमेरिकेची Shuttle मोहीम बंद झाली ती पुन्हा सुरु झाल्यावर तो झेंडा परत आणण्याचे ठरले त्या साठी आम्ही गमती,गमतीत Friendly competition ठेवली की,जी कंपनी किंवा अंतराळवीर पुन्हा स्थानकात जाऊन हा झेंडा फडकावेल त्याला तो बक्षिस मिळेल अर्थात हि स्पर्धा फक्त अंतराळविरांचा आणी कंपनीचा ऊत्साह वाढवण्यासाठी आणी त्यांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी होती आता तुम्ही ती स्पर्धा जिंकल्यामुळे Benji तुमचे आणी Space X चे अभिनंदन! आम्ही हे जाहीर केलय पण स्थानकाचा कमांडर म्हणून हा हक्क Chris कडे आहे
Benji- Thanks! Douglas& Bob तुम्ही SpaceX आणी मला हि स्पर्धा जिंकून बक्षीस मिळवून दिल्याबद्दल मी नम्रपणे आणी प्रामाणिक पणे सांगेन की, तुम्ही आमचा सन्मान वाढवला आहे हे यश नासा आणी Space X च्या सर्व टिमचे आहे तसेच तुमचेही आहे
Benji- तुमच्या हातात पृथ्वीच चित्र दिसतय आणी बाजूला तरंगणारा डायनोही दिसतोय त्या बद्दल सांगा ?
Bob&Douglas- आमच्या हातातल पृथ्वीच प्रतीकात्मक Mosaicआहे त्यावर देशातील,प्राथमिक,माध्यमिक, ऊच्च ,माध्यमीक आणी College मधील 90,000 विद्यार्थ्यांचे फोटो आहेत ह्या वर्षी शेवटच्या वर्षीच्या मुलांना lock down मुळे Degree Online मिळणार आहे प्रत्यक्ष समारंभात नाही ह्या मुलांनी हि प्रतीक्रुती आम्हाला स्थानकात नेण्यासाठी भेट दिली आहे
आणी हा डायनो आम्हाला आमच्या दोघांच्या मुलांनी भेट दिलाय काय द्यावे ह्याचा खूप विचार करुन दोघांनी हा डायनो सिलेक्ट केला ईथे आम्हाला त्यांची आठवण सतत रहावी म्हणून! आता हा लाईव्ह संवाद ते पहात असतील तर त्यांना हा डायनो Tremor पाहून आनंद होईल
Benji- आता शेवटचा प्रश्न विचारतोय(गमतीत) आम्हाला तीथे तरंगणारे Toy दिसतेय ईथे सगळ्यांना वाटत कि,ते Space Station वर Control करत त्या बद्दल सांगा
Bob Douglas- ते Space X मधून Demo-1च्या वेळेस पृथ्वीवरुन स्थानकात आल आता आमच्या सोबत आम्ही ते परत आणू तेव्हा त्याच्या साठी स्पेस सुट डिझाईन करायचा विचार करतोय अंतराळात त्याच्या शरीरात हवा शिरून त्याला त्रास होऊ नये म्हणून Just Joking! त्या Toy च नाव Earthie

Wednesday 10 June 2020

Space X Crew Dragon स्थानकात पोहोचल्यानंतर अंतराळवीरांनी साधला लाईव्ह संवाद


 Expedition 63 Crew
अंतराळ स्थानकात पोहोचल्या नंतर सर्व अंतराळवीरांसोबत अंतराळवीर Douglas आणि Bob फोटो- नासा संस्था
नासा संस्था - 1 जुन
नासाच्या Space X Crew Dragon चे ऐतिहासिक यशस्वी उड्डाण अमेरिकेच्या भूमीवरून झाल्यानंतर एकोणीस तासांनी 31मे ला अंतराळयान Endeavor अंतराळ स्थानकाजवळ पोहोचताच यानातील स्वयंचलित यंत्रणेने hatching आणि docking पार पडले आणि अंतराळवीरांनी स्थानकात सुखरूप प्रवेश केला त्यानंतर लगेचच त्यांचा पृथ्वीवरील नासा संस्थेशी लाईव्ह संपर्क साधण्यात आला
नासाचे प्रमुख Jim Bridenstine ह्यांनी Douglas Hurley आणि Bob Behnken ह्या दोन्ही अंतराळवीरांशी लाईव्ह संवाद साधला आणी त्यांचे यशस्वी  ऐतिहासिक उड्डाण आणि स्थानकातील docking बद्दल अभिनंदन केले शिवाय त्यांच्या ह्या नव्या Space X Dragon मधील प्रवासाबद्दल जाणून घेतले अंतराळ प्रवास कसा झाला,प्रवासादरम्यान काही त्रास झाला का? Endeavor अंतराळ यानात काही त्रुटी आढळल्या का? त्यांनी ह्या एकोणीस तासाच्या प्रवासात झोप घेतली का? अशी विचारणा केली
अंतराळवीर Douglas आणि Bob ह्यांनी आमचा प्रवास सुखकर आणि आरामदायी होता हा नवा Endeavor अंतराळयानातील अंतराळ प्रवासाचा अनुभव खूपच छान होता कोणताही त्रास जाणवला नाही अत्याधुनिक यंत्रणेनी सुसज्ज असलेले Space X अंतराळ यान आणि त्यातील रचना आरामदायी आहे स्वयंचलित यंत्रणेमुळे
यानाचे आणि Falcon रॉकेटचे प्रक्षेपण वैशिष्ठपूर्ण आणि कमी त्रासदायक होते hatching आणि docking प्रक्रिया सहजतेने झाली ,आम्ही ह्या एकोणीस तासांच्या प्रवासात आलटून पालटून काही तास झोपहि  घेऊ शकलो आम्हाला ह्या यानातून प्रवास करण्याची संधी दिल्यामुळे आम्ही नासा संस्था आणि Space X टीमचे आभारी आहोत असे सांगितले
त्या नंतर Jim Bridenstine ह्यांनी त्यांना  तुम्ही फ्रेश व्हा नंतर लवकरच लाईव्ह पत्रकार परिषद घेण्यात येईल असे सांगत त्यांचा निरोप घेतला
ह्या लाईव्ह संवादाच्या वेळेस Director Mark Geyer ISS Deputy Manager Kenneth Todd आणि अंतराळवीर Kjell  Lindgren उपस्थित होते
त्या नंतर स्थानकात अंतराळवीरांचा Well Come ceremony पार पडला

Monday 1 June 2020

Space X Crew Dragonचे अतराळवीरांसह अंतराळ स्थानकाकडे यशस्वी प्रयाण


 Demo-2 rocket launch
                           Space X Dragon अंतराळात झेपावल्यानंतर -फोटो -नासा संस्था

नासा संस्था -30मे
खराब हवामानामुळे 27 मेची लांबलेली नासाची Space X Crew Dragon मोहीम अखेर शनिवारी तीस मेला यशस्वीपणे पार पडली अमेरिकन निर्मित Space X Crew Dragonआणि Falcon 9 Rocket मधून नासाचे अंतराळवीर Douglas Hurley आणि Robert Behnken हे दोन अंतराळवीर अमेरिकन भूमीवरून अंतराळ स्थानकाकडे रवाना झाले
जाण्याआधी ह्या दोनही अंतराळवीरांची आवश्यक तपासणी करण्यात आली कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे त्यांना काही काळ Quarantine करण्यात आले होते त्यांची launching ची पूर्ण तयारी झाल्यानंतरआणी सर्व व्यवस्थित आहे हे चेक केल्यानंतर दोन्ही अंतराळवीर बाहेर आले तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या नासा संस्थेतील निवडक  अधिकारी व ह्या मोहिमेतील कर्मचाऱ्यांची टीम आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचे टाळ्या वाजवून जोशात स्वागत केले Launching पॅड कडे जाण्याआधी कार मध्ये बसल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांशी काही क्षण बोलण्याची परवानगी देण्यात आली होती कुटुंबीयांचा निरोप घेऊन अंतराळवीर Launching साठी रवाना झाले
अमेरिकेतील Kennedy Space Center Florida येथून  Space X अंतराळ यानाची व्यवस्थित चाचणी केल्यानंतर तीस मेला 3.22a.m.ला Space X Crew Dragon ह्या दोन्ही अंतराळवीरांना घेऊन अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठी अंतराळात झेपावले  त्यानंतरही अंतराळवीरांनी आवश्यक चाचणी करून सर्व ठीक असल्याचे अधिकाऱ्यांना सांगितले  Space X रविवारी 10.29a.m.ला अंतराळ स्थानकात पोहोचेल ह्या Space X Crew Dragon च्या वैशिष्टपूर्ण बनावटीमुळे यान स्थानकाजवळ पोहोचताच autonomously डॉकिंग प्रक्रिया सुरु होईल पण अंतराळवीर आणि पृथ्वीवरील नासाचे कर्मचारी हि प्रक्रिया diligently monitor करतील ह्या Space X Dragon मध्ये touch Screen Computers बसविले आहेत अंतराळवीर अंतराळ स्थानकात प्रवेशल्यानंतर अंतराळ स्थानकात सध्या राहात असलेले अंतराळवीर Chris Cassidy आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर त्यांचे अंतराळ स्थानकात स्वागत करतील
2011नंतर बंद पडलेली नासाची अंतराळ मोहीम तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा सुरु झाली विशेष म्हणजे अकरा वर्षांपूर्वी ह्याच भूमीवरून नासाचे अपोलो 11अंतराळयान चंद्रावर झेपावले होते आताच्या  ह्या यशस्वी ऐतिहासिक मोहिमेमुळे पुन्हा एकदा अमेरिकन भूमीवरून अमेरिकन निर्मित यान आणि रॉकेट मधून अंतराळवीरांनी अंतराळात उड्डाण केले त्या मुळे नासाचे अधिकारी आणि अमेरिकन नागरिक आनंदित झाले आहेत
नासाचे प्रमुख Jim Bridenstine ह्यांनी हि मोहीम यशस्वी केल्याबद्दल अंतराळवीर Douglas Hurley आणि Robert Behnken ह्या दोघांचे अभिनंदन केले शिवाय ह्या मोहिमेतील सर्व टीम आणि Space X co.चेही आभार मानले ह्या सर्वानीच उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे अंतराळ विश्वात अमेरिकेचे नाव उंचावले आहे आता अमेरिका स्वयंपूर्ण देश झाला असून ह्या पुढील आगामी काळातील मंगळ आणि चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांना त्याचा फायदा होईल असेही ते म्हणाले
हा launching चा ऐतिहासिक सोहळा अमेरिकेचे अध्यक्ष Donald Trump आणि vice President Mike Pence आणि त्यांच्या पत्नी Karen Pence ह्यांनी Kennedy Space Center च्या Building मधून पाहिला  
 President Donald Trump, right, Vice President Mike Pence, and Second Lady Karen Pence watch the launch of a SpaceX Falcon 9 .
President Donald Trump ,vice President Mike Pence आणी Karen Pence launching  पाहताना
फोटो -नासा संस्था

नासाच्या ह्या अंतराळमोहिमेतील Space X Dragon co.चे चीफ इंजिनिअर Elon Musk देखील ह्या मोहिमेच्या यशाने आनंदित झाले आहेत ते म्हणतात ह्या मोहिमेच्या यशाने माझे कित्येक वर्षाचे स्वप्न साकार झाले आहे ह्या यशात नासाच्या टीमचा आणि ह्या मोहिमेत काम करणाऱ्या साऱ्यांचाच वाटा आहे त्यांनी केलेले कष्ट अखेर कामी आले
ह्या मोहिमेच्या Manager Kathy Lueders म्हणतात हे यश अभिमानास्पद आणि शब्दातीत आहे ह्या ऐतिहासिक क्षणी आनंद व्यक्त करताना मला शब्द सुचत नाहीत! गेल्या पाच वर्षांपासून आम्ही ह्या मोहिमेची तयारी करत होतो आणि नेमकी हि मोहीम पूर्णत्वास येण्याचा वेळेस अमेरिकेतच नाही तर सर्व जगातच कोरोनान थैमान घातलय त्याचा संसर्ग रोखण्यासाठी जाहीर झालेल्या लॉक डाऊन आणि work at home मुळे निर्बंध आले अत्यंत कमी व अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ह्या मोहिमेची अंतिम तयारी पूर्ण करावी लागली आणि आमच्या टीममधल्या कर्मचाऱ्यांनी लॉक डाऊनची कडक अंमल बजावणी करत ह्या कठीण काळातही अत्यंत कुशलतेने
 हे काम पूर्णत्वास नेलेल पाहून मीही क्षणभर अचंबित झाले ह्या मोहिमेचे यश पाहून आमचा उत्साह वाढला आहे
आगामी काळात ह्या अंतराळ मोहिमेला आणखी यश मिळेल यात शंका नाही
ह्या Space X Dragon चा उपयोग अंतराळवीरांना अंतराळस्थानकात जाण्यासाठी आणि परत आणण्यासाठी होईल इतर देशातील अंतराळवीरांसाठीही ह्या अंतराळयानाचा व्यावसायिक उपयोग केल्या जाणार आहे
ह्या अंतराळवीरांच्या ऐतिहासिक उड्डाणाचे लाईव्ह प्रक्षेपण नासा t.v. आणि सोशल मीडियावरून करण्यात आले होते लॉक डाऊन मुळे प्रत्यक्ष तिथे जाऊ न शकणाऱ्या अमेरिकन नागरिकांनी ह्या संधीचा लाभ घेतला शिवाय लाईव्ह चॅट चीही संधी उपलब्ध असल्याने अनेकांनी आपल्या शंकांचे निरसन प्रश्न विचारून केले ह्या मोहिमेआधी नागरिकांसाठी नासा संस्थेने # launch America हि मोहीम राबवण्यात आली त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेकांनी गण्याचा व्हिडिओ पाठवून आपल्या भावना व्यक्त केल्या

 
 Launching साठी जाण्याआधी सर्वांचा निरोप घेताना अंतराळवीर Robert आणि अंतराळवीर Douglas Hurley
फोटो -नासा संस्था
जाता जाता अंतराळवीरांनी Space X च्या आतील भागाचे दर्शन घडविले आणि पत्रकार परिषदेत त्यांच्या यानाला त्यांनी कुठले नाव देण्याचे ठरवलेय असे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तरही दिले त्या वेळेस त्यांनी ह्या नावाचे सरप्राईझ आम्ही लाँचिंगच्या वेळेस देऊ अस सांगितल होत त्यांनी त्यांच्या यानाला Endeavor असे नाव ठेवल्याचे सांगितले